दुष्टांची भरभराट का होते?
“दुष्ट का जिवंत राहतात?” विश्वासू ईयोबाने हा प्रश्न खूप वर्षांपूर्वी विचारला होता, आणि त्याच्या दिवसापासून तो पुनःपुन्हा विचारला जातो. बहुधा तो पूर्वीच्या युगोस्लाविया क्षेत्रात राहणाऱ्या अनेक लोकांच्या (आमच्या नियतकालिकेच्या मुखपृष्ठावर दर्शविलेल्या स्त्रीच्या चेहऱ्यावर दिसत असल्याप्रमाणे) मनात असेल जे शोकांतिक युद्ध सहन केलेल्यांसाठी दुःख करतात. दुष्ट लोक का वाचतात, आणि त्यांची का भरभराट होते? ईयोबाने नोंद घेतल्याप्रमाणे, अनेकदा “त्यांची घरे सलामत व निर्भय असतात, देवाचा दंड त्याजवर पडत नाही.”—ईयोब २१:७, ९.
मग याचा अर्थ असा होतो का देवाची सेवा करण्याला, शेजाऱ्यावर प्रीती करण्याला व वाईट गोष्टी करण्यापासून दूर राहण्याला काहीच मूल्य नाही? मुळीच नाही! बायबल आम्हाला याविषयीची योग्य समज देते. ते म्हणते: “दुष्कर्म्यांवर जळफळू नको; अन्याय करणाऱ्यांचा हेवा करू नको. कारण ते गवताप्रमाणे लवकर कापले जातात, हिरवळीसारखे वाळून जातात. परमेश्वरावर भाव ठेव व सदाचाराने वाग.”—स्तोत्र ३७:१-३.
होय, दुष्टांची स्पष्ट दिसणारी भरभराट तात्पुरती आहे. वास्तविक पाहता, त्यांची जीवनमर्यादा अतिशय कमी आहे, परंतु देवाची सेवा करणाऱ्यांना भवितव्यासाठी भव्य आशा आहे. लवकरच, देवाचे अभिवचन पूर्ण होईल: “[देव] त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील, ह्यापुढे मरण नाही, शोक, रडणे, व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” (प्रकटीकरण २१:४) दुष्ट नव्हे तर केवळ धार्मिक तो काळ पाहतील. आमच्या आजूबाजूला कितीही दुष्ट असले तरी, देवाच्या समीप जाणे व त्याची इच्छा पूर्ण करण्याचे शिकण्यासाठी हे किती उत्तेजनकारक आहे!
तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास, किंवा तुमच्या घरी कोणी येऊन तुमच्यासोबत मोफत गृह बायबल अभ्यास करण्याची तुमची इच्छा असेल तर, कृपया Watch Tower, H-58 Old Khandala Road, Lonavla 410401, Mah., India, किंवा पृष्ठ २ वर दिलेल्या योग्य पत्त्यावर लिहा.