तुम्ही तुमच्या मुलाला यहोवाची निवड करण्यास मदत करीत आहात का?
“मला वाटले की, बायबलचा अभ्यास करणे खरोखर कंटाळवाणे आणि त्रासदायक आहे. मी मोठा झाल्यावर यहोवाचा साक्षीदार होणार नाही हे मी गुप्तपणे माझ्या मनात ठरवले,” असे एका तरुणाने म्हटले. ख्रिस्ती घरातील बहुतेक मुले यहोवाच्या बाजूने उभे राहण्याचा पावित्रा निवडतील अशी आशा केली असली तरी, या तरुणासारख्या इतर तरुण जणांना यहोवाला त्यांचा देव म्हणून स्वीकारण्यास कठीण जात असेल.
पालकांना काहीवेळा त्यांच्या मुलांना प्रभावकारी मार्गदर्शन कसे द्यावे याचीच खात्री नसते. ते त्या उत्सुक पित्याप्रमाणे पुष्कळ आत्म-परीक्षण करतात ज्याने एकदा असे म्हटले: “प्रामाणिकपणे तुम्हाला सांगायचे झाल्यास, पुष्कळ वेळा मी माझ्या झोपलेल्या मुलांचे चेहरे पाहिले, त्यांच्या गालांवर अजूनही निराशेचे अश्रू होते. तेव्हा मी विचार करायचो की मी आणखी जरा दयाळू का झालो नाही.” त्याचे दोन मुलगे मोठे झाले आणि त्यांनी यहोवाची सेवा करण्याचे निवडले.
तरीही, आज अनेक तरुण आहेत जे यहोवाचा त्याग करतात व सैतानी जगात जाण्यासाठी ख्रिस्ती संघ सोडतात. यास्तव पालक त्यांच्या मुलांना यहोवाची निवड करण्यास मदत देण्यासाठी कशाप्रकारे यशस्वी होतात? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी आपण पहिल्यांदा हे शोधून काढूया की, जरी पालकांना तीव्रपणे वाटत असते की त्यांच्या मुलांनी त्यांच्यासोबतच राहावे तरीही काही युवक यहोवाचा त्याग का करतात.
काही युवक यहोवाचा त्याग का करतात
काही युवक यहोवा किंवा त्याचे मार्ग वास्तविकतेत जाणून घेत नाहीत हे सर्वाधिक कारणातील एक सर्वसामान्य कारण आहे. बालपणापासून ख्रिस्ती सभांना उपस्थित राहत असले तरी ते केवळ गेले पाहिजे म्हणून जातात व यहोवाचा खरेपणाने शोध करत नाहीत. (यशया ५५:६; प्रेषितांची कृत्ये १७:२७) वर उल्लेखलेल्या मुलाला ख्रिस्ती सभा कंटाळवाण्या वाटत होत्या कारण व्यासपीठावरून वक्ते जे काही बोलतात त्यातले त्याला काहीच समजत नव्हते.
सत्याचे बीज काही मुलांमध्ये रोवले जाते परंतु ती मुले आपल्या मनाला, सैतानाच्या जगातील स्वच्छंद व भौतिक जीवन पद्धतींची भुरळ पाडू देतात. काहीजण समवयस्कांसोबत संगती राखण्याच्या व त्यांच्यासारखे होण्याच्या तीव्र इच्छेला यशस्वीरीत्या लढा देऊ शकत नाहीत.—१ इतिहास २८:९; लूक ८:१२-१४; १ करिंथकर १५:३३.
परंतु, संपूर्ण जगभरात ख्रिस्ती घरातील अनेक मुलांनी यहोवाच्या बाजूने उभे राहण्यास निवडले आहे. त्यांच्या पालकांनी जी सकारात्मक पावले उचलली त्यातून काही शिकायला मिळते का?
लवकर सुरवात करा
तुमच्या मुलांना यहोवाची निवड करण्याची मदत करण्यास महत्त्वाची गुरूकिल्ली म्हणजे, लवकर सुरवात करा. अनेकांच्या बाबतीत कोवळे व ग्रहणक्षम हृदय असताना त्याच्यावर जो ठसा उमटविला जातो व जे धडे शिकवले जातात ते जीवनभर टिकतात. (नीतीसूत्रे २२:६) यास्तव, तुमच्या मुलांना यहोवाच्या चांगुलपणाबद्दल, त्याची प्रीती आणि भयजनक गोष्टींविषयी लहानपणापासूनच सांगण्यास सुरवात करा. यहोवाबद्दल आणि त्याने त्यांच्यासाठी जे काही केले आहे त्याबद्दलची त्यांच्या हृदयात गुणग्राहकता वाढवण्याचा प्रयत्न करा. हे साध्य करण्यासाठी, अनेक पालकांनी वॉचटावर संस्थेच्या प्रकाशनांमधील यहोवाच्या निर्मितीबद्दलच्या विपुल लेखांचा यशस्वीरीत्या उपयोग केला आहे.
यहोवा आणि त्याच्या उपासनेसाठी आज्ञाधारकता व आदर हे त्या इतर गुणांमधील आहेत जे जीवनाच्या सुरवातीपासूनच बिंबवले पाहिजेत. शाळेत अद्याप दाखल न झालेल्या मुलांना, ख्रिस्ती सभांमध्ये छोट्या नोंदी घेताना व स्वतःच्या बायबलमधून शास्त्रवचने उघडून पाहण्याचा प्रयत्न करताना किंवा पेंग आल्यावर पालकांसोबत थंड पाण्याने तोंड धुण्यास जाताना पाहणे किती आनंदविणारे आहे. या अगदी साध्या गोष्टी आहेत, परंतु यहोवाला आदर व आज्ञाधारकता दाखवली पाहिजे हे त्या कोवळ्या मनावर ठसवणे किती महत्त्वपूर्ण आहे!
गंभीर व्यक्तिगत बायबल प्रशिक्षणाची देखील सुरवात लवकर झाली पाहिजे. एका जोडप्याने, त्यांचे दोन मुलगे दोन वर्षांचे होते तेव्हापासून थोर शिक्षकाचे ऐका या पुस्तकाचे वाचन चालू केले.a पुढे ही मुले मोठी झाली तेव्हा ते पहाटेच उठून दररोज त्यांच्या आईसोबत बायबलच्या कथांचं माझं पुस्तक व तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाळ जगू शकाल या पुस्तकांचा अभ्यास करत असत.* यानंतर न्याहारीआधी त्यांचे बाबा, दिवसाच्या शास्त्रवचनाची चर्चा करत असत. या पालकांच्या प्रयत्नाला समृद्ध प्रतिफळ मिळाले. त्यांच्या या मुलांनी, अलिकडेच वयाच्या १० आणि ११ व्या वर्षी त्यांच्या समर्पणाचे प्रतीक म्हणून पाण्याने बाप्तिस्मा घेऊन यहोवाची सेवा करण्याचे निवडले.
जपान येथील वॉचटावर संस्थेच्या शाखा दप्तरात सध्या काम करणारा एक तरुण आठवून सांगतो की तो लहान असताना, त्याच्या आईने त्याला यहोवासोबत नातेसंबंध वाढवण्यास मदत केली. रात्री ती त्याच्या शेजारी बसून त्याला प्रार्थना करावयास मदत करत असे. तो कोठेही गेला किंवा काहीही करत असला, तरी हा धडा कधीच विसरला नाही की, यहोवा नेहमी त्याच्या जवळ त्याला मदत करण्यास तत्पर होता.
यशस्वी पालक त्यांच्या मुलांच्या, वारसाने मिळालेल्या अपूर्णत्वामुळे होणाऱ्या चुकीच्या प्रवृत्तींना ओळखून त्यांना दुरूस्त करण्यासाठी त्यांच्या मुलांना लवकर मदत देण्यास सुरवात करतात. (नीतीसूत्रे २२:१५) स्वार्थीपणा, हट्टीपणा, गर्व, इतरांची अतिशय टीका करणे यासारख्या प्रवृत्तींवर वेळीच आळा घातला पाहिजे. नाही तर, अशाप्रकारचे बीज पुढे देव आणि त्याच्या मार्गांविरूद्ध बंड करण्याप्रत वाढतील. उदाहरणासाठी, चांगला हेतू असणारे परंतु फाजिल लाड पुरवणारे पालक बहुधा, त्यांच्या मुलांमध्ये स्वार्थी प्रवृत्ती वाढू देतात. अशाप्रकारच्या मुलांना त्यांच्या पालकांचा किंवा यहोवाचा आदर करण्यास कठीण वाटते. बायबलमध्ये उल्लेखलेल्या त्या ‘कृतघ्न’ व्यक्तिसारखे ते होतात. (नीतीसूत्रे २९:२१, NW) दुसऱ्या बाजूला पाहता, ज्या मुलांना घरी लहानसहान कामे करावयास दिली जातात व इतरांच्या गरजांबद्दल जागृत राहण्यास शिकवले जाते ती मुले, पालक आणि यहोवा या दोघांठायी कृतज्ञता व्यक्त करण्यास प्रवृत्त होतात.
दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी की एखादे मूल साध्य करू शकेल अशी ईश्वरकृत ध्येये त्याच्यासमोर ठेवण्यास बालपणापासूनच सुरवात करावी. असे जर लहानपणीच व नित्याने केले नाही तर, इतर त्याचे मन आणि हृदय वेगळ्या ध्येयांनी व्यापून टाकतील. सुरवातीपासून शेवटपर्यंत बायबल वाचणे, वॉचटावर संस्थेच्या एखाद्या प्रकाशनाचा व्यक्तिगत अभ्यास करणे, ईश्वरशासित सेवा प्रशालेत नाव नोंदवणे, सुवार्तेचा उद्घोषक होणे व बाप्तिस्मा घेणे या सर्व गोष्टी त्या ध्येयांमध्ये समाविष्ट असल्या पाहिजेत.
तॉकफूमी आठवण करून सांगतो की, त्याची आई तो शाळेतून घरी आल्यावर तिने काढून ठेवलेल्या साध्या प्रश्नांची उत्तरे त्याने स्वत:हून शोधून काढावित म्हणून ते जेवणाच्या टेबलावर ठेवत असे. अशाप्रकारे तिने त्याला वॉचटावर व अवेक! नियतकालिके वाचण्याची सवय लावली. युरीला आठवते की, ख्रिस्ती सेवकांची अधिक गरज आहे तेथे काम करणाऱ्या पायनियरांसोबतb काही दिवस राहिल्यामुळे, त्यांच्यासोबत क्षेत्रसेवेत गेल्याने, स्वादिष्ट जेवण बनवताना त्यांचे निरीक्षण केल्यावर, व त्यांचा आनंद आणि आवेश पाहिल्यावर तिनेही याचप्रकारे यहोवाची सेवा करावी या तिच्या इच्छेवर अतिशय प्रभाव पडला. पुष्कळ तरुण आठवून सांगतात की, त्यांच्या पालकांनी नियमितरीत्या, वॉचटावर संस्थेचे मुख्यालय आणि शाखा दप्तर ज्याला बेथेल असे म्हटले जाते तेथे आणले जेणेकरून ते यहोवाची सेवा आनंदाने करणाऱ्या इतर तरुण पुरूष आणि स्त्रियांना पाहू शकले. लहान असताना ज्यांनी भेटी दिल्या होत्या त्यांच्यातील पुष्कळ जण आता संपूर्ण जगभरातील बेथेलमध्ये काम करत आहेत.
तुमच्या मुलांना तुमचा वेळ द्या
तुमच्या मुलांसोबत तुम्ही जितका व ज्याप्रकारचा वेळ घालवता त्याचा, यहोवाची सेवा करण्याच्या किंवा न करण्याच्या त्यांच्या निवडीवर थेट परिणाम होऊ शकतो. तुम्ही त्यांच्यासोबत बायबल अभ्यास करण्यात किती वेळ व तयारी खर्च केलीत ती त्यांना लगेच कळते. जर तुम्हाला मागच्या वेळेस तुम्ही तुमचा अभ्यास कोठपर्यंत संपवला होता हे आठवत नसेल किंवा तुम्ही तुमचा अभ्यास काही क्षुल्लक कारणांसाठी रद्द करता, तर त्यातून हेच निष्पन्न होईल की अभ्यास इतका महत्त्वपूर्ण नाही. परंतु, जेव्हा ते त्यांच्या पालकांना अभ्यासासाठी सर्व गोष्टींचा त्याग करताना, त्याची उत्तम तयारी करून, काहीही झाले तरी नियमितपणे अभ्यास चालवताना पाहतात तेव्हा त्यातून एक वेगळाच संदेश दिला जातो. असेच केले पाहिजे अशी कोणतीही अट नसली तरी, काही माता त्यांच्या मुलांना, त्यांच्या अभ्यासाला बसण्याअगोदर, सभांना जाताना किंवा शेजाऱ्याच्या घरी बायबल अभ्यासाला जाताना ज्याप्रकारे तयार होतो त्याप्रकारचा पेहराव घालून तयार करतात. यामुळे त्यांच्यावर हाच प्रभाव होतो की यहोवाची उपासना महत्त्वपूर्ण आहे.
तुमच्या मुलांचे बायबल शिक्षण आवडणारे बनवण्यास व त्यांच्या हृदयाप्रत पोहंचण्यास पुष्कळ वेळ आणि प्रयत्नाची गरज लागेल. शिकलेल्या गोष्टींचा लहान मुलांसमोर अभिनय करून दाखवण्यामुळे त्यांच्यावर विशेषतः अधिक परिणाम होतो. उदाहरणार्थ, एका पित्याने त्याच्या मुलांना, बायबल मधील लाजरच्या पुनरूत्थानाच्या अहवालाचा अभिनय करून त्याची कल्पना करण्यास मदत केली. तो कपडे अडकवण्याच्या लहानशा खोलीत गेला आणि मग पुनरूत्थित लाजराप्रमाणे बाहेर आला.—योहान ११:१७-४४.
मुले जसजशी प्रौढत्व गाठू लागतात, तसतसे ते सामना करत असलेल्या भावना, संशय, आणि चिंतेच्या पूराला बांध घालण्यासाठी याहूनही अधिक वेळ आणि हुन्नर लागते. मुलांनी यहोवावर भाव वाढवण्यास हवा तर या स्थितीत प्रेमळ व सूक्ष्मदृष्टी असलेल्या पालकांनी वेळ बाजूला काढणे अतिशय महत्त्वाचे आहे. चार मुले असलेल्या एका यशस्वी पित्याने कथन केले की, त्याची मुले विविध समस्यांचा सामना करत असताना तो, वॉचटावर प्रकाशनांमध्ये त्याजशी संबंधित असलेल्या विषयांचा शोध करून त्या समस्या पूर्णपणे सोडविल्या जात नाहीत तोपर्यंत त्यांची चर्चा दररोज करत असे.
पायनियर सेवेत व्यग्र असलेल्या दोन मुलांच्या आईला, तिची मुलगी दूर बहकत चालली आहे व तिला ईश्वरशासित कार्यांमध्ये काहीच आनंद नाही असे दिसून आले. यास्तव तिने निश्चय केला की, तिची मुलगी दुपारी शाळेतून घरी येईल तेव्हा ती घरात राहील व चहा घेत असताना तिला संभाषणात सामील करील. मायलेकीच्या या जवळीकीच्या संभाषणाद्वारे, त्या मुलीला हवी ती मदत प्राप्त झाली. आता, विद्यालयातून पदवी मिळाल्यानंतर, ही मुलगी तिच्या आईसोबत पायनियर सेवेत आहे.—नीतीसूत्रे २०:५.
चांगली संगती व उदाहरण
मुलांसाठी त्यांचा वेळ खर्च करण्यासोबत, पालकांनी त्यांच्या अपत्याला हितकारक संगती देखील पुरवली पाहिजे. नीतीसूत्रे १३:२० (NW) म्हणते: “सुज्ञांची सोबत धरणारा सुज्ञ होईल, परंतु मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.”
अनेक यशस्वी पालकांनी या म्हणीतील सत्य ओळखले आहे. चार मुलांचा एक पिता म्हणतो: “गतकाळातील गोष्टींचा मी विचार करतो तेव्हा, आमच्या मुलांची संगत सत्यामधील मुलांसोबतच असल्यामुळे यहोवाची सेवा करण्यास ते प्रवृत्त झाले असे मला वाटते. मी त्यांना आमच्या तसेच इतर मंडळीतील मुलांबरोबर मैत्री करून ती टिकवण्याचे उत्तेजन दिले.” अनेक वर्षांपासून बेथेलमध्ये काम करणाऱ्या एका ख्रिस्ती वडिलाने जुन्या आठवणीविषयी म्हटले: “मी तरुण असताना, आम्ही एका लहानशा घरात राहात होतो. तरीही विभागीय पर्यवेक्षकांच्या राहण्याची व्यवस्था नेहमीच आमच्या घरात होत असे. शिवाय, आमच्या मंडळीतील खास पायनियर आमच्यासोबत नियमित भोजन करण्यासाठी येत. ते आमच्या घरी आंघोळ करत व आमच्यासोबत सहवास ठेवत. त्यांचे अनुभव ऐकून व त्यांचा आनंद पाहून मला पूर्णवेळेच्या सेवेबद्दल गुणग्राहकता वाढवण्यास मदत मिळाली.”
कठीण परिस्थितीतून गुजरणाऱ्यांना चांगली सोबत साहाय्य करते. एका मातेने, तिचा मुलगा बिकट परिस्थितीत असताना त्याची समस्या यहोवाच्या साक्षीदारांच्या एका प्रवासी पर्यवेक्षकाबरोबर चर्चिली. मुलाला क्षेत्र सेवेत तिच्यासोबत घेऊन जाण्याची त्याने शिफारस केली. “असे केल्याने त्याची आध्यात्मिकता आणि सर्व काही सुधारेल,” असे पर्यवेक्षकांनी म्हटले. ती कळवते: “आमच्या मंडळीत संध्या साक्षकार्याची व्यवस्था होती आणि शाळेला जाणारी पुष्कळ मुले, इतर अनेक वृद्ध नियमित पायनियर आणि निदान एखादे वडील यात भाग घेत. सुरवातीला माझ्या मुलाला नियमितरीत्या पाठवणे अतिशय कठीण होते, परंतु मग या हितकारक संगतीमुळे तो पूर्वीपेक्षा अधिक आनंदी व उत्साहित होऊन घरी येई. विद्यालयात असताना, त्याने बाप्तिस्मा घेतला आणि प्रत्येक महिन्याला साहाय्यक पायनियर म्हणून कार्य केले. पदवीधर झाल्यावर तो एक नियमित पायनियर बनला.” यहोवाची इच्छा करण्यासोबत हितकारक संगत ठेवल्याने उत्तम प्रतिफळ मिळाले.
तुमच्या मुलावर हितकारक परिणाम करणारे स्थानिक तरुण नसतील, परंतु यहोवाची सेवा करण्याचे निवडलेल्या अनेक तरुणांच्या वारंवार केलेल्या पाहणीत असे दिसून आले की त्यांच्या निणर्यात त्यांच्या पालकांच्या उदाहरणाची भागीदारी आहे. पुष्कळ युवकांनी त्यांच्या पालकांचे कौतुक केले व त्यांचे अनुकरण करू इच्छित होते. युरीला तिच्या आईचा आदरातिथ्य, ती इतरांची कशी काळजी घेई, टेलिफोनद्वारे त्यांच्याशी बोले, व दुखणाईतांसाठी जेवण बनवे, ते सर्व आठवते. चार मुले असणाऱ्या एका कुटुंबातील तत्सुओ हा एक सदस्य होता. ती सर्व मुले आता मोठी होऊन यहोवाची सेवा करत आहेत. तत्सुओने म्हटले: “आई आमच्याबरोबर नियमितपणे अभ्यास करू शकत नव्हती कारण आमचे वडील ख्रिस्ती विश्वासात नव्हते. तिला नातेवाईकांकडून विरोध होता. परंतु सत्यासाठी तिने घेतलेला पावित्रा व यहोवाची सेवा करण्यात तिला जो आनंद मिळत होता याचा माझ्यावर खूपच परिणाम झाला. आमच्या समस्यांना सोडवण्यासाठी ती पहाटेपर्यंत जागी राहू इच्छित होती.” विश्वासू कार्यांचा आधार असलेल्या बुद्धिमान पालकीय शब्दात सामर्थ्य असते. योचिरो त्याच्या पालकांबद्दल असे म्हणतो: “मंडळीतील इतरांबद्दल त्यांनी कधीही नकारात्मक विचार व्यक्त केलेले किंवा आम्हा मुलांना इतरांबद्दलच्या चुकांची चुगली करण्यास परवानगी दिल्याचे मला आठवत नाही.”—लूक ६:४०-४२.
मुले यहोवाची निवड करत असलेले पाहण्यास आनंद
तुमच्या मुलांना यहोवाची निवड करण्यास मदत करण्याविषयीचे फसगत करणारे कोणतेही नियम नाहीत. काही वेळा अनेक चिन्तातुर क्षण असतील. परंतु पूर्वी उल्लेखिलेल्या चिंताक्रांत पित्याने म्हटले: “पालक या नात्याने आम्ही यहोवाची दृश्य संस्था ज्या सूचना पुरवते त्या काटेकोरपणे अनुसरण्याचा प्रयत्न केला. ही, समस्यांवर मात करण्यासाठी फारच मोठी मदत ठरली.” त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले.
बायबल सूचनांचे पराकाष्ठेने अनुकरण केल्याने, तसेच तुमच्या मुलांना तुमचे विश्वासू उदाहरण आणि मदत करण्याच्या तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांसहित यहोवावर प्रीती करण्याची विश्वसनीय कारणे दिल्याने, कालांतराने तुमच्या प्रयत्नांना यशाने सुशोभित केलेले तुम्हालासुद्धा दिसून येईल. यहोवाचा साक्षीदार न होण्याचा निश्चय केलेल्या त्या तरुणाची तुम्हाला आठवण आहे का? त्याच्या आईने त्याला त्याच्या कठीण वर्षांमध्ये यशस्वीरीत्या मदत केल्यानंतर त्याने म्हटले: “तिने मदत करण्याचे सोडून दिले नाही याबद्दल मला आनंद वाटतो!” तुम्हालाही तुमच्या मुलांच्याबाबतीत असाच परिणाम दिसून येईल.—गलतीकर ६:९.
[तळटीपा]
a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क, इंका.ने प्रकाशित केले आहे.
b यहोवाच्या साक्षीदारांच्या पूर्णवेळेच्या सेवकांना पायनियर असे म्हटले जाते. एक साहाय्यक पायनियर प्रत्येक महिन्याला सेवेत जवळजवळ ६० तास, नियमित पायनियर ९० तास आणि खास पायनियर १४० तास खर्च करतो.
[चित्र]
मुलांच्या संगोपनाच्या गोड आठवणींकडे तुम्ही मागे वळून पाहू शकता का?