वाचकांचे प्रश्न
मानवी रक्तातील अल्ब्युमिनचा अंश असलेले वैद्यकीय इंजेक्शन किंवा लस स्वीकारणे उचित ठरेल का?
स्पष्टच सांगायचे तर, प्रत्येक ख्रिश्चनाने याबद्दल व्यक्तिगत विचार केला पाहिजे.
देवाच्या सेवकांना प्रेषितांची कृत्ये १५:२८,२९ मध्ये रक्तापासून दूर राहा, या अधिकृत सूचनेचे योग्यरितीने पालन करावयास हवे. यामुळेच ख्रिश्चन, रक्तमय मांस किंवा रक्ताचे सॉसेज यासारखे पदार्थ खाणार नाहीत. परंतु देवाचा नियम वैद्यकीय क्षेत्रात देखील लागू होतो. यहोवाचे साक्षीदार रक्त नाकारत असण्यासंबंधीचा ऐवज बाळगतात. त्यामध्ये ते ‘रक्त संक्रमण, संपूर्ण रक्त, लाल पेशी, पांढऱ्या पेशी, रक्त बिबिंका, किंवा प्लाझ्मा’ यांना नाकारतात, असे नमूद केलेले आहे. तथापि, रक्तातील पोषक द्रव्यातील अल्प अंश असलेल्या सीरम् इंजेक्शनबद्दल काय?
साक्षीदारांना याची पूर्णपणे जाणीव आहे की, हा प्रत्येकाच्या बायबल प्रशिक्षित विवेकानुसार त्यांचा खाजगी निर्णयाचा मुद्दा आहे. हे द वॉचटावर जुन १, १९९० मधील “वाचकांचे प्रश्न” या सदराखाली स्पष्ट केले होते. ज्यामध्ये एखाद्यास विशिष्ट रोगाची लागण झाल्यास सीरम इंजेक्शनचा सल्ला डॉक्टर देऊ शकतात याची चर्चा करण्यात आली होती. रक्त प्लाझ्मा स्वतः अशाप्रकारच्या इंजेक्शन्स् मधील कार्यकारी घटक नसून; ज्यामध्ये प्रतिकार करण्याची क्षमता विकसित झाली आहे त्यांच्या रक्त प्लाझ्मातील प्रतिद्रव्य आहे. आपण अशी इंजेक्शन्स् घेऊ शकतो असे वाटणारे काही ख्रिश्चन ती चांगल्या विवेकाने स्वीकारतात. त्यांनी याची नोंद घेतली की, गर्भवती स्त्रीच्या गर्भशयातील अर्भकास तिच्या रक्तातील प्रतिद्रव्यांचा पुरवठा होतो. “वाचकांचे प्रश्न” या सदराने वरील प्रमाणे तसेच गर्भवती स्त्रीपासून काही अल्ब्युमिन बाळापर्यंत नेले जाते हे नमूद केलेले आहे.
पुष्कळांना हे विलक्षण वाटते की, रक्त विरहित लशींमध्ये तुलनात्मकरित्या काही प्रमाणात प्लाझ्मा अल्ब्युमिन असू शकते आणि ते, लशी तयार करण्यासाठी वापरात येणाऱ्या मिश्रणाच्या घटकांमध्ये स्थिरता आणण्यासाठी वापरले किंवा त्यात टाकले जात होते. अलिकडे, संयोगक्रियेद्वारे तयार केलेले संप्रेरक ईपीओ (एरीओपॉईटीन) इंजेक्शन्स्मध्येसुद्धा अल्ब्युमिनचा काही प्रमाणात वापर केला जातो. लाल पेशींची वाढ जलदरीतीने होऊ शकते; यासाठी काही साक्षीदार ईपीओ इंजेक्शन्स् स्वीकारतात आणि म्हणूनच रक्त संक्रमण आवश्यक आहे या डॉक्टरांच्या विचारापासून ते मुक्त होऊ शकतात.
औषध निर्माण करणारे कारखाने नवीन घटक किंवा सूत्रातील फेरफार विकसित करत असल्यामुळे भविष्यामध्ये तुलनात्मकरित्या अल्ब्युमिनचे अल्प प्रमाण असलेले इतर वैद्यकीय औषधे वापरात येऊ शकतील. अल्ब्युमिन हा लशीचा किंवा डॉक्टरने मान्य केलेले इतर इंजेक्शनचा भाग आहे याविषयी खिस्ती विचार करतील. अल्ब्युमिन हा त्याचा घटक आहे असा त्यांना संशय असेल किंवा तसा विश्वास करण्यासाठी कारण असल्यास, ते त्यांच्या डॉक्टरांकडे विचारपूस करु शकतात.
नमूद केल्याप्रमाणे, अनेक साक्षीदारांनी अल्ब्युमिनचे अल्प प्रमाण असलेले इंजेक्शन स्वीकारण्यास आक्षेप घेतलेला नाही. तरीसुद्धा, कोणास व्यक्तिगत निर्णय घेण्यापूर्वी या संदर्भात अधिक विस्तृत माहिती हवी असल्यास जुन १, १९९० द वॉचटावर मधील “वाचकांचे प्रश्न” या सदराखाली नमूद केलेल्या माहितीची त्याने उजळणी करावी.