वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ९/१ पृ. ३-५
  • उत्क्रांतीची न्यायचौकशी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • उत्क्रांतीची न्यायचौकशी
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • विरोधात्मक साक्ष
  • उत्क्रांती ही बौद्धिक निवड आहे का?
  • विश्‍वासाची बाब
  • उत्क्रांतीवादाचा बायबलशी मेळ बसतो का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • देवाने उत्क्रांतीद्वारे सजीव सृष्टीची निर्मिती केली का?
    सावध राहा!—२००६
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ९/१ पृ. ३-५

उत्क्रांतीची न्यायचौकशी

वचनबद्ध उत्क्रांतीवादी आता, आरडाओरडा करून अवयवयुक्‍त उत्पत्तीची पुनर्तपासणी करण्याची मागणी करत आहेत

तुम्ही गुन्हेगारीच्या न्यायचौकशीत एक विधिवेत्ता आहात अशी कल्पना करा. प्रतिवादी त्याची निर्दोषता उघडपणे कबूल करतो, आणि त्याच्यावतीने साक्ष देणारे साक्षीदार पुढे येतात. परंतु, त्यांची साक्ष ऐकताना तुमच्या निदर्शनास येईल की, प्रत्येक साक्षीदार परस्पर विरोधात आहे. मग, बचावाच्या साक्षीदारांना, साक्षीदार पिंजऱ्‍यात जाऊन उभे राहण्यास सांगितले जाते तेव्हा, त्यांची साक्ष बदलते. विधिवेत्ता या नात्याने, तुम्ही त्यांनी दिलेल्या साक्षीला महत्त्व द्याल का? दोषी असलेल्याला दोषमुक्‍त करण्यास तुम्ही प्रवृत्त व्हाल का? बहुधा नाहीच, कारण प्रतिवाद्याकडून दिलेल्या साक्षीत जर काही विसंगती असेल तर ती, प्रतिवाद्याची विश्‍वसनीयता दुर्बळ करते.

हीच स्थिती उत्क्रांतीच्या सिद्धांताची आहे. उत्क्रांतीच्या सिद्धांताचे समर्थन करण्याकरता जीवनाच्या उगमाच्या विविध गोष्टी सांगण्यासाठी, साक्षीदारांचा एक लोंढा पुढे आला आहे. परंतु त्यांनी दिलेल्या साक्षीचा जवळून अभ्यास केल्यावर ती विश्‍वसनीय शाबीत होईल का? उत्क्रांतीच्या सिद्धांताला उंचावून धरणारे एकवाक्यतेत बोलणी करतात का?

विरोधात्मक साक्ष

जीवनाची सुरवात कशी झाली? कदाचित, विचार करण्यास प्रवृत्त करणारा व वादविवाद पेटवणारा या प्रश्‍नासारखा आणखी दुसरा प्रश्‍न नाही. तरीही हा वादविवाद केवळ उत्क्रांती विरूद्ध निर्मिती इतकाच नाही. उत्क्रांतीवाद्यांमध्येच बराचसा वाद होतो. खरे पाहता, उत्क्रांतीची सविस्तर माहिती, म्हणजे ते कसे घडले, त्याची सुरवात कोठे झाली, त्याला कोणी व कशी सुरवात केली आणि त्या प्रक्रियेला किती काळ लागला हे सर्व विषय तीव्र वाद माजवतात.

अनेक वर्षांपासून उत्क्रांतीवाद्यांनी असा दावा केला की, जीवनाची सुरवात कोमट कार्बनी “रसात” झाली. आता काही जण असा विश्‍वास बाळगतात की, महासागरातील फेसाने जीवनाची सुरवात केली असावी. समुद्राखालच्या उष्णोदकाच्या नैसर्गिक फवाऱ्‍यात कदाचित जीवनाची सुरवात झाली असावी असे काही शास्त्रज्ञांनी सुचवले. काही असे गृहीत धरतात की, पृथ्वीवर उतरलेल्या उल्कांसोबत अवयवयुक्‍त जीव आले. किंवा इतर असे म्हणतात की कदाचित, लघुग्रह पृथ्वीवर येऊन धडकल्यामुळे वातावरणात काही बदल झाला आणि त्यातूनच जीवनाची सुरवात झाली. “जर एक मोठा लोखंडी लघुग्रह पृथ्वीला थडकला तर पुष्कळ आश्‍चर्यकारक गोष्टी होतील,” असे एक संशोधक म्हणतो.

जीवनाच्या सुरवातीच्या स्वरूपावरही पुनर्विचार केला जात आहे. “जीवन हे, एकेकाळी गृहीत धरल्याप्रमाणे शांत, सौम्य परिस्थितीत मुळीच उद्‌भवले नाही. तर ते ज्वालामुखी स्फोट व धूमकेतू आणि लघुग्रहाच्या धोक्याच्या यातना भोगीत असलेल्या नरकतूल्य आकाशाखालच्या ग्रहावर उद्‌भवले,” असे टाईम मासिक सुचविते. अशा गोंधळाच्या स्थितीत जीवनाचा क्रमविकास होण्याच्या क्रियेला पूर्वी विचार केला होता त्यापेक्षा फारच कमी वेळ लागला असावा, असे काही शास्त्रज्ञ आता म्हणतात.

जीवनाच्या सुरवातीच्या बाबतीत देवाची—“जर देव अस्तित्त्वात आहे” तर—काय भूमिका आहे यावरही शास्त्रज्ञांचे विविध मत आहे. काही म्हणतात की, निर्माणकर्त्याने हस्तक्षेप न करताच जीवनाचा क्रमविकास झाला, तर इतर म्हणतात की देवाने या प्रक्रियेची सुरवात केली आणि मग उत्क्रांतीद्वारे त्याची वाढ होण्यास सोडून दिले.

जीवनाची सुरवात झाल्यावर उत्क्रांती कशी घडली? येथेही, गोष्टींमध्ये विरोधात्मक विचार दिसतात. १९५८ मध्ये, जातींची उत्पत्ती (इंग्रजी) या पुस्तकाचे प्रकाशन होऊन एका शतकानंतर, उत्क्रांतीवादी सर जुल्यन हक्सले स्पष्ट सांगतात: “डार्विनचा सर्वात मोठा शोध, म्हणजेच नैसर्गिक निवडीचे सार्वत्रिक तत्त्व, मोठ्या क्रमविकासाच्या परिवर्तनाला कारणीभूत आहे असे दृढपणे आणि एकदाचेच स्थापित केले आहे.” परंतु, चोवीस वर्षांनंतर, उत्क्रांतीवादी मायकल रूझ यांनी लिहिले: “वाढत्या संख्येचे जीवशास्त्रज्ञ असा वाद करतात की डार्विनच्या सिद्धांतावर आधारित असलेला—विशेषतः उत्क्रांतीचे बदल होण्यास नैसर्गिक निवडी मुख्यरीत्या कारणीभूत आहेत असा कोणताही उत्क्रांतीचा सिद्धांत— दिशाभूल करणारा अपूर्ण असा सिद्धांत आहे.”

टाईम नियतकालिक उत्क्रांतीच्या सिद्धांताला पाठींबा देणारे “अनेक ठाम पुरावे” आहेत असे म्हणत असले, तरीसुद्धा हे मान्य करते की उत्क्रांती ही “अनेक चुका असलेली जटिल कहाणी आहे, शिवाय, जे पुरावे गहाळ झालेत त्यांना पुन्हा कसे पुरवावेत यावर अनेक विरोधात्मक सिद्धांत आहेत.” प्रकरण येथेच संपले असे सुचवण्याऐवजी, काही वचनबद्ध उत्क्रांतीवादी आरडाओरडा करून अवयवयुक्‍त उत्पत्तीची पूर्ण पुनर्तपासणी करण्याची मागणी करत आहेत.

अशाप्रकारे, उत्क्रांतीचा—विशेषकरून जीवनाची सुरवात उत्क्रांतीने झाली—हा वाद सुसंगत साक्षीवर आधारित नाही. शास्त्रज्ञ टी. एच. जनॉबी असे निरीक्षण करतात की, जे उत्क्रांतीचे समर्थन करतात त्यांनी “अनेक वर्षांमध्ये चुकीचे सिद्धांत निर्माण केले आहेत आणि सोडूनही दिले आहेत, व शास्त्रज्ञांचे आजपर्यंत एकाही सिद्धांतावर एकमत झालेले नाही.”

चित्तवेधक गोष्ट अशी की, चार्ल्स डार्विन यांनी असे खटके अपेक्षिले होते. जातींची उत्पत्ती (इंग्रजी) या पुस्तकाच्या प्रास्ताविकतेत त्यांनी लिहिले: “मला हे पूर्णपणे माहीत आहे की या पुस्तकात असा एकही मुद्दा चर्चिलेला नाही ज्याच्यासाठी वास्तविकता आधार म्हणून पुढे सारता येतील. यामुळे मी ज्या निर्णयावर शेवटी येऊन पोहंचतो त्याच्या अगदी विरूद्ध निर्णयांकडे अनेकदा निरवले जाते.”

होय, अशा प्रकारची विरोधात्मक साक्ष उत्क्रांतीच्या सिद्धांताच्या विश्‍वसनीयतेबद्दल प्रश्‍न उभे करते.

उत्क्रांती ही बौद्धिक निवड आहे का?

उत्क्रांतीचा सिद्धांत सुरवातीपासूनच “अनेक लोकांना आवडला कारण तो विशिष्ट जातीच्या निर्मितीच्या सिद्धांतापेक्षा वैज्ञानिकरीत्या अधिक खरा असा भासला.”

शिवाय, काही उत्क्रांतीवाद्यांची दुराग्रही विधाने, घाबरवून टाकणारी असू शकतात. उदाहरणार्थ, शास्त्रज्ञ एच. एस. शेल्टन, विशिष्ट निर्मितीच्या कल्पनेवर “गंभीर विचार करणे निव्वळ मूर्खपणाचे आहे,” असे ठामपणे म्हणतात. जीवशास्त्रज्ञ रिचर्ड डॉकीन्झ सडेतोडपणे म्हणतात: “उत्क्रांतीमध्ये विश्‍वास करत नाही असे म्हणणारा कोणी तुम्हास भेटला तर तो अज्ञानी, मूर्ख, आणि वेडा आहे.” त्याचप्रमाणे, प्राध्यापक रने ड्यूबो म्हणतात: “अनेक ज्ञानी लोक ही वस्तुस्थिती स्वीकारतात की विश्‍वातील सर्व गोष्टींचा—आकाशातील सर्व गोष्टींपासून मानवजातीपर्यंत—विकास झाला आहे व उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून जात असताना त्यांचा विकास होत राहतो.”

या विधानांवरून असे वाटते की बुद्धिमान असलेला कोणीही उत्क्रांतीचा स्वीकार करील. शेवटी, असे करण्याचा अर्थ एखादा “मूर्ख” असण्यापेक्षा “ज्ञानी” आहे असा होईल. तरीही, असे पुष्कळ ज्ञानी पुरूष आणि स्त्रिया आहेत जे उत्क्रांतीच्या सिद्धांताला समर्थन देत नाहीत. “बहुतेक शास्त्रज्ञांच्या खाजगी शंका होत्या असे मला आढळून आले, आणि काही मोजके असेही म्हणाले की डार्विनच्या उत्क्रांतीचा सिद्धांत वैज्ञानिक सिद्धांत मुळीच नाही,” असे फ्रान्सिस हिचींग यांनी त्यांच्या जिराफाची मान (इंग्रजी) या पुस्तकात लिहिले.

नामवंत ब्रिटिश शास्त्रज्ञ, चंद्र विक्रमसींग यांनी देखील हाच पावित्रा घेतला. ते म्हणतात, “डार्विनच्या उत्क्रांतीच्या मूळ तत्त्वांसाठी कोणताच पुरावा नाही. तो एक सामाजिक प्रभाव होता ज्याने संपूर्ण जगाला १८६० मध्ये कह्‍यात घेतले होते. मला वाटते की, तेव्हापासून विज्ञानासाठी ते अनर्थकारक ठरले आहे.”

टी. एच. जनॉबी यांनी, उत्क्रांतीवाद्यांनी समोर मांडलेल्या वादांची कसून तपासणी केली. ते म्हणतात, “आम्हाला विश्‍वास ठेवण्यास निरवणाऱ्‍या परिस्थितीपासून ही परिस्थिती फारच वेगळी आहे. जीवनाच्या सुरवातीबद्दलच्या या जटिल सिद्धांताला आधार देण्यासाठी पुरावे फारच अपुरे आणि तुटक आहेत.”

यास्तव, उत्क्रांतीच्या सिद्धांताबद्दल आक्षेप घेणाऱ्‍यांना नुसतेच “अज्ञानी, मूर्ख, आणि वेडसर” असे म्हणून त्यांची उपेक्षा केली जाऊ नये. उत्क्रांतीला आव्हान देणाऱ्‍या मतांच्या बाबतीत पाहता, कट्टर उत्क्रांतीवादी जॉर्ज गेलॉर्ड सींप्सन यांना देखील कबूल करावे लागले की: “अशा प्रकारच्या दृष्टिकोनाला केवळ स्मित हास्य करून किंवा थट्टा करून काढून टाकणे चुकीचे ठरेल. ज्या लोकांनी उत्क्रांतीच्या सिद्धांताबद्दल आक्षेप घेतला ते गंभीर आणि बुद्धीमान अभ्यासक होते.”

विश्‍वासाची बाब

काहींचा असा विचार आहे की, उत्क्रांतीची श्रद्धा वास्तविकतेवर तर, निर्मितीची श्रद्धा विश्‍वासावर आधारित आहे. हे खरे की, कोणाही मानवाने देवाला पाहिले नाही. (योहान १:१८; पडताळा २ करिंथकर ५:७.) तरीही, उत्क्रांतीच्या सिद्धांताचा या बाबतीत काहीच फायदा नाही, कारण तो, मानवांनी कधीच न पाहिलेल्या किंवा पुन्हा न घडलेल्या घटनांवर आधारलेला आहे.

उदाहरणार्थ, शास्त्रज्ञांनी, जीवनाचा नवा प्रकार निर्माण करणारे बदल, तसेच फायदेकारक बदल यांचे निरीक्षण कधीच केले नाही; तरीही त्यांना याची खात्री आहे की अशाच तंतोतंतपणे नव्या जाती अस्तित्वात आल्या. त्यांनी जीवनाचे उत्परिवर्तन प्रत्यक्षात पाहिले नाही; तरीही ते असा आग्रह धरतात की याच प्रकारे जीवनाची सुरवात झाली.

अशा प्रकारच्या पुराव्याच्या अभावामुळे टी. एच. जनॉबी यांना उत्क्रांतीच्या सिद्धांताला, “केवळ ‘विश्‍वास’” असे म्हणण्यास भाग पाडते. भौतिकशास्त्रवेत्ता फ्रेड हॉईल याला “डार्विननुसारचे तत्त्व” असे म्हणतात. डॉ. ईवन शूट याहूनही अधिक जोरदार विधान करतात की, “पूर्णपणे वचनबद्ध असलेल्या उत्क्रांतीवाद्यापेक्षा निर्मितीवाद्याकडे खुलासा करण्यासाठी कमी रहस्य असते असा मला संशय येतो.”

इतर तज्ज्ञ देखील सहमत दर्शवतात. खगोलशास्त्रज्ञ रॉबर्ट जसट्रो कबूल करतात की, “मी, मानवाच्या स्वभावाचा खोलवर विचार करतो तेव्हा, कोमट पाण्यात मिसळलेल्या रसायनातून मानव प्राण्याची निर्मिती झाली हे, पवित्र शास्त्रातील त्याच्या उगमाविषयीच्या अहवालाच्या तुलनेत चमत्कारिक वाटते.”

तर मग, जीवनाची निर्मिती करण्यात आली, ही कल्पना अजूनही अनेक जण का स्वीकारत नाहीत?

[३ पानांवरील चित्रं]

काहींची दुराग्रही विधाने, घाबरवून टाकणारी असू शकतात

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा