योग्य प्रकारच्या धर्मासाठी त्यांचा शोध
जीवनासंबंधी प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळण्यासाठी काही लोकांनी बालवयापासूनच शोध केला आहे. ते तरुण असताना धार्मिक कार्यांना उपस्थित राहिले असतील. परंतु अनेकांना असे दिसून आले की, त्यांना जी उत्तरे मिळाली त्यामुळे किंवा चर्चच्या धार्मिक विधीने जीवनाच्या समस्यांशी लढा देण्यासाठी त्यांना कोणतीही मदत पुरवली नाही.
ते धार्मिक विधीला क्वचित उपस्थित राहत असले तरी, ते अजूनही त्यांच्या पालकांच्या धर्माचेच आहेत असे म्हणतील. चर्च ऑफ इंग्लंडमधील बिशपांच्या मते, त्यांचा विश्वास नावापुरताच राहिला आहे. त्यांनी धर्माविषयी विचार करण्याचे सोडून दिले आहे. इतरांनी, धार्मिक वर्तुळातील दांभिकता पाहून तिटकारा आल्यामुळे, धर्माला संपूर्णपणे नाकारले आहे. तरीही, जीवनाबद्दल असलेले त्यांचे प्रश्न तसेच राहिले आहेत.
काहींना गंभीर शंका का आहेत
पुष्कळ लोकांना माहीत आहे की, बेघर असलेल्यांना मदत करण्यासाठी, गरजवंताना अन्न वाटप करण्याचे व सांस्कृतिक कार्यक्रमांची जबाबदारी उचलण्यासाठी अनेक चर्चच्या काही एजन्सी आहेत. परंतु धर्मामध्ये मुळावलेला हिंसाचार आणि रक्तपाताच्या ताज्या बातम्या ते ख्रिस्ती नसलेल्या लोकांमध्येच नव्हे, तर तथाकथित ख्रिस्ती लोकांत रोजच ऐकतात. हिंसाचारात भाग घेणारे योग्य प्रकारच्या धर्माचे आचरण करणारे आहेत अशी ते शंका करतात, तेव्हा यामुळे आम्हाला आश्चर्य वाटावे का?
धार्मिक पार्श्वभूमीचे अनेक जण असा विचार करत होते की, चर्चने उघडलेली अनाथालये चांगली गोष्ट होती. तथापि, ते अलिकडील वर्षांमध्ये, पाळकांनी त्यांच्या देखरेखीखाली असलेल्या मुलांचा लैंगिक दुरुपयोग करण्यामुळे त्यांच्यावर जो आरोप लावला तो ऐकून थक्क झाले आहेत. सुरवातीला लोकांना वाटले की, केवळ काही पाळक दोषास्पद असतील. आता पण, लोक विचार करत आहेत की, चर्चच्या मूलभूत गोष्टीतच काही चुकीचे तर नाही ना?
एयुचेन्यॉप्रमाणे काही जण एके काळी त्यांच्या धर्मामध्ये बरेच गोवलेले होते. अर्जेंटिनात राहणारी ही युवती कुमारी इटॉटेच्या उपासनेसाठी बऱ्याच यात्रा करणाऱ्यांपैकी होती. ती १४ वर्षे जोगिणी म्हणून मठात राहिली. त्यानंतर क्रांतीकारी मार्गाद्वारे सामाजिक तसेच आर्थिक रचनेचा आमूलाग्र बदल निकडीने जाहीर करणाऱ्या, आंतरराष्ट्रीय धर्म-राजकीय गटाचे सदस्य होण्यासाठी ती बाहेर पडली. तेथे तिने जे पाहिले व अनुभवले त्यामुळे तिचा, देवावरील विश्वास व भरवसा तिने गमावला. ज्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो अशा धर्माचा ती खरेपणाने शोध करीत नव्हती. गरीबांना न्याय देणारा मार्ग,—होय, भरवसा ठेवता येतील अशी मैत्रिण तिला हवी होती.
काही लोक, चर्चेसमध्ये काय चालले आहे यावर निरीक्षण करतात, व ते त्यापासून दूरच राहतात. एका नास्तिकाचा दृष्टिकोन १९९१ मधील स्पुटनिक मासिकात प्रकाशित झाला तेव्हा त्याने स्पष्टपणे म्हटले: “मूर्तीपूजकांचे गुण व ख्रिस्ती दंतकथा यात काही महत्त्वाचा फरक मला दिसत नाही.” उदाहरणार्थ, त्याने एका मिरवणूकीचे वर्णन केले, ज्यामध्ये पाळक, मॉस्कोच्या रस्त्यावरून सुवर्ण कशीदाकाम केलेल्या वस्रात, रसायने घालून ठेवलेल्या प्रेताच्या शवपेटीला हळूहळू नेत होते. ते प्रेत “कर्मठ ख्रिस्ती संताचे” होते. व त्याला संग्रहालयातून चर्चमध्ये स्थलांतरीत करण्यात येत होते. या गोष्टीने लेखकाला, प्राचीन इजिप्तमधील याजक व रसायने घालून ठेवलेली प्रेते यांची आठवण झाली. त्याला हे देखील आठवले की, मॉस्कोमधील मिरवणूकीत भाग घेणाऱ्यांचा “ख्रिस्ती त्रैक्यावर” विश्वास होता; अशाचप्रकारे इजिप्तमधील लोक देखील, ऑसिरीस, इसिस, आणि हॉरस या तीन देवतांची भक्ती करत होते.
त्याच लेखकाने ख्रिस्ती प्रीतीची कल्पना, “देव प्रीती आहे” व “आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा,” याचा उल्लेख करुन असे म्हटले की, यांची मूर्तिपूजक इजिप्तमध्ये समांतरता दिसली नाही. परंतु त्याने निरीक्षले: “बंधू प्रीती ही जगात, ख्रिस्तीजगत म्हटल्या जाणाऱ्या भागात देखील विजयी होण्यात अपयशी झाली.” त्याने, राष्ट्राच्या कारभारात समाविष्ट होण्याच्या चर्चच्या आर्जवामुळे उद्भवणाऱ्या वाईट फळांबद्दल देखील भाष्य केले. त्याने पाहिलेल्या गोष्टीमुळे, त्याला ख्रिस्ती धर्मजगातील चर्चेस, आपण शोध करीत असलेल्या गोष्टींची पूर्ती करीत आहेत, असे मुळीच वाटले नाही.
उलटपक्षी, इतरांना समाधानकारक उत्तरे मिळाली, परंतु ती ख्रिस्तीधर्मजगताच्या चर्चेसमध्ये नाही.
तिला मृतांबद्दलचे सत्य शिकायला मिळाले
मॉगडॉलेनॉ ही बल्गेरियात राहाते. सध्या तिचे वय ३७ वर्षांचे आहे. १९९१ मध्ये तिच्या सासऱ्याचा मृत्यू झाल्यावर, ती फारच निराश झाली. ती स्वतःला वारंवार विचारत असे, ‘मृत लोक कोठे जातात? माझे सासरे कोठे आहेत?’ ती चर्चमध्ये गेली. तसेच तिने घरातील मूर्तीसमोर प्रार्थना केली. तरीही तिला काही उत्तरे मिळाली नाहीत.
नंतर एके दिवशी, शेजाऱ्याने फोन करून तिला त्याच्या घरी बोलावले. यहोवाच्या साक्षीदारासोबत अभ्यास करीत असलेला तरुण, या शेजाऱ्याकडे येणार होता. त्याने देवाचे राज्य व पृथ्वीला नंदनवन करून लोक अनंतकाळ आनंदात राहतील या देवाच्या उद्देशाबद्दल सांगितले तेव्हा तिने ते लक्षपूर्वक ऐकले. मेजावर तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक होते. याचा वापर करुन, या तरुणाने तिचे लक्ष पवित्र शास्त्रातील उपदेशक ९:५ वचनाकडे निर्देशित केले, ते म्हणते: “मृतास तर काहीच कळत नाही.” त्या संध्याकाळी तिने त्या पुस्तकाचे अधिक वाचन केले. मृत लोक स्वर्ग किंवा नरकातील दुसऱ्या जीवनात गेलेले नाहीत; गाढ निद्रेत असल्याप्रमाणे त्यांना काहीच कळत नाही, हे तिला माहीत झाले. तिने यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानिक मंडळीच्या सभेला उपस्थित राहण्याच्या निमंत्रणाचा आनंदाने स्वीकार केला. सभेनंतर पवित्र शास्त्राचा नियमित अभ्यास करण्यासही तिने सहमती दर्शवली. सभेत, यहोवाला ज्याप्रकारे प्रार्थना केल्या जात होत्या, हे पाहिल्यावर, तिने देखील खोल रुजलेल्या कमतरतेवर मात करता येण्यास मदत मिळावी म्हणून यहोवाला प्रार्थना करण्याचे सुरू केले. तिच्या प्रार्थनेला उत्तर मिळाले तेव्हा, तिला योग्य प्रकारचा धर्म सापडला हे समजले.
त्यांना अर्थभरीत जीवन सापडले
ऑन्ड्रॉची बेल्जियमधील कट्टर कॅथोलिक असणाऱ्या घरात वाढ झाली, व तो स्थानिक पाळकाचा साहाय्यक म्हणून सेवा करीत होता. तथापि, त्या काळात त्याने पाहिलेल्या गोष्टींमुळे चर्चसाठी असलेला त्याचा आदर कमी झाला. यामुळे, तो केवळ नामधारी कॅथोलिक राहिला.
तो १५ वर्षे फुटबॉलचा व्यावसायिक खेळाडू होता. एके प्रसंगी, इटलीमध्ये त्याच्या संघाने सामना खेळला तेव्हा, त्याच्या संघाला पोपना भेट देण्याचे निमंत्रण मिळाले. त्या भेटीत आध्यात्मिक उभारणीदायक काहीही नव्हते, व पोपच्या सभोवती असलेल्या जगिक धनसंपत्तीने ऑन्ड्रॉला अस्वस्थ केले. चर्चविषयी असलेली त्यांची शंका अधिकच वाढली. दोन विवाह तुटल्यामुळे, त्याचे वैयक्तिक जीवन दुःखी झाले होते. जगीक परिस्थितीने त्याची निराशा केली होती. १९८९ मध्ये त्याने आपल्या डायरीत लिहिले: ‘आमच्या सभोवती घडत असलेल्या मूर्ख गोष्टींचा अर्थ काय आहे?’ त्याच्या धर्माकडून त्याला उत्तर मिळाले नाही.
१९९० मध्ये आर्यिश आइसलंड येथे, ऑन्ड्रॉ फुटबॉलचा शिक्षक म्हणून काम करत असताना, यहोवाच्या साक्षीदारांच्या एका मिशनऱ्याने त्याच्याशी संपर्क साधला. त्याने साहित्याचा स्वीकार केला व मिशनऱ्याला परत बोलावले. ती (मिशनरी) आपल्या नवरा, केल् यासोबत आली. शेवटी ते ऑन्ड्रॉसोबत बसले व बोलले तेव्हा, पवित्र शास्त्र समजण्याविषयी तो अधिक आस्थेवाईक होता हे स्पष्ट दिसले. ऑन्ड्रॉची पत्नी, अस्ता हिने देखील आवड दाखवली. दुपारच्या वेळी, शिकवण्याच्या भागात तीन तास त्याला मिळत होते, व त्यावेळेचा उपयोग त्यांनी पवित्र शास्त्राच्या अभ्यासासाठी करण्याचे ठरवले. त्याने म्हटले, “आराम करण्यापेक्षा पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्याने मला अधिक ताजेतवाने वाटते.” पवित्र शास्त्राने हळूहळू त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यहोवा व त्याच्या राज्यावरील त्यांचा विश्वास सावकाशपणे वाढला. शांतीमय नवीन जगाविषयी पवित्र शास्त्राचे गौरवी अभिवचन, “घडत असलेल्या सर्व वायफळ गोष्टीपासून” मुक्तता, ही गोष्ट त्यांच्यासाठी वास्तविकता बनली. दोघेही, ऑन्ड्रॉ व अस्ता त्यांच्या नवीन सापडलेल्या विश्वासाची सहभागिता आता इतरांसोबत करीत आहेत.
मॉगडॉलेनॉ, ऑन्ड्रॉ व अस्ता यांना शेवटी, योग्य प्रकारचा धर्म सापडल्याबद्दल आता खात्री झाली आहे. एयुचेन्यॉ देखील राजकीय माध्यमाद्वारे जगाच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केल्यानंतर अखेरीस, यहोवाच्या साक्षीदारांमध्ये असलेला धर्म योग्य प्रकारचा असल्याचे तिलाही दिसले आहे. परंतु, एखादा धर्म योग्य प्रकारचा आहे याला खरेपणाने कोणती गोष्ट ठरवते? कृपया पुढे दिलेले साहित्य पाहा.
[७ पानांवरील चित्रं]
यहोवाच्या साक्षीदारांसोबतचा नियमित पवित्र शास्त्राभ्यास, समाधानकारक उत्तरे मिळण्याचा शोध करणाऱ्या ५० लाखापेक्षा अधिक लोकांना मदत करीत आहे