वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ५/१५ पृ. २८-३०
  • देवाच्या सेवेत असताना घरच्या ओढीचा सामना करणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाच्या सेवेत असताना घरच्या ओढीचा सामना करणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • कशामुळे दुःखाची सुरवात होते?
  • तुमच्या भावनांचा सामना करणे
  • पुढे पाहात राहा
  • परदेशात सेवा करायला तुम्हाला आवडेल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • त्यांनी स्वतःला स्वेच्छेने वाहून घेतले—माइक्रोनीशियामध्ये
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • मासेदोनियात येऊन साहाय्य करण्याचे आवाहन तुम्ही स्वीकारू शकाल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • नवीन मंडळीशी कसं जुळवून घ्यावं?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ५/१५ पृ. २८-३०

देवाच्या सेवेत असताना घरच्या ओढीचा सामना करणे

येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना, “जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकास शिष्य” करण्याची आज्ञा दिली. (मत्तय २८:१९) अनेक ख्रिश्‍चनांसाठी, ह्‍या नेमणूकीला पार पाडण्याचा अर्थ म्हणजे घरापासून दूर, कठीण परिस्थितींमध्ये जगणे होय. प्रवासी पर्यवेक्षक, त्यांच्या पत्नी, आणि इतर, देवाच्या सेवेसाठी पुष्कळ गोष्टींचा त्याग करतात. त्या सर्व यहोवाच्या साक्षीदारांसाठी घरची ओढ लागणे, खरोखर एक आव्हान असू शकते.

आठवणी तुमच्या विचारांना सुखावह भूतकाळातील सुरक्षितता आणि प्रीतीकडे नेतात तेव्हा घरची ओढ लागते. यामुळे इतक्या तीव्र भावना उत्पन्‍न होऊ शकतात की, तुम्हाला उदास वाटू लागते आणि आणखी सहन करता येत नाही. वास्तविक पाहता, काहींनी त्यांची सर्व मालमत्ता विकून टाकली आणि एका विदेशी प्रदेशात जाण्यासाठी खूप पैसा खर्च केला, परंतु जेव्हा त्यांना घरची आठवण येऊ लागली तेव्हा त्यांनी त्यांच्या सर्व योजनांना धुडकावून लावले आणि त्यांच्या घरी पुन्हा आले. घरच्या ओढीने त्यांच्यावर मात केली.

भावनांवरचे अशा प्रकारचे घाव बहुधा पहिल्यांदाच घर सोडून गेलेल्यांवर वारंवार होतात, परंतु काहींच्या बाबतीत तो आयुष्यभर असतो. २० पेक्षा अधिक वर्षांसाठी घरापासून दूर असलेल्या याकोबाला ‘बापाच्या घराची ओढ’ लागली. (उत्पत्ती ३१:३०) घरची ओढ सहन करण्याची कोण अपेक्षा करू शकेल? कशामुळे त्याची सुरवात होते? एखादी व्यक्‍ती अशा भावनांचा सामना कसा करू शकते?

कशामुळे दुःखाची सुरवात होते?

घरच्या ओढीचा परिणाम कोणावरही होऊ शकतो. मेदचा राजा, ॲसटियागस याची कन्या ॲमिटिस, हिला खात्रीने आनंदात राहण्यासाठी समृद्धता, प्रतिष्ठा, सुंदर घर हे सर्व होते. तरीही तिला इतकी घरची ओढ होती की तिचा पती राजा नबुखद्‌नेस्सर याने तिला सांत्वन देण्यासाठी बाबेलच्या झुलत्या बागा बांधल्या.

घरची ओढ विशेषकरून तेव्हा अधिक अडचणीचे होऊ शकते जेव्हा एखाद्या व्यक्‍तीचे जीवन दुसऱ्‍या ठिकाणी गेल्यावर अधिक कठीण होते. यहूदाचे लोक कैदी झाले तेव्हा, त्यांनी असा विलाप केला: “बाबेलच्या नद्यांजवळ आम्ही बसलो. हो तेथे आम्हाला सीयोनाची आठवण झाली; तेव्हा आम्ही रडलो.”—स्तोत्रसंहिता १३७:१, ४.

अनेक गोष्टी घरच्या ओढीच्या विषण्णतेला चेतवितात. टेरी, जिने कॅनडा सोडले ती म्हणते: “एके दिवशी एका पुस्तकातून आमच्या संपूर्ण कुटुंबाचा एक फोटो खाली पडला. मी त्याला उचलून पाहिले तेव्हा, घरच्या ओढीच्या पुराने मला बुडवून टाकले. मी तेव्हा खूप रडले.” क्रिस जेव्हा इंग्लंड सोडून फारच गरीब राष्ट्रात राहण्यासाठी गेला तेव्हा तो कबूल करतो: “एखाद्या जुन्या गाण्याच्या केवळ तालीमुळे किंवा ओळखीच्या खाद्यपदार्थाच्या केवळ सुवासामुळे मला, मी मागे ज्या गोष्टी सोडून आलो आहे त्यांची ओढ लागते.”—गणना ११:५, पडताळा.

जवळचे कौटुंबिक बंधन हे पुष्कळदा हातभार लावणारे कारण असते. ब्राझिलची रोझाली जी आता शेजारच्या राष्ट्रात राहत आहे, असे विवेचन देते: “मला घराकडून वाईट बातमी मिळते तेव्हा मी त्यांना मदत करण्यासाठी तेथे नसल्यामुळे खिन्‍न होऊन जाते. काही वेळा तर मला काहीच बातमी मिळत नाही आणि मी भलताच विचार करू लागते.” जेनिस उत्तर अमेरिका सोडून ॲमेझॉन उष्णकटिबंधातील एका छोट्याशा गावात राहण्यासाठी गेली. ती म्हणते: “मला घराकडून आनंदाची बातमी ऐकायला मिळाल्यावर मला घरची ओढ लागते. ते सर्वजण मजेत दिवस घालवत आहेत, हे ऐकल्यावर मला वाटत असे की मी सुद्धा त्यांच्यासोबत असते तर किती बरे झाले असते.”

घरच्या लोकांना सोडल्यामुळेच केवळ घरची ओढ लागते असे नाही. लिंडा म्हणते: “माझ्या गरजेच्या गोष्टी कोठून विकत घ्यायच्या हे माहीत नव्हते तेव्हा मी खूप चिडायची. मला त्यांचे भाव माहीत नव्हते, शिवाय वस्तुविनिमय देखील करता येत नव्हते. स्वतःची कार असणे, फारच महाग होते, आणि गर्दी असलेल्या सार्वजनिक परिवहनात चढण्याचा प्रयत्न करताना मला नेहमी धक्काबुक्की होत असे. या सर्व गोष्टी मला घरची ओढ लावत असत.” सांस्कृतिक आणि आर्थिक दरा यावर विवेचन मांडताना, जेनेट तिचा अभिप्राय अशा रीतीने मांडते: “मला अस्वस्थ करणारे दारिद्‌य्र होते. मी पूर्वी कधीही लोकांना भाकरीसाठी भीक मागताना किंवा एखादे मोठे कुटुंब, पाण्याची सोय नसलेल्या एकाच खोलीत राहत असताना पाहिले नव्हते. . . . अशा गोष्टींमुळे मी इतकी उदास झाले की मी आणखी जास्त वेळ तेथे थांबू शकत नाही असे मला वाटले.”

तुमच्या भावनांचा सामना करणे

आम्ही प्रेम करीत असलेल्या लोकांबद्दल किंवा आम्ही ज्या भागात लहानाचे मोठे झालो त्या जागेबद्दल तीव्र भावना बाळगल्यासंबंधाने आम्हाला विचलित झाल्यासारखे वाटू देऊ नये. यहोवा देवाने आम्हाला भावना दिल्या आहेत जेणेकरून आम्ही उबदार व्यक्‍तिगत नातेसंबंधाचा आनंद घेऊ शकतो. इफिसातील मंडळीचे ख्रिस्ती पर्यवेक्षक भावनात्मक प्रौढ पुरूष होते. परंतु जेव्हा प्रेषित पौलाची त्यांच्यासोबतची भेट समाप्तीस आली तेव्हा काय झाले? तेव्हा तर, “ते फार रडले व त्यांनी पौलाच्या गळ्यात गळा घालून त्याचे पुष्कळ मुके घेतले!” (प्रे. कृत्ये २०:३७) अर्थात, त्या घटनेत घरची ओढ गोवलेले नाही. तरीही, ती आम्हाला विचार करायला खाद्य देते. भावना उत्पन्‍न होणे साहजिक आहे, परंतु त्यांना आमच्यावर नियंत्रण ठेवण्याची आम्ही परवानगी देऊ नये. तर मग, तुम्ही यशस्वीरीत्या घरच्या ओढीचा सामना कसा करू शकता?

स्थानिक भाषा बोलण्यास शिकणे, ही भावना स्थिरावण्याची गुरुकिल्ली आहे. अनोळखी भाषा बोलावी लागत असल्यामुळे तुमच्या दळणवळणात अडथळा येतो, आणि तेव्हाच घरच्या ओढीच्या भावना अधिक तीव्र होतात. यास्तव, तुम्ही ज्या नवीन ठिकाणी राहण्यासाठी जाणार आहात तेथे जाण्यापूर्वीच शक्यतो, तेथील भाषा लिहिण्यास आणि बोलण्यास शिका. किंवा, तेथे पोंहचल्यावर पहिल्या काही आठवड्यांसाठी त्या भाषेच्या अभ्यासावर मन एकाग्र करा. तेव्हाच तुम्हाला तीव्र प्रेरणा होऊ शकते आणि ती शिकण्याची उत्तम आशा मिळू शकते. जर तुम्ही हे पहिले आठवडे मुख्यतः, भाषेच्या अभ्यासासाठी दिलेत तर, तुम्ही लवकरात लवकर संभाषणात भाग घेऊ शकता, जे तुम्हाला घरच्या ओढीच्या भावनांना शमविण्यास मदत करील.

होता होईल तितक्या लवकर नव्या मित्रांशी ओळख करून घ्या. असे केल्याने तुम्हाला घरच्यासारखा सहवास वाटायला लागेल. यहोवाच्या साक्षीदारांची सभा, खरे मित्र बनवण्याचे उत्तम ठिकाण आहे. तुम्ही पुढाकार घ्या आणि इतरांमध्ये रस घ्या. त्यांची पार्श्‍वभूमी, त्यांच्या कुटुंबाची, त्यांच्या समस्यांची आणि त्यांच्या आवडीनिवडींची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. समविश्‍वासूंना तुमच्या घरी निमंत्रण द्या. असे केल्यावर, इतर लोक तुमच्यामध्ये आवड घेऊ लागतील हे तुम्ही पाहाल.

देवाच्या लोकांमध्ये, मित्रत्व, कौटुंबिक नातेसंबंधाप्रमाणे जवळकीचे असू शकते. येशूने म्हटले: “जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ तीच माझी बहीण व तीच माझी आई.” (मार्क ३:३५) ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना अशी खात्री दिली की: “ज्याने ज्याने माझ्याकरता व सुवार्तेकरता घरदार, बहीणभाऊ, आईबाप, मुलेबाळे किंवा शेतीवाडी सोडली आहे, अशा प्रत्येकाला सांप्रतकाळी छळणुकीबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, आया, मुले, शेते आणि येणाऱ्‍या युगात सार्वकालिक जीवन ही मिळाल्याशिवाय राहणार नाहीत.” (मार्क १०:२९, ३०) असे आश्‍चर्यकारक आध्यात्मिक बंधुत्व असताना, नव्या ठिकाणी देखील आम्ही एकटे नाही.

तुम्ही पूर्वी होता त्या ठिकाणाच्या लोकांसोबत मैत्री ठेवल्याने सुद्धा तुम्हाला घरच्या ओढीचा सामना करण्यास मदत मिळेल. तुम्ही दुसऱ्‍या ठिकाणी राहावयास गेल्यामुळे खासकरून पत्राने दळणवळण करणे अर्थपूर्ण आहे हे जाणण्यास तुम्हाला आश्‍चर्य वाटेल कारण आता कदाचित तुम्ही तुमच्या शब्दांना विचारपूर्वक महत्त्व द्याल. तुमच्याकडे सांगावयास अनेक आनंदाच्या बातम्या असतील. पूर्वी उल्लेख केलेली जेनेट असे सुचवते की: “लांब ठिकाणी टेलिफोनने बोलणे अतिशय महाग आहे, परंतु तुमचा आवाज टेप करून टपालाने तो पाठवणे तुलनात्मकरीत्या स्वस्त आहे. पहिल्यांदा एका मशीनसोबत बोलताना तुम्हाला अवघड वाटेल. तथापि, ध्वनिग्राहकाच्या साहाय्याने तुम्ही कोणा इतर व्यक्‍तिसोबत संभाषण केले तर, ते सोपे आणि मनोरंजक वाटेल.” तुम्ही त्यांनाही त्यांचा आवाज टेपवर ध्वनिमुद्रित करून पाठवण्यास सांगू शकता.

अमेरिकेतून लॅटिन अमेरिकेला २५ वर्षांआधी राहावयास गेलेली शर्ली म्हणते: “मी समस्यांच्या ऐवजी उभारणीकारक अनुभव लिहिते. यामुळे मला लिहित राहण्यासाठी, इतरांना उत्तेजन मिळते.” परंतु, जरा सावध रहा. पत्र लिहिण्यात सर्वच वेळ घालवला तर तुम्हाला नवे मित्र बनवता येणार नाही. कॅनडातून दुसऱ्‍या राष्ट्रात राहण्यासाठी गेलेला डेल म्हणतो: “नेहमीच घरात राहून ज्या गोष्टींची तुम्हाला उणीव आहे त्यांच्यावर सारखे विचार करण्याचे टाळा. त्याऐवजी बाहेर जा आणि तुमच्या नव्या वातावरणाचा आनंद लुटा.”

त्या नव्या प्रदेशातील रूढी, इतिहास, विनोद, सौंदर्य आणि मनोरंजक ठिकाणांची माहिती ओळख करून घ्या. हे तुम्हाला नकारात्मक कारणांवर विचार न करण्यास मदत करील. तुम्ही ज्या ठिकाणी राहण्यासाठी गेला आहात, तेथेच कायम राहण्याचा तुमचा निश्‍चय आहे तर लगेच व वारंवारपणे तुमच्या मायदेशी भेट देण्याचा प्रयत्न करू नका. नवे मित्र बनवण्यास आणि नव्या परिसराशी जुळवून घेण्यास वेळ लागतो. मायदेशी सारख्या भेटी दिल्यामुळे त्या प्रयत्नाला खीळ लाभते. तुम्ही त्या नवीन ठिकाणी व्यवस्थितपणे एकदाचे स्थिर झाल्यावर, मग तुम्ही तुमच्या घरी भेट देऊन पुन्हा येऊ शकता. या वेळेपावतो, तुमच्या नव्या घरासोबत जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करीत राहा.

पुढे पाहात राहा

यहोवाने आमच्यासाठी संपूर्ण पृथ्वीला आमचे घर म्हणून बहाल केले आहे. (स्तोत्रसंहिता ११५:१६) आम्ही कोणत्याही प्रदेशात असलो तरी आनंदी ख्रिस्ती आत्म्यामुळे जीवन सुखावह होऊ शकते. राज्य आस्था वाढवण्यासाठी आणि सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी तुम्ही दुसऱ्‍या राष्ट्रात किंवा स्वदेशातच इतर ठिकाणी गेला असाल तर आनंदी अपेक्षा ठेवा. नवे मित्र बनवण्याची, विविध रूढी शिकवण्याची, शिष्य बनवण्याची किंवा देवाच्या सेवेत प्रतिफळदायी गोष्टी करण्याची आशा ठेवा.

यहोवा देव असा मित्र आहे जो, तुम्ही कोठेही असला तरी सदोदित तुमच्याबरोबर राहील. (स्तोत्रसंहिता ९४:१४; १४५:१४, १८) यास्तव प्रार्थनेद्वारे त्याच्यासोबत जवळीक राखा. (रोमकर १२:१२) हे तुम्हाला देवाचा सेवक ह्‍या नात्याने तुमच्या जीवनाचा उद्देश मनी बाळगण्यास मदत करील. अब्राहाम आणि साराने उर शहरातील त्यांचे सोईस्कर घर सोडून दिले तेव्हा त्यांनी त्यांचा उद्देश मनात ठेवला. यहोवाच्या आज्ञेनुसार त्यांनी, त्यांच्या मित्रांना आणि नातेवाईकांना मागे सोडले. (प्रे. कृत्ये ७:२-४) त्यांनी जे शहर सोडले त्याविषयी सारखीच आठवण काढली असती व त्यांना त्याची ओढ लागली असती तर, निश्‍चितच त्यांना पुन्हा जाण्याची संधी मिळाली असती. परंतु ते त्याहीपेक्षा उत्तम ठिकाणी जात होते—अखेरीस देवाच्या स्वर्गीय राज्याखालच्या नंदनवनमय पृथ्वीवरील जीवनाकडे.—इब्रीयांस ११:१५, १६.

विदेशी क्षेत्रामध्ये किंवा तुमच्या स्वदेशी राज्य उद्‌घोषकांची जेथे जास्त गरज आहे तेथे प्रचार करणे आव्हानात्मक असू शकते. परंतु हे काम प्रतिफलदायी व मोबदल्याचे कार्य ठरू शकते. (योहान १५:८) आणि जर का नकारात्मक विचार तुमच्या मनाला तात्पुरते गुरफटून टाकत असतील तर, मनामध्ये तुमच्या ध्येयांना कायम लक्षात ठेवले व पुढची आशा नेहमी ठेवली तर, तुम्ही त्यांच्यावर मात करू शकता. एका अविवाहीत मिशनरी बहिणीने म्हटले: “माझ्यावर उदासिनता मात करत आहे असे मला जाणवल्यास, मी नव्या जगाविषयी व सर्व मानवजात एक कुटुंब कसे होईल याबद्दल विचार करण्याचा प्रयत्न करते.” अशा प्रकारचे सुखकारक विचार तुम्हाला, तुमचा आनंद टिकवून ठेवण्यास व घरच्या ओढीच्या ओझ्याखाली दबून न जाण्यास मदत करतील.

[२९ पानांवरील चित्रं]

घरच्या ओढीने ख्रिस्ती सेवेत अडथळा करू नये

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा