नियमन मंडळात वाढ
यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाच्या सभासदात वाढ व्हावी या दृष्टीने, आता कार्य करणाऱ्या ११ वडिलांमध्ये जुलै १, १९९४ पासून आणखी एका सदस्याची भर पडली. या नव्या सदस्याचे नाव जेरीट लॉइश्च असे आहे.
बंधू लॉइश्च यांनी, नोव्हेंबर १, १९६१ रोजी पूर्ण वेळेच्या सेवेत पदार्पण केले. ते वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या ४१ व्या वर्गातून पदवीधर झाले. त्यांनी १९६३ पासून १९७६ पर्यंत ऑस्ट्रिया येथे विभागीय आणि प्रांतीय कार्यात सेवा केली. १९६७ मध्ये त्यांनी विवाह केला, आणि ते व त्यांची पत्नी मेरेट यांनी नंतर १४ वर्षांसाठी व्हिएन्ना येथील ऑस्ट्रिया बेथेल कुटुंबाचे सदस्य म्हणून कार्य केले. चार वर्षांपूर्वी त्यांची ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथील संस्थेच्या मुख्यालयात बदली झाली. तेथे बंधू लॉइश्च यांनी व्यवस्थापन कार्यालयात तसेच सेवा समितीचे सहाय्यक या नात्याने कार्य केले आहे. युरोपियन क्षेत्रातील त्यांच्या वैचित्र्यपूर्ण अनुभवामुळे आणि जर्मन, इंग्रजी, रोमानियन व इटालियन भाषेचे ज्ञान असल्यामुळे, ते नियमन मंडळाच्या कार्याला अमूल्य साहाय्य करतील.