मलावीकडील सुवार्ता!
आग्नेय आफ्रिकन खंडातील मलावी देशात, वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रक्ट सोसायटी ऑफ पेन्सिल्व्हेनिया नोव्हेंबर १५, १९९३ रोजी अधिकृतपणे नोंदणी झाली. यामुळे यहोवाच्या साक्षीदारांना कायदेशीर मान्यता आणि मलावी येथील लोकांना पवित्र शास्त्राचे सत्य सांगण्याचे स्वातंत्र्य मिळेल.
१९४८ मध्ये आधी, मलावीतील यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याची व्यवस्थित मांडणी करण्यासाठी वॉचटावर संस्थेचे एक शाखा दप्तर तेथे स्थापन केले गेले. जानेवारी ८, १९५७ रोजी वॉचटावर संस्थेची तेथे पहिल्याच वेळी अधिकृतपणे नोंदणी झाली होती. अनेक वर्षांसाठी यहोवाच्या साक्षीदारांनी झटपट वाढीचा आनंद घेतला. परंतु मग, १९६४ मध्ये हिंसात्मक छळ उसळला. का बरे?
देवाला आज्ञाधारकता दाखवून, यहोवाच्या साक्षीदारांनी राजकारणाच्या गोष्टींमध्ये कडक तटस्थता राखली. (योहान १७:१६) स्पष्टतः, काहींना ही शास्त्रवचनीय भूमिका योग्यपणे समजली नाही, आणि साक्षीदार आमूलाग्र सुधारणावादी धर्माचे व न्यायरक्षणबाह्य लोक आहेत असा विपर्यास करून सांगितले. यास्तव, या शांती-प्रिय ख्रिश्चनांचा छळ करणे काहींना न्याय्य वाटले. अनेक साक्षीदारांना त्यांच्या नोकरीवरून काढण्यात आले, मारहाण अथवा मानभंग करण्यात आला. काहींनी तर त्यांच्या मुलांपासून जबरदस्तीने वेगळे करण्यात आले.
१९७२ मध्ये ३०,००० पेक्षा अधिक साक्षीदारांना आणि त्यांच्यासोबत पवित्र शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांना, जीव गमावण्याच्या भीतीमुळे ते राष्ट्र सोडून जावे लागले. हजारो जण शेजारच्या मोझांबिक राष्ट्रात निर्वासितांच्या छावणीत जाऊन स्थायिक झाले. परंतु, १९७५ मध्ये या निर्वासितांना पुन्हा मलावी येथे पाठवण्यात आले, जेथे त्यांना पुढील छळ सहन करावा लागला. अनेकांना छळछावण्यांमध्ये टाकण्यात आले. या दंगलीतच, मलावी येथील वॉचटावर संस्थेचे नाव, कायदेशीर मान्यता प्राप्त करण्याच्या यादीतून छाटले गेले. तेव्हा पासून पुढे त्या प्रदेशातील यहोवाचे साक्षीदार आणि त्यांच्या कायदेशीर संस्थेवर बंदी आणली गेली.
या सर्व घडामोडी होत असतानाही, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रत्याघात केला नाही. त्यांनी कधीही जमाव केला नाही किंवा सरकाराविरूद्ध दंगा केला नाही. उलटपक्षी, त्यांनी सरकारच्या “वरिष्ट अधिकाऱ्यांना” योग्य सन्मान आणि आदर दाखवण्याचे त्यांचे ख्रिस्ती कर्तव्य प्रार्थनापूर्वक राखले. (रोमकर १३:१-७; १ तीमथ्य २:१, २) साक्षीदारांनी पवित्र शास्त्रात नमूद केलेल्या ख्रिस्ती जीवनाच्या उच्च दर्जांना उंच केले आहे, आणि अशाप्रकारे वर्तणूकीत सर्वोत्तम उदाहरण मांडले आहे.
त्यांच्या नव्या प्राप्त झालेल्या स्वातंत्र्याने, मलावी येथील यहोवाच्या साक्षीदारांनी “सुवेळी” निकडीने, पवित्र शास्त्राच्या सत्याचा प्रचार करण्याचा दृढनिश्चय केला आहे.—२ तीमथ्य ४:२.
[३१ पानांवरील चित्रं]
एम. जी. हेन्श्चल, १९६०, मलावी बेथेल कुटुंबासमवेत