वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ४/१५ पृ. ३-४
  • मानवी मार्गदर्शन अपयशी ठरले आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मानवी मार्गदर्शन अपयशी ठरले आहे का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्हाला विश्‍वसनीय मार्गदर्शन कोठे मिळू शकेल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • दारिद्र्‌य निर्मूलनासाठी शर्थीचे प्रयत्न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • बायबल प्रश्‍नांची उत्तरं
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१६
  • सर्व गोष्टींत देवाच्या मार्गदर्शनाचे पालन करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ४/१५ पृ. ३-४

मानवी मार्गदर्शन अपयशी ठरले आहे का?

सर्व गोष्टी कोणी निर्माण केल्या? “देवाने,” असे तुमचे उत्तर आहे तर, तुम्ही पवित्र शास्त्राचा देव जो निर्माणकर्ता आहे त्याच्यावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या लाखो लोकांच्या सहमतात आहात.

तरीही, देवावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या अनेकांना, तो मानवजातीच्या समस्यांना सोडवण्यात कार्यशीलतेने गोवलेला आहे ही गोष्ट स्वीकारण्यास कठीण वाटते. देवाचा मानवजातीला मुक्‍तता देण्याचा कार्यक्रम चालू आहे असा विचार करणे वास्तविकतेचे वाटते का? हे खरे आहे याचा अनेकांना तर्कशुद्ध पुरावा सापडत नाही.

देवाला वगळून, हजारो वर्षांसाठी, मानवांनी उपायांचा शोध करताना अगणित आत्मसाहाय्य पद्धतींचा प्रयोग करून पाहिला आहे. परंतु मानवांना उपाय सापडले आहेत का? की समस्या आणखीनच बिकट व सोडवण्यासाठी कठीण होत चालल्या आहेत? मानव आज जगातील तातडीच्या समस्यांना कशारीतीने हाताळत आहे?

एक तज्ज्ञ अशारीतीने त्यांचे मनोगत व्यक्‍त करतात: “औद्योगिक क्रांतीनंतर, विकसित राष्ट्रांनी जगाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीची, उत्पादन व खप यांच्या असंयमित नमुन्याद्वारे अतिशय पिळवणूक केली आहे, ज्यामुळे जागतिक पर्यावरणाला नुकसान पोहचून, विकसित राष्ट्रांची हानी झाली.”

मानव पृथ्वीची नासाडी करतच आहे. अर्जेंटिनाच्या क्लॉरीन नावाच्या वृत्तपत्राने असे विवेचन मांडले: “या शतकाच्या उत्तरार्धात, आर्थिक लोभ, दक्षतेची उणीव, व बेपर्वा या सर्व गोष्टी मोठ्या संकटांना जबाबदार ठरल्या ज्यामुळे केवळ मानवांचा बळी झाला नाही तर पर्यावरणाची अनेकवेळा अपरिगण्य मर्यादेत अवनति केली आहे.”

आधुनिक समाजाला अत्यंत दारिद्‌य्र कायमचेच चिकटून बसले आहे असे दिसते. एवढेच नव्हे तर जगातील समृद्ध रा देखील दारिद्‌य्राच्या पराकोटीच्या ओझ्याखाली वाकली आहेत. टोरंटो, कॅनडाच्या ग्लोब ॲण्ड मेलनुसार, असा अंदाज लावला जातो की, “कॅनडाच्या सर्व लोकांमधील एक तृतीयांश लोक, लौकिक काम करण्याच्या विशिष्ट वयात आल्यावर त्यांच्या जीवनकाळादरम्यान दारिद्‌य्राचा अनुभव घेतील.” ते वृत्तपत्र पुढे असे म्हणते की, “दारिद्‌य्राच्या अव्वल कारणांतील एक कारण, कौटुंबिक बिघाड हे आहे, आणि अलिकडच्या वर्षांमध्ये हा कल अधिकच वाढला आहे.”

मादक पदार्थांचे सेवन हे, ऱ्‍हास होत चाललेल्या समाजाचे आणखी एक चिन्ह आहे. मानवजात याबद्दल काय करू शकते? फारच कमी प्रयत्न, हे उघड आहे. लाखो लोक गुंगीकारक द्रव्याच्या दुरूपयोगामुळे शारीरिक, मानसिक व नैतिक अवनतिचा अनुभव घेत आहेत, आणि ही समस्या हा हा म्हणता पसरत आहे.

रोगांविरूद्ध चाललेल्या झगड्यात शास्त्रज्ञांचा पराजय होत आहे असे दिसते. हे खरे आहे की, आधुनिक तंत्रविज्ञानाने रोगांविरूद्ध चाललेल्या लढाया जिंकल्या आहेत. तरीसुद्धा, काही वैज्ञानिक पद्धती, घातक सूक्ष्मजीवांच्या मादक पदार्थांच्या प्रतिकारक जातीचा उद्‌भव करण्यास कारणीभूत झाल्या आहेत.

मानव सरकार, मानवी हक्कांची सर्वत्र होत असलेली पायमल्ली थांबवू शकत नाहीत. उदाहरणार्थ, गुलामगिरीला टाळण्यासाठी मुक्‍तता देणारे नियम आणि कायद्यांना बनवले तरी, असा अंदाज लावला जातो की, संपूर्ण जगभरात दहा कोटी पेक्षा अधिक लोकांना निकृष्ट गुलामगिरीच्या तुल्य असणाऱ्‍या परिस्थितीत काम करण्यास जबरदस्ती केली जाते.

परंतु मानवी मार्गदर्शन अपयशी का ठरले आहे? या घटकांचा विचार करा. मानवी मार्गदर्शन लोकांकडून अशा लोकांकडून येते ज्यांना गंभीर मर्यादा आहेत. जीवनातील त्यांचा अनुभव सापेक्षरीतीने कमी आहे व सर्वसामान्यपणे विशिष्ट परंपरा किंवा वातावरणामुळे मर्यादित आहे. त्यांचे ज्ञानही प्रमाणातच आहे. त्यांचे मार्गदर्शन त्या मर्यादेला प्रतिबिंबित करते. प्रेषित पौलाने म्हटल्याप्रमाणे, “सर्वांनी पाप केले आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले.”—रोमकरास ३:२३.

अधिकांश मानवजात वास्तविकतेत अनुभवत असलेल्या अनेक समस्या आणि अडचणी, देवाच्या मार्गदर्शनाला टाळल्याचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम भोगत आहेत. तर मग, अशाप्रकारचे मार्गदर्शन कोठे मिळू शकेल बरे? आज देव आम्हाला कशारीतीने मार्गदर्शन पुरवत आहे? पुढील लेख यांच्या उत्तरांचा विचार करील.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा