तुम्ही प्रार्थना करता तेव्हा देव ती ऐकतो का?
एखादा मुख्य शासक, कोणा प्रकरणास तो लवादाकडे नेमून देणार की ते स्वतः हाताळणार हे ठरवीत असतो. तसेच विश्वाच्या सार्वभौम शास्त्यापाशी, कोणा एक प्रकरणात तो व्यक्तिगत हस्तक्षेप करणार की नाही ही निवड करण्याचा हक्क आहे. शास्त्रवचने ही शिकवण देतात की, आमच्या प्रार्थनांमध्ये स्वतः वैयक्तितपणे समाविष्ठ होण्याचे देवाने ठरविले आहे, यास्तव त्या त्याकडे कराव्यात.—स्तोत्रसंहिता ६६:१९; ६९:१३.
याबाबतीतील देवाची निवड तो त्याच्या मानवी सेवकांबद्दल जी वैयक्तित आस्था बाळगून आहे ती प्रकट करते. त्याच्या लोकास प्रत्येक विचार आणि काळजीसह त्याजकडे जाण्यापासून मोडता घालण्याऐवजी, तो त्यांना “निरंतर प्रार्थना करा,” “प्रार्थनेत तत्पर” असा, “त्याजवर [परमेश्वरावर] तुम्ही आपली सर्व चिंता टाका,” असे उत्तेजन देतो.—१ थेस्सलीकाकर ५:१७; रोमकर १२:१२; स्तोसंहिता ५५:२२; १ पेत्र ५:७.
देवास जर त्याच्या सेवकांच्या प्रार्थनांकडे लक्ष पुरवावेसे वाटले नसते तर त्याने त्याजजवळ जाण्याच्या या सोईची योजनाच केली नसती व तिचा एवढ्या मोकळेपणाने उपयोग करण्याचे उत्तेजनही दिले नसते. देव स्वतःस त्याच्या लोकांकरिता एवढे उपलब्ध करतो हे, तो प्रत्यक्षात ऐकत असतो असा आत्मविश्वास राखण्याचे पुरेसे कारण देते. होय, तो त्याच्या सेवकांच्या प्रार्थनेकडे लक्ष देत असतो.
याशिवाय, पवित्र शास्त्र स्पष्ट शब्दात म्हणते की, देव प्रार्थना ऐकणारा आहे या सत्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. उदाहरणार्थ, प्रेषित योहानाने लिहिलेः “त्याजविषयी आपल्याला जो भरवसा आहे तो हा आहे की, आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल.” (१ योहान ५:१४) दाविद राजाने यहोवा देवास, “तू जो प्रार्थना ऐकतोस,” असे संबोधून आत्मविश्वासाने म्हटलेः “तो माझी वाणी ऐकेल.”—स्तोत्रसंहिता ५५:१७; ६५:२.
यास्तव, प्रार्थनेची कृती ही स्वतःठायी तिचे फायदे राखून असली तरीही शास्त्रवचने हे स्पष्ट करतात की, जेव्हा कोणी धार्मिक प्रार्थना करीत असतो तेव्हा त्यात पुष्कळसे समाविष्ठ असते. कारण कोणीतरी ती ऐकत असतो. तो ऐकणारा देव आहे.—याकोब ५:१६-१८.
ऐकल्या गेलेल्या प्रार्थना
ज्यांच्या प्रार्थना ऐकल्या व त्यांची उत्तरे मिळाली अशांच्या अनुभवांनी पवित्र शास्त्र ओतप्रोत भरलेले आहे. त्यांचे अनुभव हे स्पष्टपणे शाबीत करतात की, प्रार्थनेचे फायदे, निवडक निवारक प्रकरणांच्या प्रभावापलिकडील व एखाद्याच्या विचारांपलिकडील आहेत. एखादा आपल्या प्रार्थनेनुसार जे वैयक्तिक परिश्रम उचलत असतो त्यांच्याही पलिकडे त्यांचा विस्तार पोहंचतो.
उदाहरणार्थ, इस्राएलाच्या राज्यपदास पदच्यूत करण्याच्या अबशालोमच्या कटास तोंड देऊन असता दाविद राजाने प्रार्थना केलीः “हे परमेश्वरा अहीथोफेलाची [अबशालोमाचा सल्लागार] मसलत फोल कर.” ही कोणी छोटी विनंती नव्हती, कारण “त्या काळी अहीथोफेल जी मसलत देत असे ती जशी काय देवाजवळ मागितलेल्या कौलाप्रमाणे असे.” त्यानंतर अबशालोमाने, दाविद राजास पदच्यूत करण्याची जी मसलत अहीथोफेलाने दिली होती तिला नकार दिला. का बरे? “अहीथोफेलाची चांगली मसलत मोडून अबशालोमावर अरिष्ट आणावे म्हणून परमेश्वराने [यहोवा, न्यू.व.] ही योजना केली होती.” यास्तव, हे स्पष्ट आहे की, दाविदाची प्रार्थना ऐकली गेली होती.—२ शमुवेल १५:३१; १६:२३; १७:१४.
याचप्रमाणे, हिज्कीयाने, त्याला ज्या आजाराने मरणास टेकवले होते त्यापासून बरे करण्यास, देवाजवळ प्रार्थना केली व तो बरा झाला. हे सर्व, हिज्कीयाने प्रार्थना केल्याच्या परिणामात मनाचे परिवर्तन जणू घडले व त्याचे फायदे लाभले असे काही होते का? नाही. अगदीच नाही! तर हिज्कीयास यशया संदेष्टाद्वारे कळविण्यात आलेला यहोवाकडील संदेश असा होताः “मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रु पाहिले आहेत; मी तुला बरे करतो.”—२ राजे २०:१-६.
दानीएल, ज्याची प्रार्थना, तो अपेक्षित होता त्यापेक्षा अवकाशाने उत्तरदायी ठरली, तीत यहोवाकडील दिव्यदूताने खात्री दिलीः “तुझे शब्द ऐकण्यात आले.” इतरांच्या प्रार्थना जसे, हन्ना, येशूचे शिष्य, आणि लष्करी अधिकारी कर्नेल्य, अशांच्या प्रार्थनांचे उत्तर अशा मार्गांनी देण्यात आले जे मनुष्य शक्तिपलिकडील होते. म्हणून पवित्र शास्त्र अगदी स्पष्टपणे शिकविते की, केवळ त्याच प्रार्थना देवाकरवी स्वीकारल्या, ऐकल्या व उत्तराकरिता पात्र ठरविल्या जातात ज्या ईश्वरीय इच्छेच्या ऐक्यात असतात.—दानीएल १०:२-१४; १ शमुवेल १:१-२०; प्रे. कृत्ये ४:२४-३१; १०:१-७.
पण देव, आज त्याच्या विश्वासू सेवकांच्या प्रार्थना कशा ऐकतो?
प्रार्थनांची उत्तरे
वर उल्लेखिलेल्या प्रार्थनांची उत्तरे अत्यंत थरारकतेत तसेच अद्भूतरित्या देण्यात आली. कृपया हे लक्षात घ्या की, पवित्र शास्त्र काळातही प्रार्थनांची जी उत्तरे मिळत ती चटकन लक्षात येण्याजोगी नव्हती. यामागील कारण हेच होते की, त्यांचा संबंध नैतिक मनोबल तसेच कुवतीस वाढविणे, की ज्यामुळे देवाच्या सेवकांचे नीतीच्या मार्गांना चिटकून राहण्यास सहाय्य होईल. खासकरुन ख्रिश्चनांकरिता प्रार्थनांची उत्तरे, काहीतरी नेत्रदिपक किंवा शक्तिशाली असे घडवून आणण्याकरिता नव्हे तर, आध्यात्मिकतेत मदतीची असत.—कलस्सैकर १:९.
यास्तव, तुमच्या प्रार्थनांची उत्तरे जशी तुम्ही अपेक्षिता किंवा हवीत तशी सर्वदाच मिळत नसल्यास निराश होऊ नका. उदाहरणार्थ, एखादी परिक्षा टाळण्याऐवजी देव कदाचित तिच्यामध्ये टिकून राहण्याकरिता तुम्हास “शक्ति” पुरविण्याची निवड करील. (२ करिंथकर ४:७; २ तीमथ्य ४:१७) अशा शक्तिस आम्ही कधीही हलक्या प्रतीचे समजू नये, तसेच असा निष्कर्ष घेऊ नये की, यहोवा आमच्या प्रार्थनांचे कधीच उत्तर देत नाही.
इतर कोणाही ऐवजी देवाचा पुत्र, येशू ख्रिस्त याचेच प्रकरण लक्षात घ्या. उघडपणे ईश्वरनिंदक म्हणून मरण येऊ नये अशा चिन्तेत असता, येशूने प्रार्थना केलीः “हे बाप्पा, तुझी इच्छा असली तर हा प्याला मजपासून दूर कर.” तर काय, देवाने ही प्रार्थना अनुकूलपणे ऐकली का? होय, याची प्रतीती इब्रीयांस ५:७ मध्ये दिली आहे. यहोवाने त्याच्या पुत्रास आवश्यक त्या वधस्तंभावरील मरणापासून सोडविले नाही. त्याउलट, “स्वर्गाहून एक देवदूत येऊन आपणाला बळ देताना त्याच्या दृष्टीस पडला.”—लूक २२:४२, ४३.
आम्हापैकी कोणालाही हे उत्तर अत्यंत थरारक व अद्भूत चमत्कार वाटेल. पण यहोवा देवास, जो स्वतः अशा बळाचा उत्पादक आहे, हा काही अद्भूत चमत्कार नाही. शिवाय येशूस, त्याच्या पूर्वीच्या स्वर्गीय जीवनातील काळात अशा काही प्रसंगाचा अनुभव होता ज्यात दिव्यदूतांनी मनुष्यांची भेट घेतली होती. यास्तव, जसा आम्हावर होईल तसा देवदूताच्या दर्शनाचा प्रभाव त्याजवर झाला नाही. असे असताही, हा देवदूत, ज्याची येशूला त्याच्या मनुष्यप्रकृतीपूर्वीच्या जीवनात व्यक्तिगत ओळख होती, किंवा असलीच पाहिजे, त्याने त्याला त्याजपुढील नजीकच्या काळातील संकटांना तोंड देण्यास बळ पुरविले.
आजच्या आपल्या विश्वासू सेवकांच्या प्रार्थनांचे उत्तर देण्यात यहोवा वेळोवेळी तो टिकून राहू शकेल असे जरुरीचे बळ पुरवितो. हा आधार कदाचित, सोबतीच्या उपासकाकडून उत्तेजनाच्या रुपात मिळेल; कारण ते सतत आमच्या संगतीत असतात. मग, आम्ही असे मनात आणावे का की, आम्हासारख्या परिक्षा प्रसंगातून ते गेलेले नाहीत, मग त्यांना आम्हासारखे अनुभव आलेले नसणार, तर ते आम्हास कोणते बळ पुरवू शकणार, तेव्हा त्यांचे उत्तेजन काहीही कामाचे नाही? येशूही, त्याला नुकतेच दर्शन दिलेल्या देवदूताबद्दल असाच विचार मनात आणू शकत होता. त्याऐवजी, त्याने यहोवाने त्याच्या प्रार्थनेच्या उत्तरात जे उत्तेजन पुरविले होते त्याचा स्वीकार केला व यात तो त्याच्या पित्याची इच्छा विश्वासूपणे पुरी करू शकला. आम्हीही, आमच्या प्रार्थनांच्या उत्तरात देव जे सर्व बळ पुरवीत असतो त्याचा कृतज्ञतापूर्वक स्वीकार करू. हे आठवणीत असू द्या की, धीराने सहन करीत राहण्याचे काळ टळले की, अगण्य आशिर्वादांचा लाभ होतो.—उपदेशक ११:६; याकोब ५:११.
देव ऐकतो ही खात्री राखा
तुमच्या प्रार्थनेचे उत्तर तत्काळ न मिळालेसे वाटले तरी तिच्या गुणकारकतेबद्दलची खात्री गमावू नका. स्वतःचे दुःख, निराशा, किंवा देवाच्या सेवेतील वाढत्या जबाबदाऱ्याबद्दल विनवणी, अशा प्रकारातील काही प्रार्थनांच्या उत्तराकरिता अशा वेळेपर्यंत कदाचित थांबून राहावे लागेल जी देवास उचित आणि उत्तम वाटेल. (लूक १८:७, ८; १ पेत्र ५:६) जर तुम्ही कोणा वैयक्तिक गंभीर प्रकरणाबद्दल प्रार्थना करीत असला तर, आपल्या तत्परतेद्वारा देवास हे दाखवा की, तुम्हास केवढी तन्मयता आहे, व तुमचे उद्देश शुद्ध व खरे आहेत. याकोबाने हाच आत्मा देवदूताशी आवेशाने झोंबी काही काळ केली तेव्हा दाखविला. तो म्हणालाः “तू मला आशीर्वाद दिल्यावाचनू मी तुला जाऊ द्यावयाचा नाही.” (उत्पत्ती ३२:२४-३२) आम्हाठायीही ही खात्री असण्यास हवी की, आम्ही मागत राहिलो तर योग्य वेळी आशिर्वाद मिळवू.—लूक ११:९.
एक शेवटला विचार, विश्वाचा सार्वभौम सत्ताधीश आमचे ऐकतो हाच केवढा बहुमूल्य विशेष हक्क आहे. या दृष्टीकोणातून पाहता, आम्ही यहोवा देव, त्याच्या वचनांद्वारा, त्याजकडील आवश्यक गोष्टींबद्दल बोलतो त्यावेळी कान देऊन ऐकतो का? आमच्या प्रार्थना आम्हास आमच्या सृष्टीकर्त्याच्या अधिक निकट संबंधात आणतात, तर आम्हासही वाटावे की, त्याला जे काही आम्हास सागांवेसे वाटते ते सर्व आम्ही लक्षपूर्वक ऐकावे.
[६ पानांवरील चित्रं]
देव प्रार्थना ऐकतो. आम्ही त्याचे त्याच्या वचनातून ऐकतो का?