वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w92 ७/१ पृ. ३-४
  • कोणीतरी आमचे ऐकणारा असण्यास हवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कोणीतरी आमचे ऐकणारा असण्यास हवा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • मिळती जुळती माहिती
  • प्रार्थनेद्वारे देवाच्या जवळ या
    बायबल नेमके काय शिकवते?
  • “आपली मागणी देवाला कळवा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • प्रार्थनेतून मदत कशी मिळवावी
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • देवाशी नातं मजबूत करण्यासाठी प्रार्थना करा
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
w92 ७/१ पृ. ३-४

कोणीतरी आमचे ऐकणारा असण्यास हवा

मानव प्राणी असता, आम्ही जीवनात नेहमी आनंद व समाधानप्राप्तीचा प्रयत्न करत असतो. पण ज्या ज्या वेळी वैयक्‍तिक अडचणी उद्‌भवतात अशा काळात आमच्या समस्यांबद्दल कोणा एखाद्याशी सलगीने बोलणी करण्याजोगे असले तर केवढ्या मदतीचे व सांत्वनपर वाटते!

डॉ. जॉर्ज स्टीव्हनसन म्हणतात: “कोणासोबत बोलून अंतःकरण उघड करणे हे तुम्हावरील भारास हलके करते; तुमच्या चिन्ता अधिक प्रकाशात पाहण्यात मदत होते; शिवाय अनेक वेळा तुम्ही स्वतः त्यांच्याबद्दल काय करण्याची शक्यता आहे हे पाहण्यात मदत करते.” डॉ. रोझ हिल्फारडिंज यांनी बारकाईने पाहिलेः “आम्हास परस्परांची सुखदुःखे झेलली पाहिजेत. चिन्ता वाटून घेण्यास हव्या. जो ऐकतो, आम्हास समजून घेतो असा कोणी जगात आहे असे आमचे ठाम मत असावे.”

अर्थात, या सर्व गरजा कोणी मनुष्य पुऱ्‍या करु शकणार नाही. कारण वेळेवर आणि इतर गोष्टींवर मर्यादा रचलेली असल्यामुळे, जेव्हा आम्हास आमच्या मानवी आत्मविश्‍वासाची सातत्याने गरज असते तेथे तो उपलब्ध नसतो. किंवा काही वेळा आमच्या जिवलग मित्रांसोबतही काही प्रकरणांची चर्चा करण्यास मागेपुढे करतो.

अर्थात, खऱ्‍या ख्रिश्‍चनांचे ऐकून घेऊ शकणारा कोणीच नाही, असे मुळीच नाही; कारण प्रार्थनेचे साधन सदा उपलब्ध आहे. पवित्र शास्त्र वारंवार आम्हास, यहोवा हे नाव असणाऱ्‍या आमच्या सृष्टिकर्त्या देवाकडे प्रार्थना करीत राहण्याचे उत्तेजन देते. आम्हास प्रांजळपणे, येशूच्या नामाने आणि देवाच्या इच्छेच्या ऐक्यात प्रार्थना करण्यास मार्गदर्शित केले आहे. एवढेच काय पण व्यक्‍तिगत आणि खाजगी प्रकरणेही प्रार्थनेकरिता उचित विषय आहेत. “सर्व गोष्टींविषयी प्रार्थना . . . करुन . . . आपली मागणी देवाला कळवा,” असे आम्हास फिलिप्पैकर ४:६ मध्ये सांगितले आहे. हे केवढे असामान्य दान आहे! आमच्या विश्‍वाचा सार्वभौम सत्ताधीश सदोदित आपल्या नम्र सेवकांची जेव्हा जेव्हा त्यांना त्याच्या सान्‍निध्यात जाण्याची इच्छा होते तेव्हा तो त्यांचे स्वागतच करतो व त्यांच्या प्रार्थनांचा स्वीकार करतो.—स्तोत्रसंहिता ८३:१८; मत्तय ६:९-१५; योहान १४:१३, १४; १ योहान ५:१४.

तरी, देव खरेच ऐकतो का? काही कदाचित असाही विचार करतील की, प्रार्थनेस प्रभावी बनविणे हे मानवी कुशलतेवर अवलंबून आहे का. एखादी व्यक्‍ति प्रार्थना करते; आपल्या विचारांची जुळवाजुळव करून लाघवी शब्दात पुढे मांडते. याप्रकाराने त्याचे प्रकरण स्पष्ट करून, तो उचित उपाय मिळविण्याच्या मागे लागतो व त्याला प्राप्त करण्यात जे काही हातभार लावील अशा सर्व गोष्टींबद्दल तो दक्ष राहतो. त्याची समस्या मिटते, तेव्हा तो कदाचित देवाला श्रेय देईल, पण प्रत्यक्षात हा त्याच्या विचारांनी तसेच परिश्रमांनी उत्पादित केलेला अपेक्षित निकाल असतो.

अनेक आज असेच समजून आहेत की, प्रार्थनेत हेच सर्व काही आहे. आपण तेच समजता का? याप्रकारे प्रार्थनेचे बळ मर्यादित आहे का? चला समजू की, एखाद्याचे विचार आणि शारीरिक प्रयत्नांनी त्याच्या प्रार्थनेशी निगडीत राहून उत्तर प्राप्त करण्यात एक उल्लेखनीय भूमिका पार पाडली. पण मग त्या प्रकरणातील देवाच्या भूमिकेबद्दल काय? तुम्ही प्रार्थना करता ती देव ऐकतो का? तो तुमच्या प्रार्थनांना, त्यात काही महत्त्वाचे लक्ष देण्याजोगे व उत्तर देण्यालायकतेचे आहे इतके महत्त्व देतो का?

या प्रश्‍नांची उत्तरे अर्थपूर्ण आहेत. जर देव आमच्या प्रार्थनांकडे लक्ष पुरवीत नाही, मग प्रार्थना या केवळ मानसिक भावनांचा संच ठरतील. तेच जर देव, आमच्या प्रार्थनांकडे लक्ष देतो, लक्ष देऊन त्यांना ऐकतो तर अशा या सुविधेबद्दल आम्ही केवढे कृतज्ञ असावे! तिने आम्हास या सुविधेचा दर दिवशी उपयोग करण्यास प्रवृत्त करावे.

या कारणास्तव, तुम्ही आपले वाचन पुढे चालू ठेवावे असे आम्ही तुम्हाला आमंत्रण देत आहोत. कारण वर नमूद असलेल्या गोष्टींची चर्चा पुढील लेखात आहे हे तुम्हाला दिसेलच.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा