वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w92 ७/१ पृ. ३२
  • वाचकांचे प्रश्‍न

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वाचकांचे प्रश्‍न
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • मिळती जुळती माहिती
  • अलीशिबाला बाळ होतं
    बायबलमधून शिकू या!
  • “ते दोघं यहोवाच्या नजरेत नीतिमान होते”
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • सात्विक असल्यामुळे त्यांना प्रतिफळ मिळाले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • मार्ग तयार करणाऱ्‍याचा जन्म
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
w92 ७/१ पृ. ३२

वाचकांचे प्रश्‍न

जखर्या, जो बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाचा बाप होता, त्याला लूक १:६२ नुसार असे सूचित होते का की, जणू बहिरा तसेच मुका बनविले?

काहींनी तर असा निष्कर्ष काढला की जखर्या बहिरा बनला होता. पवित्र शास्त्रात आम्ही वाचतोः “त्याच्या बापाच्या नावावरुन त्याचे [मुलाचे] नाव जखऱ्‍या ठेवणार होते. परंतु त्याच्या आईने म्हटले, असे नाही; याला योहान म्हणावायचे आहे. ते तिला म्हणाले, या नावाचा तुझ्या नातलगात कोणी नाही. नंतर आपल्या मनात ह्‍याचे नाव कोणते ठेवावयाचे आहे, असे त्यांनी त्याच्या बापाला खुणेने विचारले. तेव्हा त्याने पाटी मागवून ह्‍याचे नाव योहान आहे असे लिहिले.”—लूक १:५९-६३.

तर या अहवालात असे काहीच नाही जे जणू ठामपणे म्हणते की तो काही काळाकरिता बहिरा होता.

या आधी, गॅब्रीएल देवदूताने जखर्यापाशी, ज्याला योहान संबोधितील अशा मुलाचा जन्म होण्याचे घोषित केले. वयस्कर जखर्याला या गोष्टीचा विश्‍वास पटेना. देवदूताने त्याला उत्तर दिलेः “पाहा, हे घडेल, त्या दिवसापर्यंत तू मुका राहशील, तुझ्याने बोलवणार नाही; कारण यथाकाळी पूर्ण होणाऱ्‍या माझ्या वचनांवर तू विश्‍वास ठेविला नाही.” (लूक १:१३, १८-२०) देवदूताने जखर्याच्या ऐकण्यावर नव्हे तर भाष्य शक्‍तिवर परिणाम होण्याचे म्हटले होते.

अहवाल पुढे म्हणतोः “तो [पवित्र स्थानातून] बाहेर आल्यावर त्याला त्याजबरोबर [थांबलेल्या लोकांबरोबर] बोलता येईना; तेव्हा त्याला पवित्र स्थानात दर्शन झाले आहे असे ते समजले; तो त्यांस खुणावू लागून गप्प राहिला.” (लूक १:२२) या स्थळी ज्या ग्रीक शब्दाचा अर्थ “गप्प” असा केलेला आहे तो “थक्क” म्हणजेच बोलण्यात तसेच ऐकण्यात थक्क झाला असावा. मग, जखर्याबाबत काय? त्याला बरे करण्यात आल्यावर काय घडले याचा विचार करा. “मग, तत्क्षणी त्याचे तोंड उघडले, त्याची जीभ मोकळी झाली व तो देवाचा धन्यवाद करीत बोलू लागला.” (लूक १:६४) यावरुन रास्तपणे याच दृष्टीकोणाप्रत जाणे होते की, जखर्याची केवळ वाचा दुर्बळ झाली होती.

मग, इतरांनी जखर्याला “खुणेने” का विचारले की, “ह्‍याचे [मुलाचे] कोणते नाव ठेवावयाचे आहे”? काही अनुवादकांनी तर हेच “खुणेच्या भाषेत” किंवा “खुणेची भाषा उपयोगात आणून” असे अनुवादन केले आहे.

जखर्या, जो देवदूताच्या घोषणेपासून मुका होता, त्याला वेळोवेळी हातवारे करणे भाग पडे, जी एक प्रकारची सांकेतिक भाषा तो स्वतःचे विचार व्यक्‍त करण्यास उपयोगात आणीत असावा. उदाहरणार्थ, जे मंदिराबाहेर होते त्यांना “तो खुणावत” असे. (लूक १:२१, २२) नंतर जेव्हा त्याने पाटी मागितली तेव्हा ती खुणेने किंवा हातवारे करून मागितली असेल. (लूक १:६३) ह्‍या कारणास्तव ही शक्यता आहे की, अनुच्चारितेच्या काळात हातवारे करून सभोवतालच्या लोकांशी संपर्क ठेवीत असेल.

तथापि, लूक १:६२ मध्ये ज्या खुणांचा उल्लेख आहे त्यांचेबद्दल अधिक स्पष्टतेची शक्यता आहेः नुकताच अलीशिबेने मुलाच्या नावाचा उल्लेख केला होता. यास्तव, तिची अवहेलना न करता, त्यांनी जे उचित पाऊल उचलणे होते ते उचलून तिच्या नवऱ्‍याचा अभिप्राय जाणून घेण्यास गेले. हे ते डोके डोलावून किंवा त्या अर्थाच्या खुणेने म्हणू शकत होते की, ‘बरे तर, आम्ही (म्हणजेच, जखर्यासह ज्या सर्वांनी) तिची पसंती ऐकली आता मुलाच्या नावाबद्दल तुझा अंतिम निर्णय काय आहे?’

त्यानंतर लागलेच दुसरा चमत्कार घडला, ज्याने परिस्थितीस पूर्वदशाप्राप्तीप्रत नेले. “मग, तत्क्षणी त्याचे तोंड उघडले, त्याची जीभ मोकळी झाली व तो . . . बोलू लागला.” (लूक १:६४) त्याच्या श्रवणशक्‍तिबद्दल कोणताही उल्लेख करण्याची गरज भासली नाही कारण तिजवर कोणताही परिणाम झाला नव्हता.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा