१९१४ जगास धक्का देणारे ते वर्ष
“१९१४-१८ दरम्यानचे महायुद्ध होरपळून निघालेल्या पृथ्वीचा आमच्या काळास त्या काळापासून विभाजित करणारा एक जणू पट्टा निमार्ण करणारे होते. प्रचंड प्राणहानि करून, कल्पनांना पार कलाटणी देऊन, तसेच गोंधळाचे असाध्य घाव उमटवून, त्याने जसे शारीरिक तसेच मानसिक मनोविकारांची या दोन पर्वांत मोठी दरी स्थापिली आहे.” —फ्रॉम द प्राऊड टॉवर—ए पार्ट्रेट ऑफ द वर्ल्ड बीफोर द वॉर १८९०-१९१४, या बार्बरा टकमन यांच्या पुस्तकातून.
“ते बहुतेक—पण अद्यापी पूर्णतयः नव्हे तरी—इतिहास जमा आहे की, जे हजारो लोक या अनुषंगिक विसाव्या शतकांच्या सुरवातीस त्याच्या तारूण्यात होते त्यांचेपैकी अनेक अद्याप हयात आहेत.”—लीन मॅकडोनाल्ड हिचे १९८७ मध्ये प्रकाशित, १९१४ या पुस्तकातून.
मग, १९१४ बद्दल एवढे कुतुहल का बाळगावे? तुम्ही कदाचित म्हणालः ‘मला, गतकाळाबद्दल नव्हे,’ तर ‘भावी काळात रस आहे.’ जेथे गोलार्धिक प्रदूषण, कौटुंबिक जीवनात बिघाड, गुन्हेगारी, मानसिक रोग आणि बेकारी यात सतत होत असलेली वाढ यामुळे मनुष्यांच्या भवितव्यावर थंड वारे वाहात असल्याचे दिसते. ज्या अनेकांनी १९१४ चे महत्वास पडताळू पाहिले, तो त्यातच, अधिक उज्वल भवितव्याची आशेचे आधार सापडले.
अनेक दशके आधी द वॉचटावर पाक्षिकाने हे स्पष्ट केले होते की, मनुष्यजात ही “सर्व वेदनांचा हा [जो] प्रारंभ” त्यास अनुभवीत आहेत. हा वाक्प्रचार येशू ख्रिस्ताने मनुष्यजातीच्या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या नाशाआधी ज्या घटना घडणार त्यांच्याबद्दल केलेल्या महान भविष्यवादातून आहे.—मत्तय २४:७, ८.
आज, मनुष्यजातीतील एक छोटासा हिस्सा अद्याप १९१४ मध्ये घडलेल्या नाट्यपूर्ण घटनांना आठवितो. मग ही वयस्कर पिढी, देव पृथ्वीस सर्वनाशापासून बचावून ठेविण्याआधीच जाणार का? पवित्र शास्त्रानुसार, नाही. “या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा,” येशूने अभिवचन दिलेः “तो जवळ दारानजीक आहे, असे समजा. मी तुम्हास खचीत सांगतो, हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही.”—मत्तय २४:३३, ३४.
१९१४ या वर्षास एवढे ऐतिहासिक महत्व का आहे याची गुणवत्ता ओळखण्यास १९१४च्या मध्यापर्यंत ज्या सर्व जागतिक घटना घडल्या त्या विचारात घ्या. त्या काळाआधीचे रशियाचे झार निकोलस, जर्मनीचे कैझर विल्हेम हे बादशहा तसेच ऑस्ट्रिया-हंगेरीचे सम्राट फ्रँस्ट योझेफ यांनी बलाढ्य सत्ता गाजविल्या. यांचेपैकी प्रत्येकजन चार दशलक्ष पुरुषांना हवे तेव्हा एकत्र करून त्यांना लढण्यास पाठवू शकत होता. पण त्यांच्या पूर्वजांनी ज्याला पवित्र मित्रत्वाचा तह म्हणत त्यावर स्वाक्षरी केल्या होत्या व हे घोषीत करण्यात आले होते की, एका महान “ख्रिश्चन राष्ट्रां”तील वेगवेगळ्या भागावर अधिपत्य गाजविण्यास देवाने त्यांची नेमणूक केली आहे.
ब्रिटानिका नामे शब्दकोशानुसार, या दस्तऐवजाने “१९व्या शतकाच्या दरम्यान परराष्ट्र संबंधाच्या युरोपियन नीती मार्गावर जोरदार परिणाम केला होता.” त्याचा लोकशाही विचारांच्या चळवळींना विरोध करण्यात तसेच ज्यांना ईश्वरी हक्क आहे अशा राजांना अनुकूलता दाखविण्यात उपयोग केला गेला. कैसर विल्हेम याने झार निकोलस याला लिहिले होतेः “आम्ही जे ख्रिश्चन राजे, त्या आम्हावर स्वर्गाकडून एक पवित्र कर्तव्य लादलेले आहे ते म्हणजे राजांना जे ईश्वरी हक्क आहेत त्या मागील तत्त्वांना उंचावणे. याचा अर्थ असा होतो का की, युरोपातील राजांचा कोणा तरी मार्गी देवाच्या राज्याशी संबंध जोडलेला होता? (पडताळा १ करिंथकर ४:८) मग, जी चर्चेस अशा राजांना आपला पाठिंबा देत होती त्यांच्याबद्दल काय? ख्रिश्चनत्वाबद्दलचा त्यांचा दावा खरा होता का? या प्रश्नांची उत्तरे १९१४ नंतरच्या वर्षांत स्पष्ट होत गेली.
ऑगस्टमध्ये, अकस्मात
“१९१४ मधील वसंत ऋतुत तसेच उन्हाळ्यात युरोपभरात असाधारण शांतता पसरल्याचे लक्षात येत होते.” असे ब्रिटनचे मुत्सद्दी विन्स्टंन चर्चिल यांनी लिहिले आहे. सर्वसाधारण लोक भविष्यकाळाबद्दल आशावादी होते. द वर्ल्ड वॉर वन नामे आपल्या पुस्तकात लुईस स्नायडर म्हणतातः “१९१४ जग हे आशा आणि आश्वासनांनी भरलेले होते.”
हे खरे की, जर्मनी व ब्रिटनमध्ये अनेक वर्षे हाडवैर होते. तरीसुद्धा, जसे इतिहासकार जी. पी. गुच, अंडर सीक्स रेन्स, या आपल्या पुस्तकात म्हणतातः “१९११, १९१२ किंवा १९१३ पेक्षा १९१४ मध्ये युरोपियन लढाया कमी झाल्याचे दिसते. दोन्ही सरकारमधील परस्पर संबंध या आधीच्या सर्व वर्षापेक्षा अधिक चांगले होते. १९१४ मधील ब्रिटनचे कॅबिनेट सदस्य विन्सटन चर्चिल यांच्या म्हणण्यानुसार, “जर्मनी, हे आमच्याच विचाराचे होते असे दिसत होते, म्हणजेच शांती असावी अशाच निश्चयाचे होते.”
पण तेच, जून २८, १९१४ रोजी ऑस्ट्रीया-हंगेरी साम्राज्याचे युवराज साराजीवो यांचा भीषण खून होताच क्षितिजावर दाट धुके जमू लागली. एक महिन्यानंतर, सम्राट फ्रँस्ट योझेफने सरबियावर युद्ध पुकारले आणि आपल्या सैन्यास ते राज्य पादाक्रांत करण्यास हुकुम दिला. मध्यंतरीच्या काळात कैसरवेल्हमच्या हुकमात जर्मनीच्या एका मोठ्या पलटणीने अकस्मात ऑगस्ट ३, १९१४ च्या रात्री बेलजीयमवर हल्ला केला व फ्रान्सकडे मुसंडी मारली. दुसऱ्या दिवशी ब्रिटनने जर्मनीशी युद्ध पुकारले. झार निकोलसच्या बाबतीत पाहता, त्याने जर्मनीशी तसेच ऑस्ट्रीय-हंगेरीशी युद्ध करण्यास रशियन सैन्याची मोठ्या संख्येत जमवाजमव करण्याचा हुकुम दिला. परस्परांचीच कत्तल करून सबंध खंडास रक्तलांछीत करण्यापासून या पवित्र दोस्तीतहाने युरोपियन राजांना रोकले नाही. तरी अधिक मोठे धक्के अद्याप बसणे होते.
ख्रिसम्सपर्यंत निवळले
महायुद्धाच्या अचानक उद्वेगाने लोकांच्या आशावादास थंडाविले नाही. अनेकांठायी हा विश्वास होता की, तो एका अधीक चांगल्या जगास सामोरे आणील आणि सबंध युरोपभर मोठ मोठाले जमाव, आपला त्याला पाठिंबा असल्याचे दाखविण्यास, जमले होते. द स्ट्रगल फॉर मास्टरी इन युरोप—१८४८-१९१८, या आपल्या पुस्तकता ए. जे. पी. टेलर लिहितातः “१९१४ मध्ये कोणीही लष्करी बळाचे वैभवाखेरीज युद्धाचा एवढा भयानक परिणाम होईल, असा खोलवर विचार केलेला नव्हता; ते, एवढे भयानक सामाजिक महासंकट असेल असे कोणीच अपेक्षिले नाही. याउलट, अनेकांची भाकिते होती की, काही महिन्यातच युद्ध विराम होईल.
तरीसुद्धा, युरोपियनांनी १९१४ मधील त्यांचा ख्रिसमस साजरा करण्याआधी ४५० मैल (७०० कि. मि.) लांब पसरलेल्या खंदकाच्या सीमेवर, जी स्वीत्झर्लंडच्या दक्षिणेपासून ते बेल्जीयमच्या उत्तर किनाऱ्यापर्यंत पोहंचलेली होती, हट्टहासास पेटल्यामुळे हत्याकांड घडला. याला पश्चिम आघाडी संबोधीत, व जर्मन लेखक हर्बट सल्झबाक याने १९१४ च्या शेवटल्या दिवसावर आधारीत जी आपली रोजनिशी बनविली होती तिजमध्ये या प्रसंगाचा उल्लेख केलेला आहे. त्यातील टिप्पणात म्हटलेः “हे भयानक युद्ध सतत तसेच चालू राहिले; आणि तेच सुरवातीला कोणालाही हेच वाटे की, ते लवकरच, काही आठवड्याच्या आत संपेल; पण शेवट कोठेही दृष्टीपथात नाही.” मध्यंतरी, युरोपच्या इतर भागात, रशिया, जर्मनी, ऑस्ट्रिया-हंगेरी तसेच सर्बियाच्या सैनिकात धुमश्चक्री माजली होती. लवकरच याचे लोण युरोपाबाहेरही पसरले. शिवाय समुद्रावर, आफ्रिका तसेच मध्यपूर्वेत आणि पॅसिफिक समुद्रावरील बेटावरही लढाया लढविल्या गेल्या.
चार वर्षात युरोप उध्वस्त झाले होते. जर्मनी, रशिया, आणि ऑस्ट्रिया-हंगेरीने प्रत्येकी दहा ते वीस लक्ष सैनिक गमावले. रशियाने तर १९१७ मधील बोलशेव्हिक क्रांतीत तिची राजसत्ताक पद्धतही गमावली. सर्व युरोपियन राजांना व त्यांच्या पाद्रीवर्गीय समर्थकांना केवढा मोठा धक्का बसला! आधुनिक इतिहासकार तर अद्याप आश्चर्य व्यक्त करीत आहेत. गॉर्डन ब्रुक-शेफर्ड, हे रॉयल सनसेट या आपल्या पुस्तकात विचारतातः “हे सत्ताधिष्ठ, जे बहुतेक परस्परात रक्ताने म्हणा किंवा विवाहाने नातेवाईक होते, व राज्यपद सांभाळून ठेवण्यास ज्यांनी स्वतःस वाहीले होते, अशांनी ज्यामुळे त्यांच्यातील काही नामशेष झाले व शेष निर्बल राहिले अशा भ्रातृहत्येच्या रक्तपातात स्वतःस कसे घसरु दिले.”
फ्रान्सने आपले प्रजासत्ताक दहा लाख सैनिकांच्या बळीने गमावले, तर ब्रिटीश साम्राज्य, ज्याची साम्राज्यशाही युद्धाआधीच मावळू लागली होती, त्यानेही एकून ९,००,००० बळी दिला. अशाप्रकारे, सर्व मिळून ९० लक्ष सैनिक कामी आले आणि सुमारे २ कोटी दहा लक्ष जखमी झाले. युद्धविना होणाऱ्या नुकसानीबद्दल द वर्ल्ड बुक एनसायक्लोपिडीया म्हणतेः “आजार, भूक आणि याचप्रकारच्या इतर युद्ध परिणामांच्या कारणास्तव मुलकींचे केवढे नुकसान झाले याचा कोणालाही संपूर्ण अंदाज नाही. काही इतिहासकारांचा अंदाज आहे किं सैनीकाएवढेच मुलकीही मारले गेले असावेत.” १९१८ मधील स्पॅनिश फ्लू साथीने सबंध जगभरातून २,१०,००,००० आपला टोल गोठला.
आमूलाग्र बदल
जसे त्याकाळी संबोधीले जाई तसे, महायुद्ध काळानंतर जग तसेच राहिलेले नव्हते. ख्रिस्ती धर्मराज्यातील पुष्कळशा चर्चेसने ज्याअर्थी मोठ्या उत्साहाने त्यात भाग घेतला होता त्यामुळे बचावून राहिलेल्या पैकीचे भ्रम निरासांनी नास्तिकतेस अनुकूलता दर्शविण्यास धर्माचा त्याग केला. इतरांनी जडवाद आणि मौजमजेचा पाठलाग सुरु केला. प्राध्यापक मॉद्रीस एकस्टीन्स हे, राईटस् ऑफ स्प्रिंग्ज नामे आपल्या पुस्तकात म्हणतातः “१९२० काळाने “सुख हेच अंतिम साध्य आणि कैफाने परमोच्च गाठू अशांची असामान्य वाढ प्रत्यक्ष पाहिली.”
प्राध्यापक एकस्टीन्स खुलासा करतातः “युद्धाने, नीतीच्या आदर्शावर घाला घातलेला आहे.” दोन्ही बाजुच्या पुरूषांना धर्म, लष्कर व राजनीतीच्या नेत्यांनी असे पढविले की, बहुसंख्य कत्तल ही पराभवातहि नैतिक विजय आहे, असा दृष्टिकोण बाळगून असा. एकस्टीन्स मान्य करतात की हा केवळ नीतिच्या परंपरेवर केलेला निष्ठुर आघात आहे, जिचा उगम यहुदी-ख्रिश्चन नीतिशास्त्रातून असल्याचे प्रतिपादन केले जाते.” पुढे ते म्हणतातः “पश्चिम आघाडीवरील लष्करी छावण्याकडे येण्याजाण्याच्या वाटेवर लवकरच वेश्यागृहे नित्याच्या आवश्यक वस्तु म्हणून अवतरील. स्वदेशगृहाच्या आघाडीवर नीतीच्या व्यक्तित्वाने आपली कांचोळी आणि कमरबंद ही दोन्ही सैल केली. वेश्याव्यवसायात लक्षवेधक वाढ झाली.
होय, १९१४ने पुष्कळशे बदल घडविले. तरी अनेक जसे अपेक्षित होते तसे त्याने कोणतेही अधीक चांगले निर्माण केले नाही, शिवाय युद्धाने “सर्व युद्धांचा शेवट” घडवून आणला नाही. याउलट, बार्बरा टकमन या इतिहासकारनीने हेरलेः “भ्रामक कल्पना आणि उत्साह जो १९१४ पर्यंत सर्वकाही शक्य असल्याचे भासवी तो हळूवार पण सत्य परिस्थितीच्या प्रचंड लाटेच्या दबावाखाली कायमचा बुडाला.
काही झाले तरी, १९१४ मधील शोकांतिका ज्यांनी प्रत्यक्ष पाहीली त्यांचेपैकी काहींना जे काही त्या वर्षी घडले त्याबद्दल नवल वाटले नाही. प्रत्यक्षात, युद्धास सुरवात होण्याच्या आधी पासुन ते “संकटाच्या अतिशय भयानक काळाची” अपेक्षा करीत होते. ते कोण होते? व ते असे काय जाणून होते ज्याची इतरांना जाणीव नव्हती?
[५ पानांवरील चौकट]
१९१४मधील ब्रिटीशांचा आशावाद
“सुमारे एक शतकभर आमच्या बेटा सभोवताली एकही शत्रु दिसला नाही. . . . या शांत किनाऱ्यावर तसा काही धोका उद्भवू शकण्याची शक्यता आहे का हा विचारहि करणे मुष्कीलीचे होते. . . . लंडन एवढे आनंदी व भरभराटीस आलेले पूर्वी कधीही दिसले नव्हते. कारण्याजोगे, पाहण्याजोगे व ऐकण्याजोगे असे जे सर्व होते तेवढे पूर्वी कधीही नव्हते. कोणाही ठायी मग तो वयस्कर असो कि तरूण, त्याच्याठायी हा संशयही कधी उद्भवला नाही की, जे सर्व ते त्या अतुलनीय १९१४ च्या मोसमात प्रत्यक्ष पाहात आहेत ते प्रत्यक्षात, एका युगाच्या समात्पिचे आहे.”—जेफरी मार्कस् यांनी लिखीतः बीफोर द लँप्स वेन्ट ऑऊट, पुस्तकातून.