राज्य घोषकांचा वृत्तांत
पॅराग्वेच्या विरळ क्षेत्राचा उरक फलप्राप्ती देतो
वॉचटावर संस्थेच्या पॅराग्वेमधील शाखा दप्तर, त्यांच्या सबंध क्षेत्रभागावर राज्य सुवार्तेच्या घोषणेचे काम पूर्णतया उरकलेच पाहिजे याची पूर्ण जाणीव बाळगून आहे. (प्रे. कृत्ये १:८) होय, “मोठ्या संकटात” सध्याच्या दुष्ट व्यवस्थीकरणाचा संपूर्ण नाश करण्याआधीचा हाच तो काळ आहे ज्यात सर्वांस राज्याबद्दलचे शिक्षण देण्याची व यहोवाची सेवा करण्याची संधि आहे. (मत्तय २४:२१, २२) पुढील काही अनुभव हे दाखवितात की मंडळीसाठी नेमून न दिलेली जी अनेमस्त क्षेत्रे आहेत अशांवरील लोकांच्या मदतीकरता काय केले गेले. शाखादप्तर म्हणतेः
चोहोकडील अनेमस्त क्षेत्रे, हंगामी खास पायनियरांकरवी सेवेने उरकावीत अशा योजना आखण्यात आल्या. १९९० मधील सेवावर्षातील नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात ३९ बंधू भगिनींनी, जेथे अद्याप एकही राज्य प्रचारक नव्हता अशा शंभर शहरात व छोटछोट्या गावात सेवा केली. त्या सर्वांनी मिळून ६,११९ पुस्तके, ४,२६२ पुस्तिका आणि ५,१४४ मासिके खपविली गेली. या सेवा हालचालींद्वारे प्रचारकांच्या एका नव्या गटास कार्यान्वित करण्यात आले.
▫ एका पायनियर भगिनीने अशाच अनेमस्त क्षेत्रावर सेवा करतेवेळी, एका स्त्रीला तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक दिले. तिजबरोबर अभ्यास चालविण्याचेही ठरविले व तिने आनंदाने होकार दिला. पायनियर जेव्हा परत आली तो तिजकरिता फक्त ती स्त्री नव्हे तर तिचा नवरा आणि दहा मुलेही थांबून होती. त्या पुढील भेटीच्या वेळी, ते कुटुंब शिवाय त्यांचे मित्र व शेजारीही अभ्यासाकरिता तयार होते! त्या स्त्रीने त्यांना असे म्हणून आमंत्रित केले होते की, अभ्यास फार चांगला आहे व यहोवा ज्या आशा तसेच आशिर्वाद देतो ते आश्चर्यजनक आहेत. हे तिजकरिता असे काही होते, जे यापूर्वी कोणीही कधीच तिला सांगितले नव्हते; ह्यास्तव तिला वाटले की, ही सुवार्ता तिच्या शेजाऱ्यांनी तसेच आप्तानीही ऐकावी.
दर वेळी पायनियर अभ्यास चालविताना एवढे लोक उपस्थित असत की, जणू एक छोटीशी मंडळी बनली. हे रसिकजन अनेक प्रश्न विचारीत, शिवाय अभ्यासात सहभागी होत. मग जेव्हा पायनियरने हे समजावून सांगितले की, आता क्षेत्रभागावरील काम संपत आले आहे व लवकरच तिला तिच्या इतर सहकाऱ्यासोबत नवीन ठिकाणी स्थलांतर व्हावे लागेल; तेव्हा त्या स्त्रीने मोठ्या काळजीने विचारले, तर मग त्यांचे काय होणार? तर जवळपास जी मंडळी होती तिजमधील बंधू येऊन अभ्यास पुढे चालवितील, अशी व्यवस्था केली. आता या आस्थेवाईक, मेंढरासमान लोकांचे सहाय्य करण्यास खास पायनियरांना पाठविले आहे.
▫ दुसऱ्या अशाच अनेमस्त क्षेत्रभागात घरोघरचे कार्य करीत असता एका पायनियर भगिनीस असा एक मनुष्य भेटला ज्याने दहा वर्षापूर्वी सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते हे पुस्तक घेतले होते. तेव्हापासून त्याचा यहोवाच्या साक्षीदारांसोबत संपर्क घडला नव्हता. तरीही, तो हे जाणून होता की, यहोवा, ज्याला तो सेनाधीश यहोवा संबोधीत असे, तोच खरा देव आहे आणि त्याच्या मर्जीनुरुप केवळ त्याचीच भक्ति करण्यास हवी. म्हणून तो त्याच्या ओळखीच्या सर्वांबरोबर यहोवाबद्दल बोलत असे. शिवाय, दर आठवडी तो एका आस्थेवाईक जोडप्याची भेट घेण्यास व देवाबद्दल बोलणी करण्यास तीन किलोमीटर्सची पायपीट करी, कारण, त्याच्या म्हणण्यानुसार, ‘जर मी जाणे थांबविले तर ते यहोवाला विसरुन जातील.’ या विवाहीत जोडप्यासोबतच, इतर दहा जन असे होते की, ज्यांना पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्याची गोडी होती, व हे सर्व केवळ, या आस्थेवाईक व्यक्तिने त्यांना उपदेश केला म्हणून घडले.
लक्षणीयरित्या, पायनियरांनी त्याची भेट घेण्याच्या काही दिवस आधी याच गृहस्थाने स्थानिक पाळकाला व त्याजसोबतच्या मिरवणूकीस कुमारी मेरीच्या पुतळ्यासह त्याच्या घरात प्रवेश करण्यास मना केले व स्पष्ट सांगितले, तो मूर्तीवर विश्वास ठेवीत नाही. पाळक संतापला. त्या रात्री या गृहस्थाने मदतीकरिता यहोवाकडे प्रार्थना केली. यास्तव कल्पना करा की, पायनियरांनी त्याची भेट घेतल्यावर त्याला केवढा आनंद वाटला असावा! पद्धतशीर पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्याची व्यवस्था करण्यात आली व तो गृहस्थ आता ईश्वरशासित संघटनेच्या सोबतीत सतत प्रगती करीत आहे.
खरोखरी, पराग्वेमधील एकत्रित करण्याचे कामावर, बंधूवर्ग जसजसा या अनेमस्त क्षेत्रभागात पूर्णपणे साक्षीकार्य उरकत आहे, यहोवा आपल्या आशिर्वादांचा वर्षाव करीत आहे.—मत्तय २४:१४.