खरे स्वातंत्र्य—कोणत्या उगमापासून?
“पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही. हे परमेश्वरा [यहोवा, न्यू.व.] मला शिक्षा कर.”—यिर्मया १०:२३, २४.
१, २. बहुतेक लोकांना स्वातंत्र्याबद्दल काय वाटते, पण आणखीन कशाचा विचार होण्यास हवा?
खऱ्या स्वातंत्र्याबद्दल तुम्हाठायी कदर आहे यात काही शंका नाही. आपले विचार व्यक्त करण्याचे, कोठे व कसे जीवन व्यतित करावे याबद्दलचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य स्वतःला असावे अशी तुमची इच्छा असते. स्वतःला आवडणारे काम निवडावे, आपले आवडीचे अन्न, संगीत व मित्र निवडावे ही देखील तुमची इच्छा असते. लहान किंवा मोठ्या गोष्टींची आवडनिवड तुम्हाला असते. आपणावर हुकुमशहा असावेत व थोडे काय किंवा काहीच स्वातंत्र्य असू नये असे कोणाही साधारण मनुष्याला वाटत नसते.
२ तथापि, तुम्हाला तसेच इतरांनाही खऱ्या स्वातंत्र्यापासून लाभ होत राहावा अशा जगाची इच्छा तुम्हाला होत नाही का? स्वातंत्र्याचे रक्षण होत आहे व त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनाला पूर्ण स्वरुपाचे वक्तव्य करण्याचा लाभ मिळत आहे असे जग तुम्हाला नको का? आणि जर शक्य आहे तर भीती, गुन्हेगारी, उपासमार, दारिद्य्र, प्रदूषण, आजार व युद्धे यापासून स्वतंत्र असणारे जगही तुम्हाला नको का? होय, अशा प्रकारातील स्वातंत्र्य हे खरेच हवेहवेसे वाटेल.
३. आम्हाला स्वातंत्र्याचे का मोल वाटते?
३ आम्हा मानवांना स्वातंत्र्याबद्दल इतके का वाटत असते बरे? पवित्र शास्त्र म्हणतेः “जेथे प्रभूचा [यहोवा, न्यू.व.] आत्मा आहे, तेथे मोकळीक आहे.” (२ करिंथकर ३:१७) तर यहोवा हा स्वतंत्रतेचा देव आहे. याशिवाय त्याने आमची निर्मिती आपल्या ‘प्रतिरुपाप्रमाणे व सदृश्यतेने’ केलेली असल्यामुळे त्याने आपणाठायी अशी स्वेच्छा रुजविली आहे की ज्यामुळे स्वातंत्र्याची कदर आम्हाठायी राहून त्याचा लाभ मिळवता येतो.—उत्पत्ती १:२६.
स्वातंत्र्याची पायमल्ली
४, ५. इतिहासभर स्वातंत्र्याची कशी विटंबना झाली?
४ आपल्या स्वेच्छास्वातंत्र्याचा दुरुपयोग करून लोकांनी इतर लाखो लोकांना दास बनविले, यातना दिल्या व जिवेही मारिले. पवित्र शास्त्र कळवते की, साधारण ३,५०० वर्षाआधी “मिसरी लोक इस्राएल वंशजापासून सक्तीने काम घेऊ लागले. असल्या बिकट कामाने त्यांस जीव नकोसा झाला.” (निर्गम १:१३, १४) द एन्सायक्लोपिडिआ अमेरिकाना कळवते की, इ. स. पूवीच्या चवथ्या शतकात अथेन्स तसेच इतर दोन ग्रीक शहरात मुक्त लोकांपेक्षा दासांची संख्या अधिक होती व त्यांचे प्रमाण ४:१ असे होते. हाच उगम पुढे असेही म्हणतोः “रोममध्ये आरंभाला दासांना काहीच अधिकार नव्हते. थोडी हलकीशी चूक झाली तरी त्या कारणामुळे त्याला मरणदंड मिळे.” काम्पटन्स एन्सायक्लोपिडीआ हे परिक्षण देतेः “दासांचे परिश्रम हा रोममध्ये राष्ट्राचा मूळ पाया होता. . . . शेतावर गुलाम साखळ्यांनी बंदिस्त स्थितीत काम करीत. रात्री त्या सर्वांना एकत्र बांधीत व एका मोठ्या तुरुंगात जमिनीत अर्ध्यावर गाडले जाण्याच्या स्थितीत टाकून देत.” हे दास एकेकाळी स्वतंत्र होते, त्यामुळे या जीवनात त्यांना किती खडतर कष्ट काढावे लागले असतील याची कल्पना करा!
५ ख्रिस्ती धर्मजगताने देखील काही शतके गुलांमांचा जाचक व्यापार केला. द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिआ म्हणतेः “१५०० ते १८००च्या काळादरम्यान युरोपियनांनी आफ्रिकेमधून पश्चिम गोलार्धात सुमारे १ कोटी काळ्या गुलांमाची आवक केली.” आजच्या या २०व्या शतकात नाझी राजकीय बंद्यांच्या छावण्यात सरकारी धोरणामुळे लाखो कैद्यांना इतके कठीण परिश्रम करावे लागले की, त्यांचा त्यात मृत्यु झाला किंवा त्यांना ठार करण्यात आले. या बळीत यहोवाच्या साक्षीदारांचाही समावेश होता, ज्यांनी घातकी नाझी सत्तेला आपला पाठिंबा दर्शविला नाही.
खोट्या धर्माला बंदिस्त झालेले
६. प्राचीन कनानामध्ये खोट्या धर्माने लोकांना कसे बंदिवान केले होते?
६ खोट्या धर्मास जडून राहण्यामुळे देखील बंदिस्तपणा परिणामित होतो. उदाहरणार्थ, प्राचीन कनानात मोलख मूर्तीस लहान मुलांचा बळी देत. या खोट्या दैवताच्या मोठ्या प्रतिमेच्या आत एक भट्टी जळत राही असे म्हटले जाते. मग, जिवंत लहान मुलांना या मूर्तीच्या पसरलेल्या हातावर टाकीत, जी तेथून खाली आगीत पडत. काही इस्राएलांनी देखील खोट्या भक्तिचा हा प्रकार आचरला. देव म्हणाला की, त्यांनी ‘मोलख मूर्तीस आपले पुत्र व कन्या होम करून अर्पिले; हे मी त्यांस आज्ञापिले नव्हते, ते असले कृत्य करतील हे माझ्या ध्यानीमनीही नव्हते.’ (यिर्मया ३२:३५) मोलखने आपल्या उपासकांना कोणता फायदा दिला? आज ती कनानी रा व त्या मोलखाचे उपासक कोठे आहेत? ते सर्वच नष्ट झाले आहेत. ती उपासना खोटी होती, ती सत्यावर नव्हे तर लबाडीवर आधारलेली होती.—यशया ६०:१२.
७. ॲझेटक धर्माची कोणती किळसवाणी प्रथा होती?
७ मध्य अमेरिकेत काही शतकांआधी ॲझेटेक्स लोक देखील खोट्या धर्माचे गुलाम झाले होते. लोकांचे आपापले विशिष्ट दैवत होते, ते नैसर्गिक शर्क्तिची देव म्हणून भक्ति करीत; दैनंदिन जीवनाच्या विविध कार्यप्रणालींच्या देवता होत्या; वनस्पतींनाही दैवते होती; आणि आत्महत्येचेही एक दैवत होते. द एन्शियन्ट सन किंग्डम ऑफ द अमेरिकास् हे पुस्तक कळवतेः “ॲझेटिक मेक्सिको सरकारने वरपासून खालपर्यंत असे संघटन निर्माण केले होते की, ज्यामुळे अदृश्य शर्क्तिना होता होईल तितक्या मानवी हृदयांचे बळी देऊन संतुष्ट करावे. रक्त हे त्या दैवतांचे पेय होते. दैवतांना योग्य यज्ञाचा बळी कैद्यातून मिळावा यासाठी प्रत्यक्ष अविश्रांत झोंबी चालत.” १४८६ मध्ये एका मोठ्या मनोऱ्याकृती मंदिराचा समर्पण सोहळा घडला तेव्हा “हजारो बळींची मोठी रांग लागली होती. त्यांना यज्ञाच्या दगडावर आपले हात पसरुन पडावे लागे. तेव्हा त्यांचे हृदय कापून काढीत व ते काही काळ सूर्यासमोर धरीत” व अशाप्रकारे सूर्यदेवतेला संतुष्ट करीत. द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडीआ म्हणतेः “उपासक बळीच्या शरीराचा उरलेला भाग कधी कधी खात असत.” तरीपण या आचारसंहितेने ॲझेटक साम्राज्य किंवा त्याच्या खोट्या धर्माला वाचवले नाही.
८. ॲझेटकमध्ये ज्या भयानक रुपाने घडत तशा आधुनिक हत्येबद्दल एका मार्गदर्शकाने काय म्हटले?
८ एका संग्राहलयात कोणी ॲझेटक एका तरुण पुरुषाचे हृदय कापून काढीत असल्याचे चित्र ठेवले होते. तेथे काही लोकांनी भेट दिली. त्यावेळी त्यांचा मार्गदर्शक त्या चित्राची माहिती देत होता. माहिती ऐकून प्रवाश्यांमधून एक मोठा सुस्कारा ऐकायला आला. मग, या मार्गदर्शकाने म्हटलेः “मूर्तिपूजक देवांना ॲझेटक याजक एका तरुणाचा यज्ञ करण्याची माहिती ऐकून तुम्हाला कसे वाटले ते मला समजण्यासारखे आहे. पण या २०व्या शतकात लाखो तरुण पुरुषांचा युद्धदेवताला बळी घेतला गेला आहे, त्याचे काय? ते यापेक्षा अधिक चांगले होते का?” युद्ध पेटल्यावर सर्व राष्ट्रातील धार्मिक पुढारी विजयप्राप्तीसाठी प्रार्थना करतात आणि जरी आपल्याच धर्माचे लोक शत्रूपक्षाला असले तरी त्यांना ठार करून आपल्याला विजय मिळावा अशा आशीर्वादासाठी ते विनंती करतात ही वस्तुस्थिती आहे.—१ योहान ३:१०-१२; ४:८, २०, २१; ५:३.
९. आजच्या कोणत्या प्रथेने इतिहासातील सर्वात अधिक तरुण बळी घेतले जात आहेत?
९ मोलख, ॲझेटक दैवते आणि युद्धे यांना मिळालेला तरुणांचा बळी, हा गर्भपाताद्वारे जगभरात जी हत्या घडते त्यापुढे नक्कीच फिका पडेल; जगभर दरवर्षी असे ४ ते ५ कोटी गर्भपाताचे मृत्यु घडतात. गेले तीन वर्षातील गर्भपातांच्या बळींची संख्या, या शतकात घडलेल्या सर्व युद्धबळींच्या संख्येपेक्षा एक कोटीहून पुढे गेली होती. दर वर्षी जितक्या बालकांचा गर्भपात केला जातो त्यांची संख्या १२ वर्षांच्या नाझी सत्तेमध्ये जितक्या हत्या घडल्या त्यापेक्षा अधिक असते. अलिकडील दशकात तर मोलख किंवा ॲझेटक दैवतांना बळी गेलेल्या संख्येच्या पुढे हजारोंनी बालकांचे गर्भपात घडले आहेत. तरीही हे गर्भपात करणारे किंवा घडविणारे बहुतेक सर्वच जण आपण कोणातरी धर्माचे आहोत असे दाव्याने सांगत असतात.
१०. लोक खोट्या धर्मास आणखी कोणत्या एका प्रकाराने जखडलेले आहेत?
१० खोट्या धर्माने लोकांना आणखी एका प्रकाराने जखडविलेले आहे. उदाहरणार्थ, पुष्कळ जण असे मानतात की, मृत लोक आत्मिक जगतात जिवंत आहेत. अशा या विश्वासाचा परिणाम हा दिसतो की, मृत पूर्वजांचे भय निर्माण होते व त्यांना संतुष्ट करून त्यांच्याकडून लाभ मिळवण्यासाठी त्यांची भक्ति केली जाते. यामुळे लोक मांत्रिक, दुरात्मिक प्रकारात गुंतले असून यांना तसेच धर्मपुढाऱ्यांना बोलावण्यात येऊन त्यांच्याद्वारे मृतांना संतुष्ट करण्याचे प्रकार आचरले जातात. या कारणास्तव हा अत्यंत उचित असा प्रश्न आहे की, अशा या दास्यत्वातून बाहेर पडण्याचा एखादा मार्ग आहे का?—अनुवाद १८:१०-१२; उपदेशक ९:५, १०.
[८, ९ पानांवरील चित्रं]
इतिहासभर काहींनी आपल्या स्वेच्छा स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून इतरांना गुलाम बनविले