मानवाच्या “नव्या जगाची व्यवस्था” जवळ आली आहे?
१. अलिकडील वर्षात अधिक राजकीय स्वातंत्र्याची इच्छा कशी व्यक्त होताना दिसली आहे?
आज लाखो लोक खोट्या धर्माच्या बंधनाखाली आहेत व पुष्कळांना तर तसेच राहणे आवडते. याच वेळी अधिकाधिक लोक राजकीय स्वातंत्र्याची मागणी करीत आहेत. गेल्या काही वर्षात पूर्व युरोपात आणि इतरत्र घडलेल्या अपूर्व घटना स्पष्ट करतात की, लोकांना अधिक मुक्त स्वरुपाचे सरकार असावेसे वाटते. या कारणामुळेच स्वातंत्र्याचे नवे पर्व जवळ आले आहे असे पुष्कळ म्हणत आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षांनी तर याला “नव्या जगाची व्यवस्था” असे म्हटले. खरेच जागतिक नेते सर्वत्र म्हणत होते की, आता शीतयुद्ध आणि शस्त्रस्पर्धा ही संपली असून मानवजातीसाठी शांतीच्या नव्या पर्वाची पहाट उगवली आहे.—पडताळा १ थेस्सलनीकाकर ५:३.
२, ३. खऱ्या स्वातंत्र्याविरुद्ध कोणती परिस्थिती काम करीत आहे?
२ समजा, मानवी प्रयत्नांनी शस्त्रास्त्रे कमी झाली आणि अधिक मुक्त प्रकारातील सत्ता निर्माण झाल्या, तरी त्यामुळे खरी शांती अस्तित्वात येईल का? नाही, कारण सर्व राष्ट्रात भयानक समस्या आहेत; यात लोकशाहीच्या समस्या आहेत, जेथे गरीबांची संख्या वाढती आहे आणि लाखो लोक आर्थिकदृष्टीने तग धरुन राहण्यासाठी झगडत आहेत. अमेरिकेतील अहवाल कळवतो की, विज्ञान व औषध यात प्रगति झालेली असली तरी जगभर दर दिवशी सरासरी ४०,००० मुले अपुऱ्या आहारामुळे किंवा टाळता न येणाऱ्या आजारामुळे मरत आहेत. या क्षेत्रातील जाणकार सांगतातः “दारिद्र्य असा विशेष लक्षणीय आकार घेत आहे की जो मानवजातीच्या भवितव्याला दहशत घालत आहे.”
३ याशिवाय, आज अधिकाधिक लोक, अधिक उग्र होत असलेल्या गुन्हेगारीचे भक्ष्य बनत आहेत. वंशीय, राजकीय आणि धार्मिक द्वेष अनेक राष्ट्रांचे तुकडे करीत आहे. काही ठिकाणी तर नजीकच्या भविष्यातील परिस्थिती तर यापेक्षा दुसरी असणार नाही, ज्याबद्दलचे वर्णन जखर्या १४:१३ मध्ये याप्रकारे दिलेले आहेः तेव्हा लोकांची “फार त्रेधा उडेल, ते प्रत्येक आपल्या बाजूला असलेल्या माणसाला धरतील व त्याजवर हल्ला करतील.” (टूडेज इंग्लिश व्हर्शन) मादक द्रव्यांचे सेवन तसेच लैंगिक रितीने संक्रमित होणारे आजार सांथीचे बनत आहेत. लाखो लोकांना एडस्चा संसर्ग लागलेला आहे. एकट्या अमेरिकेत तर यामुळे १,२०,००० पेक्षा अधिक जण आधीच मेले आहेत.
पाप व मरण यांचे बंधन
४, ५. आज स्वातंत्र्य अस्तित्वात असले तरी, कसल्या प्रकारचे बंधन सर्वांवर आपली पकड राखून आहे?
४ तथापि, अशा प्रकारातील कसलीही वाईट परिस्थिती अस्तित्वात नसली तरीही लोकांना खरे स्वातंत्र्य मिळू शकणार नाही. ते सर्व बंधनात असतील. ते कसे काय? उदाहरण पाहू जाता, समजा कोणा हुकुमशहाने पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीला गुलाम करून त्या सर्वांना ठार केले तर काय? अगदी असेच काहीसे आमचे पहिले पालक देवाविरुद्ध बंडखोर झाले तेव्हा घडले आणि मग सर्वजण दियाबलाच्या क्रूर व जाचक सत्तेचे गुलाम झाले.—२ करिंथकर ४:४.
५ पवित्र शास्त्रातील उत्पत्ती याचा १ला व २रा अध्याय दाखवतो त्याप्रमाणे देवाने मानवाची निर्मिती केली त्यावेळी त्यांनी या पृथ्वीवर परिपूर्ण अवस्थेत सदासर्वकाळ जिवंत राहावे असा त्याचा उद्देश होता. परंतु आदाम या आमच्या पूर्वजाने देवाविरुद्ध बंड केल्यामुळे आम्ही सर्वजण आमची गर्भधारणा झाली तेव्हापासून मरणदंडाच्या शिक्षेखाली आलो. “एका मनुष्याच्या [आदाम, मानवजातीचा कुटुंबप्रमुख] द्वारे पाप जगात आले, आणि पापाच्या द्वारे मरण आले, आणि सर्वांनी पाप केल्यावरुन सर्व मनुष्यात मरण पसरले.” पवित्र शास्त्र म्हणते की, “मरणाने राज्य केले.” (रोमकर ५:१२, १४) यास्तव, आम्हाला कितीही प्रमाणात व्यक्तिशः स्वातंत्र्य असले तरी आपण सर्वजण पाप व मरण यांच्या बंधनाखाली आहोत.
६. स्तोत्रसंहिता ९०:१०चे लिखाण झाल्यावर जीवनाच्या संभाव्यतेबद्दल थोडीशी सुधारणा का दिसली?
६ याशिवाय, आपल्याला सध्या जे जीवन आहे ते खूपच मर्यादित आहे. भाग्यवान देखील काही दशकेच जगतात. आणि अभागी लोकांसाठी ते काही वर्षांचे असते. एक नवा अभ्यास म्हणतोः “विज्ञान व औषधी शास्त्राने मानवी जीवनाची संभाव्यता त्याच्या स्वाभाविक मर्यादेपर्यंत आणली आहे.” याचे कारण हे की, आदामाच्या पापामुळे आमच्या अनुवंशिक रचनेत अपूर्णत्व व मरण हे रुजवण्यात आले आहे. खरेच हे किती दुःखाचे आहे की आपण वयाची ७०री किंवा ८० ओलांडत असता खरे म्हणजे जीवनाचा आनंद उपभोगण्यासाठी अधिक सूज्ञ व समर्थ बनण्यास हवे होते, पण प्रत्यक्षात आमची शरीरे वाकू लागतात व मग शेवटी आम्ही धुळीस जाऊन मिळतो!—स्तोत्रसंहिता ९०:१०.
७. आम्हाला हव्या असणाऱ्या व आमच्या गरजेच्या खऱ्या स्वातंत्र्याचे उगम मानवाला कधीच का होता येणार नाही?
७ तर मग, पाप व मरण यांचे बंधन कोणत्या प्रकारातील सरकार टाळू शकेल? कोणीही नाही. आजार, वार्धक्य आणि मरण या शापांपासून कोणीही सरकारी अधिकारी, विज्ञानशास्त्रज्ञ किंवा वैद्य कोठेही आम्हाला मुक्त करवू शकत नाहीत. तसेच त्यांना असुरक्षितता, अन्याय, हिंसाचार, उपासमार आणि दारिद्र्य यांना काढून टाकता येत नाही. (स्तोत्रसंहिता ८९:४८) कितीही प्रामाणिक हेतू राखणारे मनुष्य असोत, त्यांना आम्हाला हव्या असणाऱ्या व गरजेच्या खऱ्या स्वातंत्र्याचा उगम होता येणे अशक्य आहे.—स्तोत्रसंहिता १४६:३.
स्वेच्छास्वातंत्र्याचा गैरवापर
८, ९. मानवजात ही कशामुळे सध्याच्या वाईट दशेला पोहंचली?
८ मानवी कुटुंबाची अशी ही दुःखद स्थिती होण्याचे कारण हे की, आदाम व हव्वा यांनी आपल्या स्वेच्छास्वातंत्र्याचा गैरवापर केला. द जरुसलेम बायबल या आवृत्तीतील १ पेत्र २:१६ म्हणतेः “स्वतंत्र लोकांसारखे वागा; आणि आपल्या स्वतंत्रतेला कधीही दुष्टपणासाठी सबब होऊ देऊ नका.” यावरुन हे दिसते की, मानवी स्वातंत्र्य अमर्याद असावे हा देवाचा हेतु नव्हता. ते देवाच्या नीतीमान नियमांच्या चाकोरीत अनुभवायचे होते व त्यानुसार ते सर्वांसाठी लाभदायक ठरणार होते. शिवाय ती चाकोरी एवढ्या विस्तारीत रुपाची होती की, ज्यामुळे प्रत्येकाला आपले व्यक्तिगत स्वातंत्र्य निवडता येऊ शकत होते. अशाप्रकारे देवाचे अधिपत्य हे कधीच जाचक ठरणार नव्हते.—अनुवाद ३२:४.
९ परंतु आमच्या पहिल्या मातापित्यांनी बरोबर काय व चूक काय ते स्वतःच ठरविण्याचा निर्णय केला. त्यांनी स्वतःला देवाच्या अधिपत्यापासून हेतुपुरस्सरपणे दूर नेल्यामुळे देवानेही त्यांच्यासाठी असणारा आधार काढून घेतला. (उत्पत्ती ३:१७-१९) अशाप्रकारे ते अपूर्ण होऊन त्यांना आजार व मरण जडले. मानवजातीने स्वातंत्र्य अनुभवण्याऐवजी ती पाप व मरण यांच्या बंधनात आली. तसेच ती अपूर्ण व बहुधा क्रूर असणाऱ्या मानवी अधिपतींच्या लहरीखाली आली.—अनुवाद ३२:५.
१०. यहोवाने सर्व गोष्टी कशा प्रेमाने हाताळल्या?
१० देवाने एक आविर्भाव या अर्थाने मानवाला काही काळासाठी संपूर्ण स्वातंत्र्याची मुभा देऊन त्याला त्यावर संशोधन करू दिले. यापासून उद्भवणारे परिणाम, देवापासून स्वतंत्र असणारे मानवी शासन यशस्वी होऊ शकत नाही हे निःसंशये दाखवून देतील हे त्याला ठाऊक होते. स्वेच्छा स्वातंत्र्य योग्यपणे उपयोगात आणणे हा ठेवा असल्यामुळे देवाने तो काढून न घेता, देवाने सर्व गोष्टी घडू देण्यास प्रेमाने तात्कालिक मुभा दिली.
‘मानवाला पावले नीट टाकता येत नाही’
११. इतिहासाने पवित्र शास्त्राच्या अचूकतेला कसे उंचावून धरले आहे?
११ ऐतिहासिक अहवालाने यिर्मया १०:२३, २४ वचनाची अचूकता स्पष्ट केली. ती वचने सांगतातः “पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही. हे परमेश्वरा [यहोवा, न्यू.व.] मला शिक्षा कर.” याचप्रमाणे इतिहासाने उपदेशक ८:९ची देखील अचूकता स्पष्ट केली, जे म्हणतेः “एक मनुष्य दुसऱ्यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करतो.” हे केवढे खरे आहे! मानवी कुटुंबांनी एका समस्येपासून दुसरीकडे धाव घेतली व सर्वांना त्याचे गंभीर परिणाम सहन करावयास मिळाले. प्रेषित पौलाने ही परिस्थिती अगदी सविस्तरपणे रोमकर ८:२२ मध्ये या शब्दात सांगितलीः “आपल्याला ठाऊक आहे की, सबंध सृष्टि आजपर्यंत कण्हत व वेदना भोगीत आहे.” होय, देवाच्या नियमांपासूनची मोकळीक खरीच अनर्थकारक ठरली आहे.
१२. पूर्ण रुपाच्या स्वातंत्र्याबद्दल काही प्रापंचिक उगम काय सांगतात?
१२ स्वातंत्र्याबद्दल भाष्य करताना इन्क्वीझिशन ॲण्ड लिबर्टी या पुस्तकाने हे विवेचन मांडलेः “स्वातंत्र्य हा मुळात सद्गुण असू शकत नाहीः त्याला सतत अधिक पात्रतेची जोड मिळाल्याशिवाय त्याबद्दल अभिमान बाळगता येत नाही. खरे म्हटले तर तो कदाचित स्वार्थी गुणाचा एक अधिक खालच्या स्थरावरील प्रकार होऊ शकतो. . . . मानवाला संपूर्णतया स्वतंत्र प्राणी होता येत नाही व होता येणे शक्य नाही; तशी महत्त्वाकांक्षा वा ओढ ही मूर्खपणाची आहे.” तसेच इंग्लंडचे राजकुमार फिलिप यांनी एकदा म्हटलेः “प्रत्येक लहर व सहज प्रवृत्तीचे लाड पुरविण्याचे स्वातंत्र्य असावे हे अपीलदायक वाटते; तथापि, आत्मसंयमनाशिवाय असणारे स्वातंत्र्य . . . आणि इतरांबद्दलचा विचार राखण्याविना दाखवलेली वागणूक या गोष्टी वसाहत कितीही श्रीमंत असली तरी तिच्या जीवनाची गुणवत्ता हिरावणाऱ्या ठरतात हे अनुभवाने पदोपदी सिद्ध झाले आहे.”
कोणाला चांगले कळते?
१३, १४. मानवी कुटुंबासाठी केवळ कोण खरे स्वातंत्र्य प्रदान करू शकतो?
१३ घरामध्ये संघटन कसे निर्माण करावे हे कोणाला चांगले कळते—प्रेमळ, समर्थ व अनुभवी पालकांना की, तरुण मुलांना? याचे उत्तर उघड आहे. त्याचप्रमाणे मानवाचा निर्माता, आमचा स्वर्गीय पिता आम्हासाठी सर्वांत चांगले ते काय, ते जाणून आहे. मानवी समाजाचे संघटन कसे करावे व त्यामध्ये कसे शासन असावे हे तो जाणून आहे. खऱ्या स्वातंत्र्याचे लाभ प्रत्येकाला मिळण्यासाठी स्वेच्छास्वातंत्र्याला कसे नियंत्रित ठेवावे हेही त्याला माहीत आहे. मानवी कुटुंबाला त्याच्या बंधनातून सोडवून सर्वांसाठी खरे स्वातंत्र्य कसे द्यावे हे केवळ सर्वसमर्थ देव, यहोवा जाणून आहे.—यशया ४८:१७-१९.
१४ या कारणास्तव, यहोवा आपल्या वचनात, रोमकर ८:२१ मध्ये हे प्रेरित अभिवचन देतोः “सृष्टि स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या लेकरांची गौरवयुक्त मुक्तता मिळेल.” होय, देव मानवी कुटुंबाला सध्याच्या दुर्देवी परिस्थितीतून संपूर्णपणे मुक्त करण्याचे अभिवचन देऊन आहे. हे कसे घडून येईल त्याबद्दल पुढील लेख चर्चा करील.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
(पृष्ठे ७ ते १२ पर्यंतची उजळणी)
▫ मानवाला स्वातंत्र्याबद्दल इतके आकर्षण का वाटते?
▫ सबंध इतिहासभर लोक कोणकोणत्या मार्गी गुलाम बनले?
▫ यहोवाने इतक्या काळ स्वेच्छास्वातंत्र्याचा का गैरवापर होऊ दिला?
▫ सबंध मानवजातीस केवळ कोण खरे स्वातंत्र्य देऊ शकतो व का?
[१० पानांवरील चित्रं]
मानवाचे जीवनमान हे, साधारण ३,५०० वर्षांआधी स्तोत्रसंहिता ९०:१० मध्ये जितके सांगितले आहे तेवढेच आहे