तुम्हास आठवते का?
तुम्ही टेहळणी बुरुजच्या अलिकडील अंकांचे काळजीपूर्वक वाचन केले आहे काय? असल्यास पुढील मुद्दे तुमच्या लक्षात येऊ शकतील:
▫ बहिष्कृत लोकांचा संपर्क साधून त्यांना पश्चातापाकडे निरवता येते का हे पाहण्यासाठी पुढाकार घेता यावा म्हणून आध्यात्मिक मेंढपाळांना कोणता आधार आहे?
इस्राएल लोक बंदिवासात होते आणि अद्याप पश्चातापी नव्हते तरी यहोवाने मेंढपाळाप्रमाणे त्यांना शोधण्यासाठी पुढाकार घेतला व त्याने आपल्या संदेष्ट्यांना त्यांच्याकडे पाठविले. याचप्रमाणे आज जे हरवलेल्या मेंढराप्रमाणे आहेत व जे पश्चातापी आहेत अशांना मदत देण्याचा आधार ख्रिस्ती मेंढपाळांपाशी आहे. (पडताळा लूक १५:४-७.)—२/१, पृष्ठ १७-१९.
▫ ख्रिस्ती मंडळीत एखाद्याला परत घेतल्यावर आमच्या भावना व कृती कशी असावी याबद्दल येशूचा उधळ्या पुत्राचा दाखला काय दाखवितो? (लूक १५:२२-३२)
पित्याचे अनुकरण करणे हे आमचे ध्येय असले पाहिजे. उधळ्या पुत्र परतल्यावर बापाला आनंद झाला. या कारणास्तव मंडळीत परत घेतलेल्या बांधवासोबत आपण मुक्तपणे बोलावे व त्याला सत्यामध्ये कशी प्रगति करता येईल याबद्दल उत्तेजन द्यावे.—२/१, पृष्ठ २१.
▫ सफन्या २:३ मधील भविष्यवाद असे का म्हणतो की, “कदाचित परमेश्वराच्या क्रोधदिनी तुम्ही दृष्टीआड व्हाल”?
जीवनासाठी तारण होणे हे विश्वासूपणा व सहनशीलता यावर अवलंबून आहे. (मत्तय २४:१३) या कारणास्तव, जे देवाच्या नीतीमान दर्जांना अनुसरतील व शुद्ध वाणी बोलत राहतील अशांनाच यहोवाच्या क्रोधदिनी दृष्टीआड केले जाईल. (सफन्या २:१, २)—५/१, पृ. २१.
▫ ख्रिस्ती स्त्रीने दागिने व सजावट याबाबतीत काय लक्षात ठेवले पाहिजे?
सौंदर्य प्रसाधनांचा वापर करण्यावर पवित्र शास्त्र बंदी घालीत नाही. (निर्गम ३२:२, ३; एस्तेर २:७, १२, १५) पण यात भिडस्तपणा असावा. एखाद्या स्त्रीला अगदी सहजगत्या जगाच्या पद्धतीचे अनुकरण करुन अवाजवी रितीने ओठ रंगविणे, गाल रंगविणे, डोळ्यात काजळ घालणे या गोष्टींचा मोह होईल. हेच ईजबेलीने केले. (२ राजे ९:३०) यास्तव, ही सौंदर्यप्रसाधने भरपूर प्रमाणात वापरली जात नाही आणि दागदागिन्यांचा वापर भपकेबाज होत नाही याबद्दल काळजी घेतली जाण्यास हवी.—२/१, पृ. ३०-१.
▫ मुलांना शिक्षण देण्यामध्ये पालकांना येशूच्या कोणत्या शिक्षणपद्धती उपयुक्त असल्याच्या आढळल्या आहेत?
आपल्या लहान मुलांना सत्य अपीलकारक दिसावे यासाठी पालक उदाहरणांचा चांगला वापर करतील; आणि आपल्या मोठ्या मुलांना काय वाटते ते पाहण्यासाठी ते विचारपूर्वक तयार केलेले प्रश्न विचारतील. (पडताळा मत्तय १७:२४-२७.)—५/१, पृ. ३०.
▫ मत्तय ५:८ मध्ये सांगण्यात आलेले “अंतःकरणाचे शुद्ध” “देवाला (कसे) पाहतील”?
देव आपल्या सचोटी रक्षकांच्या बाबतीत कार्य करून दाखवल्याचे जेव्हा ते बघतात तेव्हा ते जणू ‘देवाला पाहतात.’ (पडताळा निर्गम ३३:२०; ईयोब १९:२६; ४२:५.) तथापि, मत्तय ५:८ मध्ये उद्धृत केलेल्या “पाहणे” या शब्दाचा, “मनाने पाहणे, कळणे, समजणे” असाही अर्थ होतो. वस्तुतः येशूने देवाच्या व्यक्तिमत्वाचे हुबेहुब प्रतिबिंब दाखवले असल्यामुळे या व्यक्तित्वावरील अंतर्दृष्टि ही “अंतःकरणाचे शुद्ध” असलेल्यांना ‘देवाला पाहण्यास’ समर्थ करते. (योहान १४:७-९)—३/१, पृ. ११.
▫ काहींनी स्मारकविधीच्या बोधचिन्हांची सहभागिता चुकीने का घेतली?
काही अप्रौढ जणांना देवाच्या उद्देशांची तौलनिक रसिकता नसते. अभिषेक घडणे हे “इच्छा बाळगणाऱ्याकडे व धावणाऱ्याकडेही नाही तर . . . देव याजकडे आहे,” याची त्यांना समज मिळालेली नसेल. (रोमकर ९:१६) नव्या करारात समाविष्ट होणे व ख्रिस्तासोबत सहवारीस होणे हे ठरविणे कोणा विशिष्टाचे, त्याचे किंवा तिचे काम नाही. यहोवाची निवड ग्राह्य मानली जाते, आणि त्याचा आत्मा हा या निवडीसंबंधाने साक्ष देतो. (रोमकर ८:१६; १ करिंथकर १२:१८)—३/१, पृ. २९.
▫ सफन्या ३:९ मध्ये सांगण्यात आलेली “शुद्ध वाणी” ही काय आहे?
ती देव व त्याचे उद्देश याबद्दलच्या सत्याची योग्य समज ही आहे.—३/१, पृ. २२-३.
▫ गुन्हेगारीचे भक्ष्य बनण्याचे टाळण्यासाठी कोणती व्यावहारिक दक्षता घेता येऊ शकेल?
जेथे शक्य आहे तेथे रात्रीच्या वेळी धोक्याच्या जागी जाणे टाळावे. तुमचे दागिने लपवून ठेवा आणि कॅमेरासारख्या वस्तु आपल्या बाजाराच्या पिशवीत टाका. तुम्ही आपणासोबत एखादी ब्रीफकेस किंवा बॅग नेत असाल तर रस्त्याच्या कडेने चालण्याची खबरदारी घ्यावी. (पहा नीतीसूत्रे ३:२१-२३.)—२/१, पृ. ५-६.