वाचकांचे प्रश्न
◼ ख्रिश्चन स्त्रीने दागदागिने वापरावेत, श्रुंगार करावेत, केसांना रंगवावे किंवा यासारख्या इतर पद्धती अनुसराव्यात हे उचित आहे का?
प्राचीन काळी व आमच्या काळात देखील जे बायबल पद्धती अनुसरीत असल्याचा दावा करतात अशांनी श्रुंगाराबाबत एक अत्यंत प्रभावी पण अलगच दृष्टीकोन राखला आहे.a
काही विशिष्ट चर्चेसमधील स्त्रिया श्रुंगार आणि दागिने घालण्यावर संपूर्ण बंदी घालून आहेत. उदाहरणार्थ, द अमीश पीपल नामे पुस्तक आपल्या अहवालात म्हणते, ते “आपल्या शारीरिक बाह्यरुपावर नियंत्रण ठेवून आहेत, कारण त्यास वाटते, कोणाही सदस्यांठायी जर जगीक दिखाव्याची जिवंत प्रेरणा आहे तर तो धोक्यात आहे, याकरिता की, [ते] लक्ष्य शारीरिकतेऐवजी आध्यात्मिकतेकडे अधिक रोखलेले असणे बरे! काही लोक . . . शास्त्रवचनांचा आधार घेतील.
जे वचन मग वाचून दाखविले जाते ते १ शमुवेल १६:७. “यहोवाने शमुवेलास म्हटलेः ‘तू त्याच्या स्वरुपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंचकाठीवर जाऊ नको. . . . मानव बाहेरचे स्वरुप पाहतो, पण यहोवा हृदय पाहतो.” तथापि, त्या वचनात दाविदाचा भाऊ एलियाब याच्या उंचीचा उल्लेख केलेला आहे. संदर्भाहून असे लक्षात येते की, यात देव कोणाही वेशभूषेबाबत बोलत नव्हता, जसे की, दाविद किंवा त्याचे भाऊ केस करीत का किंवा श्रुंगार करीत का किंवा जडजवाहीर त्यांच्या पोषाखाचा भाग असे.—उत्पत्ती ३८:१८; २ शमुवेल १४:२५, २६; लूक १५:२२.
याचा अर्थ, जे हा ग्रह बाळगून आहेत की, ख्रिश्चनांनी कोणाही प्रकारचा श्रुंगार, दागदागिने न वापरता उल्लेखनीयरित्या अगदी साधे राहावे ते चुकीचा अर्थ लावलेल्या वचनांचा मागोवा घेत असतात. प्रत्यक्षात पवित्र शास्त्र हे केशवेषभूषेवर कोणतीही तपशीलवार चर्चा पुरवीत नाही; तसेच ते कोणा विशिष्ठ श्रुंगार पद्धतीस संमती देते व इतर प्रकारांवर निर्बंध घालते असेही नाही. तर ते केवळ समर्पक मार्गदर्शन पुरविते. या, आपण त्याबद्दल विचार करू व ते आज कसे लागू करता येऊ शकते ते पाहू.
प्रेषित पौलाने प्रेरित मार्गदर्शन सादर केलेः “माझी इच्छा आहे की, स्त्रियांनी स्वतःस साजेल अशा वेषाने आपणास भिडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे. कसे गुंफणे आणि सोने, मोत्ये व मोलवान वस्त्रे यांनी नव्हे.” (१ तीमथ्य २:९) पेत्रानेही याच अनुरोधाने लिहिले आहेः “तुमची शोभा केसांचे गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे, किंवा पोशाक करणे यांनी बाहेरून आणलेली नसावी; तर जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे त्याने, म्हणजे अंतःकरणातील गुप्त मनुष्यपणाने, जी अविनाशी शोभा ती असावी.”—१ पेत्र ३:३, ४.
यात “शोभवावे,” “साजेल,” “शोभा” ही ग्रीक भाषेतील ‘कॉसमॉस’ या शब्दाची अवतरणे आहेत, शिवाय ज्याचा अर्थ श्रुंगार साधने होतो त्या कॉजमॅटीक या शब्दाचेही मूळ आहे. यामुळेच ही वचने आमचे, स्त्रियांनी स्वतःस शोभविण्यात, जे श्रुंगार, जडजवाहीर किंवा ज्या इतर वस्तु वापरण्याबद्दलचे प्रश्न उद्भवतात त्याची उत्तरे देण्यात साहाय्यक ठरतात.
पौल आणि पेत्राचे तसे म्हणण्यामागील अर्थ असा होतो का की, ख्रिश्चनांनी, केसांचे गुंफणे, सोन्यामोत्याचे दागिने घालणे तसेच श्रुंगारिक वस्तुंचा उपयोग करणे टाळावे? नाही. पण त्याचा अर्थ तसाच होतो असा जर दावा केला तर ख्रिश्चन भगिनींना बाह्य “वस्त्रे” घालणेही टाळावे लागेल. तरी सुद्धा, जिला पेत्राने मृतातून उठविले, ती दुर्कस फार प्रिय होती, कारण ती इतर भगिनींकरता बाह्य वस्त्रे बनवी. (प्रे. कृत्ये ९:३९) यास्तव १ ले तीमथ्य २:९ व १ ले पेत्र ३:३, ४ यांचा असा अर्थ होत नाही की, भगिनींनी केसांचे गुंफणे, मोती, कपडे वगैरे वापरणे टाळावे. याउलट पौल, स्त्रियांच्या वेशभूषेत साजेसेपण आणि समयसूचकपणा असावा, यावर जोर देत होता. पेत्र स्पष्ट करतो की, स्त्रीने आपल्या अविश्वासू नवऱ्यास जिंकण्याकरता आपल्या अंतर्गत आत्म्याकडे अधिक लक्ष द्यावे ना की, बाह्यरुपावर किंवा श्रुंगार करण्यावर भर देत राहावे.
साध्या शब्दात, पवित्र शास्त्र एखाद्याच्या पेहरावात सुधारणा किंवा सजविण्याच्या सर्व प्रयत्नांना मना करीत नाही. देवाचे काही सेवकही, मग ते पुरुष असोत की, स्त्रिया, दागिने वापरत असत. (उत्पत्ती ४१:४२; निर्गम ३२:२, ३; दानीएल ५:२९) विश्वासू एस्तेरने सुंदरता अधिक उजळावी म्हणून दीर्घ मुदतीच्या तेलमर्दनास आणि सौंदर्य प्रसाधनांच्या इलाजांना मुभा दिली होती. (एस्तेर २:७, १२, १५; दानीएल १:३-८ बरोबर पडताळा.) देवाने म्हटले होते की, तो लाक्षणिक रुपे इस्राएलांना बांगड्या, हार, नाकात बाळी आणि कानात फुले घालील. हे सर्व त्यांच्या “अतिसुंदर” होण्यात भर टाकणारे होते.—यहेज्केल १६:११-१३.
तरी यहेज्केलमधील हा अहवाल आम्ही आमच्या वेषभूषेवर फाजील लक्ष देऊन राहण्याच्या विरुद्धतेतील धडा आहे. देवाने म्हटलेः “तू आपल्या सौंदर्यावर भरवसा ठेऊन आपल्या किर्तीच्या जोरावर शिंदळकी केली; आल्यागेल्याबरोबर शिंदळकीचा तू सपाटा चालविला.” (यहेज्केल १६:१५; यशया ३:१६, १९) अशाप्रकारे, यहेज्केल १६:११-१५ मधील अहवाल, आम्ही बाह्यरुपावर अधिक लक्ष देऊन असू नये म्हणून पौल आणि पेत्राने सदुपदेश नंतरच्या काळात केला आहे त्यास अधोरेखित करतो. जर कोणी स्त्री स्वत्ला जडजवाहीराने श्रुंगारीत करू इच्छिते तर ते केवढे व कोणत्या पद्धतीने घालणार यावर याकरता नियंत्रण राखावे की त्यात अतिरेकता किंवा भडकता, रंगेलपणा नसावा.—याकोब २:२.
मग, एखादी ख्रिश्चन स्त्री ओठ तसेच गाल रंगविण्याची साधने, काजळ आणि पापण्या किंवा डोळ्यांच्या रेषा रंगविण्याचे प्रकार उपयोगात आणिते तर तिजबाबत काय? इस्राएल देश व त्यासभोवतालच्या परिसरात भूगर्भसंशोधकांना काही श्रुंगार साधने तसेच पात्रे आणि आरसे सापडले. होय, पौर्वात्यतील प्राचीन काळच्या स्त्रियाही अशी काही श्रुंगार साधने उपयोगात आणीत जी आजच्या अनेक उत्पादनात आढळून येतात. ईयोबाच्या एका मुलीचे नाव केरेनहप्पुक होते, ज्याचा अर्थः “काजळीचे (डोळ्याच्या अंजनाचे) शिंग” किंवा पात्र, ज्याचा डोळ्याच्या अंजनाकरता उपयोग करीत.—ईयोब ४२:१३-१५.
इस्राएलात काही श्रुंगार साधने उपयोगात आणीत, तरी त्यात अतिरेकतेस पोहंचणे केवढ्या धोक्याचे आहे हे पवित्र शास्त्रातील काही उदाहरणांनी स्पष्ट केले आहे. इस्राएलांची अनेक वर्षे राणी बनून राहिल्यानंतर, ईजबेलने, ‘डोळ्यांना सुरम्याने रंगविले व मस्तकासही श्रुंगारले.’ (२ राजे ९:३०) त्यानंतर इस्राएलांनी मूर्तिपूजक राष्ट्रांचे अनीतीमान लक्ष्य आपणाकडे कसे आकर्षित केले याचे वर्णनात म्हटलेः “सोन्याच्या अलंकारांनी भूषित झालीस; काजळ घालून आपले डोळे मोठे केले व आपणास सजविले.” (यिर्मया ४:३०; यहेज्केल २३:४०) ही किंवा इतर वचने, एखाद्याचे व्यक्तीत्व खुलविण्याकरता म्हणून काही कृत्रिम साधनांचा उपयोग करणे चुकीचे आहे असे कोठेच म्हणत नाहीत. तरी ईजबेलीची गोष्टी की, तिने डोळ्यात एवढा सुरमा भरला होता की, तो दूरवरुन, एवढेच काय पण येहूला राजवाड्याबाहेरून दिसला. त्यात कोणता धडा आहे? मुक्त हस्ते श्रुंगार साधनांचा उपयोग करू नका. तो अतिरेकतेच्या मार्गी जाऊ देऊ नका.b
अर्थात दागदागिने किंवा श्रुंगार साधने उपयोगात आणणारी कोणतीही स्त्री क्वचितच म्हणेल की, माझी स्वपद्धती आणि जो खर्च होतो तो करणे चुकीचे आहे. तरीही याबद्दलचा कोणताही वाद उद्भवत नाही की, असुरक्षितता उद्भवली किंवा जाहीरातबाजीचा स्फोटक परिणाम सतत झाल्याने एखाद्या स्त्रीस भड श्रुंगार करण्याची सवय जडली असेल. कदाचित तिला याचा एवढा सराव झाला असेल की, त्याच्या परिणामातील तिचे बाह्यस्वरुप बहुतेक ख्रिश्चन स्त्रियांनी स्वतःस “भिडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे,” या तत्त्वाचे विरोधातील असेल ही जाणीव ठेवण्यात कमजोर असेल.—पाहा याकोब १:२३, २४.
हे मानले की, आवडीनिवडी या स्वमर्जीवर असतात. काही स्त्रिया मोजकेच दागिने व नाममात्र किंवा कसलाच श्रुंगार करणार नाहीत तर इतर अधिकाधिक करतील. यास्तव कोण श्रुंगाराचा किंती व केवढा उपयोग करते याचा न्याय न करणे हेच सूज्ञपणाचे ठरेल. दुसरी गोष्ट म्हणजे स्थानिक पद्धती. एखादी पद्धत दुसऱ्या देशात (किंवा पूर्वापार चालत येत आहे म्हणून) स्विकारणीय असेल, यास्तव ती आजच्याकरिताही चालण्याजोगी आहे असा त्याचा अर्थ होत नाही.
सूज्ञ ख्रिश्चन स्त्री वेळोवेळी आपल्या वेशभूषेस न्याहाळत राहील; व स्वतःस अगदी प्रामाणिकतेत विचारत राहील कीः “मी बहुतेक वेळा अधिक (किंवा उठावदार) दागिने किंवा केशरचना करीत असते का की, जी कदाचित माझ्या परिसरातील इतर ख्रिश्चनांपेक्षा अधिक ठरत असेल? माझी केशरचना मी हरप्रकारे बिघडलेल्या समाजासारखी किंवा कोणा चित्रिपट अभिनेत्रीसारखीच करते का किंवा १ले तीमथ्य २:९ आणि १ले पेत्र ३:३, ४ मध्ये म्हटल्याप्रमाणे, स्वतःचे नेहमी मार्गदर्शन करते? होय, माझी केशरचना, पोषाख खरेच साजेसा आहे का की, जो इतरांच्या शुद्ध विचारांना व भावनांना आदर प्रदर्शित करणारा असेल?—नीतीसूत्रे ३१:३०.
ज्या स्त्रियांना ख्रिश्चन पती असतील अशांनी वेळोवेळी त्यांचे विचार आणि सल्ला विचारावा. तसेच जर प्रामाणिकपणे अशा गोष्टींचा मागोवा घेत आहात तर इतर भगिनींचा त्याबाबतीत साहाय्यक सल्ला घेऊ शकता. पण तेच ज्या आप्तांना तीच आवड असेल अशाचे बरोबर बोलणी करण्याऐवजी अशा कोणा वयस्कर भगिनीचा सल्ला घेणे बरे, जिचे समतोलपणास व सूज्ञतेस आदर दाखविला जातो. (१ राजे १२:६-८ पडताळा.) पवित्र शास्त्र म्हणते की, सन्माननीय वयस्कर स्त्रियांनी “तरुण स्त्रियांस असे शिक्षण द्यावे की, त्यांनी . . . मर्यादशील, शुद्धाचरणी, घरचे काम पाहणाऱ्या . . . असे असावे म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही.” (तीत २:२-५) कोणतीही प्रौढ ख्रिश्चन स्त्री हे कधीच इच्छिणार नाही की, दागदागिने व मेकअप यांचा ती जो उपयोग करते त्यामुळे देवाच्या वचनांची किंवा त्याच्या लोकांची “निंदा” व्हावी.
पवित्र शास्त्रातील तामारचा अहवाल हे स्पष्ट करतो की, एखाद्या स्त्रीची वेषकेशभूषा ही ती कोणत्या प्रकारची स्त्री आहे याबाबतचा प्रभावी संदेश प्रतिध्वनित करीत असतो. (उत्पत्ती ३८:१४, १५) कोणा ख्रिश्चन स्त्रीच्या केशरचनेद्वारा तसेच जर केस रंगविते (कलपते) तर, तसेच दागदागिने आणि श्रुंगारसाधने उपयोगात आणिते तर त्याद्वारा कोणता संदेश प्रतिध्वनित होतो? असा होत आहे काः ही, देवाची शुद्धाचरणी, साजेशी व समतोल सेविका आहे?
जे सर्व ख्रिश्चनांना क्षेत्रसेवेत पाहतात, किंवा जे आमच्या सभांना उपस्थित राहतात, अशांवर स्वीकारणीय प्रभाव पडावा. खासकरून जे टिकात्मक दृष्टीकोनातून पाहात असतात, अशांचेवर पडावा. ख्रिश्चन स्त्रियांतील अधिकांश, बाहेरील जगाच्या लोकांस असा निष्कर्श घेऊ देणार नाहीत की, त्या रस्त्यावरील किंवा भडकपणाने सजविलेल्या किंवा तशा प्रशंसापात्र ठरलेल्या आहेत, त्याऐवजी त्यांनी स्वतःस ‘देवभक्ती स्वीकारलेल्या स्त्रियांस शोभेल, असे शोभवावे.—१ तीमथ्य २:१०.
[तळटीपा]
a इ. सनाच्या तिसऱ्या शतकात टर्टुलियनने म्हटलेः “जे आपली त्वचा उटण्यांनी मर्दन करतात, त्यांच्या गालास लाली फसतात, डोळ्यांना काजळाने सजवतात, ते त्याच्याविरुद्ध पाप करतात.” याशिवाय, जे त्यांच्या केसांना रंगवितात अशांचीही त्याने निर्भर्त्सना केली. मत्तय ५:३६ मधील येशूच्या शब्दांचा गैरअर्थ करून टर्टुलियनने असा ठपका ठेवला: “ते प्रभूची निंदा करतात! ते म्हणतात, ‘पाहा, आम्ही आमचे केस, पांढरे किंवा काळे नव्हे तर पिवळे केले.’” त्याने पुढे म्हटलेः “तुम्हास असेही लोक आढळतील ज्यांना स्वतः वयस्कर आहोत असे म्हणण्याची लाज वाटते, म्हणून त्यांच्या पांढऱ्या केसांना काळे करतात.” हे टर्टुलियनचे व्यक्तीगत मत होते. पण तो विषयाला अतिशयोक्तीचे रूप देत होता; कारण त्याचा हा सबंध वाद त्याच्या त्या दृष्टीकोनावर आधारीत होता की, ‘मानवी अधःपातास स्त्रीया जबाबदार आहेत; यास्तव त्यांनी पहिल्या पापाच्या बदनामीत शोकाकूल व पश्चातापी अवस्थेत हव्वेसमान फिरावे.’ पवित्र शास्त्र अशा कोणाही गोष्टीचा उल्लेख करीत नाही; देवाने मानवजातीच्या पापमय अवस्थेबद्दल आदामास जबाबदार ठरविले होते.—रोमकर ५:१२-१४; १ तीमथ्यी २:१३, १४.
b अलिकडेच अमेरिकेच्या वार्ताहर माध्यमाने, एका दूरदर्शनवरील सुवार्तिकाच्या अंतस्थ कृत्यांना उघड करण्यास सुरवात केली. त्यासोबतच त्याच्या पत्नीनेही काहीसे अधिक लक्ष आपणाकडे घेतले. वार्ताहराच्या अहवालानुसार तिची अशी खात्री होत राहिली की, “श्रुंगार आणि चित्रपट” ही दोन्ही पापमय आहेत. असे असताही नंतरच्या काळात तिने आपले विचार बदलले व तीच स्वतः भडक श्रुंगारललना म्हणून प्रसिद्धीस आली.”
[३१ पानांवरील चित्रं]
मध्यपूर्वेतील भूगर्भसंशोधनात सापडलेल्या वास्तु: हस्तिदंताचे श्रुंगार पात्र, आरसा आणि सोन्याचा हार व कानबाळ्या.
[चित्राचे श्रेय]
तिन्ही आकृती: (पूर्वेकडील इतिहासप्रसिद्ध स्थळांजवळील) क्षेत्रांची चित्रे आहेत.