वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w92 २/१ पृ. ३२
  • स्वरुप केवढे महत्त्वाचे असते?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • स्वरुप केवढे महत्त्वाचे असते?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
w92 २/१ पृ. ३२

स्वरुप केवढे महत्त्वाचे असते?

“मी माझ्या स्वरुपाबद्दल खूप नाराज झाले,” असे अमेरिकेतील पेन्सिल्वानियामधील बिवर फॉल्स येथील एका युवतीने लिहिले. “मी खूपच जाडजूड व कुरुप आहे, असे मला वाटत राहिले.” ती म्हणतेः “मी तर बरेच दिवस खूप कमी जेवत असे, आणि मग थोडेफार वजन कमी झाले. पण नंतर मला इतकी भूक लागायची की समोर दिसते ते सर्व मी खाऊन टाके व मग पुन्हा माझे वजन अधिक वाढे.”

नंतर एका ख्रिस्ती अधिवेशनात ती म्हणालीः “मी मला आरशात पाहिले व माझ्या मैत्रिणीला म्हटले की, ‘मी किती ओबडधोबड दिसते!’

“या माझ्या मैत्रिणीने मला विचारले की, मी क्वश्‍चन्स यंग पीपल आस्क—आन्सर्स दॅट वर्क या पुस्तकातील ‘ए लूक ॲट हाव यू लूक, हे सदर वाचले का. मी तिला नाही, असे म्हटले. मग ती म्हणाली, ‘अग, घरी जाऊन आज रात्री तो अध्याय वाच.’ तेच मी केले.

“मला तर वाटले की, मी माझीच कहाणी वाचतेय. मग, मी एक प्रश्‍न वाचला, ज्याने मला विचार करायला लावले, ‘तुम्हाला प्रसिद्ध, यशस्वी, किंवा आनंदी व्हावयाचे आहे, तर तुम्हाला विशिष्ट रुप असले पाहिजे अशी कल्पना कोण वाढीस लावीत असतो?’”

या प्रश्‍नाच्या उत्तराने, ती युवती म्हणते की, तिच्या जीवनात मोठा नाट्यमय बदल घडवून आणला. शेवटी ती म्हणतेः “या यंग पीपल आस्क पुस्तकातील साहाय्यक सूचनांद्वारे मी माझ्यापुढे माझी ध्येये सरळ ठेवण्याची गरज हेरली.”

आज युवकांना खूप दबाव आहेत. त्यांना यशस्वीरित्या तोंड देण्यासाठी यांना मदत हवी आहे. क्वश्‍चन्स यंग पीपल आस्क—आन्सर्स दॅट वर्क हे पुस्तक ती मदत देते. आकर्षक चित्रांनी भरलेले हे पुस्तक तुम्हास मिळविता येईल. यासाठी खालील कूपन भरुन व सोबत पुस्तकाचे मूल्य आम्हाला पाठवावे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा