आनंदाने पूर्ण व्हा
“शिष्य आनंदाने व पवित्र आत्म्याने पूर्ण झाले.”—प्रे. कृत्ये १३:५२.
१. (अ) आनंद ही कसली फलप्राप्ती आहे? (ब) कोणत्या आनंदी तरतुदीमुळे देवाचे गौरव होण्यास हवे?
आनंद! या ख्रिस्ती गुणाचा पौलाने, आत्म्याच्या फलप्राप्तीमध्ये प्रीती या गुणानंतर लगेचच उल्लेख केला. (गलतीकर ५:२२-२५) हा आनंद कशामुळे उद्भवतो? १,९०० वर्षांआधी देवाच्या दूताने गरीब मेंढपाळांना सुवार्तेविषयीची जी घोषणा केली तिजमुळे तो उद्भवतो. त्याने म्हटलेः “पाहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे, त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो. ती ही की, तुमच्यासाठी आज दावीदाच्या नगरात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभु आहे.” लागलेच स्वर्गातील दूतांचा समूह प्रकट झाला व तो या देवदूतासोबत मिळून देवाची आनंदाने स्तुती करीत हे म्हणालाः “उर्ध्वलोकी देवाला गौरव, आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती.”—लूक २:१०-१४.
२, ३. (अ) मानवजातीचा तारणारा या अर्थाने देवाने आपल्या ज्येष्ठ पुत्राला पाठविणे योग्य का होते? (ब) पृथ्वीवर असताना येशूने इतर कोणत्या मार्गाने देवाचा उद्देश पूर्ण केला?
२ देवाला मानवजातीविषयी वाटणारी सदिच्छा ही त्याने ख्रिस्त प्रभु याच्याद्वारे तारणाची तरतुद करून व्यक्त केली. हा देवाचा ज्येष्ठपुत्र खऱ्या ज्ञानाचे पूर्ण व्यक्तीमत्व राखून आहे व याने निर्मिती कार्याच्या वेळी आपल्या पित्यासंबंधी असे सांगताना वर्णिण्यात आले की, “मी त्याच्यासोबत एक दृढ तसेच खात्रीचा कारागीर होतो, माझा आनंद दिवसेंदिवस वाढत होता, त्याजसमोर मी नित्य आनंददायी होतो. मला त्याच्या पृथ्वीच्या सुपीकतेविषयी आनंद वाटे. होय, मला मानवपुत्रांविषयीही आनंद वाटत असे.”—नीतीसूत्रे ८:३०, ३१, रॉदरहॅम.
३ मानवपुत्रांविषयी इतका आनंद बाळगणाऱ्या आपल्या पुत्राला यहोवाने मानवजातीचा तारणारा या नात्याने पाठवावे हे अगदीच उचित होते. पण यामुळे देवाचे गौरव कसे होणार होते? त्याद्वारे, देवाला आपला पृथ्वीसंबंधाचा गौरवी उद्देश पूर्ण करावयास मार्ग मिळणार होता. ही पृथ्वी धार्मिक व शांतीप्रिय मानवांनी भरून जावी हा तो देवाचा प्रेमळ उद्देश होता. (उत्पत्ती १:२८) याखेरीज, या पृथ्वीवर असताना अत्यंत कठीण परिक्षेत देखील हा पुत्र, येशू, हे दाखवून देणार होता की, परिपूर्ण माणूस यहोवाची सेनाधीश प्रभु या नात्याने आज्ञा मानू शकतो व त्याद्वारे निर्मितीवर आपल्या पित्याचा केवढा कायदेशीर हक्क आहे ते पूर्णपणे सिद्ध करून देणार होता. (इब्रीयांस ४:१५; ५:८, ९) येशूच्या सचोटी-रक्षक मार्गाक्रमणामुळे सर्व खऱ्या ख्रिश्चनांपुढे त्याच्या पावलांस अनुसरण्याजोगा सुंदर नमुना प्रस्तुत केला.—१ पेत्र २:२१.
४. येशूच्या सहनशीलतेमुळे कोणता मोठा आनंद निर्माण होतो, व यामुळे आम्हाला कोणते उत्तेजन मिळावे?
४ अशाप्रकारे आपल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करण्यात येशूला अप्रतिम आनंद मिळाला व याद्वारे त्याने आणखी आनंदाची प्रतीक्षा राखली व हेच प्रेषित पौलाने इब्रीयांस १२:१, २ मध्ये सूचित केले. तो म्हणतोः “आपणही . . . आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. . . . आपल्या विश्वासाचा प्रमुख प्रतिनिधी व पूर्णकर्ता येशू ह्याच्याकडे नित्य पाहात असावे. जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.” हा कोणता आनंद त्याच्यापुढे होता? हा येशूठायीचा आनंद आहे, जो केवळ त्याच्या पित्याचे नाम गौरविण्यात आणि मानवजातीची मरणापासून सुटका करण्यापर्यंत मर्यादित नव्हता तर त्यामध्ये तो राजा व याजक होऊन आज्ञाधारक मानवजातीला नंदनवन बनलेल्या पृथ्वीवर पूर्णतेप्रत आणण्यामध्ये मिळणारा आनंद होता.—मत्तय ६:९; २०:२८; इब्रीयांस ७:२३-२६.
५. येशूचे “बंधू” कोण आहेत, व ते कोणत्या अद्वितीय आनंदात सहभागी होतात?
५ होय, देवाच्या पुत्राला मानवजातीची सेवा करण्याचा नेहमीच आनंद वाटतो. त्यामुळे, त्याच्या पित्याच्या उद्देशानुरुप सचोटी-रक्षक मानवांची निवड करण्यामध्येही त्याला मोठा आनंद वाटला. अशांना तो आपले “बंधू” म्हणतो; यांचे मरण झाल्यावर लागलेच स्वर्गीय जीवनासाठी पुनरुत्थान होते. मग, हे येशूसोबत अद्वितीय आनंदात सहभागी होतात. अशांना “धन्य व पवित्र” असे संबोधिण्यात आले असून ते “देव व ख्रिस्ताचे याजक होतील व त्याच्याबरोबर हजार वर्षे राज्य करतील.”—इब्रीयांस २:११; प्रकटीकरण १४:१, ४; २०:६.
६. (अ) “दुसरी मेंढरे” यांना कोणते आनंददायी निमंत्रण राजा देतो? (ब) या मेंढरांपैकी पुष्कळजण आज कोणत्या हक्काचा आनंद घेत आहेत?
६ यासोबत, राज्य करणारा राजा ज्यांना आपल्या संमतीदर्शक उजव्या हाताच्या बाजूला ठेवतो त्या “दुसरी मेंढरे” यांना त्याचे हे निमंत्रण आहेः “अहो, माझ्या पित्याचे आशीर्वादितहो, या; जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते वतन म्हणून घ्या.” (योहान १०:१६; मत्तय २५:३४) केवढा हा आनंदी हक्क! ज्यांना देवाच्या राज्यात पृथ्वीवर वतन मिळणार आहे त्यांच्यापैकी बरेच जण आज अभिषिक्त जनांच्या सोबतीत राहून जबाबदार नेमणूका स्वीकारीत आहेत. हे यहोवाने आधीच याप्रकारे भाकित केले होतेः “परके उभे राहून तुमचा कळप चारितील, परदेशी तुमचे नांगऱ्ये व द्राक्षांचे मळे लावणारे होतील. तुम्हास तर यहोवाचे याजक असे नाव पडेल; लोक तुम्हास आमच्या देवाचे सेवक म्हणतील.” हे सर्व देवाच्या संदेष्ट्याबरोबर मिळून असे म्हणतातः “मी यहोवाच्या ठायी अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठायी माझा जीव उल्लासतो; कारण . . . त्याने मला तारणाची वस्त्रे नेसविली आहेत.”—यशया ६१:५, ६, १०.
७. १९१४ पासूनचा हा “दिवस” इतका खास का आहे?
७ सध्या आम्ही अत्यंत खास अशा समयात जगत आहोत. १९१४ पासून हा ख्रिस्ताचा, स्वर्गीय राजा या नात्याने राज्य करण्याचा दिवस आहे. याविषयी स्तोत्रसंहिता ११८:२४, २५ मध्ये वर्णन देण्यात आले आहे. ते असेः “यहोवाने नेमलेला दिवस हाच आहे. ह्यात आपण उल्लास व आनंद करू. हे यहोवा, आम्ही तुला विनवितो की, आमचे तारण कर. हे यहोवा, आम्ही तुला विनवितो की, आमचा उत्कर्ष कर.” या दिवसाचा कळस, यहोवा बाबेलोनी धर्मांचे ताडण करील आणि ख्रिस्ताची १,४४,००० बंधू असणाऱ्या वधूचे त्यांचा स्वर्गीय राजाशी मिलाप करील तेव्हा गाठला जाईल. यामुळे देवाचे सर्व लोक “आनंद व उल्लास” करतील. आपल्या मशीही राजाला हर्मगिदोनात लढताना, त्याच्या निष्ठावंत राष्ट्राचा बचाव करताना व त्यांना नीतीमान नव्या जगात आणताना पाहून त्यांना खरोखरी आनंद होईल. (प्रकटीकरण १९:१-७, ११-१६) या आनंददायी आशेची जाहीर घोषणा करीत असताना यहोवा आपल्याला लोकांचा उत्कर्ष करीत आहे का? पुढील अहवाल याची स्पष्टता करील.
गोलार्धव्याप्त वाढ
८. (अ) यहोवाच्या साक्षीदारांचे १९९१ चे वार्षिक अहवाल पुस्तक यात पवित्र आत्म्यासोबतचा आनंद कसा प्रवर्तित होत आहे? (ब) अहवालातील काही ठळक वैशिष्ट्ये कोणती आहेत?
८ यहोवाचे आधुनिक काळाचे साक्षीदार “आनंदाने व पवित्र आत्म्याने पूर्ण” होत आहेत. (रोमकर १५:१३) याचे प्रतिबिंब आपल्याला यहोवाच्या साक्षीदारांचे १९९१ चे वार्षिक अहवाल पुस्तक यात बघायला मिळते. यामध्ये १९९० चा गोलार्धव्याप्त असा राज्यसेवेचा अहवाल देण्यात आला आहे. क्षेत्रावर ४०,१७,२१३ क्रियाशील सेवकांचा नवा उच्चांक गाठण्यात आला हे बघून आम्हाला किती आनंद होतो! ही मागील दहा वर्षांमध्ये ७७ टक्केची वाढ आहे. कारण आता मेंढराचे एकत्रीकरण जगभरातील २१२ देशात होत आहे. आता १५ वर्षानंतर बाप्तिस्म्याच्या संख्येने देखील ३,०१,५१८ इतका सर्ववेळेचा उच्चांक प्रस्थापित केला आहे! खासपणे पूर्व युरोपात झालेल्या काही अधिवेशनात अपेक्षेपेक्षा अधिकांचा बाप्तिस्मा झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये खूप युवक होते व यांनी, धर्म हा जुन्या लोकांसोबतच नष्ट होईल या समाजसत्तावाद्यांच्या दाव्याला खोटे ठरविले.
९. (अ) आरंभीच्या पालकीय तालमीमुळे कोणते आनंदी परिणाम मिळतात? (ब) याविषयी कोणते स्थानिक किंवा इतर अनुभव पुष्टी देतात?
९ स्तोत्रसंहिता ३२:११ मध्ये देण्यात आलेली हाक पुष्कळ युवक पूर्ण करीत आहेत. ती म्हणतेः “अहो नीतीमानांनो, यहोवाच्या ठायी आनंदोत्सव करा; अहो, सरळ मनाचे जनहो, तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा.” कित्येक पालक, “बालपणापासून” आपल्या मुलांना तालीम देण्याची सूचना पाळीत असल्याचे दिसून येत आहे. (२ तीमथ्य ३:१५) त्या कोवळ्या मुलांसाठी संस्थेने तयार केलेल्या कॅसेट टेप्स् तसेच निरनिराळी प्रकाशने यांचा चांगला वापर होत असल्याचे दिसते. ही मुले शाळेत जाऊ लागल्यानंतर तेथे सुंदर साक्ष देत आहेत. हे एका आठ वर्षे वयाच्या जपानी मुलीविषयी कळविण्यात आले आहे. “आमची उन्हाळ्याची सुटी संपल्यावर मी माझ्या शिक्षिकेकडे जाऊन तिला विचारले की, ‘तुम्ही तुमच्या पालकांच्या कबरेला भेट दिली का?’ ती म्हणालीः ‘होय, माझे वडील खूपच प्रेमळ होते व दरवर्षी मी तेथे जाते.’ मग, मी म्हटलेः ‘तुम्ही पवित्र शास्त्राचा अभ्यास केला व देवाची शिकवण आचरली तर मग, तुम्हाला तुमचे प्रेमळ वडील नंदनवन झालेल्या पृथ्वीमध्ये पुन्हा भेटू शकतील.’ यानंतर मी, शिक्षिकेला माझे माय बुक ऑफ बायबल स्टोरिज् हे पुस्तक दिले. आता आमची ही शिक्षिका आमच्या सबंध वर्गाला दर आठवडी जेवणाच्या सुटीदरम्यान एक धडा वाचून दाखविते.”
१०. यंग पीपल आस्क या पुस्तकाद्वारे कोणते चांगले उद्देश साध्य करण्यात आले व याची काही उदाहरणे कोणती?
१० नवयौवनातील असणाऱ्या मुलामुलींनी क्वश्चन्स यंग पीपल आस्क—आन्सर्स दॅट वर्क या पुस्तकाचा वैयक्तीक अभ्यास करताना तसेच इतर युवकांना साक्ष देताना चांगला उपयोग करून घेतला आहे. पालकांना देखील या पुस्तकाविषयी रसिकता वाटली. साहाय्यक पायनियरींग करणाऱ्या स्विट्झर्लंडमधील एका भगिनीने आपल्या मुलाचे वर्गमित्र असणाऱ्या मुलांच्या पालकांना भेट देण्याचे ठरविले. यामुळे कित्येक पालकांशी मोठी मनोरंजक चर्चा झाली आणि २० पुस्तकांचे (बहुतेक यंग पीपल आस्क) आणि २७ मासिकांचे वितरण झाले. त्रिनिदादमध्ये एका शाळकरी मुलीने हे पुस्तक आपल्या शिक्षिकेला शाळेत दिले, मुलीच्या आईने तिचा मागोवा घेतला आणि ३६ कर्मचाऱ्यांमध्ये २५ प्रतींचे वाटप केले. दुसऱ्या महिन्यात तिने आपले लक्ष तिच्या ओळखीच्या पालकांवर लावले आणि आणखी ९२ पुस्तकांचे वितरण केले व नवनवीन पवित्र शास्त्र अभ्यास सुरु केले. कोरिया येथे एका माध्यमिक शाळेत एका शिक्षकाने यंग पीपल आस्क या पुस्तकाचा वापर करून “मी शाळेतील माझी गुणवत्ता कशी वाढवू शकतो?” आणि “मी माझ्या शिक्षकांसोबत कसे वागू शकतो?” यासारख्या विषयांवर लहान प्रवचन दिले व हे पुस्तक मुलांना सादर केले. मुलांमध्ये ३९ पुस्तकांचे वाटप झाले. पण मग, काही पालकांनी तक्रार केली. तथापि, हेडमास्तरांनी या पुस्तकाचे परिक्षण करून बघितले व म्हटले की, “हे खूप चांगले पुस्तक आहे,” आणि स्वतःच्या मुलीसाठी देखील एक पुस्तक घेतले.
सर्वोत्तम शिक्षण
११, १२. वॉच टावर संस्थेची प्रकाशने सर्वोत्तम स्वरुपाचे शिक्षण देत आहेत याविषयी काही कोणता पुरावा देता येईल?
११ आमच्या मासिकातील शैक्षणिक मूल्यता ही देखील पुष्कळांना आवडली आहे. अमेरिकेतील एका शाळेने आपल्या वर्गात वापर करण्यासाठी अवेक! मासिकाच्या जुलै २२, १९९० अंकाच्या (“क्रॅक ॲडीक्शन”वरील लेख) १,२०० प्रती मागविल्या. याचप्रमाणे यहोवाच्या साक्षीदारांच्या शाळेत जाणाऱ्या मुलांच्या उदाहरणशील वागणूकीमुळे देखील चांगली छाप पडत आहे. थायलंडमधील एका शाळेतील वर्गात मुले खूप दंगा करीत होती, तेव्हा शिक्षिकेने ११ वर्षे वयाच्या राचा या विद्यार्थ्याला सर्वांसमोर उभे केले व म्हटलेः “तुम्ही मुले या मुलाचे का अनुकरण करीत नाही? तो अभ्यासात हुशार आहे आणि याची वागणूकही चांगली आहे.” पुढे तिने म्हटलेः “मला वाटतं की, तुम्ही आपली वागणूक सुधारण्यासाठी राचासारखं यहोवाचे साक्षीदार व्हावं.”—पडताळा नीतीसूत्रे १:८; २३:२२, २३.
१२ डॉमिनिकन रिपब्लिक येथील एक युवक बहीण लिहितेः “मी चार वर्षांची असताना एका धार्मिक शाळेच्या बालवाडीत शिकत होते. येथे आम्हाला लिहिण्या-वाचण्याचे शिक्षण मिळाले. माझी शिक्षिका असणाऱ्या जोगिणीला मी यु कॅन लिव्ह फॉरएव्हर इन पॅरडाईज ऑन अर्थ् हे पुस्तक बक्षिस म्हणून दिले. त्यामध्ये मी हा संदेश जोडला होताः ‘तुम्ही मला लिहायला-वाचायला शिकवले म्हणून मी तुमचे खूप आभार मानते. माझी ही इच्छा आहे की तुम्ही माझ्या विश्वासाची समज प्राप्त करावी आणि मला जशी या पृथ्वीवर, ती पूर्णपणे नंदनवन होईल तेव्हा सर्वकाल जगण्याची आशा आहे तीच तुम्हीही मिळवावी.’ यामुळे मला शाळेतून काढून टाकण्यात आले. आठ वर्षांनी मला ही शिक्षिका पुन्हा भेटली. तिने सांगितले की, पाळकाचा विरोध होत होता तरी मी दिलेले पुस्तक तिने वाचले. नंतर ती राजधानीच्या शहरात स्थलांतरित झाली व येथे तिने साक्षीदारांबरोबर पवित्र शास्त्राचा अभ्यास आरंभिला. आता या ‘शुद्ध वाणी’ प्रांतिय अधिवेशनात तिचा व माझा एकत्रित बाप्तिस्मा होत आहे.” खरेच, आधी भाकित करण्यात आल्याप्रमाणे, “बालकांच्या मुखातून” सूज्ञान येऊ शकते!—मत्तय २१:१६; स्तोत्रसंहिता ८:१, २.
१३. शलमोनाच्या सूचनेला किती नवयौवन मुले प्रतिसाद देत आहेत, आणि हे जागतिक अहवालात कसे प्रतिबिंबित होत आहे?
१३ शलमोनाने हा उत्तेजनपर सल्ला दिलाः “हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर; तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला उल्लास देवो. तू मनास वाटेल त्या मार्गाने . . . चाल.” (उपदेशक ११:९) आज यहोवाच्या साक्षीदारांची कित्येक मुले या वचनाचा अवलंब करीत आहेत हे पाहणे मोठे आनंदविणारे आहे. ती आपली यौवनाची वर्षे यहोवाची सेवा पूर्ण वेळ करण्याच्या कार्याच्या तयारीत घालवीत आहेत ते अशासाठी की शालेय जीवन संपल्यावर त्यांना हे सर्वथोर काम आपल्या हाती घेता यईल. पायनियरांची संख्या वाढती असून ती वर्षभरात ८,२१,१०८ इतकी होती. बेथेलमध्ये काम करणाऱ्या ११,०९२ बंधूभगिनींना जमेस धरुन ही संख्या प्रचारकांच्या २१ टक्के इतकी आहे!
१४. आमच्या भगिनी कोणते सहकार्य करीत आहेत, व यासाठी त्या कोणत्या प्रशंसेला पात्र आहेत?
१४ हे मोठ्या आस्थेचे आहे की, कित्येक देशात सर्व पायनियर प्रचारकांमध्ये भगिनींचा समावेश अधिक आहे, जसे की, अमेरिकेत त्या ७५ टक्के आहेत. हे स्तोत्रसंहिता ६८:११ वचनाला अधिक जोर देणारे ठरते की, “यहोवा अनुज्ञा देतो: मंगल वार्ता प्रसिद्ध करणाऱ्या स्त्रियांची मोठी सेना सिद्ध” होते. आमच्या भगिनी क्षेत्रकार्य अधिक प्रमाणात करीत आहेत याविषयी त्या प्रशंसेला पात्र आहेत. त्या घरगुती पवित्र शास्त्र अभ्यासात ज्या कुशल पद्धतीने शिकवतात, त्यामुळे पुष्कळ लोकांना सत्याप्रत निरविण्यात आले आहे. याचप्रमाणे मंडळीत अधिक जबाबदाऱ्या असणाऱ्या बांधवांच्या बायकांचीही, ते त्यांना देत असलेल्या पाठबळाविषयी उबदारपणे प्रशंसा होण्यास हवी.—नीतीसूत्रे ३१:१०-१२; इफिसकर ५:२१-२५, ३३.
पवित्र शास्त्राचे शिक्षण समृद्ध होते
१५. (अ) जागतिक अहवालामध्ये नमूद करण्यात आलेल्या काही राष्ट्रांनी घरगुती पवित्र शास्त्र अभ्यासाच्या बाबतीत केवढी वाढ दर्शविली आहे? (ब) पवित्र शास्त्र अभ्यास केवढी फलप्राप्ती देऊ शकतो याचे विवेचन करणारे कोणते अनुभव तुम्हास सांगता येतील?
१५ पवित्र शास्त्र शिक्षणाचे कार्य वृद्धींगत होते आहे व दर महिन्याला जगभरात सरासरी ३६,२४,०९१ इतके शास्त्राभ्यास चालविण्यात येत आहेत. पवित्र शास्त्रातील सत्य व्यक्तीमत्व बदलू शकते हे पुढील अहवालावरून स्पष्ट आहे. ऑस्ट्रेलियामध्ये २५ महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा संपवल्यावर जानेवारी १९८७ मध्ये एका माणसाला न्यूझिलंड येथे पाठवण्यात आले. त्याला चोरी व खोटी कागदपत्रे या कारणावरून ती शिक्षा झाली होती. तो मादक द्रव्याच्या व्यसनाधीन होता आणि १७ पेक्षा अधिक वर्षे त्याचा व्यापार करीत होता. पुढील वर्षी त्याच्या बायकोने यहोवाच्या साक्षीदारांसमवेत पवित्र शास्त्राचा अभ्यास आरंभिला. तिचे ज्ञान वाढले तसतसे तिच्या वागणुकीत लक्षणीय बदल झाल्याचे त्याला दिसले. ती आता चांगली बायको व माता बनली होती. आपल्या बायकोच्या आग्रहामुळे तो जून १९८९ मध्ये एका विभागीय संमेलनाला आला. त्याने पवित्र शास्त्र अभ्यास स्वीकारला व मग त्याचे एकंदरीत राहणीमान व स्वरुप यात बदल दिसू लागले. कुटुंबातील सातही सदस्य सभांना हजर राहू लागले. त्या माणसाने पौलाने इफिसकर ४:१७-२४ मधील उत्तम सूचना आत्मसात केली व त्याचा जानेवारी १९९० मध्ये बाप्तिस्मा झाला.
१६. (अ) १९९० चा स्मारकविधी अहवाल आम्हाला आनंदाचा स्रोत कसा आहे? (ब) कोणती तातडीची गरज आहे आणि मदतीसाठी आम्ही कोणते प्रयत्न करण्यास हवेत?
१६ वर्षाच्या अहवालामध्ये एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे मंगळवार, एप्रिल १०, १९९० रोजी साजरा झालेला स्मारकविधी, ज्याची लक्षणीय उपस्थिती ९९,५०,०५८ इतकी होती. २१२ देशापैकी ७० पेक्षा अधिक देशांनी या समारंभाची उपस्थिती त्यांच्या प्रचारकांच्या उच्चांकाच्या तिपटीपेक्षा अधिक असल्याचे कळविले आहे! उदाहरणार्थ, जेथे बंदी आहे अशा सात आफ्रिकी देशात एकंदर ६२,७१२ प्रचारक आहेत, त्यांनी स्मारकविधीची उपस्थिती २,०४,३५६ इतकी होती असे कळविले. झगड्यांनी छिन्नविच्छिन्न असणाऱ्या लायबेरियातील १,९१४ प्रचारकांना स्मारकविधीला ७,८११ लोक हजर झाल्याचे पाहून मोठा आनंद वाटला. हाईतीत प्रचारकांचा उच्चांक ६,४२७ इतका आहे, तेथे ३६,५५१ उपस्थिती होती. मायक्रोनेशियाच्या विरळ बेटांवरील ८८६ प्रचारकांमध्ये ३,९५८ इतकी उपस्थिती होती. श्रीलंकेच्या १,२९८ प्रचारकांनी ४,५२१ उपस्थिती कळवली. तर झांबियाच्या ७३,७२९ प्रचारकांनी स्मारकविधीला ३,२६,९९१ लोक आल्याचे सांगितले. हे झांबियाच्या लोकवस्तीमध्ये दर २५ मागे १ असे प्रमाण पडले. हा गोलार्धव्याप्त अहवाल पुन्हा हे कळवितो की, लाखो प्रांजळ लोक मेंढवाड्यात एकत्र होण्याची वाट पाहून आहेत. पण नुसता प्रांजळपणा उपयोगाचा नाही. तर मग, आम्ही आमची घरगुती पवित्र शास्त्र अभ्यास हाताळण्याची पद्धत अधिक सुधारीत बनवून व अभ्यासात वाढ करवून स्मारकविधीला उपस्थित राहिलेल्यांनी अधिक दृढ विश्वास संपादीत करावा यासाठी मदत देऊ शकू का? यांनी आम्हासोबत यहोवाची स्तुती गाण्यामध्ये आमचे साथीदार असावे ही आमची इच्छा आहे. याचा अर्थ त्यांना जीवन असा होऊ शकतो!—स्तोत्रसंहिता १४८:१२,१३; योहान १७:३; १ योहान २:१५-१७.
आनंदाची पूर्णता
१७. आम्ही आमचा आनंद टिकवून ठेवावा यासाठी पहिल्या शतकातील कोणत्या उदाहरणांनी आम्हास उत्तेजन दिले पाहिजे?
१७ आम्हापुढे कोणतेही परिक्षाप्रसंग येवोत, आम्ही आमचा आनंद टिकवून ठेवावा हा आपण निर्धार राखू या. आम्हाला कदाचित स्तेफनासारखा अनुभव येणार नाही, तरी देखील त्याचे उदाहरण आम्हास खूप उत्तेजन देऊ शकते. त्याच्यावर आरोप केले जात होते तरी त्याला आपला आनंदी मनोभाव राखता आला. त्याच्या शत्रूंना “त्याचे मुख देवदूताच्या मुखासारखे दिसले.” त्याच्या संकटात देव त्याच्या समीप होता. त्याने “पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन” आपल्या मरणापावेतो निर्भिड साक्ष दिली. पौल व बर्णबा यांनी आपले प्रचारकार्य परराष्ट्रीयांकडे नेले तेव्हा ते देखील “आनंदित झाले आणि त्यांनी देवाच्या वचनाचा महिमा वर्णिला.” परत छळ सुरु झाला. पण विश्वास धारक डगमगले नाहीत. “शिष्य आनंदाने व पवित्र आत्म्याने पूर्ण झाले.” (प्रे. कृत्ये ६:१५; ७:५५; १३:४८-५२) आमचे शत्रू आम्हाविषयी काहीही करोत, आमच्या जीवनातील दैनंदिनीच्या समस्या काहीही असल्या तरी आम्ही पवित्र आत्म्याचा आपला आनंद कधीही हिरावू देऊ नये. पौल म्हणतोः “आशेने हर्षित व्हा; संकटात धीर धरा; प्रार्थनेत तत्पर राहा.”—रोमकर १२:१२.
१८. (अ) नवे यरूशलेम काय आहे व देवाच्या लोकांनी तिच्यासोबत का आनंद केला पाहिजे? (ब) “नवे आकाश व नवी पृथ्वी” मानवजातीला कसे आशीर्वाद देणार?
१८ ती आशा केवढी अद्भुत आहे! यहोवा आपल्या सर्व लोकांना घोषित करतोः “पाहा, मी नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करतो; पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत; परंतु जे मी उत्पन्न करतो त्याने तुम्ही सदा आनंदी व्हा व उल्लास पावा.” ख्रिस्त प्रभु, “नवे यरुशलेम” (सध्याची देवाच्या स्वर्गीय संस्थेची राजधानी, “वरील यरुशलेम”) आणि पृथ्वीवरील नवीन जगाची संस्था हे मानवजातीला मुबलक आनंद देणार. (गलतीकर ४:२६) मृत मानवांचे पुनरुत्थान, सर्व आज्ञाधारकांचे मानवी पूर्णतेतील सार्वकालिक जीवनासाठी उत्थान, पृथ्वीव्याप्त नंदनवनातील चिरकालिक असे उपयुक्त हालचालींनी भरलेले जीवन—या सर्व गोष्टी किती आशादायक व आनंदाच्या आहेत! जसे यहोवा स्वतः ‘यरुशलेमाविषयी उल्लास पावतो व तिच्या लोकांना आनंदमय बनवितो’ तसेच देवाच्या लोकांना संदेष्टा हे आमंत्रण देतोः “यरुशलेमेबरोबर आनंद करा, तिजवर प्रेम करणारे तुम्ही सर्व तिजमुळे उल्लासा.” (यशया ६५:१७-१९; ६६:१०; प्रकटीकरण १४:१; २०:१२, १३; २१:२-४) होय, आपण सर्व सदा आनंदाने व पवित्र आत्म्याने पूर्ण होऊ आणि प्रेषित पौलाच्या या सल्ल्याकडे कान देऊः “प्रभुमध्ये सर्वदा आनंद करा; पुन्हा म्हणेन, आनंद करा.”—फिलिप्पैकर ४:४.
आनंदाविषयीच्या अभ्यासाचा सारांश
◻ आनंदाने सहन करीत राहण्याचा कोणता नमुना येशूने आम्हासाठी दिला?
◻ दोन समर्पित गटांना आनंदाविषयीची कोणती कारणे आहेत?
◻ तरुण तसेच वयस्कर सत्यामध्ये कसे हर्षित होत आहेत?
◻ १९९०च्या अहवालाची उजळणी करता, “हे यहोवा, आम्ही तुला विनवितो की, आमचा उत्कर्ष कर” या प्रार्थनेला कोणते उत्तर मिळत आहे असे दिसून येते?
◻ आनंदाची सर्वांग रितीने पूर्णता कधी व कशी साध्य होईल?
[२५ पानांवरील चित्रं]
यहोवाच्या दूताने ख्रिस्त प्रभु याच्या जन्माची घोषणा ‘मोठा आनंद देणारी सुवार्ता’ अशी केली