वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w91 ४/१ पृ. ३०-३२
  • “आधी नम्रता मग मान्यता”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “आधी नम्रता मग मान्यता”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ‘नम्रतेपासून मान्यतेकडे’ गेलेले आणखी इतर लोक
  • विविध प्रकारचे गौरव
  • या विश्‍वासू ख्रिश्‍चनांना कशाने जिवंत राखले?
  • सुबत्तेच्या काळातील प्राणघातक दुष्काळ
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • योसेफाला तुरुंगात टाकलं जातं
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • यहोवा तुम्हाला यशस्वी व्हायला मदत करत आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • यहोवा योसेफला विसरला नाही
    बायबलमधून शिकू या!
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
w91 ४/१ पृ. ३०-३२

“आधी नम्रता मग मान्यता”

एक तरुण युक्‍तीबाजाने केलेल्या आरोपामुळे मिसरी तुरुंगात अडकला होता. त्याला पुष्कळ अपमान सहन करावा लागला आणि आता तुरुंगातून सुटण्याची कोणतीच आशा दिसत नव्हती. मग, त्याला फारोसमोर हजर राहण्याचा हुकूम आला. तरुंग रक्षकांनी त्याला ताबडतोब बाहेर आणले. त्याने दाढी केली, आपली वस्त्रे बदलली अणि मग तो सम्राटापुढे उभा राहिला.

योसेफासाठी विस्मयता वाट पाहून होती. योसेफाने, यहोवाच्या सहाय्याने, फारोच्या दोन्ही स्वप्नाचा बिनचूक उलगडा केला. फारो म्हणालाः “पहा, मी तुला अवघ्या मिसर देशावर नेमितो.” (उत्पत्ती ४१:४१) केवढा हा आश्‍चर्यकारक अनुभव—एकाच दिवसात तुरुंगातून ते राजमहालात! योसेफाचा अनुभव, शलमोन राजास नंतरच्या काळी जे लिहिण्यास प्रेरित करण्यात आले त्याची सत्यता वदवितोः “तो कारागृहातून निघून राजा झाला.” अगदी उचितपणे, शलमोनाने दोनदा हे लिहिलेः “आधी नम्रता, मग मान्यता.”—उपदेशक ४:१४; नीतीसूत्रे १५:३३; १८:१२.

या ईश्‍वरी सत्यापासून फायदा मिळविण्यासाठी स्वतःला विचाराः योसेफाला त्याच्या त्या अपमानास्पद अनुभवाच्या दरम्यान कशाने वाचविले? ज्या दोषारोपामुळे या यहोवाच्या विश्‍वासू सेवकाला तुरुंगात जावे लागले त्याला त्याने कसे तोंड दिले? योसेफासाठी यहोवाच्या मनात कोणते मान्यतेचे गौरव होते? ज्यांनी अनेक शतकातून विश्‍वासू व धैर्याने छळाचा व अपमानाचा सामना केला त्यांच्यासाठी कोणते मान्यतापर गौरव थांबून आहे? यापेक्षाही अधिक म्हणजे, आम्हावर असा अपमानकारक प्रसंग उद्‌भवला तर आम्हाला समतोल दृष्टीकोन बाळगण्यास काय मदत करील?

योसेफाने बहुदा, त्या पूर्वीच्या दोन भविष्यवादित स्वप्नांवर मनन केले असेल ज्यामध्ये हा निर्देश करण्यात आला होता की, त्याचे भाऊच काय पण त्याचे पालक देखील त्याजपुढे “नमन” करतील. खरे म्हणजे, योसेफाचे पहिले स्वप्न ऐकताच त्याच्या भावांनी विचारलेः “अरे, तू आम्हावर राजा होणार काय?”—उत्पत्ती ३७:८-१०.

योसेफाच्या मत्सरी भावांनी जवळजवळ त्याचा खूनच केला होता! परंतु, यहोवाच्या मार्गदर्शनाद्वारे या १७ वर्षांच्या तरुणाला व्यापाऱ्‍यांना विकण्यात आले. त्यांनी त्याला फारोचा प्रमुख अंगरक्षक पोटीफर याला विकले.

सरतेशेवटी, योसेफ पोटीफरच्या घरचा कारभारी झाला. त्याच्या बायकोने या देखण्या तरुणास भुरळ घालण्याचा प्रयत्न केला. तरी योसेफ यहोवास निष्ठावंत होता व तो तेथून निसटला. त्या कावेबाज बायकोने योसेफावर बलात्काराचा खोटा आरोप लावला, पोटीफरने तिच्यावर विश्‍वास ठेवला व यामुळे योसेफाला तरुंगामध्ये अडकावे लागले.

तथापि, तो येथेही यहोवास निष्ठावंत राहिला; आणि जसे आधी सांगण्यात आले त्याप्रमाणे त्याला येथून, फारोच्या स्वप्नांचा उलगडा करण्यासाठी नेण्यात आले. फारोने नंतर योसेफास मिसराचा अन्‍नसाठा संग्रहीत करण्याच्या वैभवी अधिकारावर नेमले. जेव्हा कनानात दुष्काळ पडला तेव्हा योसेफाचे भाऊ कुटुंबाला अन्‍नसामग्री मिळावी याकरता त्याच्यापुढे अक्षरशः नमले.

‘नम्रतेपासून मान्यतेकडे’ गेलेले आणखी इतर लोक

आणखी एक यहोवाचा विश्‍वासू सेवक, ज्याच्या जीवन चारित्र्याने, “आधी नम्रता मग मान्यता,” या ईश्‍वरी सत्याची प्रचिती दिली, तो मोशे होता. फारोच्या राजदरबारी त्याची वाढ झाली होती त्यामुळे मोशापुढे कौतुकास्पद भवितव्य होते. तरी घटनांनी परिस्थितीला वळण दिले. मोशेने यहोवावरील विश्‍वास व त्याच्या लोकांविषयीची प्रेमळ काळजी यामुळे हालचाल केली व याकरता त्याला क्रोधिष्ठ फारोच्या हातून आपला जीव वाचविण्यासाठी पळ काढावा लागला. तो एकटाच मिद्यानापर्यंत आला. ४० वर्षे त्याने आपली नम्रता, साध्या मेंढपाळाचे जीवन कंठून, त्याचा सासरा इथ्रो याची सेवा करून दाखविली. या ४० वर्षांदरम्यान मोशेने नम्र बनविणाऱ्‍या यहोवाच्या मार्गावर विचार करणे आणि भविष्यामध्ये त्याच्यासाठी जे राखले आहे त्यावर मनन करणे यामुळे आपले व्यक्‍तीत्व बदलविणे हे केवढे उत्तेजक ठरले असावे बरे!

यानंतर मान्यता मिळाली. यहोवाने मोशेला फारोकडे त्याचा संदेशवाहक व त्याचे लोक मिसराबाहेर आणणारा अशी नेमणूक दिली. मोशेला दहा पिडात सरळपणे समाविष्ट होता आले तसेच इस्राएलांना तांबड्या समुद्रातून नेणे हे केवढे विलोभनीय हक्क लाभले होते बरे? नंतर सिनाय पर्वतावर मोशेला यहोवाकडून नियमशास्त्र मिळाले. तो खाली उतरला तेव्हा लोक “मोशेच्या मुखावरील गौरव एकसारखे पाहू शकले नाहीत.”—२ करिंथकर ३:७.

याचप्रमाणे पौर्वात्य देशातील श्रेष्ठ व्यक्‍ती ईयोब याचाही विचार करा. तो “सरळ, देवाला भिऊन वागणारा व पापापासून दूर राहणारा” होता. (ईयोब १:२, ३, ८) नंतर अचानकपणे, त्याने आपली दहा मुले, हजार मेंढरे, उंट, गुरे व गाढवी गमावली.

पण एवढेच नव्हते. इयोबाला गळवांनी नखशिखात अतिशय पीडिले व तो शारीरिकरित्या किळसवाणा बनला. त्याच्या बायकोनेच ही कुचेष्टा केलीः “तुम्ही अजून सत्त्व धरून राहिला आहा काय? देवाला शाप द्या व मरून जा!” (ईयोब २:९) ईयोबाची मोठी पराकाष्ठेची परिक्षा झाली व त्याला खूप अपमानकारकपणे नमविण्यात आले; पण त्याला यहोवा व आद्यशत्रू सैतान यांच्यामध्ये स्वर्गात जो वाद झाला त्याची कसलीही जाणीव नव्हती. ईयोबाच्या तीन “मित्रां”नी जी प्रदीर्घ चर्चा मांडली तिजमुळे काही सुधारणा होऊ शकली नाही. तथापि, ईयाबाने आपली सचोटी राखली. त्याने, त्याच्यापेक्षा लहान असलेल्या अलीहूची सूचनाही स्वीकारली.—ईयोब ३२:४.

मग, ईयोबाला प्रतिफळ मिळाले का? होय, यहोवाने ईयोबास त्याची गुरेढोरे दुपटीने दिली, व त्याला सात पुत्र व तीन कन्या दिल्या. या कन्या देशात देखण्या होत्या! ईयोबाच्या नम्रपणाचा हा केवढा भव्य परिणाम! यामुळे “आधी नम्रता मग मान्यता,” हे तत्व केवढे सत्य शाबीत झाले बरे!—ईयोब ४२:१२-१५.

विविध प्रकारचे गौरव

विविध प्रकारचे गौरव आहे हे उघड आहे; ते स्त्रियांच्या केसापासून ते सिनाय पर्वतावरून उतरणाऱ्‍या मोशेच्या चेहऱ्‍यावरील गौरव. (१ करिंथकर ११:१५; २ करिंथकर ३:७) नेत्रदिपक सूर्यास्ताचे भव्य गौरव तसेच ताऱ्‍यांचे आणखी एक आगळे गौरव आहे.—१ करिथकर १५:४१.

“गौरव” हा शब्द पवित्र शास्त्रात विविध प्रकारे हजारो वेळा उपयोगात आणला आहे. त्यांचे संदर्भ तसेच पार्श्‍वभूमि तपासल्यावर, यहोवा हाच सर्व गौरवांचा स्रोत आहे हे स्पष्ट होते. त्याचे विश्‍वासू सेवक तसेच त्याची अति उत्कृष्ठ निर्मिती या गोष्टी गौरव हे विविध मार्गी व विविध स्तर प्रदर्शित करू शकतात.

आमच्या या २० व्या शतकात, ज्यांना गौरवी अशी स्वर्गीय आशा आहे, त्यांनी पुष्कळ मानखंडणा स्वीकारली याविषयी भरपूर पुरावा आहे. पहिल्या जागतिक महायुद्धा दरम्यान, ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथील वॉचटावर सोसायटीच्या नेतृत्व करणाऱ्‍या सदस्यांना खोट्या आरोपावर २० वर्षांच्या कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली. याच काळादरम्यान कित्येक ठिकाणी छळाचा भडका उडाला. उदाहरणार्थ, जे. बी. सायबेनलीस्ट यांना कायदेशीर नोटीस न दाखविता धरले गेले, तीन दिवस कैदवास झाला. येथे त्यांना तीन वाईट झालेले भाकरीचे तुकडे देण्यात आले. जमावाने त्यांना तुरुंगातून चाबकाचे फटके देत, गरम डांबर फासत, टोकाला वायर असलेल्या बगीच्या चाबकाने फटकारे ओढीत नेण्यात आले. एका सुनावणीच्या वेळी न्यायाधिशाने म्हटलेः “तुझ्या पवित्र शास्त्रासोबत तू नरकात जा; तू नरकात जाण्याच्या लायकतेचा आहेस. तुला फाशीच दिली पाहिजे.”

दुसऱ्‍या जागतिक महायुद्धा दरम्यान यहोवाच्या काही विश्‍वासू सेवकांनी नाझींच्या राजकीय बंद्यांच्या छावणीत त्रास सहन केला. यापैकी एक होते, मार्टीन पोएटझिंगर जे अभिषिक्‍त साक्षीदार आहेत व ते त्या छळातून वाचून आता यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य बनण्यास बचावून राहिले. ते डचाऊचे वर्णन “दुरात्म्यांचे वेडे घर,” असे करतात. माऊथासेन छावणीत, “गेस्टोपोनी यहोवावरील आमचा विश्‍वास मोडण्यास, आम्हाला फसविण्याच्या सर्व प्रकारांचा वापर करून पाहिला. उपासमार, आहाराचे पथ्य, फसवी मैत्री, क्रुरता, दिवसामागून दिवस खोड्यात उभे करणे, खांबावर दहा फूट उंचावर हात कमरेच्या पाठीमागे बांधून लटकविणे, चाबकाचे फटकारे—हे सर्व व इतर . . . गोष्टींचा प्रयोग केला.”

या विश्‍वासू ख्रिश्‍चनांना कशाने जिवंत राखले?

अशा शोचनीय व मानहानीकारक स्थितीमध्ये त्यांना जो शेवटी उत्तम परिणाम मिळणार त्याच्यावरील भक्कम विश्‍वासाने ज्या सचोटी राखणाऱ्‍यांसाठी राखलेले गौरवी भवितव्य समाविष्ट आहे, त्याने सहन करण्यास मदत दिली. अभिषिक्‍त जनांच्या “लहान कळपा”साठी ते प्रतिफळ स्वर्गीय जीवनाचे आहे. (लूक १२:३२) बाकीच्या इतर विश्‍वासू मानवांसाठी पृथ्वीवरील खास प्रकारचे गौरवी जीवन राखून ठेवण्यात आले आहे. यातील काही जण योसेफ, मोशे आहेत ज्यांविषयीचा उल्खे इब्रीकरांस पत्राच्या ११ व्या अध्यायात आहे. कृपया ३२ ते ४० वचने वाचा व या विश्‍वासू जनांना कोणकोणत्या अपमानकारक स्थितीला तोंड द्यावे लागले ते पहा. याखेरीज, एक “मोठा लोकसमुदाय” आज यहोवाची सेवा करीत आहे. (प्रकटीकरण ७:९, १५) यांचे भवितव्य काय असणार?

एक समृद्धकारक भवितव्य त्यांच्यासाठी वाट पाहून आहे. येशू ख्रिस्ताच्या वर्चस्वाखालील स्वर्गीय सरकारला आपले पृथ्वीवरील प्रतिनिधी असतील, ते प्रकटीकरण २०:१२ मध्ये उल्लेखिलेल्या गुंडाळीच्या सूचना लागू करतील. अशांना राजे म्हणून नव्हे, तर “सर्व पृथ्वीवर सरदार म्हणून” नियुक्‍ती मिळण्याचा गौरवी हक्क राहील. यांच्यासमवेत अमर्याद असा नम्र, विश्‍वासू लोकांचा समूह असणार, ज्यात पुनरुत्थित समाविष्ट असतील. या सर्वांना पृथ्वीवरील गौरवी नंदनवनात सार्वकालिक जीवन मिळेल.—स्तोत्रसंहिता ४५:१६.

आजही लाखोजन खोट्या धर्मास सोडून यहोवाच्या साक्षीदारांच्या समाजास येऊन मिळत आहेत व ते त्याच्या समवेत घरोघरच्या कार्यात आनंदाने सहभागी होऊन आपणाठायीच्या नम्रतेचे प्रमाण देत आहेत. यातील पुष्कळांची कौटुंबिक सदस्य तसेच मित्र यांनी थट्टा केली पण ते सत्य भक्‍तीस बिलगूनच राहिले. यहोवा या खऱ्‍या देवाची भक्‍ती करता यावी म्हणून त्यांनी नम्रपणे सुधारणुकीचा व शिस्तीचा स्वीकार केला. यांची आशा ‘जेव्हा पृथ्वी, जसे जल समुद्राला व्यापून टाकते त्याप्रमाणे यहोवाच्या ज्ञानाने पूर्णपणे भरेल’ तेव्हाच्या नंदनवनाची पुनर्स्थापना झालेल्या जगात जगणे ही आहे.—हबक्कुक २:१४.

यहोवाच्या लोकांना कसास लावण्याचे दिवस हेच आहेत. हे जणू आपण परक्या देशात राहणाऱ्‍या लोकांना जो अनुभव येतो त्यासारखेच आहे. सत्य भक्‍ती व खोटी भक्‍ती यांच्यामधील दरी ही खोल व विस्तीर्ण होत चालली आहे. आम्हाला काही ना काही प्रमाणात अपमान हा सहन करावा लागतो. पण जसे येशूला, त्यापुढे जो आनंद ठेवला होता त्यामुळे बल व सांत्वन मिळाले त्याप्रमाणेच आम्ही अंतिम परिणामाची स्थिती लक्षात घेऊन सर्व परिक्षांवर मात करू शकतो.

पवित्र शास्त्र आम्हाला उपदेश देतेः “यहोवापुढे स्वतःस नम्र करा म्हणजे तो तुम्हास उंचावेल.” (याकोब ४:१०) तुम्हाला कोणा खडतर परिक्षेत लोटले जाते तेव्हा या शब्दांचा विचार कराः “आधी नम्रता, मग मान्यता.” तसेच यहोवा निष्प्रभ होऊ शकत नाही हेही आठवणीत असू द्या.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा