तळटीप
a “आर्यन श्रेष्ठत्वा”विषयी कळविताना द न्यू यॉर्क टाईम्सने फेब्रुवारी १७, १९४० च्या अंकात जॉर्जटाऊन विश्वविद्यालयाच्या व्यवस्थापकीय मंडळाच्या एका कॅथोलिक सभासदाने असे म्हटल्याचे उद्धृत केले की, “त्याने ॲडाल्फ हिटलरला असे म्हणताना ऐकले की, पवित्र रोमी साम्राज्य जे जर्मनीचे साम्राज्य होते, त्याची पुनर्स्थापना झालीच पाहिजे.” तथापि, विल्यम एल. शायरर या इतिहासकारांनी निष्पत्तीची माहिती कळविली आहेः “जानेवारी ३०, १९३३ रोजी जन्मलेल्या तिसऱ्या साम्राज्याविषयी हिटलरने ही घमेंड केली की, ते हजार वर्षे टिकेल आणि त्यामुळे नाझी काळात त्याला नेहमी ‘हजार वर्षीय साम्राज्य’ असे उल्लेखित असत. ते केवळ बारा वर्षे व चार महिने टिकले.”