“तुम्ही विश्वासात आहा किंवा नाही याविषयी आपली परिक्षा करा”
२ रे करिंथकरांस पत्रातील ठळक मुद्दे
प्रेषित पौलास करिंथमधील ख्रिश्चनांविषयी आस्था होती. त्याने लिहिलेल्या पहिल्या पत्रातील उपदेशाबद्दल त्यांचा दृष्टीकोन काय बनला होता? त्या पत्राने करिंथकरांस पश्चाताप करण्याएवढे दुःखित केल्याची बातमी घेऊन जेव्हा तीत आला त्यावेळी पौल मासेदोनियात होता. पौलास त्यामुळे केवढा आनंद झाला बरे!—२ करिंथकर ७:८-१३.
पौलाने करिंथकरांना लिहिलेले त्याचे हे दुसरे पत्र मासेदोनियातून इ.स. ५५च्या मध्यात लिहिले असावे. या पत्रात त्याने मंडळीत शुद्धता राखण्यात कोणती पावले उचलावीत, यहुदीयातील विश्वस्त गरजवंतांना मदत करण्यास निधि उभारण्यास मनाची कशी उभारणी करावी याची चर्चा केली व आपल्या प्रेषितपणाचे समर्थन केले. पौलाने जे काही म्हटले आहे त्यातले पुष्कळसे आमचे ‘आम्ही विश्वासात आहोत किंवा नाही याविषयी स्वतःची परिक्षा करण्यात’ साहाय्य करील. (१३:५) तर मग, आम्हाला या पत्रातून काय टिपता येईल?
सांत्वनदात्या देवाचे सेवक
प्रेषिताने हे स्पष्ट केले की, जसे देव सर्व संकटात आमचे सांत्वन करतो, तसेच आम्हीही इतरांचे करावे व त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. (१:१–२:११) पौल व त्याचे साथीदार जरी कमालीच्या दबावाखाली होते तरी देवाने त्यांची सुटका केली. तरी, करिंथकर त्यांच्याकरता प्रार्थना करून त्यांचे साहाय्य करू शकत होते. जसे आपणही, जे सत्याचा स्वीकार करून आहेत अशांसाठी प्रार्थना केली पाहिजे. पण त्या स्वैराचारी मनुष्याबद्दल काय ज्याचा १ करिंथकराच्या ५ व्या अध्यायात उल्लेख होता? त्याला बहिष्कृत करण्यात आले होते हे जरी स्पष्ट होते तरी त्याने पश्चाताप केला. त्याला केवढे समाधान वाटले असेल जेव्हा करिंथकरांनी त्याला माफ केले व प्रीतीने परत आपणामध्ये सामावून घेतले.
पौलाचे शब्द आम्हाठायीच्या ख्रिश्चन सेवकपणाच्या आवडीत भर टाकून आमच्या खऱ्या विश्वासाविषयीच्या भूमिकेला अधिक दृढ करू शकतील. (२:१२–६:१०) जे नव्या कराराचे सेवक आहेत त्यांना तर देवाच्या अग्रेसरपणात “जयोस्तवाच्या” मिरवणूकीत सामील होण्याचा हक्क प्राप्त आहे. पौल व त्याचे सहकारी, यांच्यावर दया झाल्यामुळे ही बहुमोल सेवा त्यांना प्राप्त झाली. त्यांच्याप्रमाणे सध्याच्या काळातील अभिषिक्तांना “समेटाची सेवा” करण्याचे सोपविले आहे. अजून, यहोवाचे सर्व साक्षीदार त्यांच्या सेवकपणाद्वारे इतरांना संपन्न करीत आहेत.
पूर्ण स्वरुपाचे पावित्र्य व उदारपणा राखा
पौलाने हे स्पष्ट केले की, ख्रिस्ती सेवकांनी यहोवाचे भय बाळगून पूर्ण स्वरुपाचे पावित्र्य राखून असलेच पाहिजे. (६:११–७:१६) आम्हास जर विश्वासात खंबीरपणे टिकून रहावयाचे आहे तर अविश्वासू बरोबरील जुआखाली जखडले जाण्याचे निश्चये टाळावे; शिवाय आम्ही सर्व प्रकारच्या शारीरिक तसेच आध्यात्मिकतेस अशुद्ध करणाऱ्या सर्व गोष्टीपासून स्वतःला शुद्ध राखले पाहिजे. करिंथकरांनी अनैतिकतेचे स्वैराचरण करणाऱ्यास बहिष्कृत करून शुद्धतेची हालचाल केली. आणि त्याच्या पहिल्या पत्रामुळे त्यांना तारणदायी पश्चाताप उत्पन्न करण्यात, दुःखित बनवले तरी पौलास आनंद वाटला.
याशिवाय, आम्ही हेही शिकतो की, देवभिरू सेवकांना आपल्या उदारतेचे प्रतिफळ प्राप्त होते. (८:१–९:१५) गरजवंत “पवित्र जन” यांच्यासाठी साहाय्य निधि संग्रहीत करण्याबद्दल पौलाने मासेदोनियातील लोकांचे उदाहरण उल्लेखिले. ते त्यांच्या ऐपतीपलिकडे उदारता दाखवीत आणि करिंथकरांठायी तशा वृत्तीची उदारता असावी असे तो अपेक्षित होता. त्यांचे तसेच आमचेही देणे, हृदयापासूनचे असावे; कारण “संतोषाने देणारा देवाला आवडतो.” व तोच त्याच्या लोकांस सर्व प्रकारच्या उदारतेसाठी संपन्न करतो.
पौल—काळजी करणारा प्रेषित
आम्ही जेव्हा यहोवाच्या सेवेत काही कामे सिद्धीस नेऊ तेव्हा स्वतःची नव्हे तर त्याची प्रतिष्ठा मिरवू. (१०:१–१२:१३) काही असले तरी खोट्या शिकवणूकींना खोडून टाकण्यात आम्ही केवळ “देवाच्या दृष्टीने समर्थ” अशी जी आत्मिक शस्त्रसामग्री तिचाच उपयोग करू. करिंथमधील प्रतिष्ठा मिरविणारे “खोटे प्रेषित” ख्रिस्ताचा सेवक म्हणून पौलाने सहनशीलपणे जो विक्रम प्रस्थापित ठेवला त्याची बरोबरी कधीच करू शकणार नाही. तरी त्याचे फारच गौरव होऊ नये म्हणून देवाने त्याच्या “शरीरात एक काटा”—कदाचित दृष्टीतील मंदपणा किंवा ते खोटे प्रेषित—तसाचा राहू दिला. याऊलट, पौलाने आपल्याठायीच्या कमकुवत गुणाबद्दल, देहस्वभावाबद्दल जरी आढ्यता बाळगली, तरी “ख्रिस्ताची शक्ती” त्याजवर मंडपाप्रमाणे सदा राहील. मनुष्य प्रकृतीतील या नात्याने तो त्याच्या विश्वासात खंबीर राहिला व खोट्या प्रेषितांप्रमाणे त्याने कमी प्रतीचा ठरविले नाही. पौलाने करिंथकरांमध्ये जी “चिन्हे, अद्भुते व महत्कृत्ये . . . पूर्ण धीराने करून दाखविली होती,” त्यांच्याद्वारे त्याच्या प्रेषितपदाचे प्रमाण त्यांना पटले होते.
एक सेवक व प्रेषित असता पौलाठायी सोबतीच्या समविश्वासूंच्या आध्यात्मिकतेबद्दल काळजी होती, जी आम्हाठायीही असण्यास हवी. (१२:१४–१३:१४) तो मोठ्या आनंदाने ‘त्यांच्या जीवांसाठी पूर्णपणे खर्ची पडण्यास तयार होता.’ पण करिंथास परत गेल्यावर पौलाठायी हे भय होते की, तेथील काहींनी आपल्या दैहिक कृत्यांचा पस्तावा केलेला नाही. यास्तव, तो सर्वांना सल्ला देतो की ते विश्वासात होते का याबद्दल त्यांनी स्वतःचे परिक्षण करावे; आणि हेच इच्छित होता की, कोणी “काही वाईट करू नये.” शेवटी तो त्यांना पूर्ण व्हा, समाधान मिळवा व एकचित्त होऊन शांती व आनंदाने राहा अशी विनंती करतो. हा आम्हासाठीही केवढा उत्तम उपदेश आहे बरे!
परिक्षण करीत राहावे!
पौलाने करिंथमधील ख्रिश्चनांना लिहिलेले दुसरे पत्र या प्रकारांनी हे सूचित करते की, असे अनेक विविध मार्ग आहेत, ज्यांचेद्वारा आम्ही हे परिक्षण करीत राहावे की, आम्ही विश्वासात आहोत का. त्याच्या शब्दांनी आम्हास देखील इतरांचे साहाय्य करण्यास, जसे देव आमच्या सर्व संकटसमयी सांत्वन देतो तसे, उत्तेजन दिले पाहिजे. प्रेषिताने जे काही ख्रिस्ती सेवकपणाबद्दल म्हटले, ती विश्वासूपणे पार पाडीत असता सोबत यहोवाच्या भयाची संपूर्ण पवित्रता मिळवीत राहण्याचे उत्तेजन द्यावे.
पौलाचा उपदेश अनुसरणे हे कदाचित आम्हास अधिक उदार व साहाय्यक बनवील. तरी त्याचे शब्द आम्हाला आपली नव्हे तर यहोवाची आढ्यता बाळगून राहण्यास सांगते. त्यांनी आम्हाठायी समविश्वासूंवरील प्रीती, सहानुभूति वाढविण्यात अधिक उत्सुक करावे. खरेच हे सर्व व इतरही मुद्दे जे करिंथकरांच्या दुसऱ्या पत्रात आढळतात, ते आम्हा सर्वांचे ‘आम्ही विश्वासात आहोत किंवा नाही याविषयीचे परिक्षण करण्यात’ बहुमोल साहाय्य करतील.
[३० पानावरील चौकट/चित्रं]
यहोवाचे वैभव प्रवर्तित करीत राहा: मोशे सिनाय डोंगरावरून दगडी पाट्या घेऊन उतरला तेव्हा त्याच्या तोंडावरुन किरणे येत होती कारण देव त्याच्यासोबत बोलला होता. (निर्गम ३४:२९, ३०) पौलाने याचा उल्लेख करून म्हटलेः “आपल्या मुखावर आच्छादन नसलेले आपण सर्व जण आरशाप्रमाणे यहोवाचे वैभवाचे प्रतिबिंब पाडीत आहो, आणि यहोवा जो आत्मा त्याच्याद्वारे तेजस्वितेच्या परंपरेने आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहो.” (२ करिंथकर ३:७-१८) पूर्वी तांबे व कथिल या मिश्रधातुचे तसेच तांब्याचे आरशे असत; त्यांना खूप चकाकी आणीत की, ज्याकरवी प्रतिमा स्पष्ट दिसे. अभिषिक्त जन आरशाप्रमाणेच येशू ख्रिस्तापासून येणारे देवाचे वैभव प्रवर्तित करत आहेत; त्यांचे, यहोवाचे वैभव प्रवर्तित करणाऱ्या पुत्राद्वारे ‘प्रगतिशीलपणे त्या प्रतिमेत रुपांतर होत आहे.’ (२ करिंथकर ४:६; इफिसकर ५:१) पवित्र आत्मा व शास्त्रवचने याकरवी देव स्वतःच्या गुणांचे प्रतिबिंब म्हणजे “नवे व्यक्तीमत्व” त्यांजमध्ये निर्माण करतो. (इफिसकर ४:२४; कलस्सैकर ३:१०) आमची आशा स्वर्गीय असो किंवा पृथ्वीवरील असो, आपण हे व्यक्तीमत्व प्रदर्शित करू या आणि आपल्या सेवकपणात देवाचे वैभव प्रवर्तित करण्याचा हक्क जोपासत राहू या.
[३१ पानावरील चौकट/चित्रं]
“नीतीमत्वाची शस्त्रे”: पौल व त्याचे सहकारी आपली देवाचे सेवक अशी ओळख “उजव्या व डाव्या हातातील नीतीमत्वाच्या शस्त्रास्त्रांनी” करून देत होते. (२ करिंथकर ६:३-७) उजवा हात तरवार चालविण्यास तर डावा हात ढाल धरण्यास उपयोगात आणीत. सर्व बाजूंनी हल्ले होत होते तरी पौल व त्याचे सहकारी आध्यात्मिक युद्ध लढण्यास सुसज्ज होते. करिंथमधील मंडळी ख्रिस्ताकडील सरळपणापासून बहकू नये यासाठी हे युद्ध त्यांना खोटे शिक्षक तसेच “खोटे प्रेषित” यांच्याविरुद्ध लढावे लागले. पौलाने कधीही कुटिलता, फसवेगिरी किंवा ठकविणे या दैहिक पापाच्या शस्त्रांचा आश्रय घेतला नाही. (२ करिंथकर १०:८-१०; ११:३, १२-१४; १२:११, १६) याउलट, खऱ्या भक्तीचे संरक्षण करण्यासाठी नेटाने लढा द्यावा म्हणून जी “शस्त्रे” त्यांनी उपयोगात आणली ती नीतीमत्वाची किंवा न्यायाची होती. यहोवाचे साक्षीदार आज याच उद्देशासाठी “नीतीमत्वाची शस्त्रे” उपयोगात आणीत आहेत.