व्हॅटिकन कोडेक्सचे रहस्य
कोडेक्स व्हॅटिकन १२०९ हे व्हॅटिकन येथील ग्रंथालयाच्या यादीत पहिल्या नंबरावर आहे. ते १४७५ व्या वर्षी तयार झाले. ते तेथे कसे आले याविषयी कोणालाही ज्ञात नाही. ते त्या तीन महान ग्रीक कोडीक्सपैकी आहेत जी आजपर्यंत बचावून आहेत. चवथ्या शतकातील सायनाटीकस् व पाचव्या शतकाच्या सुरवातीस असलेले अलेक्झांड्रियन ही ती दुसरी दोन कोडेक्स होत.
या व्हॅटिकन हस्तलिखाणाचे महत्त्व जरी सर्वपरिचित असले तरी १६व्या शतकात फारच थोड्या प्रामाण्यांना त्याच्या परिक्षणाची परवानगी मिळाली होती. व्हॅटिकन ग्रंथालयाने १६६९ मध्ये त्याची निरनिराळी मुद्रणे संग्रहीत केली होती, तरी ती पुढे हरवली आणि १८१९ पर्यंत परत मिळाली नव्हती.
फ्रान्सचे सम्राट नेपोलियन याने १८०९ मध्ये रोम काबीज केले व हे बहुमोल हस्तलिखित आपणासोबत पॅरिसला नेले. या ठिकाणी लेहार्ड ह्युज हे एक नामांकित कोशकार होते; त्यांच्याकरवी ते तपासले गेले. पुढे नेपोलियनचे पतन झाल्यावर ते १८१५ मध्ये परत व्हॅटिकनला आणले गेले. पुढील ७५ वर्षे ते परत एकदा रहस्यमय वस्तु बनले होते; ते व्हॅटिकनने लपवून ठेवले होते.
कॉन्स्टंटाईन व्हॉन टीचीनड्रॉफ या जागतिक किर्तीच्या कोशकारांना, कित्येक महिने वाट पाहिल्यानंतर सरतेशेवटी १८४३ मध्ये केवळ सहा तासांसाठी हे हस्तलिखित तपासण्याची परवानगी मिळाली. दोन वर्षांनंतर इंग्लंडचे प्रामाण्य डॉ. एस. पी. ट्रेजलेस यांना अभ्यासासाठी नव्हे तर फक्त ते पाहण्याची परवानगी मिळाली. त्यांनी म्हटले: “हे खरे की मी वेळोवेळी हस्तलिखिते पाहिली; पण त्यांनी मला त्यांचा उपयोग करण्याची परवानगी दिली नाही. माझे सर्व खिसे तपासल्याविना ते मला उघडू देत नव्हते; मला सोबत पेन, शाई व कागद बाळगण्याची परवानगी नव्हती. शिवाय मी ते हस्तलिखित पाहात असता दोन प्रिलॅटी [पाळक] मजसोबत सतत लॅटिन भाषेत बोलत असत; आणि एखादा उतार न्याहाळून पाहू लागलो तर ते लगेच माझ्या हातून ते पुस्तक हिरावून घेत.”
रोमन कॅथोलिक चर्च आपणाजवळील हा अमोल ठेवा जगाला दाखविण्यास एवढे नाखूष का होते?
का लपविले?
रोमन कॅथोलिक चर्चसाठी पवित्र शास्त्रवचनांची लॅटिन व्हलगेट आवृत्ती “अप्रतिम असा स्वीकृत सल्ला” राहिला आहे. पायस बारावे यांच्या डिव्हिनो ॲफलांटे स्पिरीच्यु या १९४३ मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, जेरोम यांचे हे चवथ्या शतकातील लॅटिन भाषांतर “विश्वास व नैतिकता या दृष्टीने कसलीही चूक नसणारे” याप्रकारे पाहिले जात होते. पण ज्यापासून व्हलगेटचे भाषांतर झाले त्या इब्री व ग्रीक वचनाबाबत काय? धर्मकोश म्हणतो की, यांचे मोल व्हलगेटच्या अधिकाराच्या बरोबरीचे आहे. यास्तव, कोणतेही ग्रीक लिखाण असो, मग ते व्हॅटिकन कोडेक्स का असेना, त्यांना लॅटिन व्हलगेटप्रमाणे अधिकृत असे कधीच मानण्यात आले नाही. रोमन कॅथोलिक चर्चने घेतलेल्या या भूमिकेमुळे पुष्कळशा समस्या उद्भवल्या.
उदाहरणार्थ, १६ व्या शतकातील कोशकार ईरॅसमस यांनी त्यांचा “नवा करार” ग्रीक भाषेपासून तयार केला तेव्हा त्यांनी व्हॅटिकन कोडेक्सच्या अधिकाऱ्यांना विनविले की, त्यांनी १ ले योहान अध्याय ५ व वचने ७ व ८ यातील खोटे शब्द काढून टाकावेत. ईरॉमसचे म्हणणे बरोबर होते; तरीपण १८७९ पर्यंत पोप लिओ तेरावे यांनी व्हलगेटमधील ते भ्रष्टावलेले लॅटिन शास्त्रातील वचन उंचावून धरले. शेवटी जी आधुनिक रोमन कॅथोलिक भाषांतरे मुद्रित झाली त्यात ही वचनीय चूक कबूल करण्यात आली.
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा जगास कोडेक्स सायनाटीकस् प्रकाशित करण्यात आले तेव्हा रोमन कॅथोलिक अधिकार मंडळीस हे स्पष्ट कळून आले की, त्यांचे कोडेक्स व्हॅटिकन मागे पडण्याच्या धोक्यात आहे. त्यामुळे शतक संपताच उत्तम फोटी कॉपी शेवटी लोकांस उपलब्ध कराव्या लागल्या.
या हस्तलिखान प्रतीत एकूण ७५९ पाने आहेत. यामधून उत्पत्तीचा बहूतेक भाग, स्तोत्रे, आणि ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचे शेवटचे भाग गहाळ झाले आहेत. ते अगदी पातळ व सुरेख चर्मपत्रावर लिहिलेले आहे. ते हरणाच्या उत्तम कातडीपासून अगदी साध्या पण कुशल हातांनी बनविले आहे. त्याचा अधिकृत किताब कोडेक्स ब असा आहे. ते आज व्हॅटिकन ग्रंथालयात पहावयास मिळते. आता ते गुप्त नाही व त्याचे मोल आता जाणले व सबंध जगभर त्याची आवड निर्माण झालेली आहे.
[२९ पानांवरील चित्र]
This Picture is missing marathi file.
[Credit Line]
Facsimile from Codices E Vaticanis Selecti