यहोवाचे आवेशी साक्षीदार कूच करीत आहेत!
यहोवाचे पहिल्या शतकातील साक्षीदार जेवढे निर्भिड तेवढेच कृतीत आवेशी होते. “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा,” हे येशूने दिलेले काम ते अति तन्मयतेने करीत.—मत्तय २८:१९, २०.
तथापि, ख्रिस्ताच्या आरंभीच्या अनुयायांनी ही आज्ञा गंभीरतेने लक्षात घेतली होती हे आपल्याला कसे कळू शकते? पवित्र शास्त्रातील प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक हे सिद्ध करते की, ते यहोवाचे आवेशी साक्षीदार होते व शिवाय ते खरोखरीच कूच करीत होते!
फायदे व इतर गोष्टी
शुभवर्तमानाचे तिसरे पुस्तक व प्रेषितांची कृत्ये यांची भाषा व लिखाणशैली एकाच लेखकाकडे अंगुली दर्शवितात—लूक, जो “प्रिय वैद्य” होता. (कलस्सैकर ४:१४) प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात जी संभाषणे व प्रार्थना संग्रहीत आहेत त्या अतुल्य आहेत. पुस्तकातील सुमारे २० टक्के भागात, खऱ्या विश्वासाचे समर्थनात पेत्र व पौलाच्या भाषणांची नोंद आहे.
प्रे. कृत्ये हे पुस्तक इ. स. ६१ च्या सुमाराम रोममध्ये लिहिण्यात आले. यावरुन हे दिसते की, याच कारणास्तव, त्यात पौलाचे कैसरासमोर उभे राहणे तसेच इ. स. ६४ मध्ये निरोने ख्रिश्चनांचा जो अमानुष छळ केला त्याचा उल्लेख नाही.—२ तीमथ्य ४:११.
लूकच्या शुभवर्तमानाप्रमाणेच प्रे. कृत्ये हेही थिऑफिलसकरता लिहिले. त्याचे लिखाण, विश्वासास खंबीर आधार देण्यास व ख्रिस्ती धर्माचा प्रचार अहवाल देण्याकरता केलेले आहे. (लूक १:१-४; प्रे. कृत्ये १:१, २) यहोवाचा हात त्याच्या निष्ठावंत सेवकांसोबत होता हे या पुस्तकात सिद्ध केले आहे. त्यात आम्हास त्याच्या आत्म्याच्या बलाची जाणीव करून दिलेली आहे. तसेच ते ईश्वरप्रेरित भविष्यवादावरील आमच्या आत्मविश्वासास बळ देते. याशिवाय, छळातही टिकून राहण्यात, यहोवाचे स्वत्यागी साक्षीदार राहण्यात मदत पुरविते व त्यासोबत राज्यावरील आमच्या आशेची उभारणी करते.
ऐतिहासिक अचूकता
पौलाचा सोबती होता म्हणून लूक त्यांच्या यात्रेचे टिपण करू शकला. याशिवाय, त्याने प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेल्या साक्षीबाबतही बोलणी केली. या सर्व गोष्टींनी आणि सत्य ते काय असेल याच्या संशोधनाने त्याच्या लिखाणास ऐतिहासिक अचूकतेच्या दृष्टीकोनात उत्कृष्ट साहित्य ठरविले.
याच कारणास्तव विल्यम रामसे हे प्रामाण्य असे म्हणू शकलेः “लूक हा अगदी पहिल्या स्थानाचा इतिहासकार होता; ते केवळ त्याचे लिखाण विश्वासाहार्य आहे म्हणून नव्हे तर, त्यात खरा ऐतिहासिक अर्थ भरलेला आहे, . . . यास्तव या लेखकाला जगातील सर्वथोर इतिहासकारात स्थान असावे.”
पेत्र—विश्वासू साक्षीदार
सुवार्ता प्रचार करण्याचे हे देवाने सोपविलेले काम केवळ यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या शक्तीनेच चालत आहे. यास्तव जेव्हा येशूच्या शिष्यांवर पवित्र आत्मा आला, तेथून पुढे ते, यरुशलेम, यहूदीया व शोमरोन तसेच “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” त्याचे साक्षी झाले. इ. स. ३३ मधील पेंटेंकॉस्टचे दिवशी त्यांजवर पवित्र आत्मा आला. ती सकाळची ९ची वेळ होती. मग हे नक्की की, जसे काही समजतात तसे ते दारू पिऊन झिंगलेले नव्हते. पेत्राने रोमांचक साक्ष दिली आणि ३,००० लोकांनी बाप्तिस्मा घेतला. धर्मविरोधक राज्य घोषकांना शांत करण्याचे अनेक प्रयत्न करतात पण, त्यांच्या प्रार्थनांच्या उत्तरात देव त्याच्या साक्षीदारांना त्याचे वचन साहसाने बोलण्याचे धैर्य देतो. तरीही परत धमकी दिली असता, ते उत्तर देतातः “आम्ही (अधिपति म्हणून) मनुष्यापेक्षा देवाला (अधिक) मानले पाहिजे.” ते त्यांचे घरोघरी जाऊन प्रचार कार्य करण्याचे चालू ठेवतात व ते काम तसेच पुढे चालत राहते.—१:१–५:४२.
यहोवाच्या आत्म्यावर विश्वस्त राहिल्याने त्याचे साक्षीदार छळातही टिकू शकतात. असेच, साक्ष देत राहिल्यामुळे स्तेफनला धोंडमार करून ठार करण्यात आले. येशूचे शिष्य पांगतात. पण हे वचनाच्या फैलावार्थ घडते. सुवार्तिक फिलिप्प शमरोनात पायनियरिंग करतो. अद्भूतरित्या, तार्ससच्या शौलाचे परिवर्तन घडते. आता प्रेषित पौल म्हणून, त्याला दिमिष्कमध्ये छळाला तोंड द्यावे लागते. एवढेच काय पण, यहुद्यांच्या खुनी कटापासूनही बचावतो. पौल येऊन, यरुशलेमातील इतर प्रेषितास थोड्या काळासाठी भेटतो. मग पुढे त्याच्या सेवकपणास सुरवात होते.—६:१–९:३१.
जसे प्रे. कृत्ये पुढे दाखविते की, यहोवाचा हात त्याच्या सेवकांच्या संगतीत होता. पेत्र दुर्कसला (टबीथा) मरणातून उठवितो. एका हाकेस होकार देऊन तो कैसरियातील कर्नेल्य, त्याचे कुटुंबिय व मित्र परिवारास सुवार्ता सांगतो. येशूच्या शिष्यांपैकी पहिले विदेशी शिष्य बनण्यात ते बाप्तिस्मा घेतात. यासोबत “सत्तर सप्तके” काळाची पूर्णता होते व आम्ही इ. स. ३६ मध्ये पोहंचतो. (दानीएल ९:२४) त्यानंतर लवकरच हेरोद अग्रिप्पा पहिला याकोबाची कत्तल करतो आणि पेत्रास अटक होते. पण प्रेषितास, कैदखान्यातून दिव्यदूतांनी सोडवणूक केल्याचा अनुभव येतो आणि ‘यहोवाच्या वचनाची वृद्धी व प्रसार होत राहतो.—९:३२–१२:२५.
पौलाच्या तीन मिशनरी यात्रा
देवाच्या सेवेत पौलाप्रमाणे जे स्वतःस कामी लावतात अशांवर यहोवाच्या आशीर्वादांची वृष्टी होते. त्याच्या पहिल्या यात्रेची सुरवात अंत्युखियातून होते. कूप्र बेटावर, सिर्ग्य पौल हा अधिकारी व इतर अनेक विश्वासू बनतात. पंफुलियातील पिर्गा येथे योहान मार्क त्याला सोडून यरुशलेमास माघारे जातो; पण पौल आणि बर्णबा हे तसेच पुढे पिसिदियातील अंत्युखियास पोहंचतात. लुस्रात यहुदी छळास चेतवितात. जरी दगडमार केल्यावर, मेला असे समजून सोडून गेले, तरी पौल त्यातून बरा होऊन आपल्या सेवकपणास परत सुरवात करतो. शेवटी तो व बर्णबा सिरियातील अंत्युखियात परततात व यासोबतच पहिली यात्रा संपते.—१३:१–१४:२८.
पहिल्या शतकातील बरोबर जुळणाऱ्या मंडळीसमान आजची नियमन मंडळीही पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने अनेक प्रश्नांचे निकाल लावते. सुंतेसारखा विषय जरी “अगत्याच्या गोष्टी” सारखी राहिलेली नाही तरी “मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्त, गुदमरुन मेलेले प्राणी व जारकर्म” या आजही अगत्याच्या गोष्टी आहेत. (१५:२८, २९) पौल व बर्णबा आपल्या दुसऱ्या यात्रेस सुरवात करताच तीमथ्य त्यांना येऊन मिळतो. मासेदोनियातील हाक ऐकताच तत्काळ तेथे जाण्याची हालचाल केली जाते. फिलिप्पैमध्ये साक्षीकार्यामुळे आरडाओरडा व कैदेत पडावे लागते. पण भूकंपामुळे पौल व बर्णबा यांची सुटका घडते व ते बंदिशाळेचा नायक व त्याचे कुटुंबियांना उपदेश करतात व हे विश्वासू बनतात.—१५:१–१६:४०.
यहोवाच्या सेवकांनी त्याच्या वचनाचे परिश्रमपूर्वक विद्यार्थी असावे. शास्त्रवचनात शोध करणारे बिरूयाचे लोक व स्वतः पौलही तसाच होता. अथेन्समधील अरीयपग येथे धर्मसभेपुढे तो यहोवाच्या सृष्टीकृत्यांबद्दल साक्ष देतो व तेथे काही विश्वासू बनतात. करिंथमध्ये तर एवढा विश्वास आढळतो की तो तेथे १८ महिने राहतो. येथे राहून तो थेस्सलनीकाकरांना पहिले व दुसरे पत्र लिहितो. सीला व तीमथ्य यांचा निरोप घेऊन पौल पुढे समुद्रमार्गे इफिसमध्ये जातो. तेथून तो तारवात बसून कैसरीयास जातो व तसाच पुढे यरुशलेमास पोहंचतो. तो सिरियातील अंत्युखियात परततो तेव्हा त्याची दुसरी मिशनरी यात्रा संपते.—१७:१–१८:२२.
पौलाने दाखवून दिल्याप्रमाणे, घरोघरचे साक्षीकार्य हे ख्रिश्चन सेवकपणातील महत्त्वाचा भाग आहे. प्रेषिताची तिसरी यात्रा (इ. स. ५२-५६ दरम्यान) त्याच्या दुसऱ्या फेरीचा परत मागोवा आहे. पौलाचे सेवकपण इफिसमधील विरोधास चेतविते; येथूनच तो करिंथकरांना पहिले पत्र लिहितो. करिंथकरांना दुसरे पत्र तो मासेदोनियातून लिहितो, आणि करिंथमध्ये असताना तो रोमकरांस पत्र लिहितो. मिलेतमध्ये पौल इफिसच्या वडीलवर्गाची भेट घेतो व त्याने कशाप्रकारे जाहीरपणे व घरोघर जाऊन शिकवण दिली याची आठवण करून देतो. परत यरुशलेमास परतल्यावर त्याची तिसरी यात्रा संपते.—१८:२३–२१:१४.
छळ निष्फळ ठरतो
छळ यहोवाच्या विश्वासू सेवकांच्या ओठांना मोहर लावू शकत नाही. यामुळेच यरुशलेमातील मंदिरात जेव्हा पौलाविरुद्ध दंगल उसळते तेव्हा तो मोठ्या धैर्याने दंगलखोरांना साक्ष देतो. त्याला कैसरियातील सुभेदार फेलिक्सकडे लष्कराच्या कडेकोटे बंदोबस्तात पाठविण्यात आल्यामुळे त्याचा वध करण्याचा कट निष्फळ ठरतो. फेलिक्सला आमिष मिळण्याची आशा जडते व यासाठी तो पौलाला दोन वर्षे कैदेत ठेवतो, पण त्याला शेवटपर्यंत काही मिळत नाही. त्याचा वारस, फेस्त पौलाने कैसराला केलेले अपील ऐकतो. तथापि, रोमला जाण्याआधी प्रेषित अग्रिपा राजासमोर जोरदार समर्थन करतो.—२१:१५–२६:३२.
यहोवाचे सेवक येणाऱ्या सर्व परिक्षात आपले धैर्य खचू न देता प्रचारकार्य नेटाने पुढे चालू ठेवतात. हे पौलाच्या बाबतीत तर अगदीच खरे होते. त्याने कैसराकडे अपील केलेले असल्यामुळे प्रेषित लूकसोबत इ. स. ५८ मध्ये रोमला जाण्यास निघतो. लुसिया येथे मुर्या बंदरात ते आपले तारु बदलतात. त्यांचे तारु फुटते व ते मिलित बेटावर कसेबसे पोहंचतात. नंतर ते दुसऱ्या तारवाने इटलीला जातात. रोममध्ये लष्कराचे पहाऱ्यात असता पौल लोकांना भेटण्यास बोलवतो व त्यांना सुवार्ता गाजवितो. या बंदीकाळात तो इफिसकरांना, फिलिप्पैकरांना, कलस्सैकरांना, फिलेमोन व इब्रीयांस पत्रे लिहितो.—२७:१—२८:३१.
सतत कूच करीत राहणारे
प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक प्रमाणांनी सिद्ध करते की, देवाच्या पुत्राने ज्या कार्याची सुरवात केली तेच पहिल्या शतकातील यहोवाच्या विश्वासू साक्षीदारांकरवी नेटाने पुढे चालविण्यात आले. होय, देवाच्या पवित्र आत्म्याच्या शक्तीने त्यांनी चोहोकडे मोठ्या आवेशाने साक्ष दिली.
येशूचे सुरवातीचे शिष्य प्रार्थनापूर्वक देवावर विसंबून राहिल्यामुळे त्याचे साहाय्य त्यांच्याबरोबर होते. याप्रकारे हजारो विश्वासू बनले आणि “सुवार्ता . . . आकाशाखालच्या सर्व सृष्टीत” घोषित करण्यात आली. (कलस्सैकर १:२३) खरोखरी, तेव्हाही व आताही खऱ्या ख्रिश्चनांनी हे सिद्ध केले आहे की, ते सतत कूच करीत असलेले यहोवाचे आवेशी साक्षीदार आहेत.
[३० पानावरील चौकट/चित्र]
शतपती कर्नेल्यः कर्नेल्य हा एक लष्करी अधिकारी, किंवा शतपती होता. (१०:१) शतपतींची वार्षिक अमदानी, साध्या शिपायांच्या पाचपट अधिक किंवा १,२०० दीनार किंवा अधिक असावयाची. निवृत्त झाल्यावर त्याला धन किंवा जमीन रुपाने अनुदान मिळे. त्याचा लष्करी पोषाख दिमाखदार असे. रुप्याच्या शिरस्राणापासून ते किल्टसमान जो अंगरखा असे; वर लोकरीचा लांब कोट, व नक्षीकाम केलेले हातापायावरील कवच. शतपतीच्या देखरेखीत १०० मनुष्ये असत पण काही वेळी कमी किंवा ८० असत. या “इटलीच्या पलटणी”त जी भरती होई ती, ज्यांना इटली देशातून मोकळीक मिळाली असेल व जो रोमी नागरिकत्व प्राप्त केलेला असेल अशांनाचा पलटणीत भरती करत.
[३० पानावरील चौकट/चित्र]
धाब्यावरील प्रार्थनाः पेत्र जेव्हा धाब्यावर जाऊन प्रार्थना करीत होता तेव्हा तो कोणत्याही प्रकारचा दिखाऊपणा करीत नव्हता. (१०:९) सपाट छपराच्या काहीशा कडेला असलेल्या छोट्याशा भिंतीमुळे कदाचित तो दृष्टीआड झाला असेल. (अनुवाद २२:८) तसेच, ही सपाट छप्परे संध्याकाळच्या वेळी निवांतपणे, व रस्त्यावरील गजबजीपासून आराम करण्यास चांगले स्थळ असे.
[३० पानावरील चौकट]
देव मानवरुपात अवतरले अशी समजः पौलाने लुस्राच्या रहिवाश्यांपैकी एका पायाने अधू असणाऱ्या मनुष्यास बरे केले तर त्यांना वाटले की, देव मनुष्यांच्या रुपाने अवतरले. (१४:८-१८) झेयस हा ग्रीक लोकांचे प्रमुख दैवत होता व त्या नगरात त्याचे मोठे मंदिर होते, आणि त्याचा पुत्र हर्मस, ज्याला देवांकडील निरोप्या समजत, तो त्याच्या सुरेख वक्तृत्वाबद्दल प्रसिद्ध होता. पौलाने बोलण्यात पुढाकार घेतला होता म्हणून लोकांना वाटले की तो कदाचित हर्मस असावा; म्हणून बर्णबा झेयस आहे. त्यांच्यामध्ये ही प्रथा होती की, या खोट्या दैवतांच्या मूर्तींना फुलांच्या माळांनी व सायप्रस किंवा पाईन वृक्षांच्या पानांनी सजवावे. पण अशा मूर्तीपूजक प्रकारातल्या प्रथांना पौल व बर्णबा यांनी तत्काळ धिक्कारले.
[३० पानावरील चौकट/चित्र]
बंदिशाळेचा नायक विश्वास ठेवतोः जेव्हा एका मोठ्या भूमिकंपामुळे बंदिशाळेचे सर्व दरवाजे उघडले, आतील सर्वांचे बंद सुटले, तेव्हा त्याचा फिलिपियन नायक आपला घात करणार होता. (१६:२५-२७) ते का बरे? कारण रोमचा कायदेशीर हुकुमनामाच असा होता की, पळून गेलेल्यांचा शासनदंड नायकाने भरून द्यावा. काही कैद्यांना हालहाल करून मारावे लागत असे, तसे आपल्या बाबतीत घडून येण्यापेक्षा आत्महत्त्या करणे बरे, असेच या नायकाला वाटले असावे. तथापि, त्याने सुवार्तेचा स्विकार केला व “त्याने व त्याच्या सर्वांनी बाप्तिस्मा घेतला.”—१६:२८-३४.
[३१ पानावरील चौकट/चित्र]
कैसराकडे केलेले अपीलः जन्मतयः एक रोमी नागरिक असल्याने कैसराकडे अपील करण्याचा व रोममध्ये चौकशी चालविण्याचा पौलास हक्क होता. (२५:१०-१२) रोमी नागरिकास चौकशीविना बांधणे, फटके मारणे किंवा शिक्षा देणे करता येत नव्हते.—१६:३५-४०; २२:२२-२९; २६:३२.
[चित्राचे श्रेय]
Musei Capitolini, Roma
[३१ पानावरील चौकट/चित्र]
अर्तमीच्या मंदिराचे रक्षकः पौलाच्या उपदेशामुळे अस्वस्थ होऊन देमेत्रिय नावाच्या सोनाराने नगरात दंगल चेतविली. पण नगरच्या शिरस्तेदाराने लोकांस शांत करून पांगविले. (१९:२३-४१) तो सोनार मंदिराच्या अत्यंत पवित्र स्थानाचे छोटे छोटे देव्हारे बनवीत असे, जेथे सुपीकतेचे प्रतिरुप दर्शविणारी अनेक स्तन असणारी अर्तमी देवीची मूर्ती बसविलेली असे. तिच्या मंदिराचे ने·ऑ·कोʹरॉस किंवा ‘मंदिर रक्षक’ पदाचा बहुमान मिळावा यासाठी नगरानगरात स्पर्धा चालत असे.
[३१ पानावरील चौकट/चित्र]
समुद्रावरील संकटेः पौलास नेणाऱ्या तारवास, जेव्हा युरकोलन नामे तुफानी वाऱ्याचा तडाखा बसला तेव्हा ‘मोठा प्रयास करुन देखील ती होडी ताब्यात ठेविणे शक्य होईना.’ (२७:१५, १६) तारु हे एक छोटी होडी समान, मोठ्या जहाजामागून जाणाऱ्या असतात. जहाजावर भक्कम दोरखंड जमा ठेवतात, ज्याने तुफान उठताच जहाजाच्या मुख्य भागाला खालून आवळून बांधतात. (२७:१७) या खलाशांनी चार नांगर खाली सोडले व सुकाणुची बंधने ढिली केली आणि तारु वल्हवण्यास सुरवात केली. (२७:२९, ४०) अलेक्झांड्रियाच्या जहाजावर “झेयस पुत्र”—कॅस्टर व पोलक्स—यांच्या शिरांची चित्रे बसविली होती व हे खलाशांचे संरक्षक आहेत असे मानले जाई.—२८:११.