वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w90 १०/१ पृ. ८
  • वाढदिवसाच्या मेजवानीत खून

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वाढदिवसाच्या मेजवानीत खून
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • मिळती जुळती माहिती
  • वाढदिवसाच्या मेजवानीत खून
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
w90 १०/१ पृ. ८

येशूचे जीवन व उपाध्यपण

वाढदिवसाच्या मेजवानीत खून

शिष्यांना सूचना दिल्यावर येशू त्यांना क्षेत्रावर जोडीजोडीने पाठवितो. कदाचित पेत्र व आंद्रिया हे दोघे भाऊ, याकोब व योहान, फिलिप्प व बर्थलमय, थोमा व मत्तय, याकोब व तद्दय, आणि शिमोन व यहुदा इस्कर्योत हे एकत्र गेले असावेत. या सुवार्तिकांच्या सहा जोड्या जेथे जेथे जातात तेथे ते राज्याची सुवार्ता सांगतात व अद्‌भूतरित्या रोगनिवारण करतात.

या दरम्यान बाप्तिस्मा करणारा योहान हा अजूनही तुरुंगात असतो. तो तेथे जवळजवळ दोन वर्षे आहे. तुम्हाला आठवत असेलच की या योहानाने, हेरोद अंतिपाविषयी जाहीरपणे हे म्हटले होते की, त्याने आपला भाऊ फिलिप्प याची बायको हेरोदिया हिला आपली बायको म्हणून ठेवणे योग्य नाही. हेरोद अंतिपा मोशाचे नियमशास्त्राचे पालन करीत असल्याचा दावा करीत होता, त्यामुळे योहानाने त्याचे हे जारत्वाचे संबंध उचितपणे उघड केले होते. या कारणामुळे हेरोदाने योहानास बहुधा हेरोदियाच्या अट्टाहासामुळे कैदेत टाकले होते.

योहान हा धार्मिक माणूस आहे हे हेरोद अंतिपाला ठाऊक आहे, त्यामुळे तो त्याचे म्हणणे मोठ्या उत्सुकतेने ऐकत असतो. त्यामुळे त्याचे काय करावे हे त्याला समजत नाही. पण हेरोदिया ही मात्र योहानाचा द्वेष करीत असते व त्याला कसे ठार मारता येईल याची संधि हेरीत असते. सरतेशेवटी, तिने वाट बघितलेली संधि येते.

इ. स. ३२ च्या वल्हांडणाच्या आधीच हेरोद आपल्या वाढदिवसाप्रीत्यर्थ मोठी मेजवानी देतो. या मेजवानीस हेरोदाचे उच्च दर्जाचे अधिकारी, लष्करी अधिकारी तसेच गालीलातील प्रतिष्ठित नागरिक एकत्र झालेले आहेत. संध्याकाळ होते तेव्हा हेरोदियाचा आधीचा पती फिलिप्प याची तरुण मुलगी सलोमी हिला पाहुण्यांपुढे नाच करावयास पाठवण्यात येते. पुरुष वर्ग तिच्या नाचामुळे खूप खूष होतो, कारण तो खूपच चित्तवेधक होतो.

हेरोद देखील सलोमीवर खूष झाला आहे. “तुला जे पाहिजे ते माझ्याकडे माग, म्हणजे मी ते तुला देईन,” असे तो घोषित करतो. तो अशीही शपथ देतोः “माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू माझ्याजवळ मागशील ते मी तुला देईन.”

उत्तर देण्याआधी ती आपल्या आईकडे जाऊन विचारणा करते. “मी काय मागू?” असे ती विचारते.

आईने नामी संधि हेरली! “बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाचे शीर.” असे हेरोदिया तडकपणे म्हणते.

लगेच सलोमी हेरोदकडे येते व विनंती करतेः “माझी अशी इच्छा आहे की, बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाचे शीर तबकात घालून आताच्या आता मला द्यावे.”

हेरोदाला खूप दुःख होते. तरीही पाहुण्यांपुढे शपथ वदविली असल्याकारणामुळे ती विनंती अमान्य करण्याचे त्याचे धाडस होत नाही. याचा अर्थ एका निष्पाप माणसाचा खून झाला पाहिजे. एका हत्या करणाऱ्‍याला लगेच त्याच्या पाजळलेल्या हत्यारानिशी तरुंगाकडे पाठविले जाते. काही वेळातच तो योहानाचे शीर एका तबकात घेऊन येतो व ते सलोमीला देतो. ती ते तिच्या आईला देते. जे घडले ते योहानाच्या शिष्यांना कळाल्यावर ते येऊन योहानाचे शरीर घेतात व दफन करतात. नंतर हा वृत्तांत ते येशूला कळवतात.

काही काळाने हेरोद जेव्हा येशू लोकांचे रोग बरे करीत आहे व त्यांच्यामध्नू दुरात्म्यांना काढीत आहे असे ऐकतो तेव्हा तो खूपच घाबरतो. त्याला वाटते की, येशू हा मृतातून उठलेला योहान आहे. तेव्हापासून पुढे तो येशूला पाहण्यास उत्कंठित असतो, त्याचा उपदेश ऐकावा म्हणून नव्हे तर आपणाठायी असणारे भय साधार आहे की नाही हे पडताळता यावे म्हणून. मत्तय १०:१-५; ११:१; १४:१-१२; मार्क ६:१४-२९; लूक ९:७-९.

◆ योहान का कैदेत आहे, व हेरोद त्याला मारण्याची का इच्छा करीत नाही?

◆ हेरोदिया सरतेशेवटी योहानास कशी ठार करते?

◆ योहानाच्या मृत्युनंतर हेरोद येशूला पाहण्याची इच्छा का करतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा