शास्त्रवचनातील धडेः जखर्या १:१-१४:२१
यहोवा आपल्या लोकांच्या आत्म्यास चेतवितो
इ.स. पू. ५३८ च्या शेवटास किंवा इ. स. पू. ५३७ च्या सुरवातीस पारसाचा राजा कोरेश याने यहुदी लोकांनी बाबेलमधून यरुशलेमास परत जाऊन तेथे ‘यहोवाच्या मंदिराची पुर्नउभारणी’ करावी असा जाहीरनामा काढला. (एज्रा १:३) तरीपण इ. स. पू. ५२० पर्यंत मंदिराची पुर्नउभारणी झाली नव्हती. यास्तव लोकांच्या आत्म्यास चेतविण्यासाठी यहोवाने हाग्गय संदेष्ट्यासोबत जखऱ्या संदेष्ट्याला सामोरे आणले.
जखऱ्याच्या प्रेरित शब्दांनी लोकांना याचे आश्वासन दिले की यहोवा त्यांच्या पाठीशी आहे व तो त्यांचे कार्य आशीर्वादित करील. यामुळे यहुदी लोकात नवीन जोम भरला. हे पवित्र शास्त्र पुस्तक आम्हाला देखील जोम भरविते ते या अर्थी की, यात मसीहाविषयीचे भविष्यवाद तसेच आमच्या दिवसात पूर्ण होत असलेले भविष्यवाद सामावून आहे.a ते आम्हालाही महत्त्वपूर्ण धडे शिकविते.
यहोवा आपल्या लोकांना आशीर्वादित करतो
यहोवाला आपल्या लोकांची काळजी आहे. देवाने दिलेले शासन न्यायी होते हे यहुद्यांनी कबूल केल्यानंतर जखऱ्यास तीन दृष्टांत होतात जे हे दाखवितात की यहोवाला आपल्या लोकांची काळजी आहे. पहिल्या दृष्टांतात तो दिव्यदूतीय स्वारांना पाहतो. पहिल्या दूताला याची उद्विग्नता वाटते की, ज्या राष्ट्रांनी यहुद्यांवर विपत्ती आणली ते ‘स्वस्थ आहेत.’ दुसऱ्या दृष्टांतात यहोवा, आपल्या लोकांना पांगविणाऱ्या राजकीय सत्ताधिशांना—“चार शिंगांना” फेकून देण्याचे ठरवितो. तिसरा दृष्टांत यहोवाची यरुशलेम बाबतची चिंता व संरक्षणमय काळजी याचे विविध रुपात वर्णन करतो.—१:१-२:१३.
कोणीही देवाच्या विश्वासू सेवकांना अडथळा करु शकणार नाही. चौथ्या दृष्टांतात, यहोवाच्या लोकांचा मुख्य विरोधक सैतान यास कडकपणे दोष दिला आहे. (प्रकटीकरण १२:१० पडताळा.) पाचव्या दृष्टांतात जखऱ्याला कळते की, यहोवाचे लोक पर्वतासमान अडखळणे आली तरी त्याची इच्छा पूर्ण करतील. ती कशी? “‘लष्करी बलाने किंवा पराक्रमाने नव्हे तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल’ असे सेनाधीश यहोवा म्हणतो.”—३:१-४:१४.
देवाचे सेवक “वाईटाचा द्वेष” करतात. (स्तोत्रसंहिता ९७:१०, ११) सहाव्या दृष्टांतात, देव ज्यांना बराच काळ शिक्षा झाली नाही त्या दुष्टांवर आपला शाप घोषित करतो असे दाखविले आहे. सातव्या दृष्टांतात दुष्टतेचे प्रतीक “शिनार देशात” म्हणजे खोट्या बाबेल धर्माच्या स्थानी वाहून नेले जाते. त्यासाठी ती खरीच चांगली जागा आहे! वाईटाचा वीट मानणाऱ्या यहोवाच्या लोकात त्या दुष्टतेला मुळीच थारा नाही. यानंतर, जखऱ्या घोड्यांनी वाहिलेले चार रथ पाहतो. हा दिव्यदूतांचा आत्मिक दल आहे, याला देवाच्या पृथ्वीवरील सेवकांना सुरक्षित राखण्याची कामगिरी आहे.—५:१-६:८.
भविष्यवादित पूर्वदृष्टांत
यहोवाच्या भविष्यवादित शब्दांची पूर्णता हेलावून टाकणारी व विश्वास मजबूत करणारी आहे. जखर्याचे हे भविष्यवादित पूर्वदृष्टांत आमच्या काळासाठी किती खरे आहेत! बंदिवान यहुद्यांनी दिलेल्या सोने व रुपे यांच्या दानाकरवी त्याला प्रमुख याजक यहोशवा यासाठी भव्य मुकुट तयार करायचा होता. यासोबतच, “जे दूर [बाबेलमध्ये] आहेत ते येतील व यहोवाचे मंदिर बांधण्यास हातभार लावतील.” याचप्रमाणे १९१९ मध्ये पुष्कळांनी मोठ्या बाबेलास सोडले व ते मंदिराच्या कामास लागले. उपासाविषयीच्या चुकीच्या कल्पनातील सुधारणूकीने यरुशलेमाच्या येणाऱ्या हर्षित स्थिती वर्णनाकडे निरविले. “सर्व राष्ट्रातील दहा लोक” आध्यात्मिक यहुद्यांना खऱ्या भक्तीत येऊन मिळतील असे भाकित करण्यात आले. (गलतीकर ६:१६; प्रकटीकरण ७:४-१०) यहोवा म्हणतोः “यरुशलेमाच्या कन्यांनो, जोराने आनंदाचा गजर कर.” तिचा राजा शिंगरावर बसून येत आहे तो “राष्ट्रांबरोबर शांतीच्या गोष्टी बोलेल.”—६:९-९:११.
देव व मेंढपाळ
देखरेख्यांवर मोठी जबाबदारी आहे व त्यांनी आवेशाने काम केले पाहिजे. आपल्या लोकांचा बचाव करण्याचे अभिवचन दिल्यानंतर यहोवा अविश्वासू मेंढपाळांवर आपला राग व्यक्त करतो. “तीन मेंढपाळ” कळपास इतके दुषित करतात की, देव लोकांसोबतचा आपला करार काढून घेतो. यरुशलेम “भारी पाषाणासारखे” बनेल. कोणी तिजवर हल्ला केला तर ते “जखम करुन” घेतील. परंतु, “यहुदाचे सरदार” म्हणजे ज्यांना देवाच्या निवडलेल्या लोकांवर देखरेख करण्याची नेमणूक आहे त्यांनी “जळत्या मशालीसारखे” अप्रतिम आवेशयुक्त असण्यास हवे.—९:१२-१२:१४.
यहोवा खोटेपणाचा द्वेष करतो. देवाच्या मंडळीत ‘खोटे बोलण्यात’ सरसावणाऱ्यांना “भोसकून” मारतील, त्यांना धर्मत्यागी म्हणून धिक्कारले जाईल. देशाचे “दोन भाग” नष्ट केले जातील तेव्हा “तिसरा भाग” अग्नीने शुद्ध केला जाईल. याला अनुसरुन, ख्रिस्ती धर्मराज्यात राहून ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्यांचा मोठा भाग यहोवाने काढून घेतला. १९१९ पासून पुढे अभिषिक्त ख्रिश्चनांच्या छोट्या अवशेषाने यहोवाच्या नामाचा धावा केला व त्यांनी त्याच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया स्वतःस लावून घेतली.—१३:१-९.
यहोवाच्या लोकांना त्याच्या संरक्षणावर भरवसा ठेवता येईल. खऱ्या उपासकांचा नाश करण्याचा शत्रु प्रयत्न करील तेव्हा देव त्याच्या लोकांना संरक्षण देईल व सैतानाच्या समूहाला धुऊन काढील. जैतुनाच्या पर्वतांच्या दुभंगण्याचा परिणाम लाक्षणिक दरीत होतो व येथे अभिषिक्त जन यहोवाच्या सार्वभौम राज्यात व त्याच्या पुत्राच्या मशीही सरकारखाली संरक्षणाचा अनुभव घेतील. येथे देवाच्या विश्वासू सेवकांना उजेड तर राष्ट्रांसाठी अंधकार असेल. मानवजातीने ही निवड केलीच पाहिजेः यहोवाची भक्ती त्याच्या लोकांसोबत मिळून करा अथवा नाश सहन करा.—१४:१-२१.
[तळटीपा]
a जखर्याच्या भविष्यवादातील प्रत्येक वचनाच्या चर्चेसाठी पॅरडाईज रिस्टोर्ड टू मॅनकाईण्ड—बाय थिऑक्रॅसि! हे वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क द्वारा प्रकाशित करण्यात आलेले पुस्तक पहा.
[३२ पानावरील चौकट]
पवित्र शास्त्र वचनांचे परिक्षण
○ १:३—यहुदी लोक बाबेलातून इ. स. पू. ५३७ मध्ये परतले तरी त्यांना देवाशी पूर्ण जिवाने आज्ञाधारक राहण्यास व त्याची भक्ती करण्यास आर्जविले. आपल्या परतीचा दृश्य पुरावा त्यांनी मंदिराच्या पुनर्बांधणी कामात लागून ते पूर्ण होईपर्यंत करीत राहण्यात दाखवून द्यावयाचा होता.
○ २:१-५—तो तरुण माणूस यरुशलेमाचे मोजमाप तिच्यासभोवती संरक्षक भिंत उभारता यावी याकरता घेत असावा असे दिसते. परंतु देवाच्या दूताने हे निदर्शित केले की, भिंत बांधून शहराची वाढ सीमित करावयाची नव्हती. यरुशलेमाची सतत होणारी वाढ कोणाही माणसाला थोपविता येऊ शकत नव्हती. यहोवा तिचा संरक्षक होणार होता व याचप्रमाणे आज तो स्वर्गीय नवे यरुशलेम याचा भाग असणाऱ्या अभिषिक्त शेषांचे संरक्षण करतो.—प्रकटीकरण २१:२.
○ ६:११-१५—महायाजक यहोशवा याला मुकुटमंडित करण्यामुळे तो राजा-याजक बनू शकत नव्हता कारण तो दावीदाच्या राजेशाही घराण्यातील नव्हता. उलटपक्षी, या घटनेमुळे यहोशवा हा मशीहाची भविष्यवादित प्रतिमा ठरला, कारण याच्यामध्ये “कोंब” याविषयीचा भविष्यवाद पूर्ण होणार होता. (जखर्या ३:८; यिर्मया २३:५) यहोशवाने यरुशलेम मंदिराच्या पुनर्बांधणीच्या कामास आरंभ करुन ते संपविण्यात मदत दिली. याचप्रमाणे स्वर्गीय राजा-याजक येशू ख्रिस्त आध्यात्मिक मंदिराचे काम तडीस नेतो.
○ ११:४-११—मेंढरासमान लोक “वधासाठी नेमलेला कळप” होते ज्यामध्ये सरकारचे मेंढपाळ त्यांची पिळवणूक करीत होते. एका काठीस “रमणीयता” व दुसरीला “बंधन” असे संबोधून जखर्याने या काठ्यांचा वापर अनुक्रमे कळपास मार्गदर्शन देण्यास व श्वापदास हुसकून लावण्यासाठी केला. (स्तोत्रसंहिता २३:४) तो येशूची पडछाया ठरला कारण येशूलाहि आध्यात्मिक मेंढपाळ म्हणून पाठविले होते पण यहुद्यांनी त्याला धिक्कारले. जखऱ्याने रमणीयतेची काठी मोडली त्याचप्रमाणे देवाने यहुद्यांसोबत रमणीयतेचे व्यवहार सोडले व त्यांच्यासोबतचा करार काढून टाकिला. जखऱ्याने बंधनाची काठी मोडली तसे देवाने इस्राएलासोबतचा नियमशास्त्र करार मोडला आणि यहुद्यांना कोणाही ईश्वरशासित बंधनविरहीत सोडले. त्यांची धार्मिक फूट त्यांच्यासाठी विनाशकारी ठरली. यरुशलेमाचा नाश इ. स. ७० मध्ये रोमी लोकांकरवी झाला.
○ १२:११—“हदाद्रिम्मोनाचा आकांत” यहुदाचा राजा योशियाच्या मृत्युबद्दलच्या शोकास संदर्भित करीत असावा. हदाद्रिम्मोन हे मगिद्दोच्या खोऱ्यातील ठिकाण होते हे स्पष्ट आहे. येथे फारो नखोसोबतच्या युद्धात तो मारला गेला. योशियाच्या मृत्युविषयी विलाप करण्यात आला. यिर्मया गीत म्हणत व गाणारे राजास उद्देशून शोकगीत गात होते.—२ इतिहास ३५:२०-२५.
[पानांवरील चित्रं ३२]
जखर्याने भाकित केल्यानुसार सर्व राष्ट्रातील लोक आता आध्यात्मिक इस्राएलांसोबत सहवास राखीत आहेत