वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 ३/१ पृ. १६-२१
  • युवकांनो दुहेरी जीवन जगण्याविरुद्ध दक्षता घ्या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • युवकांनो दुहेरी जीवन जगण्याविरुद्ध दक्षता घ्या
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • काही जण दुहेरी जीवन का जगतात?
  • पालकहो, तुम्हाला काही मदत देता येईल
  • दुहेरी जीवन खरेच काय असते?
  • ते कसे टाळावे?
  • हे दुहेरी जीवन टाळण्याची इतरांना मदत द्या
  • माझे पालक मला का समजून घेत नाहीत?
    तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे
  • युवकांनो तुम्ही ख्रिस्ती निष्ठेच्या परिक्षेत यशस्वी होणार का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • आपल्या पालकांची अंतःकरणे आनंदित करणे
    तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनवणे
  • मी माझ्या पालकांच्या आज्ञेत का असले पाहिजे?
    सावध राहा!—१९९५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 ३/१ पृ. १६-२१

युवकांनो दुहेरी जीवन जगण्याविरुद्ध दक्षता घ्या

“हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर. . . . पण ह्‍या सर्वांबद्दल खरा देव तुझा झाडा घेईल हे तुझ्या लक्षात असू दे.”—उपदेशक ११:९.

१, २. दुहेरी जीवन व्यतित करणाऱ्‍या एका युवकाचे कोणते उदाहरण येथे दिले आहे?

“बालपणापासून मी ख्रिस्ती वातावरणात, यहोवाच्या साक्षीदारांमध्ये होतो,” असे एका युवकाने लिहिले. “तरीपण, मी माझ्या पालकांच्या विचारशैली आणि त्यांचे दर्जे याच्या अगदी विरुद्धपणात जीवन व्यतित करीत होतो, घरी सुद्धा. माझे जीवन एकंदरीत स्वैराचारी स्वरुपाचे आणि जगाच्या बेशिस्त वागणूकीसारखे होते.”

२ या युवकाने आणखी विवेचीत केलेः “मला दहावे वर्ष लागण्याआधीच मी दोन्ही जगतात, होता होईल तितक्या अधिक स्वीकृतपणे जीवनाचा खेळ चालविला. शाळेत मी माझ्या मित्रांची मर्जी आणि मित्रत्व साधू पहात होतो तर घरी माझ्या पालकांची मर्जी. शाळेत मी माझे वागणे व पद्धत होता होईल तितक्या त्या वातावरणाप्रमाणे ठेवले . . . पण घरी मात्र मी वेगळाच होतो. माझे पालक अपेक्षित होते त्याप्रमाणे मी सदाचाराने वागे.”

३. (अ) आम्हाला कोणता आत्मविश्‍वास वाटतो, पण आम्हाला कसली जाणीव आहे? (ब) कशामुळे आमचे लक्ष युवकांकडे वेधले गेले आहे?

३ या युवकाची वागणूक, मंडळीत असणाऱ्‍या तुम्हा युवकांसारखी नाही हे आम्हाला दिसते. आम्हाला आत्मविश्‍वास आहे की तुम्हातील बहुतेक सर्वच आपले पालक व मंडळी यांजसोबत प्रामाणिकतेने वागत आहात, आणि यामुळेच आम्हाला तुम्हाविषयी खूप आनंद वाटतो. पण याच वेळेला काहीजण सज्जन असल्याचा, होता होईल तितके चांगले असण्याचा दिखावा पुढे मांडतात पण वडीलधाऱ्‍यांच्या नजरेआड मात्र चुकीचे जीवन जगत आहेत हे आम्हाला माहीत आहे. तेव्हा प्रश्‍न हा आहे की, आम्हाला वाटावे अशा प्रकारचे युवक तुम्ही आहात की तुम्ही दुहेरी जीवन व्यतित करता? तुमच्यातील चुका शोधण्यासाठी आम्ही हे विचारत नाही तर, आम्हाला तुम्हाविषयी खरी प्रीति आहे आणि यहोवाला संतुष्टता वाटेल या पद्धतीने तुम्ही आपल्या युवकपणाचे जीवन जगावे याविषयी तुम्हास मदत करावी हा यामागील हेतू आहे.—उपदेशक ११:९, १०; १२:१४; २ करिंथकर ५:१०.

४. काही प्रौढांनीही कसे दुहेरी जीवन व्यतित केले आहे, पण अलिकडेच युवकांच्या बाबतीत काय दिसून आले आहे?

४ तरीपण तुम्ही विचारालः ‘आम्हा युवकांकडेच तुमचे लक्ष का? प्रौढांबद्दल काय?’ होय, प्रौढांनीही दुहेरी जीवन न जगण्याची दक्षता घ्यावी हे निःसंशये खरे आहे. अलीशाचा सेवक गेहजी याने फसवी वृत्ती दाखवली. नामानाकडून आपण बक्षीस काढून घेतले आहे हे त्याने लपवून ठेवले. (२ राजे ५:२०-२६) तसेच हनन्या व सप्पीरा हे दोघेही प्रौढ होते, पण त्यांनी खोटेपणाने हे दाखविले की शेत विकून जे पैसे मिळाले ते सर्व त्यांनी प्रेषितांना दिले आहेत—याकरवी आपण केवढे दानशूर व चांगले आहोत हे भासविण्याचा त्यांनी प्रयत्न केला—पण प्रत्यक्षात पैशातील काही वाटा त्यांनी आपणापाशीच राखून ठेवला होता. (प्रे. कृत्ये ५:१-४) तद्वत, तुम्हा युवकांकडे आम्ही लक्ष देण्याचे कारण हे की, या समस्यांविषयी अनेक घटना तुम्हात घडत असल्याचे निष्पण्ण झाले आहे.

काही जण दुहेरी जीवन का जगतात?

५. (अ) काही युवक दुहेरी जीवन का जगतात? (ब) काही युवक प्रशंसनीय जीवन जगतात तेव्हा त्यांना बहुधा कशी वागणूक मिळते, यामुळे काहीजण काय करतात?

५ हे असे का? एका युवकाने यामागील प्रमुख कारण विदित करताना म्हटलेः “वेगळे राहून मला माझे मित्र गमवावे असे वाटत नव्हते.” हे खरे की, आपण सदाचारी व वेगळे आहोत असे दाखविल्यामुळे लोकात हास्याचा विषय बनतो. (पडताळा १ पेत्र ३:१६; ४:४.) हे टाळण्यासाठी तसेच आपल्या वयाच्या मित्रांकडून मर्जी राखावी याकरता काही युवक मद्य पितात आणि लैंगिक आचारातही गुंततात. शाळेत अभ्यासात नेहमी पुढे असणाऱ्‍या आणि वर्गातील चर्चेत नेहमी भाग घेणाऱ्‍या १३ वर्षे वयाच्या, साक्षीदार नसलेल्या मुलीने खेदाने म्हटलेः “मजसारख्या चांगल्या मुलीत कोणी आस्था घेणार नाही असे मला वाटले नव्हते. . . . तर आता इतरांमध्ये समाविष्ट बनण्यासाठी मला वाटते की मी माझा हुशारपणा कमी दाखवावा वा काहीतरी करावे.”

६. पेत्राला चुकीच्या वागणूकीसाठी कसे प्रभावीत केले गेले, तर युवकांविषयी आम्ही घेतलेल्या निर्वाळ्याविषयी याकरवी काय दिसते?

६ प्रेषित पेत्राला देखील आपल्या प्रतिष्ठेविषयी एकदा अभिमान वाटला होता, त्यामुळे जे योग्य ते त्याने केले नाही. अंत्युखिया येथे यरुशलेमातील यहुदी ख्रिश्‍चनांनी भेट दिली तेव्हा विदेशी ख्रिश्‍चनांसोबत सहवास राखतो अशी यहुद्यांकडून आपल्याबाबतीत टिका घडेल असे वाटून तो त्यांच्यामधून वेगळा झाला. (गलतीकर २:११-१४) सोबत्याच्या दबावापुढे प्रौढ ख्रिश्‍चनांनी देखील अशी हार पत्करल्यामुळे तुम्हा अननुभवी युवकांकडून असे काही घडू शकेल हे नवलाईचे वाटते का?—नीतीसूत्रे २२:१५.

७. दुहेरी जीवन जगण्याचा मोह काही युवकांना कसा जडतो?

७ काही युवक दुहेरी जीवन का जगतात त्याचे आणखी एक कारण म्हणजे आपल्या जीवनातील मजा हरपली जाते असा त्यांचा विश्‍वास झालेला असतो. शाळेमध्ये मित्रपरिवारात काय चर्चा चालते ती त्यांना ऐकायला मिळते—काय मजा आली कालच्या पार्टीत, काय ते संगीत होते, किती छान मद्य होते, मादक द्रव्याने किती झटका दिला, ही त्यांची बोलणी! तसेच त्यांना ऐकायला मिळते की तो मुलगा व ती मुलगी कशी एकमेकांच्या प्रेमात पडली! यामुळे आपण देखील असेच काही करावे अशी इच्छा त्यांच्या मनात निर्मिली जाते आणि मग हे युवक, पवित्र शास्त्र ज्याला “पापाचे क्षणिक सुख” म्हणते त्याचा अनुभव घेण्यास तयार होतात.—इब्रीयांस ११:२४, २५; १ करिंथकर १०:६-८.

८. युवक दुहेरी जीवन का जगतात याचे मूलभूत कारण कोणते आहे?

८ तरीपण काही युवकांना यहोवा देव आणि येणारे नवे जग खरे वाटत नसल्यामुळे ते दुहेरी जीवन जगू लागतात हे यामागील मूलभूत कारण आहे. यहोवाच्या अभिवचनांविषयी तसेच त्याचे वचन आणि दृश्‍य संस्था, यहोवाची अवज्ञा केल्यामुळे उद्‌भवणाऱ्‍या परिणामांबद्दल जे इशारे देत आहेत त्याविषयी ते खरा विश्‍वास राखीत नाहीत. (गलतीकर ६:७, ८) त्यांच्याठायी मोशेसारखी वृत्ती नसते, ज्याविषयी पवित्र शास्त्र म्हणते की, “त्याची दृष्टी [देवाकडील] प्रतिफळावर होती. . . . जो अदृश्‍य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला.” मोशेला यहोवा देव व त्याची अभिवचने खरी वाटत होती. पण जे दुहेरी जीवन जगतात त्यांच्याठायी या विश्‍वासाचा अभाव असतो. युवकांनी ज्या गोष्टीकडे आपले लक्ष रोखून धरावे असे सैतानाला वाटते तेच, म्हणजे, त्याच्या व्यवस्थेचा झगमगाट हे युवक पाहतात. या कारणास्तव पापाच्या क्षणिक सुखाकडे ते वळतात आणि याचवेळी आपण केवढे सदाचारी आहोत असा आविर्भाव ते निर्माण करतात.—इब्रीयांस ११:२६, २७.

पालकहो, तुम्हाला काही मदत देता येईल

९. (अ) युवकाच्या दुहेरी जीवनाला पालकांचा कसा हातभार लागू शकतो? (ब) वयस्करांनी कोणती जाण राखली पाहिजे आणि काय करण्याची त्यांनी दक्षता घेतली पाहिजे?

९ लेखाच्या आरंभाला उल्लेखिलेला युवक म्हणतोः “शाळेत ज्या गोष्टीने मला माझ्या सवंगड्यांत अप्रिय केले तिनेच मला घरच्या वातावरणात कृपापसंती दिली. पण मला आणखी काही हवे होते. ज्यावर विसंबून राहता येईल, भिस्त ठेवता येईल आणि ज्याच्याशी बोलता येईल असे कोणीतरी मला हवे होते. आणि हे मला माझ्या पालकांकडून लाभत नव्हते.” तर मग, पालकहो तुमच्या मुलाने दुहेरी जीवन जगण्यात तुम्ही असा हातभार लावता का? त्यांना जे व्यक्‍तिगत लक्ष व मार्गदर्शन हवे असते ते तुम्ही देता का? शाळेत आपल्या मुलांना केवढा प्रखर दबाव सहन करावा लागतो ते वयस्करांनी ध्यानात घेतले पाहिजे त्यामुळेच त्यांना उत्तेजन व मदत द्यावी याकरता करण्याजोगे सर्व काही करावे म्हणून त्यांनी दक्षता घ्यावी.—स्तोत्रसंहिता ७३:२, ३; इब्रीयांस १२:३, १२, १३.

१०. (अ) कोणत्या कुतुहूलाविषयी स्पष्टोक्‍ती करणे ही पालकांची जबाबदारी आहे? (ब) हे मार्गदर्शन दिले नाही तर सहसा कोणते परिणाम संभवतात?

१० युवकांना विरुद्ध लिंगी व्यक्‍तीसोबत कसा नातेसंबंध राखावा हा प्रश्‍न वेळोवेळी भेडसावत असतो आणि येथेच पुष्कळ पालक टाळाटाळ दाखवितात हे दुःखाचे आहे. “त्यांनी मजशी उघडपणे कधीच गोष्टी केल्या नाहीत,” असे १५ वर्षे वयाची सुंदर व हुशार मुलगी म्हणाली. “लैंगिक आचाराविषयी जे काही मी शिकले ते माझे मलाच शिकावे लागले. . . . मला याबद्दल बरेच काही जाणून घ्यावयाचे होते पण तो विषय काढण्यात मला लाज वाटत असे.” मग परिणाम काय दिसला? ती म्हणालीः “मजमध्ये व माझ्या पालकांमध्ये अदृश्‍य अशी भिंत वाढतच राहिली, आणि मी मात्र बरीच कुतुहूल बाळगणारी, मूर्ख आणि संशयी बनत गेले.” होय, ती एका युवकाच्या आमंत्रणाला वश झाली, पण तिच्या या कर्मासाठी कोणाला जबाबदार धरावे लागेल?—नीतीसूत्रे २२:३; २७:१२.

११. (अ) मुलांवर आपली प्रीति आहे हे पालक कसे दाखवू शकतात? (ब) अशा या प्रेमाचा युवक कसा प्रतिसाद दाखवतील?

११ पालकांची आपल्या मुलांवर खरी प्रीति आहे हे त्यांनी त्यांच्यासोबत वेळ खर्च करून, गोपनीय गोष्टींची चर्चा करून आणि मार्गदर्शन देऊन व्यक्‍त करण्यास हवे. (नीतीसूत्रे १५:२२; २०:१८) “त्यांना मजबद्दल खरीच काळजी वाटली असती तर त्यांनी मला काही नियम लावले असते” असे आणखी एका युवकाने म्हटले. सध्या तुम्ही लावलेल्या नियमांच्या बाबतीत काहीसा प्रतिकार युवकांकडून व्यक्‍त होत असला तरी नंतर त्यांना याविषयीची धन्यता वाटू लागेल. एका युवकाने आपल्या आईला लिहिलेः “मला नेमून दिलेल्या चाकोरीबाहेर पडण्याच्या पळवाटा मी सतत शोधीत होतो तरी तू मला त्या नियमांच्या व निर्बंधांच्या चाकोरीत बद्ध ठेवलेस म्हणून मी तुझा ऋणी आहे.” यास्तव, तुमच्या मार्गदर्शनाला अनुसरण्याचे बंधन मुलांवर आहे हे समजावून देऊन तुम्ही त्यांच्यावर आपली प्रीति दाखवा. दळणवळण राखण्यात अपयशी बनून किंवा त्यांना जेव्हा गरज असते तेथे तुम्ही हजर न झाल्यामुळे त्यांच्या दुहेरी जीवन व्यतित करण्याला हातभार लावणारे असे तुम्ही होऊ नका.

१२. पालकांच्या कसल्या मूर्ख प्रवृत्तीमुळे मुलांच्या दुहेरी जीवन व्यतित करण्याला वाव मिळतो?

१२ पालक कदाचित आणखी एका मार्गाने आपल्या मुलांच्या दुहेरी जीवन जगण्याला हातभार लावणारे आहेत असे दिसेल. हे न्यू जर्सी प्रांताच्या उच्च न्यायालयाच्या न्यायधिशांनी काढलेल्या उद्‌गारांद्वारे कळते. “शाळेत काही खोडसाळपणा केला तर शिक्षक विद्यार्थ्याला शिक्षा करतात. पण,” न्यायधीश म्हणालेः “याविषयी आपली संमती दाखविण्याऐवजी पालक शाळेत येऊन शिक्षकाची खरडपट्टी काढतात.” आपली मुले चुका करणारच नाहीत असे काही पालकांना वाटत असते. याचप्रमाणे मंडळीत कोणी वडील वा जबाबदार व्यक्‍ती कोणा पालकांना त्यांच्या मुलाने केलेला खोडसाळपणा सांगतात तेव्हा हे या कानातून ऐकतात व दुसऱ्‍याने सोडून टाकतात. असे करण्यामुळे ते त्यांच्या मुलांच्या दुहेरी जीवनाला हातभार लावणारे ठरतात.

दुहेरी जीवन खरेच काय असते?

१३. दुहेरी जीवन जगणे हे कशासमान आहे?

१३ हे विचारात घेणे महत्वपूर्ण आहेः दुहेरी जीवन जगणे म्हणजे खोटी बतावणी करणे होय. ते भोंदू व ढोंगीपणासारखे आहे. (स्तोत्रसंहिता १२:२; २ तीमथ्य ३:१३) ते जणू, “तेजस्वी देवदूतांचे सोंग” धारण करणाऱ्‍या सैतानासारखे आहे. (२ करिंथकर ११:१४, १५) याचा अर्थ, येशूने ज्या धार्मिक पुढाऱ्‍यांच्या विषयी हे म्हटले होते त्यासारखे ते आहे. तो म्हणालाः “अहो शास्त्र्यांनो, अहो परुश्‍यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहा. त्या बाहेरुन खरोखर सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरल्या आहेत. तसे तुम्हीही बाहेरुन लोकांना नीतीमान दिसता, परंतु आत ढोंगाने व अनीतीने भरलेले आहात.” (मत्तय २३:२७, २८) तद्वत, दुहेरी जीवन जगणे हा देवाविरुद्ध मोठा गंभीर अपराध आहे.

१४. दुहेरी जीवन जगणे टाळण्याची का इच्छा करावी?

१४ गंभीर विचार करण्याजोगी आणखी एक गोष्ट ही की, दांभिक मार्गाक्रमण सर्वदा लपून राहू शकत नाही. “वृत्ति शुद्ध आहे की नाही हे मूलसुद्धा आपल्या कृत्यांनी उघड करते,” असे पवित्र शास्त्र म्हणते. (नीतीसूत्रे २०:११; लूक १२:१-३) होय, तुमची कामे, मग ती चांगली असोत की वाईट, ओघाओघाने दिसणारच. शिवाय पवित्र शास्त्र म्हणते की, देव ढोंग्यांना फार कडकपणे शासन करणार. (मत्तय २४:५१) तर मग, तुम्ही दुहेरी जीवन जगण्याची इच्छा न धरावी हेच बरे!

ते कसे टाळावे?

१५. युवकाला दुहेरी जीवन जगण्याचे टाळण्यात कशामुळे मदत मिळेल?

१५ दुहेरी जीवन कशासमान असते त्याचा प्रत्यक्ष विचार केल्यामुळे ते व्यतित करण्याचे टाळणे सुलभ बनते. यासाठी स्वतःला हे विचारावेः ढोंगी, सैतानाचा अनुकारी आणि परुशी या अर्थाने मला ओळखण्यात यावे अशी माझी इच्छा आहे का? अर्थातच नाही! दुहेरी जीवन जगण्यामुळे व्यक्‍तीशः ज्या हृदयव्यथा उद्‌भवतात आणि यामुळे जीवनात ज्या बिकट समस्या येतात याचा विचार केल्यामुळे ते टाळण्यात मदत मिळते. लबाडी केल्यामुळे गेहजीचे काय झाले ते आठवा बरे! त्याला नामानाचे कोड लागले व तो आमरण कोडीच राहिला. याचप्रमाणे हनन्या व सप्पीरा या दोघांनी मोठेपणाचा आव फसवणूकीद्वारे दाखविल्यामुळे देवाने त्यांना ठार केले.—२ राजे ५:२७; प्रे. कृत्ये ५:५, ९, १०.

१६. जागतिक राहणीमानात समाविष्ट झाल्यामुळे एका युवकाच्या बाबतीत काय घडले?

१६ आज घडलेली उदाहरणे देखील सांगता येतील. अमेरिकेतील एका युवकाने पवित्र शास्त्राचा अभ्यास आरंभिला व तो राज्य सभागृहात सभांना येऊ लागला. पण मग, तो जगाच्या राहणीमानात घुटमळू लागला व त्यामुळे त्याने सहवास बंद केला. काही वर्षे निघून गेली. तो लिहितोः “साधारण दोन महिन्याआधी मी देवाला प्रार्थना करून कोणा साक्षीदाराची भेट घडावी अशी याचना केली. मी परत अभ्यासाला सुरुवात केली. आता मात्र गौप्यस्फोट झाला. एका महिन्याआधी मी आरोग्यचिकित्सा केली तेव्हा मला एडस्‌ची लागण झाल्याचे निष्पत्तीत दिसले.” शेवटी तो म्हणतोः “मागे मी शास्त्रवचनीय सल्ला अनुसरण्याचे मनावर घेतले असते तर आज ही परिस्थिती मला मिळाली नसती.” अशाप्रकारचे हे वाईट परिणाम तुम्हाला नक्कीच टाळावेसे वाटतील! जगाला तुम्हाला देण्याजोगे मोलवान असे काहीच नाही.—१ योहान २:१५-१७.

१७. आणखी कोणत्या विचारामुळे युवकाला दुहेरी जगण्याचे टाळण्याची चालना मिळाली पाहिजे?

१७ दुहेरी जीवन जगण्यामुळे यहोवाच्या नावावर कोणता परिणाम येतो हे जाणल्यामुळे ते जीवन टाळता येते. प्रस्तावनेत उल्लेखिलेला युवक म्हणतो की त्याने सिगारेट ओढल्याचे कोणी पाहिले तेव्हा तो म्हणालाः “यहोवाचे साक्षीदार धुम्रपान करतात हे मला माहीत नव्हते. तू साक्षीदार नाहीस का?” हा युवक म्हणतो की त्याला यानंतर कसेतरी वाटायला लागले, कारण तो जे काही करीत होता त्यामुळे यहोवाची निंदा होत होती. अशी तुमची इच्छा आहे का? आपला देव हा इतका कमी प्रतीचा तुम्हाला वाटतो का की प्राचीन इस्त्राएलांप्रमाणे तुम्ही त्याच्या नावावर निंदा आणू इच्छिता?—स्तोत्रसंहिता ७८:३६, ३७, ४१; यहेज्केल ३६:२२.

१८. (अ) आपल्या मुलाने दुहेरी जीवन व्यतित केले आहे हे त्याच्या पालकांना कळाले तर काय होते? (ब) यामुळे ख्रिस्ती युवकाला दुहेरी जीवन जगण्याचा प्रतिबंध का लागला पाहिजे?

१८ याशिवाय आपल्या पालकांची ख्याति व त्यांच्या भावना यांची कदर करा. “सरतेशेवटी तो दिवस आला आणि मी कसा होतो ते माझ्या आईवडीलांना कळाले,” असे वरील युवकाने लिहिले. “त्यांना खूपच मोठा धक्का बसला. आणि माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी माझ्या आईवडीलांना रडताना पाहिले. माझ्या करणीमुळे त्यांना कितीतरी यातना झाल्या होत्या.” तुम्ही जर दुहेरी जीवन जगण्याचे चालू ठेवले व ते तुमच्या पालकांना कळाले तर तेही असेच रडतील. असेच व्हावे अशी तुमची इच्छा आहे का? “चांगले नाव विपुल धनाहून इष्ट होय,” असे पवित्र शास्त्र म्हणते. (नीतीसूत्रे २२:१) दुहेरी जीवन जगण्यामुळे एकतर तुम्ही स्वतःचे चांगले नाव वाईट करीत असता. पण इतकेच नाही. तुम्ही आपल्या पालकांचे देखील नाव वाईट करता आणि ते मातीमोल बनवता. यामुळे तुमचे पालक इतरांपुढे मान वर करु शकत नाहीत.—नीतीसूत्रे १०:१; १७:२१.

१९. याकोबाच्या मुलांनी केलेल्या वाईट वागणूकीचा याकोबावर काय परिणाम घडला आणि यावरुन कोणता धडा शिकण्याजोगा आहे?

१९ पालकांचे चांगले नाव वाईट कसे होऊ शकते याचे स्पष्टीकरण याकोबाच्या पुत्रांच्या उदाहरणात चांगले दिसते. याकोबाच्या मुलीवर बलात्कार घडला तेव्हा तिच्या भावांनी शहरातील माणसांची हत्या केली आणि ते लुटले. हे वर्तमान ऐकून याकोब विलाप करुन म्हणालाः “या देशचे रहिवासी . . . यांना माझा वीट येईल असे तुम्ही करुन मला संकटात घातले आहे.” (उत्पत्ती ३४:३०; ३५:१) तुमच्याकरवी देखील तुमच्या आईवडीलांचे नाव बदनाम होऊ शकते व त्यामुळे त्यांना शेजारपाजारी आणि मित्रांत शरमेने वावरावे लागेल. खरेच, पवित्र शास्त्र म्हणते त्याप्रमाणेः “मूर्ख मुलगा आपल्या बापाला दुःख देतो आणि आपल्या जन्मदात्रीला क्लेश देतो.”—नीतीसूत्रे १७:२५.

२०. ख्रिस्ती पालकांनी आपल्या मुलांसाठी कोणते उत्तम बक्षीस देऊ केले आहे?

२० आपल्या पालकांना मनस्ताप व्हावा आणि दुःख मिळावे असे तुम्हाला वाटत नाही याचा आम्हाला भरवसा वाटतो. यास्तव आपल्या कृतींचा त्यांच्यावर कसा परिणाम होईल ते विचारात घ्या. तसेच तुम्हाला ख्रिस्ती पालकांचा लाभ घडला आहे तर त्यांनी तुम्हासाठी काय देऊ केले आहे तेहि लक्षात आणा. ते केवळ जीवन नाही तर त्यापेक्षा अधिक काहीतरी मोलवान तुम्हाला दिले आहे. पवित्र शास्त्र यहोवाबद्दल म्हणतेः “तुझे वात्सल्य जीवनाहून उत्तम आहे.” (स्तोत्रसंहिता ६३:३) तुमची वाढ सत्यामध्ये केल्यामुळे त्यांनी तुम्हाला देवाच्या वात्सल्यतेचा अनुभव येऊ दिला आणि तुम्हाला त्याच्याशी नातेसंबंध प्रस्थापित करण्यात मदत दिली. ही गोष्ट नुसते जीवन असण्यापेक्षा अधिक चांगली आहे ते याअर्थी की जरी तुम्हाला मरण आले तरी आता देव तुम्हाला नंदनवनातील चिरकालिक जीवन प्रदान करु शकतो.

हे दुहेरी जीवन टाळण्याची इतरांना मदत द्या

२१. (अ) इतर वाईट कर्मे आचरीत आहेत असे कोणा युवकाला माहीत आहे तर त्याची जबाबदारी काय आहे? (ब) १३ वर्षे वयाच्या मुलीने कोणते सुंदर उदाहरण प्रस्तुत केले?

२१ कोणी दुहेरी प्रकारातील जीवन व्यतित करीत आहे हे तुम्हाला माहीत झाले तर काय? प्रथमतः तुम्ही अशा व्यक्‍तिला वडीलांचा परामर्श घ्यायला सांगा. पण जर तो किंवा ती हे करण्याचे नाकारतो तर काय? तर मग तुम्ही ते स्वतः त्यांना कळवावे ही तुम्हावर शास्त्रवचनीय जबाबदारी आहे. (लेवीय ५:१) हे करणे सोपे नाही हे आम्हाला माहीत आहे, पण ती योग्यच गोष्ट आहे. “मित्राने केलेले घाय खऱ्‍या प्रेमाचे आहे”त असे पवित्र शास्त्र म्हणते. (नीतीसूत्रे २७:६) शास्त्रवचनीय जबाबदारीसंबंधाचे भाषण ऐकल्यावर एका १३ वर्षे वयाच्या मुलीने, तिला ठाऊक असलेल्या आणि वाईट आचारात गढलेल्या मैत्रिणीस सांगितले की तिने वडीलांची भेट घ्यावी. “मी नंतर जाऊन पुन्हा विचारले की तिने ते केले होते का,” ती मुलगी लिहिते. “तिने ते केले नव्हते. तेव्हा मी जाऊन ते त्यांना कळविले.” आता ती विचारतेः “आता मी हे जे केले ते बरोबर होते का?” होय. असे करण्यामुळे लगेच उद्‌भवणारे परिणाम दुःखदायक दिसत असले तरी याचे नंतरचे परिणाम आनंदी होतात व ते वाईट कर्मे आचरणाऱ्‍याचे जीवन वाचवतात.—इब्रीयांस १२:११.

२२. युवकांनी कोणता सूज्ञ मार्ग चोखाळावा असे त्यांना उत्तेजन आहे, आणि याचा कोणता परिणाम मिळणार?

२२ तुम्ही प्रथमतःच दुहेरी जीवन न जगण्याचा चंग बांधला तर हे सारे काही टळू शकते. तर सूज्ञ व्हा. कोणा मित्रासोबत जसा जिव्हाळा राखता तसेच देवासोबत दृढ असे व्यक्‍तिगत नाते उभारा. त्याला मदतीसाठी नित्याने प्रार्थना करा, त्याचे वचन पवित्र शास्त्र याचा परिश्रमी अभ्यास करा म्हणजे तुम्हाला त्याच्या गुणांविषयी रसिकता वाटू लागेल. अशामुळे तुम्हा युवकांवर आशीर्वाद येतील आणि मग तुमच्या पालकांचे अंतःकरण आनंदाने भरुन जाईल. पण अधिक महत्वपूर्ण ते हे की तुम्ही यहोवाचे अंतःकरण देखील आनंदी बनवू शकाल.—नीतीसूत्रे २७:११.

तुम्ही कसा प्रतिसाद दाखवाल?

◻ काही युवक दुहेरी जीवन का जगतात?

◻ पालक देखील आपल्या मुलांना दुहेरी जीवन जगण्यास कसे प्रवृत्त ठरू शकतात?

◻ दुहेरी जीवन जगणे हे कशासारखे ठरते?

◻ युवकाला दुहेरी जीवन जगण्याचे कसे टाळता येईल?

◻ कोणी युवकाने गंभीर पाप केल्याचे ज्ञात असल्यास युवकांवर कोणती जबाबदारी आहे?

[१८ पानांवरील चित्रं]

आत्मविश्‍वासपूर्वकतेने बोलणी करण्याद्वारे पालकांचे प्रेम प्रदर्शित होते

[२० पानांवरील चित्रं]

कोणी गंभीर पाप केल्याचे तुम्हास अवगत असेल तर त्याला ते कबूल करण्यास उत्तेजन द्या

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा