वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 ३/१ पृ. ८-९
  • प्रार्थना आणि देवावर भाव

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रार्थना आणि देवावर भाव
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • मिळती जुळती माहिती
  • सर्वाधिक प्रसिद्ध असलेले प्रवचन
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • येशूच्या शिकवणींचा तुमच्या प्रार्थनांवर प्रभाव पडतो का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • मत्तय अध्याय ५-७
    आजपर्यंतचा सर्वोत्तम सल्ला!
  • तुमची दृष्टी “सरळ” आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 ३/१ पृ. ८-९

येशूचे जीवन व उपाध्यपण

प्रार्थना आणि देवावर भाव

येशू आपले प्रवचन पुढे चालू ठेवून जे दिखावू धर्माचरण करतात अशांचा निषेध करतो. “तू दानधर्म करतोस,” तो म्हणतो, “तेव्हा ढोंगी जसे आपणापुढे शिंग वाजवतात तसे करु नको.”

“तसेच,” येशू पुढे म्हणतो, “तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यासारखे असू नका. कारण लोकांनी आपणास पहावे म्हणून सभास्थानात व चवाठ्यांवर उभे राहून प्रार्थना करणे त्यांस आवडते.” त्याऐवजी, तो सल्ला देतो की, “तू प्रार्थना करतो तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर.” येशू देखील जाहीरपणे प्रार्थना करीत होता त्यामुळे अशा प्रार्थनांचे तो खंडन करीत नाही. तर जे लोकांवर स्वतःची छाप पाडू इच्छित होते व त्यांच्याकडून आपली स्तुति वदवून घेण्याकरता प्रार्थना म्हणत होते त्याचा तो निषेध करीत होता.

येशू आणखी असा सल्ला देतोः “तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी तीच गोष्ट परत परत बोलू नका.” प्रार्थनेत एखाद्या गोष्टीची पुनरावृत्ती करणे चूक आहे असे येशू येथे म्हणत नाही. कारण त्यानेच स्वतः एकदा प्रार्थना करतेवेळी “तीच गोष्ट परत” सांगितली. पण येथे तो, पाठांतर केलेल्या प्रार्थनेतील तेच तेच शब्द “परत परत” बोलण्याच्या बाबतीत नापसंती दाखवीत होता. हीच गोष्ट, काही लोक हाती माळा घेऊन जप करताना तेच तेच शब्द परत म्हणताना दिसून येते.

आपल्या श्रोत्यांनी प्रार्थना कशी करावी ते सांगताना, येशू त्यांना सात याचिका असलेली नमुनेदार प्रार्थना शिकवितो. यापैकीच्या पहिल्या तीन विनंत्या देवाच्या सार्वभौमत्वाची ओळख आणि त्याचे उद्देश याविषयी योग्यपणाने प्राधान्य देऊन आहेत. या विनंत्यात देवाचे नाव पवित्र व्हावे, त्याचे राज्य यावे आणि त्याची इच्छा पूर्ण व्हावी हे समाविष्ठ आहे. बाकीच्या चार विनंत्या व्यक्‍तीगत गरजेसंबंधी आहेत, जसे की, दैनंदिन आहार, पापांची क्षमा, आपल्या सहनशीलतेबाहेर परिक्षा न घडू देणे आणि दुष्टापासून राखणे हे त्यात समाविष्ठ आहे.

आणखी पुढे जाता, भौतिक गोष्टींवर अवास्तव भिस्त ठेवण्याच्या पाशाविषयी येशू माहिती देतो. तो म्हणतोः “पृथ्वीवर आपणासाठी संपत्ती साठवू नका; तेथे कसर व गंज खाऊन नाश करतात आणि चोर घर फोडून चोरी करतात.” अशी ही संपत्ती केवळ नाश होणारी आहे असे नाही तर ती कोणाला देवासोबतचा चांगुलपणा देखील मिळवून देऊ शकत नाही.

यासाठीच येशू म्हणतोः “तर स्वर्गात आपणासाठी संपत्ती साठवा.” हे देवाच्या सेवेला आपल्या जीवनात प्रथम स्थान दिल्यामुळे शक्य करता येते. याकरवी देवाशी जोडण्यात आलेला चांगुलपणा आणि त्याकरवीचे थोर बक्षिस कोणीही आपणापासून काढून घेऊ शकणार नाही. आता येशू म्हणतोः “जेथे तुझे धन आहे तेथे तुझे ह्रदयहि लागेल.”

भौतिक गोष्टींच्या पाशाविषयीचा आणखी एक दाखला येशू देतो. तो म्हणतोः “डोळा शरीराचा दिवा आहे; ह्‍यास्तव, तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल. पण तुझा डोळा सदोष असला तर तुझे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल.” ज्या डोळ्याचे कार्यवहन योग्यपणे घडते तो शरीराकरता अंधारातील ज्योतिसमान आहे. पण बरोबर पाहण्यासाठी दृष्टी साधी किंवा सरळ असली पाहिजे, म्हणजे, तिने एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यास हवे. पण तेच केंद्र नसणारी दृष्टी एखाद्या गोष्टीचा विपर्यास करते, जसे की, भौतिक गोष्टींना सामोरे ठेवून देवाच्या सेवेला मागे रेटते. याचा परिणाम, “संपूर्ण शरीर” अंधःकारमय होते.

आणखी एका दाखल्याच्या स्पष्टीकरणाने येशू या विषयाचा कळस गाठतो. तो म्हणतोः “कोणीही दोन धन्याची चाकरी करू शकत नाही. कारण तो एकाचा द्वेष करील आणि दुसऱ्‍यावर प्रीति करील; अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्‍याला तुच्छ मानील. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही.”

हा सल्ला दिल्यावर येशू आपल्या श्रोत्यांना याची हमी देतो की, ते जर देवाच्या सेवेला प्राधान्य देत आहेत तर भौतिक गोष्टींविषयीची त्यांनी काळजी करीत बसण्याचे कारण नाही. “आकाशातील पाखरे लक्षपूर्वक पाहा,” तो म्हणतो. “ती पेरणी करीत नाही, कापणी करीत नाहीत. तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो.” आता तो विचारतोः “तुम्ही त्यांजपेक्षा श्रेष्ठ आहात की नाही?”

पुढे येशू रानातील फुलांकडे निर्देश करतो आणि सांगतो की, “शलमोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एकासारखा सजला नव्हता. जर,” तो म्हणतो, “देव रानातील फुलांना पोषाख घालतो . . . तर अहो अल्पविश्‍वासी, तो विशेषेकरून तुम्हाला पोषाख घालणार नाही का?”

आता येशू समाप्तीला सांगतोः “यास्तव, काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत चिंता करीत बसू नका, तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतीमत्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्‍याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.” मत्तय ६:१-३४; २६:३६-४५.

◆ प्रार्थनेविषयीच्या कोणत्या सूचना येशूने दिल्या?

◆ स्वर्गीय धनसंपत्ती का श्रेष्ठ आहे व ती कशी मिळविता येते?

◆ भौतिक वस्तुंविषयीचे प्रेम टाळण्यासाठी एखाद्याला कोणते दाखले मदत देऊ शकतात?

◆ चिंता करण्याची गरज नाही असे येशू का म्हणाला?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा