वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w88 ६/१ पृ. १६-२१
  • यहोवावरील भाव समर्पण व बाप्तिस्म्याकडे निरवतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवावरील भाव समर्पण व बाप्तिस्म्याकडे निरवतो
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवावर का भाव ठेवावा?
  • काहीजण यहोवावर का भाव ठेवीत नाही?
  • यहावावरील भाव समर्पणाकडे निरवितो
  • समर्पण ही आणखी एखादी प्रतिज्ञा नाही
  • पाण्याचा बाप्तिस्मा का?
  • बाप्तिस्मा—कोणत्या वर्षी?
  • बाप्तिस्मा आणि देवाबरोबर तुमचा नातेसंबंध
    बायबल नेमके काय शिकवते?
  • तुम्ही यहोवाला समर्पण का केले पाहिजे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • बाप्तिस्मा का घ्यावा?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • तुम्ही बाप्तिस्मा घ्यायला तयार आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
w88 ६/१ पृ. १६-२१

यहोवावरील भाव समर्पण व बाप्तिस्म्याकडे निरवतो

यहोवावरील भाव समर्पण व बाप्तिस्म्याकडे निरवितो. “यहोवावर भाव ठेव व सदाचाराने वाग; भूमीत वस्ती करून राहा, इमानाने चाल.”—स्तोत्रसंहिता ३७:३.

१. जगातील विचारवंतांची कोणती साक्ष दाखविते की मानवी नेत्यांवर भाव ठेवणे व्यर्थतेचे दिसते आहे?

आम्ही कोणावर भाव ठेवावा? मानवी नेते? त्यांचा अहवाल दाखवितो की अपूर्ण मानवावर भाव ठेवणे व्यर्थतेचे आहे. ही वस्तुस्थिति जगातील विचारवंत सुद्धा मानीत आहेत! या करताच व्हिजन या एका युरोपियन व्यापारी मासिकाने म्हटले की, “सध्याच्या परिस्थितीविषयी वाईट ते हे आहे की त्यातून बाहेर निघण्याचा मार्गच कोणालाही दिसत नाही.” याचप्रमाणे रॉबर्ट हेल्ब्रॉनर या अर्थतज्ञ इतिहासकारांनी म्हटले की, “आणखी काही तरी असे आहे ज्याचे कुरतडणे आम्हामध्ये होत आहे. ती आहे अशी एक आशंका, जी सांगते की आम्हावर उन्मळून येत असणाऱ्‍या समस्यांना हाताळू शकणारा ताबेदार कोणीही नाही.”

२. आधुनिक विज्ञानाच्या फायद्यांविषयी काय सांगता येईल?

२ मानवाने विज्ञानाच्या विविध क्षेत्रात प्रगति साधली आहे हे खरे आहे. पण त्याकडून लाभ मिळाला का नाही? तो मिळाला नाही. लुईस ममफोर्ड या लेखकांनी दाखविले: “यांत्रिक व वैज्ञानिक प्रगति सर्वांना समान फायदे देऊ शकेल ही खात्री . . . आता पूर्णतयः असमर्थनीय बनली आहे.” याविषयीचे ठळक प्रकरण आम्लवृष्टिचे आहे. ज्यामुळे तळी व नद्या प्रदुषित होत आहेत व वृक्ष लाखोंनी नष्ट होत आहेत. याशिवाय जगाची सध्याची शोचनीय दशा—गुन्हे, हिंसाचार, दहशतवाद, मादक औषधे व मध्याचा संसर्ग, लैंगिकरित्या संक्रमित होणारे आजार या सर्व गोष्टीत दिसणारी वाढ आणि डळमळती अर्थ व्यवस्था—हे सर्व काही साक्ष देते की मानवी नेत्यांवर आपला भाव ठेवणे निरुपयोगी आहे.

३. आम्ही आपला भाव कोठे ठेवावा याविषयी देवाचे वचन कोणता सल्ला देते?

३ याच्याच अनुषंगाने देवाचे वचन सुद्धा अगदी यथार्थपणे आम्हाला सल्ला देतो: “अधिपतींवर भरवसा ठेवू नका, मनुष्यावर भरवसा ठेवू नका, त्याच्याकडून साहाय्य मिळणे शक्य नाही. त्याचा प्राण जातो, तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो; त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होता.” (स्तोत्रसंहिता १४६:३, ४) जर मनुष्यावर नाही, तर मग कोणावर आम्ही आपला भाव ठेवावा? आम्ही हा भाव स्वर्ग व पृथ्वीच्या निर्मात्यावर ठेवू शकतो; कारण आम्ही वाचतो: “जो पुरुष यहोवावर भाव ठेवितो, ज्याचा भावविषय यहोवा आहे तो धन्य!”—यिर्मया १७:७.

यहोवावर का भाव ठेवावा?

४. यहोवाठायी असणारे महत्वपूर्ण गुण कोणते आहेत व ते आम्हाला त्याजवर भाव ठेवण्याची कोणती सबळ कारणे देतात?

४ यहोवावर भाव ठेवण्याजोगी सबळ कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे त्याच्याठायी असणारे महत्त्वपूर्ण गुण—प्रीती, सुज्ञान, न्याय व सामर्थ्य आणि या सोबत असणारे अद्‌भुत गुण यामुळे आपल्याला त्याजवर भाव ठेवता येईल. त्याचे वचन आम्हाला खात्री देते की तो सर्वशक्‍तीमान आहे, त्याला असणाऱ्‍या पदव्यात “सर्वसमर्थ देव” असाहि किताब आहे. (उत्पत्ती २८:३) खरेच, भाव ठेवण्याजोगा केवढा हा आधार! यहोवाचा प्रतिकार करून कोणीही यशस्वी होऊ शकत नाही आणि कोणीही त्याचे उद्देश धुडकावून लावण्याइतका समर्थ नाही. याशिवाय तो सर्वज्ञ आहे. आरंभ झालेल्या गोष्टीचा अंत त्याला कळतो आणि भविष्य त्याच्यासाठी जणू उघड्या पुस्तकासारखे असले तरी त्याच्यामध्ये सर्व ज्ञान व सूज्ञान वास करते. हे त्याच्या निर्मितीच्या अद्‌भुत गोष्टीद्वारे सिद्ध होते. आपल्या एकाही दळणवळणात त्याने एकहि चूक केली नाही. (यशया ४६:१०; रोमकर ११:३३-३५) यासोबतच, यहोवा पूर्णतयः विश्‍वासपात्र, नीतीमान व विश्‍वासू देव आहे. त्याला खोटे बोलणे शक्य नाही. (अनुवाद ३२:४; तीत १:२; इब्रीयांस ६:१८) यापेक्षाहि अधिक म्हणजे, निस्वार्थ प्रेम हा त्याजमधील सर्वांगपूर्ण गुण असल्यामुळे “देव प्रीती आहे” हे अगदी सार्थपणे म्हणण्यात आहे.—१ योहान ४:८, १६.

५. देवाच्या वचनात असा कोणता अहवाल राखला आहे की जो त्याच्या विश्‍वासपात्रतेची साक्ष देतो?

५ यहोवाने मानवजातीसोबत राखलेल्या दळणवळणाच्या आधारे तो सर्वशक्‍तीमान, सूज्ञानी, न्यायी व प्रेमाचा विश्‍वासपात्र देव आहे हे कळते. त्याच्यावर प्रेम करणाऱ्‍या व त्याच्या आज्ञा पाळणाऱ्‍यांसोबत यहोवा आपला करार राखतो व त्यांच्यावर दया व्यक्‍त करतो हे मोशाने इस्राएलांना आर्जवून सांगितले. (अनुवाद ७:९) या आधी, यहोवाने देवभिरू नोहा व त्याच्या कुटुंबाला मोठ्या जलप्रलयातून वाचविले. त्याचप्रमाणे देवाने धार्मिक लोट व त्याच्या दोन मुलींना सदोम व गमोरावर करण्यात आलेल्या अग्निवृष्टीमुळे घडलेल्या नाशापासून वाचविले. यानंतर देवाने इस्राएलांना मिसरातून बाहेर आणून त्यांना कनान देश दिला व त्याद्वारे अब्राहामास दिलेले अभिवचन त्याने पूर्ण केले. (उत्पत्ती ७:२३; १७:८; १९:१५-२६) याशिवाय, अग्नीच्या भट्टीत टाकण्यात आलेल्या तीन इब्र्यांना आणि दानीएलाला देखील सिंहाच्या गुहेतून यहोवाने सोडविले नव्हते का?—दानिएल ३:२७; ६:२३.

६. यहोवावर भाव ठेवणे चुकीचे नाही याचा कोणता आधुनिक पुरावा आम्हाला आढळतो?

६ यहोवा हा भाव ठेवण्याजोगा देव आहे ही गोष्ट त्याच्या आधुनिक साक्षीदारांच्या अनुभवांकरवी प्रत्ययास येते. उदाहरणार्थ, ॲडोल्फ हिटलरने मोठ्या घमेंडीने म्हटले होते की तो जर्मनीतून यहोवाच्या साक्षीदारांचा “समूह” संपूर्ण काढून टाकील. पण प्रत्यक्षात हिटलर व त्याचा नाझी पक्ष मुळासकट नाहीसा झाला व आज साक्षीदारांचा तो समूह अनेकपटीने वाढून त्यांची संख्या १,१९,०००च्याहि पुढे गेली आहे. खरे म्हणजे, द वॉचटावर आणि त्याच्या सोबतच्या अवेक! मासिकात प्रकाशित झालेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या शेकडे जीवन कथा अत्यंत वक्‍तृत्वपूर्णतेने सांगतात की यहोवा खराच भाव ठेवण्याजोगा देव आहे.

काहीजण यहोवावर का भाव ठेवीत नाही?

७. एका विशिष्ठाने तो, “यहोवाच्या साक्षीदारांमध्ये बघ्यांच्या भूमिकेत आहे” असे का म्हटले?

७ तरीपण आज किती थोडे लोक यहोवावर भाव ठेवतात! त्याचे गुण व त्याची महत्कृत्ये याबद्दल शिकून घेतलेल्या पुष्कळांनी त्याच्यावर भाव प्रदर्शित करण्यात अपयश दाखविले. यु.एस. कॅथोलिक या मासिकातील लेखात (जानेवारी १९७९) यापैकींच्या एका व्यक्‍तिबद्दल म्हणण्यात आले: “एका परिक्षकाने या माणसाच्या धर्मपसंतीबाबत विचारले तेव्हा तो म्हणाला: ‘मला वटते की मी यहोवाच्या साक्षीदारात बघ्याच्या भूमिकेत आहे.’ त्याचा अर्थ विस्तृत करण्यास सांगितला तेव्हा त्याने म्हटले: ‘यहावाचे साक्षीदार मानतात बहुतेक तेच मी मानतो—पण मला त्यात अधिक शिरायचे नाही.’” मासिकाने पुढे म्हटले: “समर्पित असणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारास अधिक खोलवर जाण्याशिवाय दुसरी कोणतीहि निवड नाही.”

८. यहोवाची सेवा करण्यासाठी स्वतःला समाविष्ठ करून घेण्याकरता एखाद्या व्यक्‍तीठायी कोणते मुलभूत गुणधर्म लागतात?

८ काही जणांची अधिक समाविष्ट होण्याची इच्छा का होत नाही? कारण त्यांच्याठायी सुहृदय नाही. एखाद्या व्यक्‍तीने ‘सार्वकालीक जीवनाच्या प्राप्तिसाठी योग्य मनोदय’ राखणे जरूरीचे आहे. (प्रे. कृत्ये १३:४८) पेरणाऱ्‍याच्या दाखल्यात येशूने दाखविले त्याप्रमाणे फलप्राप्ती आणणारे सत्याचे वचन ‘सालस व चांगल्या अंतःकरणात धरून ठेवतात.’ (लूक ८:१५) होय, अप्रमाणिक जणांना सत्य अपीलकारक वाटत नाही. प्रामाणिक अंतःकरण ही त्याची मुलभूत गरज होय. तसेच गर्विष्ठ आहे त्यांना देवाच्या वचनातील सत्य अपीलदायक वाटत नाही. त्यासाठी लीन मनोवृत्तिची जरूरी आहे. (याकोब ४:६) याशिवाय सत्य हे स्वसंतुष्ठ, स्वधार्मिकांना अपीलाचे वाटत नाही. उलटपक्षी, आध्यात्मिक गरजांची जाणीव राखणाऱ्‍यांना, धार्मिकतेसाठी भुकेले व तान्हेले असणाऱ्‍यांना आणि आज जगात घडत असलेल्या अमंगळ गोष्टी बघून शोक व विलाप करणाऱ्‍यांना ते अपील देते.—मत्तय ५:३, ६; यहेज्केल ९:४.

यहावावरील भाव समर्पणाकडे निरवितो

९, १०. (अ) एखाद्या व्यक्‍तीने यहोवावरील भाव ठेवण्याआधी कशाची आवश्‍यकता असते व ज्यांचे अंतःकरण सुस्थितीत आहे ते कसा प्रतिसाद देतात? (ब) अशा व्यक्‍ती कोणावर विश्‍वास ठेवतील?

९ कोणी यहोवावर भाव ठेवण्याआधी त्याने त्याच्याविषयी ऐकण्यास हवे. पण, “ज्याच्यावर त्यांनी विश्‍वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करतील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते कसे विश्‍वास ठेवतील? आणि घोषणा करणाऱ्‍यांवाचून ते कसे ऐकतील?” (रोमकर १०:१४) यहोवाचे सेवक प्रचार करतात तेव्हा सुहृदयी जन त्याला प्रतिसाद देतात. हे त्या प्राचीन थेस्सलनीकातल्या लोकांसारखेच घडते ज्यांनीही प्रतिसाद व्यक्‍त केला होता. त्यांच्यावद्दल पौलाने लिहिले: “तुम्ही आम्हापासून ऐकलेले देवाचे म्हणून स्वीकारले ते माणसांचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले, आणि वास्तविक ते तसेच आहे. ते तुम्ही विश्‍वास ठेवणाऱ्‍यात कार्य करीत आहे.”—१ थेस्सलनीकाकर २:१३.

१० यहोवाबद्दल शिकून घेतल्यावर अशा सुहृदयी जनांना त्याच्याविषयी विश्‍वास वाटू लागतो. हे महत्वाचे आहे कारण “विश्‍वासावाचून त्याला संतोषविणे आशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्‍याने असा विश्‍वास ठेवला पाहिजे की तो आहे. आणि त्याचा शोध झटून करणाऱ्‍यांना तो प्रतिफळ देणारा आहे.” (इब्रीयांस ११:६) याचबरोबर देवाच्या पुत्रावर सुद्धा विश्‍वास व्यक्‍त करणे जरूरीचे आहे. “तारण दुसऱ्‍या कोणाकडून नाही; कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेहि नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही”—होय, ते नाव येशू ख्रिस्ताशिवाय दुसरे कोणतेहि नाही.—प्रे. कृत्ये ४:१२.

११. यहोवावर भाव ठेवल्यामुळे त्या व्यक्‍तीला प्रेषित पेत्राने दिलेला कोणता सल्ला अनुसरण्याची चालना मिळेल?

११ देवाचे वचन, यहोवा व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त यावर भाव प्रदर्शित केल्यामुळे त्या माणसाला, प्रेषित पेत्राने त्याच्या काळातील यहुद्यांना दिलेला सल्ला अनुसरण्याची चालना मिळेल. तो म्हणाला: “तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्‍चाताप करा व वळा, अशासाठी की, विश्रांतीचे समय यहोवाजवळून यावे.” (प्रे. कृत्ये ३:१९) यहोवा देव व त्याच्या गरजा या विषयींच्या ज्ञानप्राप्तीमुळे त्या व्यक्‍तिला कळते की त्याने येशू ख्रिस्ताचा अनुयायी व्हावे अशी देवाची त्याच्या विषयीची इच्छा आहे. पेत्राने याविषयी म्हटले होते: “ह्‍याचकरता तुम्हास पाचारण करण्यात आले आहे, कारण ख्रिस्तानेही तुम्हासाठी दुःख सोशिले आणि तेणेकरून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हाकरता कित्ता घालून दिला आहे.” (१ पेत्र २:२१) यात काय समाविष्ट असते त्याची स्पष्टता करताना येशू म्हणाला: “माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ घेऊन मला अनुसरावे.” (मत्तय १६:२४) याचा अर्थ, यहोवा देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी व शिवाय येशू ख्रिस्ताच्या पावलास अनुसरण्यासाठी देवाला स्वतःचे समर्पण करणे हा होतो.

समर्पण ही आणखी एखादी प्रतिज्ञा नाही

१२. “प्रतिज्ञा” या शब्दाचा वापर ख्रिस्ती धर्मराज्यात बहुधा कसा केला जातो?

१२ ख्रिस्ती धर्मराज्यात “प्रतिज्ञा” ही संज्ञा ख्रिस्ती बनण्याच्या अनुषंगाने वारंवार वापरली जाते. अमेरिकेतील एका सुवार्तिकाने “येशूला व्यक्‍तिगत प्रतिज्ञा करण्याविषयी भर दिला” असे सांगण्यात आले. एका रोमन कॅथोलिक पाळकाने “कॅथलिक धर्मप्रतिज्ञे” बद्दल भाष्य केले. आपल्या राजकीय भूमिकेचे समर्थन करताना एका कॅथोलिक पाळकांनी म्हटले: “राजकारणात शिरणे हे माझ्या (पाळकाच्या) प्रतिज्ञेचे पुढचे पाऊल आहे.” शिवाय व्यापारी कंपन्या “आमच्या ग्राहकांच्या बाबत असणाऱ्‍या आमच्या प्रतिज्ञा” अशी जाहिरात बाजी करतात. वस्तुतः एका व्यक्‍तीला अनेक गोष्टीबद्दल एकाच वेळी प्रतिज्ञा देता येणे शक्य आहे: व्यापारी प्रतिज्ञा, सामाजिक प्रतिज्ञा, राजकीय प्रतिज्ञा व धार्मिक प्रतिज्ञा.

१३. यहोवास केलेल्या समर्पणात कशाचा समावेश असतो?

१३ तथापि, यहोवा देवास केलेले समर्पण ही आणखी एखादी प्रतिज्ञा नव्हे. प्रतिज्ञा याचा अर्थ “भावी काळात काहीतर करण्याचे अभिवचन” हा होतो. पण समर्पण करणे म्हणजे ‘पवित्रकार्य किंवा इश्‍वराच्या भक्‍ति व सेवेसाठी स्वतः होऊन पूर्णपणे वाहून घेणे’ होय. पुष्कळजण समर्पणाऐवजी नुसते अभिवचन देण्याच्या बाबतीत समाधान राखतात. याकारणामुळे अशांचा धर्म जणू निव्वळ पार्श्‍वसंगीतासारखा राहतो. हे संगीत ऐकायला गोड वाटते पण ते ती व्यक्‍ती प्रत्यक्षात जे करण्याची इच्छा धरून असते त्यात अडथळा निर्माण करीत नाही.

१४. यहोवा देवाला निव्वळ प्रतिज्ञा चालत नाही ते का?

१४ देवास केलेले समर्पण त्याच्या इच्छेप्रमाणे करीत राहणे ही गोष्ट जीवनात सर्वात महत्वपूर्ण करते. त्यात येशूने अवतरीत केलेल्या पहिल्या व सर्वोच्च आज्ञाचे पालन करण्याचे त्या विशिष्ठाने जरूरीचे आहे. येशू म्हणाला: “तू, आपला देव यहोवा ह्‍याच्यावर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्‍तीने प्रीती कर.” देवाची सेवा करण्याची श्रेष्ठता सर्वतोपरि केवढ्या महत्वाची आहे ते येशूने जोरदारपणे वदविले. याकरताच तो म्हणाला: “कोणी दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्‍यावर प्रीती करील. अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्‍याला तुच्छ मानील. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही.” (मार्क १२:३०; मत्तय ६:२४) यास्तव हे स्पष्टच आहे की, यहोवाला निव्वळ प्रतिज्ञा चालत नाही.

पाण्याचा बाप्तिस्मा का?

१५. देवावरील विश्‍वासाचे जाहीर प्रकटन करण्यात येशूने कोणते उदाहरण घालून दिले?

१५ देवास करण्यात आलेले समर्पण बाप्तिस्मा घेण्याद्वारे का सूचित करावे? कोणाला यहोवाचे साक्षीदार बनण्याची इच्छा आहे तर याला दुसरा पर्याय नाही. हीच गोष्ट, त्याने स्वतःला ख्रिस्ती, यहोवाचा “विश्‍वासू साक्षी” येशू ख्रिस्त याचा अनुयायी असल्याचे जाहीर करायचे आहे तरीही लागू होते. येशूने या विषयीचा नमुना प्रस्थापित केला कारण त्याचा यार्देन नदीत बाप्तिस्मा झाला. येथे योहान पश्‍चातापी पाप्यांचा बाप्तिस्मा करीत होता त्यामुळे येशूने बाप्तिस्मा घेण्याची का इच्छा करावी हे त्याला समजले नाही, पण येशू त्याला म्हणाला: “आता हे होऊ दे. कारण ह्‍या प्रकारे सर्व धर्माचरण पूर्णपणे करणे हे आपणाला उचित आहे.” (प्रकटीकरण १:५; मत्तय ३:१३-१७) अशा पद्धतीने देवाच्या पुत्राने स्वतःला यहोवास सादर करून आपल्या विश्‍वासाचे जाहीर प्रकटन केले व या द्वारे इश्‍वरी इच्छेप्रमाणे करू इच्छिनाणाऱ्‍यांसाठी उदाहरण घालून दिले.

१६. येशूने बाप्तिस्म्याबद्दल आपल्या अनुयायांना कोणती आज्ञा केली, आणि या आज्ञेचे पालन शिष्यांनी केले की नाही हे कसे दिसते?

१६ या पेक्षा अधिक म्हणजे, स्वर्गात आपल्या पित्याकडे परत जाण्याच्या थोड्याआधी येशूने आपल्या अनुयायांना आज्ञा दिली: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे सर्व काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.” (मत्तय २८:१९, २०) प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातील अहवाल, येशूच्या शिष्यांनी या आज्ञेचे पालन मोठ्या उत्सुकतेने केले असे दाखवितो.—प्रे. कृत्ये २:४०, ४१; ८:१२; ९:१७, १८; १९:५.

१७. पाणी शिंपडणे हा खरा बाप्तिस्मा का ठरू शकता नाही?

१७ यांचा बाप्तिस्मा कसा झाला? ख्रिस्ती धर्मराज्यात बहुतेक ठिकाणी जी प्रथा आहे त्याप्रमाणे त्यांच्यावर पाणी शिंपडून झाला का? निश्‍चितपणे नाही! येशू, बाप्तिस्मा झाल्यावर ‘पाण्यातून वर आला.’ याद्वारे त्याला पाण्यात बुडविण्यात आले होते हे स्पष्ट दिसते. (मार्क १:९, १०) बाप्तिस्म्याचा याशिवाय दुसरा अर्थच होऊ शकत नाही कारण “बाप्तिस्मा” याकरता असणारा शब्द “बुडविणे, आत घुसणे” असा अर्थ देतो.—प्रे. कृत्ये ८:३६-३९.

१८. कोणा व्यक्‍तिने देवास केलेल्या समर्पणाचे बाप्तिस्मा हे योग्य चिन्ह का ठरते?

१८ अशा प्रकारातील बाप्तिस्मा समर्पणाचे योग्य चिन्ह ठरतो. पाण्याखाली जाणे हे त्या व्यक्‍तिच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी मृत होणे असे चित्रित करते. त्याला पाण्यातून वर उचलणे त्याचे नव्या जीवनक्रमणासाठी उत्थान झाले आहे असे दर्शविते. लग्नाचाविधि जसा वधू व वर यांजमध्ये त्यांच्या विवाहीत दशेची कल्पना रूजवितो त्याचप्रमाणे साक्षीदारांसमोर घेतलेला बाप्तिस्मा त्या बाप्तिस्मा घेणाऱ्‍या उमेदवारावर खोलवर छाप पाडतो. हे निःसंशये खरे आहे की, बाप्तिस्मा घेण्याच्या कृतीने, त्या विशिष्ठाला, त्याने यहोवाला केलेले समर्पण त्याच्या मनात घट्टपणे खिळले जाऊन त्याच्या जीवनातील सर्वात महत्वाचा प्रसंग अशी आठवण जतन करून ठेवण्यास साहाय्य दिले पाहिजे. स्वतःच्या ऐवजी आता यहोवा देवाची सेवा करण्याकडे त्याची दिशा बदलली आहे हे तो दर्शवितो.

१९. बाप्तिस्मा घेण्याचे आणखी कारण कोणते?

१९ पाण्याचा बाप्तिस्मा हा, यहोवासोबत चांगला विवेकभाव संपादण्याची पूर्वयाचना असतो याकडे दुर्लक्ष होता कामा नये. हे १ पेत्र ३:२१ मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे, जेथे असे वाचतो: “त्याच्या लाक्षणिक अर्थाने आता बाप्तिस्मा येशू ख्रिस्ताच्या पुनरूत्थानाच्याद्वारे तुमचे तारण करीत आहे. त्याचा अर्थ केवळ देहाचा मळ धुऊन टाकणे नव्हे, तर शुद्ध विवेकासाठी देवाकडे विनंति करणे असा आहे.”

बाप्तिस्मा—कोणत्या वर्षी?

२०. बालके बाप्तिस्मा घेण्याच्या पात्रतेची का ठरू शकत नाहीत?

२० मत्तय २८:१९, २० मधील येशूचे शब्द दाखवितात की, ज्यांना त्याचे शिष्य करण्यात आले आहे अशांचा बाप्तिस्मा व्हावा. तद्वत, हे स्पष्ट आहे की बाळके वा लहान मुले बाप्तिस्म्याविषयक शास्त्रवचनीय गरजा पुऱ्‍या करू शकत नाही. बाळकाला देवाचे वचन, निर्माणकर्ता व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त यांजवरिला विश्‍वास जोपास्ता येत नाही. पवित्र आत्मा देवाची क्रियाशील शक्‍ती आहे हे बाळकाला समजत नाही. शिवाय ते पूर्वीच्या पापांबद्दल पश्‍चताप व्यक्‍त करून देवाच्या इच्छेप्रमाणे करण्याचा निश्‍चयी करार करू शकत नाही.

२१. युवकांनी बाप्तिस्मा घेणे साजेसे आहे का?

२१ तरीपण असे दिसते की यहोवाच्या लोकांपैकी काहींनी पराकोटीची दुसरी बाजू धरली. कित्येक ख्रिस्ती पालक आपली मुले अठरा एकोणीस वर्षे वयाची होईपर्यंत त्यांच्यापुढे बाप्तिस्म्याचा विषयच काढीत नाही. वेळोवेळी आम्ही, युवक आपल्या स्वतःच्या मर्जीने योग्य स्वरूपाचे समर्पण करीत असल्याचे ऐकतो. उदाहरणार्थ, एका वडीलाच्या ११-१२ वर्षे वयाच्या मुलाला, बाप्तिस्मा घ्यावा असे प्रामाणिकपणे वाटत होते. याकरताच बापाने इतर तीन वडीलांना त्या मुलासोबत, बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाऱ्‍यांसाठी जी प्रश्‍नावली घेण्यात येते त्याची चर्चा करण्याची विनंती केली.a निर्वाळा हा निघाला की, तो खूप तरुण असला तरी बाप्तिस्मा घेतलेला यहोवा देवाचा नियुक्‍त उपाध्याय होण्यास पात्र आहे. बहामा येथे नुकत्याच झालेल्या पायनियर सर्विस स्कूलसाठी पूर्ण वेळेच्या दांपत्याची दहा वर्षे वयाची बाप्तिस्मा घेतलेली मुलगी सुद्धा हजर होती!

२२. पालकांनी आपल्या मुलात ख्रिस्ती व्यक्‍तीमत्व उभारल्यास त्यांच्याबाबतीत त्यांना काय अपेक्षा धरता येईल?

२२ तथापि काही पालक याबाबतीत मागे पडत आहेत. ते आपल्या मुलात ख्रिस्ती व्यक्‍तिमत्वाची उभारणी करण्यासाठी ‘अग्नि प्रतिबंधक साहित्या’चा केवढ्या प्रमाणात वापर करीत आहेत? (१ करिंथकर ३:१०-१५) हे करण्यासाठी प्रथमः पालकांनी स्वतःच्या जीवनात यहोवाच्या शुद्ध भक्‍तीस सर्वात महत्वाचे स्थान दिले पाहिजे. याचसोबत अनुवाद ६:६, ७ व इफिसकर ६:४ मधील सुंदर सल्ल्याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे. याचा परिणाम असा होईल की त्यांना आपल्या मुलांना नंतर शिक्षण देण्याची गरज भासण्यापेक्षा त्यांना लवकरात लवकर घाईने बाप्तिस्मा घेण्यापासून प्रतिबंध घालता येईल.

२३. एखाद्याने समर्पण व बाप्तिस्म्याचा टप्पा गाठल्यावर पुढे काय?

२३ समर्पण व बाप्तिस्म्याद्वारे यहोवावरील आपला भाव एखाद्याने प्रदर्शित केल्यावर हा भाव सतत दाखविण्याचे त्याने चालू ठेवले पाहिजे. यापुढील लेख, “यहोवाचे भावपूर्ण सहकारी या अर्थाने सेवा करणे” त्यात काय काय समाविष्ट आहे ते ओळखण्यास आपल्याल्या मदत देईल.

[तळटीपा]

a यहोवाचे साक्षीदार या अर्थी बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाऱ्‍यांनी ज्या प्रश्‍नांची उत्तरे द्यावयाची असतात त्यांचा क्रम ऑर्गनायझ्ड टू अकम्प्लीश आवर मिनिस्ट्री या पुस्तकात आहे. हे पुस्तक बाप्तिस्मा घेण्याची तयारी करणाऱ्‍यांना दिले जाते.

तुम्ही कसा प्रतिसाद द्याल?

◻ मानवावर आपला भाव ठेवण्याची व्यर्थता कोणती वस्तुस्थिति ठळकपणे सामोरी आणते?

◻ यहोवाचे गुण व त्याचे दळणवळण त्याच्यावर भाव ठेवण्याची सबळ कारणे का देतात?

◻ यहोवावर भाव ठेवण्यात कोणा प्रतिज्ञेची नव्हे तर समर्पणाची जरूरी का आहे?

◻ पालक आपल्या मुलांमध्ये आधीपासूनच यहोवास समर्पण करण्याची इच्छा कशी रूजवू शकतील?

[१६ पानांवरील चित्रं]

यहोवावर, थोर मुक्‍तिदाता या अर्थाने आमचा भाव ठेवता येईल

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा