देवाचे न्यायदंड घोषित झालेच पाहिजे
“ऊठ, मी तुला आज्ञापितो ते सर्व त्यांना सांग, त्यांस घाबरू नको.”—यिर्मया १:१७.
१. यहोवाच्या साक्षीदारांनी नाझी जर्मनीमध्ये कसा ‘आपला उजेड पाडला’?
“यहोवाच्या साक्षीदारांच्या इतिहासात छळामध्ये होलोकास्ट किंगडम (नाझी जर्मनी) तील छळाने आपली भर टाकली आहे.” (होलोकास्ट स्टडीज ॲन्युअल, खंड २, होलोकास्टबद्दल चर्चचा प्रतिसाद) डेली न्यूज या दक्षिण आफ्रिकेतील दैनिकाच्या जुलै १५, १९३९च्या अंकात देखील जर्मन साक्षीदारांबद्दल सांगण्यात आले होते: “कधीही लुकलुकत नाही अशा दिव्याप्रमाणे ख्रिस्ती पुरुष व स्त्रियांच्या या छोट्या गटाने विश्वासाने आपली स्थैर्यता टिकविली. ही गोष्ट म्युनिचच्या बादशहास (अडॉल्फ हिटलर) काट्याप्रमाणे बोचत होती व तीच त्यांच्या मर्त्यपणास एक जिवंत साक्ष होती.” हे शब्द आम्हाला येशूच्या त्या शब्दांचे स्मरण देतात जे त्याने आपल्या शिष्यांना संबोधून म्हटले होते की ते “जगाचा प्रकाश” असतील व त्यांचा उजेड जगासमोर कसल्याही परिस्थितीत चकाकत राहील.—मत्तय ५:११, १२, १४-१६.
२, ३. श्रीलंकेत निर्भिड प्रचाराविषयीचे कोणते उदाहरण धडले?
२ दहशतवाद्यांनी छिन्नविच्छिन्न बनलेला श्रीलंकेत डेव्हिड गुणरत्नम या तरुण तामिळ साक्षीदाराचे वृत्त आढळते ज्याने यिर्मयाप्रमाणेच खरेपणाने लष्करी अधिकाऱ्यांना मोठ्या निर्भिडपणे साक्ष दिली. त्याला इतर काही लोकांसोबत चौकशीसाठी आणण्यात आले होते. अहवाल म्हणतो: “अधिकारी व त्यांच्यासोबतीची माणसे याच्या विद्वत्तेमुळे तसेच त्याचा प्रामाणिकपणा व खासपणे, ‘माझी जरी कोणा दहशतवाद्यांबरोबर गाठ पडली तरी त्यांना हाच प्रचार करीन’ हे त्याचे निर्भिड विधान यामुळे अत्यंत स्तंभित झाले.”
३ अगदी त्याच रात्री दहशतवाद्यांनी त्याच्या घरी येऊन त्याला पळवून नेले. त्याचे लष्करासोबत संगनमत आहे असा त्यांनी आरोप केला. त्याने आपली तटस्थता जाहीर केली व म्हटले की तो त्यांना देवाच्या राज्याविषयीचा प्रचार करत होता. “मी देवाचे काम करीत आहे व तेच करीत राहणार. ऐकणारे कोणत्याहि पार्श्वभूमीचे असले तरी मी त्यांना प्रचार करतो.” या निर्भिड साक्षीदाराला त्या दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केले व मागे त्याचे तरुण विधवा पत्नी व छोटे बाळ सोडले.—पडताळा प्रे. कृत्ये ७:५१-६०.
४. एका लॅटिन अमेरिकन देशात धर्म पुढाऱ्यांनी समंती दिलेला यहोवाच्या साक्षीदारांचा कोणता छळ झाला?
४ एक लॅटिन अमेरिकन देशात यहोवाच्या साक्षीदारांचा होणारा छळ कॅथोलिक व प्रेसबिटेरियन धर्मपुढाऱ्यांना मान्यवर वाटतो, त्या देशातील हा अहवाल आहे. “सैनिकांच्या ताब्यात पाच यहोवाचे साक्षीदार होते . . . त्यांना वेळोवेळी मारहाण करण्यात येई व अन्नाविना एकांतात टाकून दिले जाई. आमच्या दलातील एक अधिकारी जे विशिष्ट तत्वे मनावर बिंबविण्याचे काम करीत त्यांनी या साक्षीदारांना ते इतर सैनिकाना प्रचार करीत म्हणून शिक्षा केली. ते म्हणाले की, धार्मिक मतभेद असणाऱ्या इतर सर्वांपेक्षा यहोवाचे साक्षीदार खूप धोकादायक आहे.”
हेतु व प्रतिक्रिया
५. यिर्मयाच्या बाबतीत होते त्याप्रमाणे साक्षीदारांच्या छळामागे बहुधा काय असते?
५ होय, यिर्मयाचा जसा त्याच्या काळातील धर्म व राजकीय अधिकाऱ्यांमार्फत छळ झाला तसेच आज यहोवाच्या साक्षीदारांचा याच घटकांमार्फत जागतिकपणे छळ होत आहे. अशा हा हालचालीमाघे कोणता हेतु असतो? साक्षीदार तर वसाहतीतील अत्यंत शांतीप्रिय व कायद्यांचे पालन करणारे नागरिक आहेत तरीही त्यांच्या शत्रूंना देवाचे वचन धोकादायक वाटते. कारण देवाच्या राजाच्या त्यातील संदेशाविषयी त्यांना घृणा वाटते व ते त्याचा धिक्कार करतात. साक्षीदारांचा विना हातमिळवणीचा प्रचार व तत्वे सैतानी व्यवस्थेच्या राजकरणी, व्यापारी व धर्म घटकांचा स्वार्थीपणा व दुटप्पीपणा उघड करतो.—योहान १५:१८, १९; १ योहान ५:१९.
६. यहोवाच्या साक्षीदारांनी छळाबद्दल कोणती प्रतिक्रिया दर्शविली?
६ तथापि, तुरुंगवास, मारहाण आणि मृत्युसुद्धा असला तरी यहोवाच्या साक्षीदारांनी जागतिकपणे प्राचीन यिर्मयासारखी आपली प्रतिक्रिया दर्शविली. प्रेम व चातुर्य व्यक्त करण्यासोबतच त्यांनी राष्ट्रांना देवाच्या अप्रिय न्यायदंडांची घोषणा करणे चालू ठेवले. (२ तिमथ्यी २:२३-२६) आपण माणसांपेक्षा देवाची आज्ञा अधिकपणे मानली पाहिजे हे त्यांना ठाऊक आहे. (प्रे. कृत्ये ४:१९, २०; ५:२९) पौलाने इब्रीकरांना दिलेला सल्ला, म्हणजेच देवाच्या इच्छेप्रमाणे करीत राहण्यात टिकून राहणे, हे त्यांना माहीत आहे. यामुळेच त्यांना अभिवचनाची पूर्ति म्हणजे सार्वकालिक जीवन पहावयास मिळेल. या कारणास्तव, पौल व यिर्मयाप्रमाणे आम्हाला म्हणता आले पाहिजे: “नाश होईल अशी माघार घेणाऱ्यांपैकी आपण नाही तर जिवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहोत.”—इब्रीयांस १०:३५-३९.
आधुनिक यिर्मया ख्रिस्ती धर्मराज्यास उघड करतो
७. विसाव्या शतकातील साक्षीदारांनी, इस्राएल व यहुदाकडे पाठविलेल्या यहोवाच्या विश्वासू संदेष्ट्याचे उदाहरण कसे अनुसरले?
७ यहोवा आपल्या संदेष्ट्यांना इस्राएल व यहुदाकडे पाठवीत राहिला त्याप्रमाणेच त्याने आपल्या साक्षीदारांना त्याच्या भावी दंडाज्ञेचा विषय बजावून सांगण्यासाठी पाठविले आहे. (यिर्मया ७:२५, २६; २५:४, ८, ९) आध्यात्मिक तजेला भरविणाऱ्या १९१९ या वर्षापासून खासपणे ख्रिस्ताच्या बंधूच्या अभिषिक्त शेषांनी देवाचे न्यायदंड, विनाशाचा प्रबळ संदेश अगदी निर्भिडपणे ख्रिस्ती धर्मजगतास घोषित केला. (पडताळा यिर्मया ११:९-१३.) त्या वर्षी द गोल्डन एज या मासिकाचा प्रारंभ झाला. कितीतरी वर्षापासून आपल्या बदलत्या शिर्षकाद्वारे, कोन्सोलेशन (१९३७) व अवेक! (१९४६), त्याने ख्रिस्ती धर्मजगाच्या लबाड्या व त्याचा दिखाऊ ख्रिस्तीधर्म यांस उघड केले.
८, ९. (अ) १९२२ मध्ये चर्चेसवर दोषारोप का केला गेला? (ब) त्यांच्यासाठी कोणता विनाश भाकित करण्यात आला?
८ उदाहरणार्थ, ऑक्टोबर ११, १९२२ च्या गोल्डन एज याने खोट्या धर्माच्या या भाषेत धिक्कारले: “विविध पंथीय चर्च संघटना, त्यांचे पाळक, त्यांचे नेते व त्यांचे पाठीराखे याकरवी पृथ्वीतील व्यवस्था राखून ठेवण्याचे व तिची पुनर्स्थापना करण्याचे सर्व प्रयत्न . . . निश्चितार्थाने फोल ठरणार, कारण या गोष्टी मशीहाच्या राज्याचा भाग नाहीत. (पहिल्या) जागतिक युद्धात तर विविध चर्च पंथीयांचे पाळक प्रभु येशू ख्रिस्तास बेईमान झाले आहेत ते या प्रकारे दिसले की त्यांनी जागतिक युद्ध घडावे यासाठी मोठमोठ्या राजकीय मुत्सद्यांना व मोठ्या व्यवसायिकांना चुकीने एकत्र आणले.”
९ तो निषेध आणखी पुढे म्हणतो: “आपल्या प्रभूस व त्याच्या राज्यास त्यांनी नाकारले आहे हे त्यांनी स्वतःला सैतानाच्या संघटनेसोबत स्वेच्छेने एकत्र आणून सर्व जगाला ही घोषणा केली की लीग ऑफ नेशन्स हा देवाच्या राज्याचा पृथ्वीवरील राजकीय प्रवक्ता आहे.” सरतेशेवटी “विपत्ती” किंवा न्यायाचा संदेश आला: “आता पृथ्वीच्या राष्ट्रांवर, येशू ख्रिस्ताने म्हटलेले, ‘जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही असे मोठे संकट’ सामोरे उभे असून ते कोसळणार आहे.”
१०. कोणता दोषारोप १९२६ मध्ये करण्यात आला?
१० यिर्मया वर्गाची भूमिका वॉचटावर मासिक, पुस्तिका व पुस्तकांद्वारे अधिक विस्तृत करण्यात आली. उदाहरणार्थ, १९२३ मध्ये डिलिव्हरन्स या पुस्तकाने ख्रिस्ती धर्म राज्याच्या दिशाभूल करणाऱ्या शिक्षणाला अगदी जोरदारपणे उघड केले. त्यातील २०३ पृष्ठावर असे म्हणण्यात आले: “खोट्या तत्त्वांचा प्रस्ताव अगदी मुक्तपणे [धर्मत्यागी ख्रिस्तीधर्मराज्यात] करण्यात आला व त्यांनी सत्याची जागा बळकावून घेतली. या तत्वप्रणालीत त्र्येक, जीवाचे अमरत्व, दुष्टांना चिरकालिक यातना, पाळकांचा देवप्रणीत अधीकार आणि राजांचा राज्य करण्याचा दैवी अधिकार ही तत्वे समाविष्ठ आहेत. काही काळातच येशू बाळाची आई मरिया हिच्याविषयी पूज्य भावना उभारली गेली व लोकांना तिची देवाची आई या अर्थी भक्ती करण्याचे सांगण्यात आले.”
फुटीर ख्रिस्तीधर्मराज्याला ताकीद
११, १२. (अ) धर्मपुढाऱ्यांची अतटस्थ भूमिका कशी उघड करण्यात आली? (ब) यिर्मया वर्गाने कोणता इशारा दिला?
११ त्याच प्रकाशनाने पाळकांनी युद्धामध्ये दिलेला सहभाग उघड करून म्हटले: “विविध धर्मपंथाच्या पाळकांनी व्यापारी व राजकीय सूत्रांकरवी पुढे पाठविलेल्या सैन्यावर आशीर्वाद दिले. हा आशीर्वाद सैन्याचा लढणारा पक्ष विचारात न घेता बहाल करण्यात आला. लढणाऱ्या दोन्ही प्रतिपक्षावर एकाच देवाने आशीर्वाद द्यावा अशी पाळकांनी ढोंगीपणात प्रार्थना केली.” पडताळा यिर्मया ७:३१.) या नंतर सामोरा असणारा न्यायदंड घोषित करण्यात आला: “हे सर्व घटक मिळून तयार होणारा सैतानी संघटनेचा दृश्य भाग आला हर्मगिदोनाच्या मोठ्या लढाईसाठी सुसज्जित होत आहे.”—प्रकटीकरण १६:१४-१६.
१२ यिर्मयाच्या काळी तेव्हाचे नेते आम्ही सुरक्षित आहोत व देवासोबत शांतीसंबंध जोडून आहोत असे म्हणत होते त्याचाप्रमाणे, “हे धर्माधिकारी सुरक्षित असल्याचे व ख्रिस्ताचे नाव घेत राहण्याचे प्रतिपादन करणारे पण त्याचवेळेला दियाबलाच्या अग्नीसोबत खेळत असल्याचे प्रदर्शित करीत आहे. स्वतःच्या तसेच आपल्या लोकांच्या डोळ्यात धूळ घालून वास्तवतेकडे ते डोळेझाक करीत आहेत.” (डिलिव्हरेन्स, पुष्ठ २७०) त्यांची स्वफसवणूक त्या काळी पवित्र शास्त्र विद्यार्थी याप्रकारे ज्ञात असणाऱ्या आवेशी यहोवाच्या साक्षीदारांनी उघड केली.—मत्तय ७:२१-२३.
१३. कोणती घटना १९३१ मध्ये घडली व ती का योग्य होती?
१३ काळ गेला तसे हे पवित्र शास्त्र विद्यार्थी यिर्मयाच्या ओळखीसोबत अधिक सुपरिचित झाले. १९३१ मध्ये अमेरिकेत कोलंबस, आहायो येथील अधिवेशनात, या धैर्यशील ख्रिश्चनांच्या गटास “यहोवाचे साक्षीदार” या पवित्र शास्त्रीय नावाने ओळखले जावे असे घोषित करण्यात आले. (यशया ४३:१०-१२) हे नाव मागे इ.स. पूर्वी ८व्या शतकात यहोवाने इस्राएलांना लागू केले त्यावेळी सामोरे आले. तद्वत, सुमारे १०० वर्षानी यिर्मयाने संदेष्टा या नात्याने सेवा सुरू केली तेव्हा तो सुद्धा यहोवाचा साक्षीदार होता. (यिर्मया १६:२१) त्याचप्रमाणे येशू सुद्धा यहुदी या नात्याने पृथ्वीवर होता तेव्हा तो देखील त्याचा पिता यहोवा त्याचा साक्षीदार होता. (योहान १७:२५, २६; प्रकटीकरण १:५; ३:१४) या कारणास्तव देवाच्या नियुक्त समयी त्याच्या लोकांनी “यहोवाचे साक्षीदार” या इश्वरप्रणीत नावास लायक व्हावे हे अगदी साजेसे आहे.—योहान १७:६, ११, १२.
ख्रिस्तीधर्मराज्याचा मुखवटा काढण्यात आला
१४. गेल्या ७० वर्षात ख्रिस्ती धर्मराज्यास कसे उघड करण्यात आले?
१४ गेल्या सात दशकात, यहोवाच्या येत असलेल्या राज्याविषयीची वैभवी आशा घोषित करण्यासोबत यहोवाच्या साक्षीदारांनी धिक्कार व न्याय यांच्या खऱ्या पुराने जगास वेष्टिले. पवित्र शास्त्र आधारीत प्रकाशनांच्या स्पष्ट व टोला देणाऱ्या साहित्याचाय लाखो प्रतींद्वारे त्यांनी ख्रिस्तीधर्मराज्य हा प्रकटीकरण पुस्तकातील १७ व १८ अध्यायात धिक्कारलेल्या “मोठी बाबेल” या धर्म वेश्येचे अत्यंत प्रभावकारी बळ आहे असे उघड केले.—पहा “बाबेलोन दे ग्रेट हॅज फॉलन!” गॉड्स किंगडम रूल्स! पृष्ठे ५७६-६१५, हे पुस्तक १९६३ मध्ये वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क, इन्का. तर्फे प्रकाशित करण्यात आले.
१५. १९५५ मध्ये ख्रिस्ती धर्म राज्यास कसे उघड करण्यात आले?
१५ यहोवाच्या साक्षीदारांनी १९५५ मध्ये ख्रिश्चनडम ऑर ख्रिश्चानिटी—वीच वन इज “द लाइट ऑफ द वर्ल्ड”? या पुस्तिकेच्या लाखो प्रतींचे वाटप केले. हजारो प्रती तर थेटपणे ख्रिस्तीधर्मराज्याच्या पाळकवर्गास वितरीत झाल्या. या पुस्तिकेने त्यांना काय सांगितले? यिर्मयाच्या भूमिकेच्या खऱ्या अर्थाने तिने म्हटले: “ख्रिस्तीधर्मराज्य हा त्याच्या मार्गाकरवी आर्थिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या व लष्करी दृष्टा पुढे गेला असला तरी त्याला स्वतःच्या बाबतील ‘जगाचा प्रकाश’ असे सिद्ध करता आले नाही. ते का? . . . तो (पवित्र शास्त्राचा) ख्रिस्ती धर्म आचरीत नाही व त्याचा प्रचार करीत नाही.” त्यानंतर हा प्रश्न विचारला गेला: “खोट्या धर्मास उघड करणे ही गोष्ट त्याच्या पुरस्कर्त्यांना छळाप्रमाणे वाटावी का? हा ख्रिस्तेत्तर असा फाजील धर्माभिमान आहे का?”
१६. ख्रिस्ती धर्मराज्यास अशाप्रकारे उघड करून दाखविणे हा साक्षीदारांचा फाजील धर्माभिमान होता का? विवेचीत करा.
१६ त्याचे उत्तर होते: “नाही. तसे असते तर येशू ख्रिस्त हा यहुद्यांचा छळकर्ता व फाजील धर्माभिमान बाळगणारा ठरला असता . . . आणि येशूच्या आधीचे (यिर्मयासोबत) प्राचीन काळातील यहोवाचे सर्व संदेष्टे देखील छळकर्ते व धर्माभिमान बाळगणारे झाले असते. कारण या सर्वांनी धर्मत्यागी यहुदी व मूर्तीपूजक राष्ट्रांच्या खोट्या धर्मास उघड केले.” खरे म्हणजे, खऱ्या ख्रिश्चनांना जर “जगाचा प्रकाश” व्हावयाचे आहे तर मग आध्यात्मिक “काळोख” त्यांनी उघड केलाच पाहिजे. (२ करिंथकर ६:१४-१७) याचा अर्थ विशिष्टांवर नव्हे तर ज्या व्यवस्थेने त्याना जखडून ठेवले आहे त्यावर हल्ला करणे असा आहे. यालाच अनुलक्षून यहोवाने यिर्मयाला आज्ञा केली होती: “‘तू तर आपली कंबर कस. उठ, मी तुला आज्ञापितो ते सर्व त्यांना सांग. त्यांस घाबरू नको. . . . ते तुजबरोबर सामना करतील पण तुजवर त्यांचा वरचष्मा होणार नाही. कारण तुझा बचाव करण्यास मी तुजबरोबर आहे’ असे यहोवा म्हणतो.”—यिर्मया १:१७, १९.
यिर्मयाचे काम पूर्ण होते
१७, १८. (अ) अलिकडील वर्षात यहोवाच्या साक्षीदारांनी यिर्मयाचे कार्य कसे पुढे चालू ठेवले? (ब) प्रामाणिक जनांस कोणती सूचना सादर करण्यात आली?
१७ यहोवाच्या साक्षीदारांनी देवाच्या न्यायदंडाची तीव्रता कमी केली आहे का? हे खरे की आज आम्ही युगात राहात आहोत जेव्हा की इतर धर्माबद्दल टीका करू नये असे मानले जाते. तरीपण यहोवाचे साक्षीदारांच्या प्रकाशनात ख्रिस्ती धर्मराज्याविषयीचा न्यायाचा संदेश नेहमीप्रमाणेच वदविला जात आहे. उदाहरणार्थ, गेल्या चार वर्षात यहोवाच्या साक्षीदारांनी यु कॅन लिव्ह फॉरएव्हर इन पॅराडाईज ऑन अर्थ् या पुस्तकाच्या ७६ भाषेत ३ कोटी २० लाख प्रतींचे वाटप केले. या प्रकाशनात सध्याच्या विविध प्रश्नांची जसे की, “मृत्युसमयी काय होते?” “देवाने दुष्टाईस का अनुमति दिली आहे?” आणि “खऱ्या धर्माची ओळख पटवून घेणे” यांची उत्तरे दिली आहेत. पण हेच प्रकाशन त्यासोबत खोट्या धर्माच्या जगव्याप्त साम्राज्यविषयीचा सुद्धा स्पष्ट इशारा देते.
१८ “सैतानी जगासाठी की देवाच्या नव्या व्यवस्थेसाठी?” हे शीर्षक असणाऱ्या २५व्या अध्यायात म्हटले आहे: “पवित्र शास्त्रात खोटा धर्म ‘मोठी कळवंतीण’ किंवा वेश्या या अर्थी चित्रित करण्यात आला आहे व त्याला ‘मोठी बाबेल’ असे नाव दिलेले आहे. . . . शिवाय सबंध इतिहासात धर्म हा राजकारणी गोष्टी समवेत जडून राहिलेला आहे व त्यानेच सरकारला काय करावे याचे बहुधा मार्गदर्शन दिले आहे ही वस्तुस्थिती राहिली आहे.” तेव्हा हे पुस्तक कोणते मार्गाक्रमण चोखाळावे असे सांगते? ते विचारते: “सैतानी जगाचे भागीदार होण्याची तुमची इच्छा आहे का? किंवा तुम्ही देवाच्या नव्या व्यवस्थेसाठी आहात? तुम्ही देवाच्या नव्या व्यवस्थेसाठी असाल तर मग जगापासून व त्याच्या खोट्या धर्मापासून स्वतःला वेगळे राखाल. ‘माझ्या लोकांनो तुम्ही तिच्यातून (मोठी बाबेल) निघा.’ (प्रकटीकरण १८:४) या आज्ञेकडे तुम्ही लक्ष द्याल.”
१९. या अलिकडील काळात सुद्धा आधुनिक यिर्मयाचा आवाज बंद झाला नाही हे तुम्हास कसे दाखविता येईल?
१९ विभागणी व न्याय याचा हा स्पष्ट संदेश वर्ल्डवाईड सेक्युरिटी अंडर द “प्रीन्स ऑफ पीस” या पुस्तकात निनादत आहे. (हे पुस्तक १९८६ मध्ये प्रकाशित झाले असून त्याच्या २५ भाषेत ६० लाख प्रती वितरीत झाल्या आहेत.) पहिल्या जागतिक महायुद्धात ख्रिस्ती धर्म राज्यातील धर्मपुढाऱ्यांनी “तरुणांनी युद्ध क्षेत्रात जावे असा प्रचार केला” हे ते उघड करते. ते पुढे म्हणते: “ख्रिस्ती धर्मराज्याने आज तागायत सर्वसमर्थ देवासोबत वैर राखले आहे. त्याला इश्वरी संरक्षण नाही व या महत्त्वपूर्ण कारणामुळे त्याचे अस्तित्व डळमळीत राहिले आहे.” (पहा, पृष्ठ ३०-२.) आधुनिक काळच्या यिर्मयाचा आवाज बंद झालेला नाही! देवाच्या नायादंडाचा प्रचार उधळून लावण्यासाठी धर्मपुढारी व राजकारणी लोकांनी प्रयत्न राखले तरी त्याचे विश्वासू साक्षीदार पुढे जात आहेत. इशारा देण्याचे काम पूर्ण करण्याचा त्यांचा निर्धार आहे.—यिर्मया १८:१८.
२०. यहोवाचे न्यायदंड राष्ट्रांना घोषित करण्याचे यहोवाचे साक्षीदार का पुढे चालू ठेवतील?
२० पण हे काम का पुरे झाले पाहिजे? कारण जिवंत असा विश्वाचा सार्वभौम प्रभु यहोवा याला राष्ट्रे व त्यांचे धर्म यांच्याकडून जाब मागायचा आहे. जसे यहोवाने त्या फसव्या यहुदा आणि यरूशलेमास विचारले होते त्याचप्रमाणे आजच्या ख्रिस्ती धर्मराज्याला सुद्धा हे विचारणे संयुक्तिक आहे: “यहोवा म्हणतो: ‘याबद्दल मी नाही का समाचार घेणार? माझा आत्मा या असल्या राष्ट्रांचे पारिपत्य नाही का करणार?’” या कारणास्तव यहोवाचे साक्षीदार राष्ट्रातील लोकांच्या भेटी घेण्याचे चालू ठेवतील व त्यांना संदेश देतील जो बहुतेकांना अप्रिय न्यायदंडासारखा वाटेल, पण तेच थोडक्यांसाठी आनंदविणारी सुवार्ता—देवाच्या राज्याची सुवार्ता—असा असेल.—यिर्मया ५:९, २९; ९:९ प्रे. कृत्ये ८:४, १२.
२१. विपत्ती भाकित करण्यात आलेली असली तरी जे यिर्मयाच्या कामाकडे लक्ष देतात त्यांच्यापुढे कोणती मोठी आशा आहे? (स्तोत्रसंहिता ३७:९, ११, १८, १९, २८, २९)
२१ यिर्मयाला बहुधा ‘विपत्ती घडविणारा संदेष्टा’ असे म्हणण्यात येत असले तरी त्याच्या संदेशाने यहुद्यांना आशायुक्त किरण दिले हे खरे आहे. (यिर्मया २३:५, ६; ३१:१६, १७) त्याचप्रमाणे यहोवाचे साक्षीदार देवाच्या हर्मगिदोनातील न्यायदंडासमवेत समीप असलेल्या “मोठ्या संकटा”ची घोषणा वदवीत असले तरी ज्याद्वारे या ग्रहावर न्याय व नंदनवनाची पुनर्स्थापना होऊन लोकांना सार्वकालिक जीवन मिळेल त्या “नवे आकाश व नवी पृथ्वी”च्या आशीर्वादांचीही ते घोषना करीत आहेत. (मत्तय २४:२१, २२; प्रकटीकरण १६:१६; २१:१-४) त्यामुळे यहोवाच्या न्यायी संदेशाचे आता श्रवण करण्याची वेळ असून यिर्मयाचे भव्य कार्य संपुष्टात आणण्याचे सहकार्य देण्याची जरूरी आहे.—पडताळा यिर्मया ३८:७-१३.
तुम्हाला आठवते का?
◻ यिर्मयाप्रमाणे यहोवाच्या साक्षीदारांचा कसा छळ होत आहे?
◻ साक्षीदार पराकाष्ठेने प्रचार का करतात?
◻ यिर्मयाचे कार्य कसे वाढले आहे?
◻ निषेध कार्यात बदल झालेला नाही हे कोणत्या अलीकडील उदाहणांवरून दिसते?
◻ विनाशाचा संदेश असला तरी कोणती आशा सामोरी धरण्यात येत आहे?
[१२ पानांवरील चित्रं]
काही काळातच मरीया हिच्याविषयी पूज्य भावना उभारली गेली व लोकांना तिची “देवाची आई” या अर्थी भक्ती करण्याचे सांगण्यात आले”
[१३ पानांवरील चित्रं]
१९३१ मध्ये पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांनी त्यांच्या कोलंबस ओहायो येथील अधिवेशनात “यहोवाचे साक्षीदार” या नावाचा स्विकार केला
[१४ पानांवरील चित्रं]
यहोवाचे साक्षीदार जगभरात यिर्मयाचे उदाहरण अनुसरत आहेत