सुबत्तेच्या काळातील प्राणघातक दुष्काळ
माझे (स्वतःचे) सेवक खातील, पण तुम्ही उपाशी राहाल.”—यशया ६५:१३.
१, २. (अ) कोणत्या समस्येशी राष्ट्रे व्यर्थ झगडत आहेत? (ब) कोणत्या वास्तविक आशेस पवित्रशास्त्र स्पष्टपणे मांडते?
दुष्काळाचे भयानक दृश्य सबंध जगावर तरंगत आहे! अति कठीण समयांबद्दल भाष्य करतांना, द बॉस्टन ग्लोब या अमेरिकन वर्तमान पत्राचे संपादकीय स्तंभलेखात म्हटले आहे: “असे जग, ज्यात जवळजवळ एक महापज्ञापेक्षा अधीक व्यक्ति भूकेस बळी पडतात अशास जी अती गरीब राष्ट्रे त्यांना काही तरी मजा मारता यावी म्हणून धनीक कमाईतून काहीं तरी मदत पुरविण्याचे मार्ग शोधावे लागतात.” तथापि, तंत्रविद्येत पुढारलेले म्हणविणाऱ्या राष्ट्रांनाहि अन्न टंचाई पटयांतून पूर्णपणे वगळण्याचा दावा करता येणार नाही. आपल्या सबंध प्रजेला भरवू शकू असा कार्यक्रम आखण्यात तेहि निष्क्रीय पडले. यामुळे ज्या सर्व समस्या वाढतच आहे त्यांचे निर्मूल न करण्याचा मानवी हितैक्य साधक प्रयत्न करतात. काही उपाय आहे?
२ वर दिलेला संपादकीय लेख हे कबुल करतो की “आम्हात निराशजनक ही भूकबळीची अवस्था, . . . हे जग प्रत्येकाच्या तोंडी घांस घालण्याची क्षमता बाळगून असल्याची हमी का!” तरी दुष्काळ आणि भूक यांची आपत्ति वाढत आहे. असे का व्हावे? आमच्या प्रेमळ सृष्टीकर्त्याने पृथ्वीवरील महापद्माकरिता भरपूर अन्न पुरविलेले आहे. पृथ्वीस मानवाचे घर बनविताना त्याने तिजमध्ये विपुल उत्पादन करण्याची सर्वास पुरेसे उत्पन्न करण्याची क्षमता ठेविली. (स्तोत्र ७२:१६–१९; १०४:१५, १६, २४) या कठीण काळातहि, आम्हास ही शाश्वती दिली आहे की जे सर्व वाजवी उगमाकडे आशेने पाहतात अशा सर्वांस तो पुरेसे अन्न पुरवू शकतो. ज्याला त्याने थोर अन्नवितरक म्हणून व्यवस्थपनावर नेमिले आहे, तो आम्हास म्हणतो: “प्रथम त्याचे राज्य व त्याची (देवाची) धार्मिकता मिळवावयाची खटपट करा म्हणजे यांबरोबर तीहि सर्व (जीवनाच्या भौतिक गरजा) तुम्हास मिळतील.”—मत्तय ६:३३; १ले योहान ४:१४.
प्राणघातक दुष्काळ
३. सर्वथोर अर्थबोधकतेत आज कोणता दुष्काळ आहे, आणि तो पूर्वभाकीत आहे तो कसा?
३ आज पृथ्वीवर सर्वथोर अर्थबोधक असे जे आहे तो शोचनीय आध्यात्मिक दुष्काळ. त्याचा शांतीच्या अभावासोबत थेट सबंध आहे. मानवजात यातून मार्ग काढण्यात झोकांड्या खात आहे, क्षुब्धतेत शोध करीत आहे. सर्वसमर्थ देवाने त्याच्या संदेष्ट्याला या परिस्थितीबद्दल अनेक शतकांआधी लिहिण्यास लावले की “प्रभू यहोवा म्हणतो, पहा, असे दिवस येत आहेत की त्यांत मी देशावर दुष्काळ आणीन; तो दुष्काळ अन्नाचा नव्हे किंवा पाण्याचा नव्हे तर तो यहोवाची वचने ऐकण्यासंबंधाचा होईल ते या समुद्रापासून त्या समुद्रापर्यंत भटकतील, उत्तरेपासून पूर्वेपर्यंत पडत झडत जातील; ते यहोवाचे वचन प्राप्त करून घेण्यासाठी इकडून तिकडे धावतील तरी त्यांस ते प्राप्त व्हावयाचे नाही.”—आमोस ८:११, १२.
४, ५. (अ) शोध करीत असताहि काहींना देव का सापडत नाही? (ब) येशू, त्याच्या काळातील धर्मपुढाऱ्यांच्या गुणवैधर्म्यांत होता ते कसे? (मत्तय १५:१–१४)
४ तथापि, या कोंडीतून सुटकेचा मार्ग आहे का? प्रेषित पौल उत्तर देतो, होय, आहे, व आम्हास या शब्दांनी प्रोत्साहन देतो: “ज्या देवाने जग (केले) . . . त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरविल्या अशासाठी की त्यांनी देवाचा शोध करावा म्हणजे चाचपडत चाचपडत त्याला कसे तरी मिळवून घ्यावे. तो आपल्यातल्या कोणाएकापासूनहि दूर नाही.”—प्रे. कृत्ये १७:२४–२७.
५ देव जर “आपल्यातल्या कोणाएकापासूनहि दूर नाही,” तर अनेक त्याचा शोध का करीतात, आणि तरिहि तो त्यांना सापडत नाही ते का? ते यामुळे की, त्याचा शोध ते चुकीच्या स्थळी करतात. असे किती तरी आहेत जे स्वतःस ख्रिस्ती म्हणवितात, तरी ख्रिस्तीत्वाचा मुख्य मुळ ग्रंथ, पवित्र शास्त्र, याचेशी विचारविनिमय करीतात? स्वतःस “मेंढपाळ” म्हणवून घेणारे कितीजन “मेंढरे” यांना शिक्षण देण्यात देववचनांचा उपयोग करीतात? (यहेज्केल ३४:१० पडताळून पाहा) येशूने त्याच्या दिवसांतील गर्विष्ठ धर्मनेत्यांना स्पष्ट म्हटले: “तुम्हांस शास्र व देवाचे सामर्थ्य” कळालेले नाही. (मत्तय २२:२९; योहान ५:४४) तथापि, येशूस देववचनांची चांगली ओळख होती आणि ती त्याने लोकांना शिकविली, कारण त्यांच्याबद्दल त्याला कळवळा वाटे, जे “मेंढका नसलेल्या मेंढरांसारखे . . . रंजीस झालेले व शिणलेले होते.”—मत्तय ९:३६.
सुबत्तेचा काळ तो कसा?
६. आध्यात्मिक सुबत्तेबद्दल, यहोवा, त्याच्या सेवकांना परत शाश्वती देतो ती कशी?
६ जे प्रांजळपणे त्याच्या शोधात आहेत अशांना यहोवा पुन्हा आश्वासन व प्रोत्साहन देतो. खोट्या धार्मिक मेंढपाळांना, त्याचा संदेष्टा यशया याजद्वारे ताडणा देण्यात म्हणाला: “माझे सेवक खातील. पण तुम्ही उपाशी राहाल. माझे सेवक पितील, पण तुम्ही तान्हेले राहाल. पाहा, माझे सेवक आनंद करतील पण तुम्ही फजीत व्हाल. पाहा माझे सेवक हर्षित चित्ताने जयजयकार करतील. पण तुम्ही खिन्न चित्ताने ओरडाल. भग्नहृदय हाऊन आकांत कराल.” (यशया ६५:१३, १४) पण देव आपल्या सेवकांना सुबत्तेत कसे पुरवितो? आज आध्यात्मिक दुष्काळ जरी पसरलेला असला तरी जीवन वांचावे म्हणून देवाकडिल तरतूदीत सहभागी होण्यास आम्ही काय केले पाहिजे?
७. पुरातन काळात कोणते नाटक, आज आमच्या उत्तेजनार्थ, प्रेमाने पुरविले होते?
७ बचावून राहणे हे पूर्णपणे, देवाकडिल गरजांची जाणीव आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वासाने हालचाल करण्यावर अवलंबून असल्याने, आम्ही आनंदाने देववचनांकडे, त्याची आम्हाकरिता काय इच्छा आहे आणि तो आम्हाशी कसा व्यवहार राखतो हे चांगले समजण्यास, जावे. (योहान १७:३) या अनुरोधांत, आपण एक शास्त्रीय नाटक विचारात घेऊ, ज्यातील प्रसंग आज जे काही घडत आहे त्याच्या समानतेत असतील. या नाटकांतील मुख्य पात्र कुलाधिपति योसेफ आहे. आपल्या लोकांकरिता योसेफाद्वारे यहोवाने अन्नपुरवठा केला, तसेच आज जे त्याचा शोध करीतात, अशांचे तो प्रेमळपणे मार्गदर्शन करतो.—रोमकरांस १५:४; १ करिंथकर १०:११, रेफरन्स बायबल तळटीप (*); गलतीकर ४:२४.
योसेफ, जीवनाचा रक्षक
८, ९. (अ) योसेफ आणि याकोब व फारो यांच्या सदृश्यतेत नंतरच्या काळात कोण आम्हास आढळतात? (ब) त्याच्या पूर्णतेत आम्ही कसे समाविष्ठ आहोत?
८ जीवन रक्षक म्हणून याकोब पुत्र योसेफाने एक प्रभावी भूमिका पार पाडली. हे सर्व पुढील काळाकरिता काही चित्रित करीत होते का? बरे, योसेफास, त्याच्या भावांनी दिलेल्या गैरवाजवी वागणूकीतहि ह्याची चिकाटी, परदेशांत त्याने परिक्षा प्रसंगांना व कसोटीना कसे तोंड दिले, त्याठायीचा न डगमगणारा विश्वास, त्याचे सचोटीत टिकणे, व दुष्काळाच्या अरिष्ट काळात त्याला सुज्ञ व्यवस्थापकाच्या दर्जावर उंचावण्यात आले, हे सर्व लक्षात घ्या. (उत्पत्ति ३९:१–३, ७–९; ४१:३८–४१) याचे साम्य येशूच्या जीवनांत दिसत नाही का?
९ विपत्ति काळातहि येशू एका अशा जगांस जीवनाची भाकर बनला जे “यहोवाची वचने ऐकण्यास” भूकेले होते. (आमोस ८:११; इब्रीकर ५:८, ९; योहान ६:३५) योसेफासोबतच्या त्यांच्या नातेसंबंधाबाबत पहाता याकोब आणि फारो हे आम्हास यहोवा आणि त्याच्या पुत्राकरवी त्याने जे काही सिद्धीस नेले त्याची आठवण करू देते. (योहान ३:१७, ३४; २०:१७; रोमकर ८:१५, १६; लूक ४:१८) या खऱ्या जीवनी नाट्यात इतरांनीहि आपआपल्या भूमिका पार पाडण्यात सहभाग घेतला होता, आम्ही त्यांच्याहि भूमिका विचारात घेऊ. जो थोर योसेफ, येशू ख्रिस्त, यांचेवरील आमच्या स्वतःच्या अवलंबनाचा आम्ही स्वतःस विसर पडू देणार नाही. या कठीणावस्थेतील “शेवटल्या काळी” प्राणघातक दुष्काळापासून त्याने आमचा बचाव केला म्हणून आम्ही त्याचे केवढे कृतज्ञ आहोत!—२ तिमथ्यी ३:१, १३.
नाट्याचा उलगडा
१०. (अ) त्याला जी भूमिका पार पाडणे होते तिजकरिता योसेफ कसा पूर्वतयारीत होता? (ब) तरूण वयात त्याने कोणते गुण प्रदर्शित केले?
१० योसेफाच्या काळात, यहोवाने त्याच्या लोकाकरिता, काय राखले आहे हे कोणाहि मनुष्यास आधी कळणे शक्य नव्हते. पण तेच योसेफास त्याची महत्वाची भूमिका पार पाडण्याची हाक देण्यात आली त्यावेळेपर्यंत, यहोवाने त्याला आधीच त्याच्या योग्यतेचे शिक्षण दिले आणि तरबेज बनविले. त्याच्या सुरूवातीच्या जीवनाबद्दल, वृतान्त म्हणतो: “योसेफ सतरा वर्षाचा असता, आपल्या भावांबरोबर कळप चारीत असे; तो मुलगा आपल्या पित्याच्या स्त्रिया बिल्हा व जिल्पा यांचे पुत्रांबरोबर असे. तेव्हा त्याने त्यांच्या दुर्वतनाविषयीची खबर आपल्या बापाला दिली.” (उत्पत्ति ३७:२) त्याने त्याच्या बापाच्या हितसंबंधास निष्ठा दाखविली, जशी की येशूनेहि एका “विश्वासहीन व कुटिल पीढी”त पित्याच्या कळपाचे पालनात अढळ निष्ठा व्यक्त केली.—मत्तय १७:१७, २२, २३.
११. (अ) योसेफाचे सावत्र भाऊ त्याचा द्वेष का करीत? (ब) येशू सभोवताली तशीच परिस्थिती होती ते कसे?
११ योसेफाचा बाप, इस्राएल, त्याच्या इतर सर्व भावांपेक्षा त्याच्यावर अधीक प्रेम करी आणि त्याने त्याच्याकरिता आवडीने एक पायघोळ, पट्यापट्याचा झगा शिवला होता. यामुळे योसफाचे सावत्र भाऊ “त्याचा द्वेष करू लागले, व त्याच्याशी सलोख्याचे भाषण करीनातसे झाले.” त्याचा अधीक द्वेष करण्याचे कारण त्यांना त्यावेळी सापडले जेव्हा त्याला पडलेल्या दोन स्वप्नांचा अर्थ तो त्यांचेवर प्रभूत्व गाजवील असा होता. काही अंशी अशाच प्रकारे यहुदीयांतील प्रमुखांनी येशूचा, त्याच्या निष्ठेबद्दल, आर्जवी शिक्षणाबद्दल आणि त्याजवरील यहोवाच्या सुव्यक्त आशीर्वादामुळे द्वेष केला.—उत्पत्ति ३७:३–११; योहान ७:४६; ८:४०.
१२. (अ) याकोबास त्याच्या मुलांची काळजी का वाटत होती? (ब) योसेफ आणि येशू यांच्या जीवन ओघात कोणती समानता आम्हास आढळते?
१२ एके वेळी, योसेफाचे भाऊ, शख्खेम नजीक आपल्या मेंढरांना चारीत होते. योसेफाच्या बापाला, सहजीकच काळजी होती, कारण त्याच गावी शख्खेमने दिनाला भ्रष्ट केले होते म्हणून शिमोन आणि लेवीने त्यांच्या भावांच्या सहाय्याने शहरातील परूषांची कत्तल केली होती. याकोबाने त्यांची विचारपूस करण्यास व परत येऊन समाचार देण्यास योसेफाला पाठविले. त्याजबद्दल त्याचे भाऊ जरी द्वेषभाव बाळगून होते तरी योसेफ तत्काळ त्यांचे शोधास निघाला. त्याच्या सारखे येशूने हि, पृथ्वीवरील नेमणूक, जरी तिचा अर्थ, तारणाचा मुख्य समर्थक म्हणून तिला पूर्णतेप्रत नेण्याच्या काळात त्याला अतोनात छळ सोसावा लागणार होता तरी आनंदाने स्विकारली. त्याच्या चिकाटीने, येशू आम्हा सर्वाकरिता केवढे उत्तम उदाहरण बनला! —उत्पत्ति ३४:२५–२७; ३७:१२–१७; इब्रीयांस २:१०; १२:१, २.
१३. (अ) योसेफाच्या सावत्र भावांनी त्यांच्या द्वेषास वाट कशी दिली? (ब) याकोबाच्या शोकाची कशाबरोबर कदाचित तुलना व्हावी?
१३ योसेफाच्या दहा सावत्र भावांनी दुरूनच तो आपणाकडे येत असल्याचे पाहिले. त्याजविरूद्धचा त्यांचा राग चटकन भडकला व त्यांनी त्याचा निकाल लावण्याची योजना केली. प्रथम त्यांनी त्याला ठार करण्याचे योजिले, पण रऊबेन, जो थोरला भाऊ, त्याने स्वतःवरील जबाबदारीस घाबरून, योसेफाला, नंतर परत येऊन वर काढता येईल व सोडून देईन या इराद्याने जवळच्या सुक्या खाड्यात टाकण्यास त्यांना भाग पाडले. तथापि, मध्यंतरीच्या काळात, इश्माएली लोकांचा एक काफला तिकडून चालला असता, यहुदाने त्याच्या भावांना त्याला त्यांना गुलामात विकून टाकण्यास राजी केले. मग त्या भावांनी त्याचा पायघोळ झगा एका बकऱ्याच्या रक्तात भिजवून त्यांच्या बापाकडे पाठवून दिला. याकोबाने तो ओळखून म्हटले: “हा माझ्या मुलाचाच झगा! हिंस्र श्वापदाने त्यास खाल्ले. योसेफाला फाडून टाकिले यात संशय नाही.” येशूस पृथ्वीवर त्याची नेमणूक पुरी करण्यात जो सर्व छळ, दुःख सहन करावे लागले त्यावेळी यहोवाला याच प्रकारचा शोक झाला असावा.—उत्पत्ति ३७:१८–३५; १ योहान ४:९, १०.
योसेफ आता मिसरांत
१४. या पुरातन कालीन नाटकाचा आज आम्हास कसा फायदा होऊ शकतो?
१४ आम्ही असे अनुमान करू नये की योसेफ असलेले जे नाट्य प्रसंग घडले त्यांची पूर्णता तंतोतंत तशाच अनुपूर्व्यतेत घडली. खरे म्हटले तर, त्या काळातील, आम्हाला नमुनेदार होणारे अनेक प्रसंग आमच्या शिक्षणाकरिता व उत्तेजनाकरिता सापडतात. प्रेषित पौल म्हणतो: “जे काही शास्त्रात लिहिले, ते यासाठी की शास्त्रापासून मिळणाऱ्या सहनशीलतेच्या व समाधानाच्या योगे आपल्याला आशा प्राप्त व्हावी. आता सहनशीलता दाखविणारा व समाधान देणारा देव असे करो की ख्रिस्त येशू प्रमाणे तुम्ही परस्परे एकचित्त व्हावे. यासाठी की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता जो देव याचे एकमताने व एक मुखाने तुम्ही गौरव करावे.”—रोमकर १५:४–६.
१५. योसेफ आणि पोटीफरच्या घरादाराचे कल्याण का झाले?
१५ योसेफास मिसरास नेले. तेथे त्याला पोटीफर नावाच्या मिसऱ्यास विकले. तो फारोच्या गारद्यांचा अमलदार होता. योसेफ जरी त्याच्या पित्याच्या घरापासून दूरवर होता, तरी त्याच्या बापाने जी उत्तम जीवनतत्वे त्याच्या हृदयात बिंबवली होती त्यांच्या आधारे जगे म्हणून यहोवा त्याच्या संगतीत असल्याचे शाबीत झाले. योसेफाने यहोवाची भक्ति कधीच सोडली नाही. योसेफाठायीचे चांगले गुण त्याचा धनी, पोटीफरास आवडत म्हणून त्याने त्याला आपल्या घराचा कारभारी नेमिले. योसेफाकरिता म्हणून यहोवा पोटीफराचे घरावर आशीर्वाद पाठवीत राहिला.—उत्पत्ति ३७:३६; ३९:१–६.
१६, १७. (अ) योसेफाने आणखीन एका कसोटीला कसे तोंड दिले? (ब) योसेफास कैदेत जे अनुभव आले ते कोणत्या गोष्टींच्या मार्गदर्शनास स्पष्ट करतात?
१६ येथेच, पोटीफरच्या बायकोने योसेफास भुरळ घालण्याचा प्रयत्न केला. तो तिला नेहमी नकार देई. एके दिवशी तिने त्याचे वस्त्र घट्ट धरून ठेविले, पण तो आपले वस्त्र तिच्या हाती सोडून तेथून पळून गेला. पोटीफरासमोर तिने योसेफावर अनीतीचे आरोप ठेविले आणि पोटीफराने योसेफास बंदिशाळेत टाकिले. काही दिवस लोखंडी बेड्यात जखडून ठेविले. नंतर बंदीशाळेच्या सबंध विपत्ति काळात योसेफाने, आपण विश्वासहार्य मनुष्य आहोत हे शाबीत केले. ह्या कारणास्तव, बंदिशाळेच्या अधिकाऱ्याने योसेफाला, सर्व बंदिवानांची देखरेख करण्यास नेमिले.—उत्पत्ति ३९:७–२३; स्तोत्र १०५:१७, १८.
१७ यानंतर असे झाले की फारोचा मुख्य प्यालेबरदार आणि मुख्य आचारी या दोघांनी त्याला नाराज केले; त्याने त्यांना कैदेत टाकिले. योसेफास त्यांच्या तैनातीस ठेविले. परत यहोवाने या प्रकरणात युक्तिपर हालचाल केली. या दोघा राजदरबाऱ्यांना आश्चर्यचकीत करणारी स्वप्ने पडली. “अर्थ सांगणे देवाकडे आहे” यावर जोर देऊन योसेफाने त्यांना त्यांच्या स्वप्नांचा अर्थ सांगितला. मग, योसेफाने सांगितल्यानुसार तीन दिवसानंतर (फारोच्या वाढ दिवशी) प्यालेबरदारास पूर्ववत त्याच्या हुद्यावर नेमिले आणि मुख्य आचाऱ्यास फासांवर लटकाविले.—उत्पत्ति ४०:१–२२.
१८. (अ) योसेफाची आठवण कशी आली? (ब) फारोच्या स्वप्नांचा सारांश काय होता?
१८ जरी योसेफाने प्यालेबरदारास आपणाबद्दल फारोपाशी शिफारस करण्यास विनविले होते तरी त्या गृहस्थास योसेफाची आठवण येण्यास तब्बल दोन वर्षे लागली. तेव्हाहि, फारोस एकाच रात्री दोन गुंतागुंतीची स्वप्ने पडली म्हणून झाली. राजदरबारी असलेल्या मांत्रिक, पंडितांनाहि त्यांचा अर्थ सांगता आला नाही. मग प्यालेबरदार फारोस म्हणाला योसेफच या स्वप्नांचा अर्थ सांगू शकेल. यास्तव फारोने योसेफास बोलावणे पाठविले, त्याने येऊन, अर्थ पुरविणारा खरा मुळाधार कोण हे स्पष्ट करण्यात म्हटले: “फारोला मंगलदाय उत्तर देवच देईल.” मग मिसराच्या अधिपतिने योसेफास आपली स्वप्ने संगितली, ती अशी:
“मी स्वप्नात नीलतीरी उभा होतो, तेव्हा पाहा, सात सुंदर व पुष्ट गाई नदीतून बाहेर निघून लव्हाळ्यात चरू लागल्या आणि त्यांच्यामागून दुबळ्या, कुरूप व रोड अशा दुसऱ्या सात गाई निघाल्या; त्यांच्यासारख्या बेढब गाई साऱ्या मिसर देशात मी कधी पाहिल्या नाहीत. ह्या दुबळ्या व कुरूप गाईंनी त्या पहिल्या सात पुष्ट गाईंना खाऊन टाकिले. त्यांनी त्यांना खाऊन टाकिले तेव्हा त्या त्यांच्या पोटात गेल्या असे मुळीच दिसेना. पूर्वीप्रमाणे त्या कुरूप राहिल्या . . .
“पुनः मी स्वप्नात पाहिले की चांगली भरदार सात कणसे एकाच ताटाला आली, आणि त्यांच्या मागून सुकलेली लुंगीसुंगी व पूर्ववायूने करपलेली अशी सात कणसे निघाली, आणि त्या सात लुंग्या सुंग्या कणसांनी ती सात चांगली कणसे खाऊन टाकली. मी हे ज्योतिष्यांस सांगितले, पण त्यांतल्या कोणासहि ते मला उलगडून सांगता येईना.”—उत्पत्ति ४०:२३–४१:२४.
१९. (अ) योसेफाने नम्रता कशी दाखविली? (ब) स्वप्नांच्या उलगड्याने कोणता संकेत दिला?
१९ केवढी आश्चर्यकारक स्वप्ने! कोणी कशाप्रकारे त्यांचा उलगडा करेल? योसेफाने केला, पण स्वगौरवार्थ नव्हे. त्याने म्हटले: “फारोला पडलेले स्वप्न एकच आहे आपण काय करणार हे (खऱ्या) देवाने फारोस कळविले आहे.” मग योसेफाने त्या स्वप्नांतील प्रबळ भविष्यवादीत संदेश उलगडण्यास सुरुवात केली:
१९“पाहा अवघ्या मिसर देशात सुबत्तेची सात वर्षे येत आहेत. आणि त्यानंतर दुष्काळाची सात वर्षे येतील, तेव्हा मिसर देशाला सुबत्तेचा विसर पडेल. आणि दुष्काळ देशाची हलाखी करील . . . हे स्वप्न फारोस दोनदा पडले याचे कारण हेच की असे देवाने मुक्रर केले आहे व ते देव लवकरच सिद्धीस नेणार.”—उत्पत्ति ४१:२५–३२.
२०, २१. (अ) इशाऱ्याबद्दल फारोने कोणती प्रतिक्रिया केली? (ब) या मुद्यानुसार योसेफ आणि येशूची तुलना कशी व्हावी?
२० समोरच झेप घेण्याच्या पावित्र्यात असलेल्या या दुष्काळाबाबत फारो काय करणार? योसेफाने सुचविले, फारोने एकादा चतुर व शहाणा पुरुष देशावर नेमावा. त्याने येणाऱ्या सुबत्तेच्या वर्षांत सर्व प्रकारची अन्न सामुग्री गोळा करावी. आता पावेतो फाराने योसेफाठायींच्या सर्व ठळक गुणास ओळखले होते. त्याने आपल्या बोटातील मुद्रिका काढून योसेफाच्या बोटांत घातली. याप्रकारे फारोने त्याला अवघ्या मिसर देशावर नेमिले.—उत्पत्ति ४१:३३–४६.
२१ फारो समोर उभे असताना योसेफ ३० वर्षांचा होता, याच वयाचा असताना येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाला व त्याने आपल्या जीवनदायी सेवेला सुरुवात केली. नंतर प्रकाशित होणाऱ्या लेखात हे स्पष्ट केले जाईल की यहोवाने योसेफाचा, यहोवाकडिल “मुख्य प्रतिनीधी व तारणारा” त्याचे प्रतिरूप म्हणून या आध्यात्मिक दुष्काळाच्या काळात, आमच्या दिवसांकरिता खास अर्थ जोडून कसा उपयोग केला.—प्रे. कृत्ये ३:१५; ५:३१.
आपण कसे उत्तर द्याल
◻ कोणत्या दोन मार्गी, दुष्काळ, आज एक दहशत आहे?
◻ योसेफाने त्याच्या सावत्र भावांच्या संगतीत असता कोणत्या चांगल्या गुणांची जोपासना केली?
◻ मिसर मधील सुरुवातीच्या अनुभवाकरवी, योसेफाकडून आम्ही काय शिकतो?
◻ यहोवाने योसेफ आणि दुष्काळग्रस्त लोकांबद्दल जी आस्था व्यक्त केली, तिवरून आम्हास कशाची खात्री वाटते?
[२५ पानावरील चौकट]
द संडे स्टार (टोरँटो, मार्च ३०, १९८६) मध्ये एक स्तंभ लेखक म्हणतात, “प्रसिद्ध चर्चेसच्या बाबत पाहता त्यांची ही अधोगती, ती आजच्या पुरुष स्त्रिया आणि तरूण यांच्या ज्या सखोल आध्यात्मिक क्षुधेस शमविण्यात ते मागे पडले आहेत” त्यात दिसते.