भूतविद्या देव त्याकडे कोणत्या दृष्टीकोणातून पाहतो?
“एकाच गोष्टीविषयीची आवड व नावड हीच गोष्ट भक्कम मित्रत्व करते,” असे रोमन इतिहासकार सॅलस्ट म्हणतात. खरोखरी, मित्र म्हटला तर सर्वसामान्य गोष्टीत तुमचा सारखेपणा, जिच्यावर तुम्ही भरवसा ठेवू शकता अशी ती व्यक्ति असते. याप्रमाणेच देव आम्हाकडे मित्र म्हणून पाहतो व आम्हास त्याच्यासारखीच आवड व नावड असेल तर त्याच्या निकट येण्यास मुभा देतो. याचा अर्थ आम्ही देवाचे गुण, प्रीती, शांती, दया व चांगुलपणा यांनी आकर्षित होत असतो व आमच्या जीवनात यांचे अवलंबन करण्यास कसोशीचे परिश्रम घेतो.—गलतीकरांस ५:२२,२३.
भूतविद्येस देवाकडून अनुमति आहे की नाही हे पाहण्यासाठी आम्ही प्रथमतः त्याच्या फलप्राप्तीचे परिक्षण करण्यास हवे. (मत्तय ७:१७, १८) ते आम्हास आर्जविणारे इश्वरी गुण वाढविण्यास मदत करते का? हे पाहण्यास दोन जिवंत उदाहरणांकडे पाहू या.
भविष्य, छळणूक व मृत्यु
असामाजा अमेलीआ सुरीनाम येथील मध्यमवयीन स्त्री १७ वर्षांची होती तेव्हा भूतविद्येचे अंग असणारे भविष्य यात प्रथम सहभागी झाली होती. तिची भाकिते सत्य झाली व विचारपूस करणाऱ्यांना तिच्या उपदेशाचा फायदा झाला हे पाहता तिला तिच्या समाजात फारच उंचावले होते. (पडताळा प्रे. कृत्ये १६:१६.) परंतु एका गोष्टीने तिला त्रास दिला.
“माझ्याद्वारे बोलणारे होते ते दुरात्मे जे त्यांची मदत मागत त्यांच्याविषयी दयाळू होते,” असे ती म्हणते. “परंतु त्याच वेळी त्यांनी माझे जीवन दुःखी बनविले होते. प्रत्यके बैठकीनंतर मला बडवल्यासारखे वाटे व फार कष्टाने हालचाल करीत असे. रात्र येई तेव्हा मी काही विसावा मिळण्याची आशा करी परंतु ते दुरात्मे मला एकटे सोडीत नव्हते. ते मला त्रास देत, मजसोबत बोलत व मला जागे ठेवीत. ते काय गोष्टी सांगत!” ती दुःखाने खाली बघते, तिटकाऱ्याने आपले डोके हलविते. “ते संभोगाविषयी बोलण्यात रस बाळगीत व मजसोबत संबंध करण्यास आग्रह धरीत. ते धक्कादायक होते. मी विवाहीत होते. मी अविश्वासू होऊ इच्छित नव्हते व तसे त्यांना सांगितले. याचा काही परिणाम झाला नाही. एका वेळेस एका अदृश्य शक्तिने मजवर ताबा घेतला व माझ्या शरीरास स्पर्श करुन रगडले व मला मारले सुध्दा. मला नीकस वाटले.”
‘दुरात्मे लैंगिक अनितीस प्रोत्साहन देतात? हे शक्यच नाही!’ असेच तुम्ही उद्गाराल. ते दुरात्मे एवढे ओंगळ खरोखरीच आहेत का?
“त्याहूनही अधिक वाईट!” असे अगोदर उल्लेखिलेले गृहस्थ ऐझाक म्हणतात. “एके रात्री दुरात्म्याने पिडीत असणाऱ्या स्त्रीला मदत देण्यासाठी आम्हाला बोलावले गेले. गटाचा नेता—अति शक्तिशाली भूताचे माध्यम—याने त्या दुरात्म्यास काढण्याचा प्रयत्न केला. एक दिवसभर आम्ही त्याच्या पिशाच्चाला मदतीसाठी बोलावले. आम्ही नाचलो व नगारे वाजविले व त्या स्त्रीमध्ये हळुवार फरक पडला. तिच्यातील दुरात्म्यास दूर होण्याचा त्याने हुकूम दिला व त्याचा परिणाम दिसला. ‘आम्ही जिंकलो!’ असे तो नेता आनंदाने म्हणाला. नंतर आम्ही बसलो व विसावा घेतला.”
ऐझाक यांनी क्षणभर दीर्घ श्वास घेतला तेव्हा त्यांचे आविर्भाव थोडा वेळ विसावले. नंतर त्यांनी पुढे सुरुवात केलीः “थोडा वेळ सर्व काही यथास्थित होते, परंतु एका किंचाळीने ती शांती भंग केली. आवाज आला तेथे आम्ही घरात धावलो व गट नेत्याच्या पत्नीस पाहिले. ती मोठ्या आक्रोशाने रडत होती. घराच्या आत आम्हास दिसून आले की तिची लहान मुलगी—तिचे डोके मुरगळले होते! कोणत्या तरी शक्तीने तिची मान मुरगळून टाकली होती. तिला एखाद्या कोंबडीप्रमाणे मारले होते. स्पष्टपणे हा दुरात्म्याचा सूड होता. केवढे हे क्रौर्य! ते दुरात्मे खुनी आहेत.”
दुरात्मिकवाद व “देहाची कर्मे”
अशुध्दपणा, लैंगिक अनीती व खून—हे या दोन भूताटकीच्या अनुभवावरुन स्पष्ट झाले. हे गुण देवाच्या व्यक्तिमत्वास अगदी कटुपणे विरोध करतात. ही गोष्ट ते आत्मे खरोखरी कोण आहेत हे ओळखण्यास मदत करते. ते कदाचित देवाकडील संदेशवाहक असल्याचा बहाणा करतील परंतु त्यांची अनीती व खूनी कृत्ये त्यांना देवाचा शत्रू व इतिहासातील पहिला खूनी, दियाबल सैतान याचे अनुयायी म्हणून ओळख देतात. (योहान ८:४४) तो त्यांचा नेता आहे. ते त्याचे मदतनीस, दुष्ट दूत किंवा दुरात्मे आहेत.—लूक ११:१५-२०.
परंतु तुम्ही म्हणालः ‘ही सैतानाची विशिष्ट लक्षणे भूतविद्येत दुर्मिळ घटनेत दिसतात का? भूतविद्या मला चांगल्या आत्म्याच्या संपर्कात आणील का जे मला देवाच्या निकट सान्निध्यात येण्यास मदत करतील?’ नाही. पवित्र शास्त्र “भूतविद्ये”स इतर “देहाची कर्मे” याच्या यादीत समाविष्ट करते जे ख्रिस्ती गुणांना सरळपणे विरोध करतात.—गलतीकर ५:१९-२१.
प्रकटीकरण २१:८ मध्ये “चेटकी” (“दुरात्म्यांबरोबर संभाषण करणारे,” द लिर्व्हिग बायबल) यांना “विश्वास न ठेवणारे, अमंगळ व खून करणारे, जारकर्मी . . . मूर्तिपूजक व सर्व लबाड बोलणारे” एकाच वर्गवारीत टाकले जाते. यहोवा देव जाणूनबुजून केलेली लबाडी, व्यभिचारी, खूनी व भूतविद्येचा सराव करणारे यांच्याकडे कसे पाहतो? तो त्यांच्या कृत्यांचा धिक्कार करतो!—नीतीसूत्रे ६:१६-१९.
यास्तव भूतविद्या अभ्यासणे हे यहोवा देव ज्याचा द्वेष करतो त्यात जमेस धरले जाते. ते यहोवास धिक्कारण्याप्रमाणे आहे, सैतानाच्या कबजात असणे व देवाचा आद्य शत्रू व त्याचे सहाय्यक त्याच्या बाजूस होण्यासारखे आहे. आता याबाबत विचार कराः तुमच्या शत्रूची बाजू घेणाऱ्या व्यक्तीच्या निकट असण्याची तुम्ही इच्छा कराल का? अर्थातच नाही! याऐवजी त्यापासून तुम्ही दूर राहाल. मग, स्पष्टपणे आम्ही सुध्दा यहोवाकडून याच प्रतिक्रियेची अपेक्षा करु शकतो. नीतीसूत्रे १५:२९ म्हणतेः “यहोवा दुष्टापासून दूर राहतो.”—तसेच स्तोत्रसंहिता ५:४ पहा.
भूतविद्या मृत्युकडे निरविते
भूतविद्येचा वरवरचा अभ्यासही जीवनास धमकी देणारा आहे. देवाने त्याकडे त्याच्या पुरातन इस्त्राएल लोकात मरणदंड देण्याजोगे पातक म्हणून पाहिले होते. (लेवीय २०:२७; अनुवाद १८:९-१२) यास्तव, या गोष्टीने आम्हास आश्चर्य वाटू देऊ नये की भूतविद्येचा सराव करणाऱ्यांना “देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.” (गलतीकर ५:२०, २१) याऐवजी, “त्यांचा वाटा अग्नी गंधकाच्या सरोवरात” असेल, जे “दुसरे मरण” याकडे किंवा सार्वकालिक नाशाकडे निर्देश करते. (प्रकटीकरण २१:८) हे खरे की सध्या ख्रिस्ती राष्ट्र समूहातील काही चर्चेस भूतविद्येस सहन करतात, परंतु पवित्र शास्त्राचा दृष्टीकोण बदललेला नाही.
तुम्ही भूतविद्येसंबंधीचे पहिले पाऊल उचलले असेल तर काय? तुम्ही ते ताबडतोब थांबवून व मागे फिरण्यात चांगले कराल. पूर्वीच्या इस्त्राएलांना संदेष्टा यशयामार्फत दिलेला इश्वरप्रेरित देवाचा उपदेश अनुसरा. त्यांची परिस्थिती सध्या जे लोक अशुध्द कर्मात गुंतले असून त्याच वेळी ते देवाचे उपासक असल्याचे समजतात त्यांच्याप्रमाणेच होती. तद्वत, त्यांच्या अनुभवात महत्वपूर्ण धडे आहेत. कोणते धडे?
यशयाचा इशारा ऐका
यशयाचा पहिला अध्याय दाखवितो की इस्त्राएलांनी “यहोवास सोडिले” व ते “मागे फिरले.” (वचन ४) ते बाजूस सरकले असताही त्यांनी अर्पण देण्याचे, धार्मिक सण पाळण्याचे व प्रार्थना करण्याचे चालू ठेवले होते. परंतु त्यात कोणताच फायदा नव्हता! त्यांच्या निर्माणकर्त्यास संतुष्ट करण्याच्या अंतरिक इच्छेची त्यांच्यामधील उणीव पाहून यहोवा म्हणालाः “मी तुमच्यापुढे डोळे झाकितो, तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही.” त्या इस्त्राएलांनी अशुध्दपणाचा अंगीकार करुन त्याच्याविरुध्द बंड केले—‘त्यांचे हात रक्ताने भरुपर्यंत!—वचने ११-१५.
मग, कोणत्या परिस्थितीत यहोवा त्यांना पुन्हा स्विकारणार होता? यशया १:१६ मध्ये लिखित असणाऱ्या आवश्यकतेची दखल घ्या. तो म्हणतोः “आपणा स्वतःस धुवा व स्वच्छ करा.” यास्तव आम्ही ती सूचना गांभिर्याने घेऊ तर आम्ही भूतविद्या, जी “देहाच्या कर्मा”तील एक आहे त्या अशुध्दपणापासून पळ काढू किंवा ती सोडून देऊ. भूतविद्येमागील दुष्ट मन दियाबल सैतानाचे आहे हे आम्हास माहीत असल्यामुळे आम्ही त्याजविषयी द्वेष वाढविला पाहिजे.
यानंतर भूतविद्येसोबत संबंधित असणाऱ्या सर्व गोष्टी आम्ही दूर केल्या पाहिजेत. ऐझाक यांनी तेच केले. ते म्हणतातः “एके दिवशी मी भूताटकीविषयीची सर्व सामग्री माझ्या घरासमोर एकवटली, कुऱ्हाड धरली व त्या सर्व सामग्रीचा भुगा केला. माझी शेजारीण ओरडलीः ‘तुला याचा पस्तावा वाटेल.’ ती शंख करीत असतानाच मी त्या भुग्यावर रॉकेल ओतले व सर्वच्या सर्व भुगा जाळला. काहीही सोडले नाही.”
ही गोष्ट २८ वर्षांपूर्वीची होती. ऐझाकना त्यांच्या कृत्याचा पस्तावा झाला का? मुळीच नाही! आज ते यहोवाच्या साक्षीदारांच्या एका मंडळीत ख्रिस्ती सेवक या नात्याने हर्षाने यहोवाची सेवा करीत आहेत.
यशया १:१७ पुढील सूचना देतेः “चांगले करण्यास शिका.” यासाठी यहोवाच्या वचनाचा, पवित्र शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे. त्याद्वारे “देवाची उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे” ते समजेल. (रोमकर १२:२) मिळालेले ते नवे ज्ञान आचरणात आणणे तजेला देऊ करणाऱ्या आशीर्वादाप्रत निरवील. हीच गोष्ट असामाजाला आढळली.
नातेवाईक व शेजारी यांचा कटु विरोध होता तरी असामाजाने यहोवाच्या साक्षीदारांसोबत पवित्र शास्त्राचा अभ्यास आरंभिला व त्यानंतर केवळ काही काळातच तिने भूतविद्येपासून सुटका मिळविली. यानंतर तिने तिचे जीवन यहोवा देवास समर्पित केले व संमेलनात तिचा बाप्तिस्मा झाला. आता १२ वर्षानंतर ती कृतज्ञतेने म्हणतेः “माझा बाप्तिस्मा झाला तेव्हापासून मला भूताकरवी त्रास होत नाही.” ती स्मित करुन आठविते की, “बाप्तिस्मा झाल्यानंतरच्या रात्री माझी झोप एवढी गाढ व घोर होती की दुसऱ्या दिवशी सकाळी मी संमेलन कार्यक्रमास उशीरा गेल्ये.”
चिरकालिक फायदे
आज ऐझाक व असामाजा अंतःकरणपूर्वक स्तोत्रकर्ता आसाफासोबत म्हणू शकतातः “देवासमीप जाणे यातच माझे कल्याण आहे.” (स्तोत्रसंहिता ७३:२८) खरोखरी, यहोवाच्या समीप येण्याने त्यांना शारीरिक व भावनात्मक फायदा दिला. परंतु याहून अधिक त्याने त्यांची अंतरिक शांती व यहोवासोबतचे निकट नातेसंबंध दिले.
अशाप्रकारचे आशीर्वाद भूतविद्येच्या जोखडास झुगारुन टाकण्यास आवश्यक असणारे त्रास व कष्ट यापेक्षा मोलवान आहेत. दूर झुगारणे हे खरेच दिव्य आहे. लिन्टिना वॅन गिनेन या सुरीनाम मधील स्त्रीला तो अनुभव आला. तिने कित्येक वर्षे कसा लढा दिला व त्यात ती कशी यशस्वी झाली हे आम्ही पुढील लेखात पाहणार आहोत.
[५ पानांवरील चित्रं]
असामाजा अमेलीआ सांगतातः “दुरात्म्यांनी माझे जीवन क्लेशमय केले. . . . ते जे गोष्टी सांगत त्याने!”