वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w88 ९/१ पृ. ३-४
  • भूतविद्या एवढी वाढती आस्था का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • भूतविद्या एवढी वाढती आस्था का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • मिळती जुळती माहिती
  • भूतविद्या देव त्याकडे कोणत्या दृष्टीकोणातून पाहतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • दुरात्म्यांच्या समूहाचा प्रतिकार करा
    सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
  • दुष्टात्म्यांचा प्रतिकार करण्यासाठी यहोवाची मदत स्वीकारा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • सैतानाला अडवा आणि त्याचे डावपेच हाणून पाडा
    देवाच्या प्रेमात टिकून राहा
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
w88 ९/१ पृ. ३-४

भूतविद्या एवढी वाढती आस्था का?

फ्रान्स हा स्थानिक प्रॉटेस्टंट चर्चचा आधारस्तंभ आहे. चर्चचे काम करावयाचे असेल तर मदतीचा हात पुढे करण्यात तो अग्रस्थानी आहे. विल्हेलमीना ही देवाचे भय बाळगणारी आहे. “तुम्ही चर्चला गेले पाहिजे,” असे ती म्हणते व ती स्वतः जात असते. त्याप्रमाणेच एस्तेर चर्चला नियमित उपस्थित राहते व तिची प्रार्थना म्हटल्याशिवाय एकही दिवस जाऊ देत नाही. त्या तिघांजवळ एक गोष्ट सर्वसामान्य आहेः ते भूतविद्याही करतात.

हे सुरीनाममधील तीन रहिवासी केवळ एकटे नाहीत. जगभरात भूतविद्येची आस्था झपाट्याने वाढत आहे. विचार कराः एकट्या युनायटेड स्टेटस्‌मध्ये सुमारे ३० मासिके ज्यांचे संयुक्‍त वितरण १,००,००,००० पेक्षा अधिक आहे ती भूतविद्येच्या भिन्‍न मार्गास वाहवून घेतलेली आहेत. इंग्लंडमधील अंदाजे २०,००,००० लोक या विषयात आस्थेवाईक आहेत. नेदरलँडमधील अलिकडील निवडणूकात शहरातील गर्भश्रीमंत, उच्च शिक्षण घेतलेले व तरुण लोक अतिमानुष घटनांवर विश्‍वास ठेवतात असे दिसून आले. याहून अधिक आफ्रिका, आशिया व लॅटिन अमेरिका यांचे रहिवासी यानाते साक्ष देतात की पुष्कळ राष्ट्रात भूतविद्या दैनंदिन जीवनाचा अंतरिक भाग बनली आहे. यात आश्‍चर्य नाही की लेखक जॉन वेल्डन व क्लिफर्ड विल्सन यांनी त्यांच्या ऑकल्ट शॉक ॲण्ड सायकीक फोर्सेस या पुस्तकात हा निष्कर्ष काढलाः “पुष्कळ टीकाकारांना, ते गूढ विद्येच्या पुनरुज्जीवन काळात जगत आहेत असे वाटते.”

होय, भूतविद्या व गूढविद्या—ज्योतिष, मोहिनीविद्या, तर्कशास्त्र, अति संवेदनाशील आकलन शास्त्र, जादू, स्वप्नाचे अर्थ उलगडणे या स्वरुपातील व इत्यादि—सर्व प्रकारच्या लोकांना आकर्षित करीत आहे. का?

एक गोष्ट म्हणजे ख्रिस्ती राष्ट्रसमूहातील काही चर्चेस भूतविद्या चालवून घेतात व मान्यताही देतात. ते सुचवितात की दुरात्म्यांच्या संपर्कात येणे हा देवाच्या निकट येण्याचा अजून एक मार्ग आहे.

उदाहरण म्हणून सुरीनाम मधील ७० वर्षांचे वृध्द व्यापारी ऐझाक अमेलो घ्या. सात वर्षे त्यांना चर्च कौन्सिल सदस्य व त्याच वेळेस भूतविद्येतील परिचित म्हणून उंचावले जात होते. ते आठवितात की, “प्रत्येक शनिवारी आमचे संपूर्ण चर्च कौन्सिल गावाबाहेर दुरात्म्यांसोबत सल्लामसलत करण्यास एकत्रित होत असे. आम्ही रात्रभर ते चालू ठेवले. सकाळ उजाडली तेव्हा डीकनने त्यांच्या घड्याळावर नजर रोखली व सुमारे पाच वाजता त्यांनी आम्हास थांबविण्याचा इशारा दिला. आम्ही अंघोळ केली, कपडे बदलले व चर्चला जाण्यास निघालो—वेळेवर रविवारच्या उपासनेसाठी. त्या सर्व वर्षांत पाळकांनी कधीही व एकही नाराजीचा शब्द उच्चारला नाही.

सुरीनाममधील चर्चेस व भूतविद्येमधील दुव्याचा अभ्यास केल्यावर डच प्रोफेसर आर. व्हॅनलिव्हर खात्री देतात की पुष्कळजण भूताटकीकडे “पूरक धर्म” या दृष्टीकोणातून पाहतात. लीडन विद्यालयाने अलिकडेच प्रसिध्द केलेल्या अभ्यासात ते हे सांगतात की भूताटकी ख्रिश्‍चानिटीसोबत “विशाल धार्मिंक घटनेचा भाग” अशी ओळखली जाते.

परंतु तुम्ही कदाचित चकित व्हाल की, ‘ख्रिस्ती राष्ट्रसमूहाच्या चर्चेसनी भूताटकीला दाखविलेली स्विकृती देव त्यास मान्यता देतो याची खात्री देते का? दुरात्म्यांच्या संपर्कात येणे तुम्हास त्यांच्या निकट घेऊन जाते का? पवित्र शास्त्र अक्षरशः भूतविद्येबाबत काय म्हणते?’

[३ पानांवरील चित्रं]

ऐझाक अमेलो आठवतात की सबंध चर्च कौन्सिल दुरात्मिक चिकित्सा बैठकीत सहभागी झाले होते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा