वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w88 ४/१ पृ. ४-७
  • देवास आम्ही कसे जाणू शकतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवास आम्ही कसे जाणू शकतो
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पवित्रशास्त्र देवाचे पुस्तक
  • देवास वैयक्‍तीकपणे ओळखणे
  • पवित्रशास्त्राचे वाचन आम्हास देवाच्या निकट आणविते
  • देवास जाणण्याचे भव्य फायदे
  • देव कोण आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • यहोवाबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी सृष्टीचं निरीक्षण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • देव—तो कोण आहे?
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • देवाबद्दलची खरी शिकवण काय आहे?
    बायबल नेमके काय शिकवते?
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
w88 ४/१ पृ. ४-७

देवास आम्ही कसे जाणू शकतो

देव सर्वव्यापी म्हणजेच तो तारे व ग्रहात मेघधनुष्यात, पक्षाच्या पंखात व गवताच्या पात्यात आहे असे कांही लोक मानतात. तथापि, पवित्रशास्त्र शिकविते की देवास व्यक्‍ती यानाते निश्‍चीत ठिकाण आहे. सूज्ञ राजा शलमोनाने देवास केलेल्या प्रार्थनेत म्हटले: “तू आपल्या स्वर्गातील निवास स्थानातून ऐक.” पवित्रशास्त्रातील यशयाच्या पुस्तकात देवाने स्वतःच असे म्हटले: “आकाश माझे सिंहासन आहे.”—१ राजे ८:४९; यशया ६६:१.

देव त्याच्या निर्मितीत स्वतः उपस्थीत नसला तरी, त्याच्या व्यक्‍तीमत्वाची स्वभाववैशिष्टे त्यात प्रतिक्षेपीत आहेत. प्रेषित पौल रोमकर १:२० मध्ये म्हणाला: “सृष्टीच्या निर्मितीपासूनच त्याचे अदृष्य गुण म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थावरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत.” स्तोत्रकर्त्या दाविदाने याच्या सहमतात लिहीले: “आकाश देवाचा महिमा वर्णिते; अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. दिवस–दिवसाशी सवांद करितो, रात्र रात्रीला ज्ञान सांगते.”—स्तोत्रसंहिता १९:१, २.

होय, चांदण्या रात्री आकाशाकडे पहा व क्षणभर विचार करा की आमचे विश्‍व निर्माण करण्यास व ते चालविण्यास केवढ्या अगाध ज्ञानाची व शक्‍तीची गरज आहे बरे! (यशया ४०:२६ तुलना करा.) खरोखरी, निर्मिती हीच देवाच्या व्यक्‍तीमत्वाबाबतचा विपुल माहितीचा उगम आहे. मानव कधीही ते देत असलेल्या देवाचे गुण व स्वभाव याबाबतच्या साक्षीला पुर्णपणे आकलन करू शकणार नाही. ईयोबाचे पुस्तक आम्हास स्मरण देते: “पहा! ह्‍या त्याच्या कार्यक्षेत्राच्या केवळ सीमा आहेत; त्याची कवेळ चाहूल आपल्या कानी येते!” (इयोब २६:१४) एक पुरातन स्विडीश म्हण आहे: ‘कारागीर त्याच्या कार्यापेक्षा श्रेष्ठ आहे.’ यानुसार निर्मिती श्रेष्ठ आहे तर देव सर्वश्रेष्ठ असलाच पाहिजे, निर्मिती सुज्ञता प्रदर्शित करते तर देव सुज्ञ असलाच पाहिजे, निर्मिती शक्‍तीचे दर्शन घडविते तर देव त्याहून ही अधिक शक्‍तीशाली असण्यास हवा!

पवित्रशास्त्र देवाचे पुस्तक

अशाप्रकारे निर्मिती देवाविषयी भरपूर माहिती देते. तथापि निर्मितीचा अभ्यास तुम्हाला देवाचे नांव सांगेल का? ते निर्मितीकार्या पाठीमागील उद्देश काय किंवा तो दुष्टाईस का परवानगी देऊन आहे हे उघड करील का? अशा प्रकारच्या प्रश्‍नांची उत्तरे मिळण्यासाठी देवाने निर्माण केलेल्या भौतिक गोष्टीच्या अभ्यासापेक्षा अधिकाची गरज आहे. सुदैवाने, त्याजबाबतची अशाप्रकारची माहिती पवित्रशास्त्रात रेखाटण्याकडे देवाने लक्ष दिले.

तेथे देवास कधीही कल्पित, अवर्णनिय बुद्धीमान किंवा अदृष्य चालना किंवा शक्‍ती असे सादर केलेले नाही. प्रे. कृत्ये ३:१९ मध्ये आम्ही “यहोवा व्यक्‍ती” विषयी वाचतो. त्याचा पुत्र येशू ख्रिस्ताला मृतातून उठविले होते त्यावेळी पवित्रशास्त्र म्हणते की तो स्वर्गात “देव या व्यक्‍ती [शब्दशः समोर]” उभे राहण्यास गेला. (इब्रीकर ९:२४, किंगडम इन्टरलिनिअर) खात्रीने, येशूने देवास भव्य चालना, अनन्त बुद्धीवादी, किंवा इतर कोणतेही कल्पित विशेषण त्याजबाबत बोलताना अगर त्याला प्रार्थना करताना जोडले नाही. उलटपक्षी, त्याने त्यास बहुदा स्वर्गिय पिता, देवासोबतच्या नातेसंबधास प्रतिक्षेपित करणारी विशेषणे दिली.—मत्तय ५:४८; ६:१४, २६, ३२.

यास्तव देव “कांहीतरी” नावविरहीत नसून त्याऐवजी नांव असलेली व्यक्‍ती आहे. स्तोत्रसंहिता ८३:१८ म्हणते: “म्हणजे तू केवळ तूच यहोवा या नामाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांना कळून येईल.” हे सत्य आहे की पवित्रशास्त्रही देवाबाबत बहुमान किंवा वर्णनात्मक शब्दप्रयोग उपयोगात आणते: “सर्वसमर्थ,” “अनंतकाळचा राजा,” “तारणारा”, “मेंढपाळ”, “पुराणपुरुष”, “देखरेखा,” “शिक्षक,” “थोर उद्धारकर्ता,” “खडक”. (रूथ १:२०; १ तिमथ्यी १:१७; यशया ४३:११; स्तोत्रसंहिता २३:१; दानिएल ७:९, १३, २२; १ पेत्र २:२५; यशया ३०:२०; ५४:५; अनुवाद ३२:४) अशाप्रकारचे शब्द प्रयोग देवाच्या व्यक्‍तीमत्वाची आणखीन स्वरूपे, जसे की त्याचे सार्वभौमत्व, त्याच्या लोकाबाबतची प्रेमळ कळकळ व त्याचे अगाध ज्ञान निवेदीत करतात.

देव व्यक्‍ती असल्यामुळे त्यास आवड व नावड—तसेच भावना आहे. पवित्रशास्त्र दाखविते की तो त्याच्या लोकांवर प्रेम करतो (१ राजे १०:९), त्याच्या कार्यात हर्ष पावतो (स्तोत्रसंहिता १०४:३१), मूर्तिपूजेचा द्वेष करतो (अनुवाद १६:२२), दुष्टाईबद्दल दुख: वाटते (उत्पत्ती ६:६). १ तिमथ्यी १:११ मध्ये त्यास “धन्यवादित देव” सबोधले आहे.

देवास वैयक्‍तीकपणे ओळखणे

हे खरे आहे की देवाच्या व्यक्‍तीमत्वाचे संपूर्ण आकलन करण्यास मानवाची बुद्धी तेवढी विशाल नाही. “अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती गहन व त्याचे मार्ग किती अगम्य आहेत! ‘यहोवाचे मन कोणी ओळखिले आणि त्याचा मंत्री कोण होता?’” (रोमकर ११:३३, ३४) तरीही विश्‍वासणाऱ्‍यास देव इतर व्यक्‍ती प्रमाणेच असू शकतो. पवित्रशास्त्र आम्हास सांगते: “नोहा खऱ्‍या देवासमागमे चालला,” जणु काय यहोवा त्याच्या बाजूस होता. (उत्पत्ती ६:९) देव मोशेला इतका वास्तविक होता की तो जणू “जो अदृष्य आहे त्यास पाहात” असल्यासारखा होता. (इब्रीकर ११:२७) अब्राहामाविषयी म्हटले होते की तो “यहोवाचा मित्र” होता.—याकोब २:२३.

अर्थात देवाने व्यक्‍तीगतपणे स्वतःस, नोहा, अब्रहाम व मोशे यांना प्रकट केले. ‘बरे ठीक देवाने स्वतःहून स्वतःस मला असे वैयक्‍तीकपणे व्यक्‍त केले तर,’ असे कांहीजण म्हणतील ‘तो माझ्यासाठीही वास्तविक असेल.’ आता हे लक्षात आणा की नोहा, अब्राहाम व मोशे यांच्याजवळ पवित्रशास्त्र नव्हते. त्यांना येशू ख्रिस्त किंवा त्याने पूर्ण केलेले पुष्कळ भविष्यवाद माहीत नव्हते. याचे परिणामात येशू ख्रिस्ताने देवाबाबत जे कांही निवेदीत केले ते त्यांना ठाऊक नव्हते. अशा परिस्थीतीस्तव देवास अशा प्रकारचे सरळरित्या प्रकट करणे जरूरीचे व इष्ट वाटले.

तथापि सध्या आम्हाजवळ पवित्रशास्त्र व पूर्ण झालेले पवित्रशास्त्रीय भविष्यवाद आहेत. आम्हाजवळ येशू ख्रिस्ताचे जीवन, कार्य व शब्द याचे शुभवर्तमानाचे अहवाल आहेत. पौल म्हणतो: “कारण त्याच्या [ख्रिस्ता] ठायीच इश्‍वरपणाची सर्व पुर्णता मूर्तिमान वसते.” (कलसैकर २:९) होय, देवाला जवळून जाणण्याच्या स्थितीत आम्ही आहोत हे त्या कुलपित्यांच्या काळात शक्य नव्हते. ही गोष्ट तो आम्हास सरळपणे प्रगट होत नाही या वस्तुस्थीतीची उणीव पूर्णपणे भरून काढीत नाही का?

पवित्रशास्त्राचे वाचन आम्हास देवाच्या निकट आणविते

आम्ही याकोब ४:८ मध्ये वाचतो: “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल.” पवित्रशास्त्राच्या वाचनाने आम्ही स्वतःस देवाजवळ आणू शकतो. परंतु कसे? एक गोष्ट ही प्रत्येक दिवशी पवित्रशास्त्रातील एक भाग वाचून तुम्ही त्याच्या व्यक्‍तीमत्वाची नविन स्वभाव वैशिष्ठे व गुण शिकाल. तुम्ही वाचाल तेव्हा वारंवार थांबून तुम्हा स्वतःस विचारा: ‘मी देवाविषयी या वचनातून किंवा भागातून काय शिकलो?’ यात अधिक तुम्ही देवाच्या आत्म्यासाठी, तुम्हास समजण्यास व तुम्हास देवाच्या निकट आणण्यात “मदतनीस” म्हणून कार्य करण्यास प्रार्थना करू शकता.—योहान १४:२६.

“यहोवाची व्यक्‍ती म्हणून मिळत असलेल्या चांगल्या समजावणूकीची मी रसिकता जाणली,” हे एका ख्रिस्ती स्त्रीने, जी पवित्रशास्त्र पूर्णपणे वाचते तिने म्हटले. ती वॉचटावर बायबल स्कूल ऑफ गिलीयड जे मिशनऱ्‍यांना प्रशिक्षीत करते ज्यांना जगभरात पाठविले जाते त्याची विद्यार्थिनी होती. या शाळेत पवित्रशास्त्र अभ्यासाची कोणती पद्धत उपयोगात आणली जाते? त्यातील एक प्रशिक्षण देणारा स्पष्ट करतो: “आम्ही संपूर्ण पवित्रशास्त्र अभ्यासण्याचा यत्न गट यानाते सुरु केला. आम्ही दर दिवशी १० ते १५ पृष्ठे घेतली, सर्व . . . विद्यार्थी संशोधन करून चर्चेस सहाय्य करीत. आम्ही कठीण वचनास पोहंचू तर आम्ही (१) संदर्भ (२) लिहिते वेळची परिस्थीती (३) वचनातील मुख्य शब्दाच्या अर्थाचा विचार करीत असू. आम्ही सातत्याने विचारीत असू, ‘यहोवा व त्याचे गुण याजबाबत ते आम्हास काय सांगते?’ आम्हास आढळले की त्याजविषयी सांगणारे काहींतरी नेहमीच मिळत होते.”

तुम्हास यापूर्वी या शाळेत पवित्रशास्त्र अभ्यास करण्याचा हक्क कदाचित लाभला नसेल, तरी यातील कांही अभ्यास पद्धती तुम्हाठायी व तुमच्या कुटुंबासाठी चांगल्या ठरतील. उदाहरणार्थ, यहोवाच्या साक्षीदारामध्ये प्रत्येक आठवडी त्यांच्या मंडळीच्या सभा संबधी असणारे पवित्रशास्त्राचे थोडे अध्याय अभ्यासण्याची रीत आहे. कुटुंब यानाते हा कार्यक्रम का अनुसरू नये? याहीपुढे वॉचटावर सोसायटी संशोधन सहाय्यक प्रसिद्ध करते जसे एड टू बायबल अन्डरस्टँडींग व न्यु वर्ल्ड ट्रान्सलेशन रेफरन्स बायबल, जे तुम्हास पवित्र शास्त्रातील कठीण परिच्छेदात मदत करू शकते.a पवित्रशास्त्र वाचण्याचा नियमित कार्यक्रम यहोवाच्या व्यक्‍तीमत्वाबाबतीत तुमची आवड वाढवील.

तुम्हास खासरितीने अर्जवील असा पवित्रशास्त्रातील भाग तुम्ही निवडू शकता. उदाहरणार्थ तुम्ही स्तोत्र ८६ मधील १७ कवने अभ्यासण्याची निवड कराल तर तुम्हास देवाच्या व्यक्‍तीमत्वाची कमीतकमी १५ गुण लक्षणे सापडतील: तो चांगला आहे, क्षमा करण्यास तयार, प्रेमळ दयेत विपुल, प्रार्थनेची उत्तरे देण्यास तयार, देवात अतुलनिय, निर्मिती कार्यात अप्रतिम, र्सावभौम सत्ताधीश, अद्‌र्भित कृत्ये करणारा, मृत्युपासून मुक्‍त करणारा, दयाळू, कनवाळू, रागास धिमा, सत्यसंपन्‍न, सहाय्यक, सांत्वनदाता. तुमच्या उत्पन्‍नकर्त्याविषयी शिकण्याचा प्रयत्न करण्याच्या ध्येयापेक्षा दुसरे उत्तम ते कोणते असू शकेल काय?

देवास जाणण्याचे भव्य फायदे

सार्वकालिक जीवनाच्या आमच्या ध्येयाप्रत पोहंचणे हा देवाला जाणण्याचा केवळ एक फायदा आहे. (योहान १७:३) अधिकतेत तुमची काळजी वाहणारा दररोजचा सोबती तो खडकासारखा स्थिर आहे. तो असणे फायद्याचे आहे. (स्तोत्रसंहिता १८:३१) राजा दाविदाला शत्रुंनी वेढल्यासारखे व समस्यांनी दबल्यासरखे वाटले तेव्हा त्याला आढळले की उपलब्ध खरा मदतनीस केवळ देवच होता. तो यास्तव म्हणाला: “तुमचा भार यहोवावर टाका म्हणजे तो स्वतः तुमचा पाठींबा होईल, धार्मिकाला तो कधीही ढळू देणार नाही.”—स्तोत्रसंहिता ५५:२२.

तुम्ही सुद्धा देवासोबतच्या अशा नातेसंबधाचा आनंद, तुम्ही त्यास ओळखण्यासाठी वेळ काढला तर लुटू शकता. ते फार अवघड असे नाही. त्याचे वचन वाचण्याचा प्रयत्न करा. ज्यांचे जीवन ते देवास ओळखतात याचे दर्शन घडविते जसे की ज्यांनी तुम्हापर्यंत हे नियतकालीक आणले त्या सारख्यांच्या सहवासात या. यहोवास प्रार्थनेत आळवा. देव कांही व्यक्‍तीत्वविरहीत शक्‍ती नाही की जो तुमची आरोळी ऐकण्यास बहिरा आहे. तो जिवंत व “प्रार्थना ऐकणारा” देव आहे. “तुम्ही त्याचा शोध केला तर तो तुम्हास मिळण्यास स्वतःस उपलब्ध करील.”—स्तोत्रसंहिता ६५:२; १ इतिहास २८:९.

[तळटीपा]

a  वॉचटावर पब्लीकेशन इन्डेक्स १९३०–१९८५ तुम्हास स्पष्टीकरणाचे साहित्य व अशा चर्चेच्या या संशोधनास मदतकारक म्हणून परिच्छेदांना निश्‍चीत करण्यास सहाय्य करील.

[५ पानांवरील चित्रं]

देवाने नोहा, अब्राहाम व मोशे यांना व्यक्‍तिगतरित्या प्रकट केले

[७ पानांवरील चित्रं]

निर्मिती ही देवाच्या व्यक्‍तित्वाविषयी माहिती मिळविण्याचा अपूर्व स्रोत आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा