देव तो खरीच एक व्यक्ती आहे का?
“देव असलाच पाहिजे” अशी घोषणा १४ ऑगस्ट १९८१च्या डेली एक्सप्रेस च्या अंकाने केली. पत्रक दोन विख्यात शास्त्रज्ञांचा देवावरील विश्वास यावरील मतपरिवर्तनाचा अहवाल देत होते. जीवन स्वाभाविकरित्या अस्तित्वात आहे याविरूद्धचे अचूक समीकरण प्राप्त झाल्यानंतर त्यांचे ठाम नवीन मत उदयास आले. तथापि, या दोन नवीन विश्वासूंनी “देव” म्हटले तेव्हा त्याचा अर्थ काय होता? डेली एक्सप्रेस अहवाल देते: “ते निर्देश करणारा देव, विश्व आहे.”
तुम्ही देवावर विश्वास ठेवता तर तुमची त्याजबाबत काय कल्पना आहे? त्यांच्याप्रमाणे तुम्हीही एक अवर्णनिय बुद्धीमान, अदृश्य कल्पित शक्ती, “कांहीतरी” भव्य या दृष्टीकोनातून त्याला पहाता काय? किंवा तुम्ही त्यास वर्णन करता येण्यासारखी बुद्धीमान व्यक्ती म्हणून पाहता?
काहीना देवाकडे व्यक्ती म्हणून पाहणे विचित्र वाटते. त्यांना असेही वाटते की असे मानवाप्रमाणे पाहणे त्याला दर्जात कमी बनविते—जसे की बालीश स्वरूपाप्रमाणे झगा परिधान केलेला, सफेद लांब दाढी असून मेघारूढ वृद्ध असे त्याला बनविते किंवा मैखिलॲन्जेलोने त्यांच्या सुप्रसिद्ध चॅपल मध्ये देवास—एक बलवान, हवेत तरंगणारा चैतन्यशाली मनुष्य असे चित्रीत केले.
खरोखरच, आम्ही “व्यक्ति” हा शब्द ऐकतो तेव्हा आम्ही सहजपणे मानवप्राण्याविषयी विचार करू लागतो. उदाहरणार्थ वेबस्टर्स थर्ड न्यू इन्टरनॅशनल डिक्शनरी “व्यक्ती” याची व्याख्या “एक व्यक्तीगत मानवप्राणी” अशी देते. तसेच ती “व्यक्ती” याची व्याख्या “जागृत ग्राहणशक्ती, समंजस, नैतिकपणा या स्वभाव वैशिष्ट्याने युक्त” अशी करते. यास्तव, एकादा अचूकपणे देवाविषयी व्यक्ती म्हणूनच पण त्यास मानवाप्रमाणे न समजता विचार करू शकतो.
परंतु काहीजण आक्षेप घेतील: ‘देवास एक कल्पित शक्ती किंवा व्यक्ती म्हणून तुम्ही ओळखले तर त्यात तितकेसे वेगळे काय आहे?’ ठीक, देव केवळ चालना “कांहीतरी” आहे तर मग याचा अर्थ मानवाचे जीवन याचप्रमाणे पुर्णत: यांत्रिक आहे असा नाही का? मनुष्यास अशाप्रकारे एका भव्य मशीनमधील दात या कनिष्ट पातळी पर्यंत नमवावे लागेल. परंतु देव बुद्धीमान व्यक्ती आहे तर ते जीवनास भव्य अर्थ देत नाही का? खरोखरी ते देवासोबत नातेसंबध राखण्याच्या शक्यतेचा दुवा उघडते—नातेसंबध “त्याच्यातील” दोघांचे नव्हे तर दोन व्यक्तीतील.
स्पष्टपणे, व्यक्ती–व्यक्तीप्रमाणे देवासोबतचे नातेसंबध फारच मोहक आहेत. परंतु प्राथमिकतेत देव व्यक्ती आहे की नाही हे आम्ही कसे जाणू शकतो? तो आहे तर आम्हास तसे नातेसंबंध कसे मिळतील? पवित्रशास्त्रास याविषयावर काय म्हणायचे ते पाहू या.