वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w88 ३/१ पृ. ७
  • राज्य वाढीसाठी विस्तृत सुविधा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • राज्य वाढीसाठी विस्तृत सुविधा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
w88 ३/१ पृ. ७

राज्य घोषकांचा वृत्तांत

राज्य वाढीसाठी विस्तृत सुविधा

अलिकडेच विस्तारित सुलभीकरण केलेल्या शाखा दप्तराच्या समर्पणाचा दिवस हा जमेका येथील कॅरीबियन बेटावरील यहोवाच्या साक्षीदारांचा खूप आनंदाचा दिवस होता. या सुंदर उष्ण बेटावरील बांधवांच्या सुवार्तेच्या विश्‍वासू प्रचारावरील यहोवाच्या आशिर्वादामुळे या वाढीची गरज भासली.

जमेका येथे पहिले मिशनरी गृह १९४६ मध्ये स्थापन झाले. मिशनऱ्‍यांनी पुढे नेलेल्या कामामुळे प्रचारकांची संख्या जोराने वाढत गेली. त्यामुळे दहा वर्षात महिन्याला अहवाल देणाऱ्‍या साक्षीदारांची संख्या ७३२ पासून ३,२१६ पर्यंत वाढली. या वाढीची दखल घेता यावी म्हणून नवीन सोयीची गरज भासली.

१९५४ मध्ये योग्य जागा मिळाली आणि नजिकच्या किंगस्टन या उपनगरात दोन मजली मजबुत इमारतीचे बांधकाम सुरु झाले. हे मे १९५८ मध्ये पूर्ण झाले. त्या वर्षी प्रचारकांच्या संख्येने ४,३६७ चे शिखर गाठले.

यानंतर “लावणे” आणि “पाणी घालणे” चालू राहिले आणि यहोवा त्याला “वाढवीत” राहिला. त्यामुळे १९८३ मध्ये प्रचारकांची संख्या ७,००० पेक्षा अधिक वाढली आणि त्याबरोबरच आणखीन वाढीची गरज निर्माण झाली. (१ करिंथ ३:६) शाखा दप्तराच्या समितीने, नियमन मंडळाच्या संमतीवरून सध्याच्या सोयी वाढविण्याचा विचार केला. सबंध बेटावरून २५० बांधव मदतीला आले. कुशल व अकुशल कामगारांनी स्वयंसेवक या नात्याने गवंडी, सुतार, विद्यृत्‌ कामगार आणि इतर दुरुस्ती करणारे अशी सेवा सादर केली. यात भाग घेणारे १० ते ८६ या वयोगटातील होते. काहीजण या योजनेला पैशांची देणगी देत होते, तर काहीं कामगारांना जेवण पुरवठा करीत होते. तर काहींनी जे स्वयंसेवक लांबून आले होते अशांना राहण्यासाठी आपली घरे खुली केली. एका वर्षात या योजनेतील तिसऱ्‍या मजल्यावरील पाच खोल्या, मंनोरंजनाचे दालन, दुसऱ्‍या मजल्यावरील एक खोली आणि ४०० चौ. फुट (३७ चौ.मि.) इतकी सामानाची जागा तयार झाली, ही जागा बेथेल कुटुंबाच्या ११ सदस्यांना वापरण्यासाठी तयार झाली.

यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य मिल्टन हेन्श्चेल यांनी २२ फेब्रुवारी १९८६ रोजी समर्पणाचे भाषण सादर केले. ते “विजयोत्सावाची मिरवणूक” या विषयावर बोलले. (२ करिंथ २:१४) हा समर्पणाचा कार्यक्रम ऐकणारे एकूण २,९४९ इतके होते. यापैकी ३८० राज्य सभागृहामध्ये होते तर इतर जण इमारतीच्या इतर भागात होते, तर आणखीन कांही शहरातील इतर राज्यसभागृह, शाळेचे सभागृह यामध्ये टेलिफोन व रेडिओ द्वारा कार्यक्रम ऐकत होते.

राज्यसभागृहाला आमंत्रित असलेले बंधु बहिणीपैकी पुष्कळजण ३० वर्षे व त्याहूनही अधिक वर्षे सत्यात होते. इमारतीच्या सुंदर वाढीबद्दल पुष्कळांचे गुणग्राहकतेचे शब्द ऐकावयास मिळाले. जमेका येथील राज्य वाढीमध्ये आणखीन पुष्कळ “दुसरी मेंढरे” या पैकीचा “मोठा लोकसमुदाय’ या नविन शाखा दप्तराच्या सुविधाद्वारे विजयोत्सवाच्या मिरवणूकीत सामील होईल अशी आमची आशा आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा