मुलांना इश्वरी ज्ञानात वाढण्यास मदत करणे
पुष्कळ राष्ट्राच्या व पार्श्वभूमीच्या विचारवंत लोकांनी येशू निपूण शिक्षक व नीती शिकविणारा होता यास अनुमती दिली आहे. पण त्याच्या यौवनातील विशिष्ट गोष्टीच्या तालमीने त्याला याबाबत हातभार लावला होता का? आजचे पालक, त्यांचे कौटुंबिक जीवन व वाढ या पासून काय धडा घेऊ शकतात?
आम्हास पवित्रशास्त्र येशूच्या बालपणाविषयी अगदीच अल्पसे सांगते. मुख्यपणे त्याची पहिली १२ वर्षे दोन वचनातच कथन करितात: “यहोवाच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्वकांही पुरे केल्यावर ते [योसेफ व मरिया] गालीलात आपले गांव नासरेथ येथे परत गेले. तो बाळक वाढत वाढत बलवान होत गेला व ज्ञानाने पूर्ण होत गेला व त्याच्यावर देवाची कृपा होती.” (लूक २:३९, ४०) परंतु येथे पालकांना शिकण्यास एक धडा आहे.
लहान बालक “वाढत वाढत बलवान होत गेला.” यास्तव, त्याचे पालक त्याची शारिरिकरित्या काळजी वाहत होते हे स्पष्ट आहे तसेच, तो “ज्ञानाने पूर्ण होत” गेला.a अशा प्रकारच्या सुज्ञानासाठी आधार होईल असे ज्ञान व समज त्याला शिकविण्याची जबाबदारी कोणाची होती?
मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे, त्याच्या पालकांची ही जबाबदारी होती. नियमशास्त्र इस्राएल पालकांना म्हणते: “ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात बिंबिव; आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर ठशीव व घरी असता, मार्गाने चालत असता, निजता उठता त्याविषयी बोलत जा.” (अनुवाद ६:६, ७) वास्तविक पाहता येशू “ज्ञानाने वाढत गेला” व तसेच “देवाच्या कृपेत वाढत गेला” हे हेच दर्शविते की योसेफ व मरिया, ही ती आज्ञा पाळीत होते.
काहींना कदाचित असे वाटेल की येशू परिपूर्ण मूल होते हे पहाता त्याला वाढविण्याची पद्धत ही इतर लेकरांना वाढविण्यासाठी पूरक असा मुलभूत नमूना पुरवित नाही. तथापि योसेफ व मरिया हे कांही परिपूर्ण नव्हते. तरिही त्यांनी स्पष्टपणे त्याच्या शारिरिक व आध्यात्मिक गरजांची भरवणूक त्यांजवर वाढत्या कुटुंबाचा बोजा येत असताही पुरविली. (मत्तय १३:५५, ५६) तसेच, येशू परिपूर्ण असताही त्याला बाळकामधून बाल्यावस्था व किशोर वयातून प्रौढावस्थेत पोहंचणे होते. त्याच्या पालकासाठी वळण लावण्याजोगे बरेच काम होते व त्यांनी स्पष्टपणे ते उत्तम रित्या केले.
१२ वर्षांचा येशू
“त्याचे आई बाप दरवर्षी वल्हांडण सणास यरूशलेमास जात असत.” (लूक २:४१) देवाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक पुरुषाने यरूशलेमेत सणास येणे होते. (अनुवाद १६:१६) परंतु अहवाल सांगतो की “त्याचे आई बाप . . . जात असत.” योसेफ मरियेस त्याचप्रमाणे कुटुंबातील इतरांना घेऊन आनंदोत्सवासाठी यरूशलेमेस ६० मैल (१०० कि.मी.) दूरवर प्रवास करी. (अनुवाद १६:६, ११) हा त्यांचा प्रघात—त्यांच्या जीवनातील नियमित भाग होता. तसेच, हे त्यांनी नुसत्या दिखाव्यासाठी केले नाही तर ते सणाचे सर्व दिवस थांबून राहात.—लूक २:४२, ४३.
हे आजच्या पालकांना उपयुक्त धडा शिकविते. हा यरूशलेमेत विधीयुक्त गंभीरपणे एकत्र येण्याचा तसेच तो हर्षाचा वार्षिक सण होता. (लेवीय २३:४, ३६) त्याने योसेफ, मरिया व छोट्या येशूस आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव पुरविला. सध्याचे, पालक अशाच प्रकारच्या प्रसंगाचा त्यांच्या तरूण लेकरांना हर्षभरित तसेच आध्यात्मिक उन्नतीच्या प्रसंगाचा मागोवा घेण्यास बरेच कांही करतात. यहोवाचे साक्षीदार असणारे पालक हे त्यांच्या लेकरांना संमेलन व भव्य अधिवेशने जी नियमितपणे वर्षात समांतरीत अवधीने होतात त्यास घेऊन जाऊन हेच करतात. अशाप्रकारे लेकरांना प्रवासाचा हर्षभरित अनुभव हे हजारो समविश्वासू जनासोबत थोडे दिवस मिसळण्याचे शक्य होते. एक यशस्वी पालक ज्याने दहा लेकरांचा प्रतिपाळ केला त्याने ख्रिश्चन यानाते बाप्तीस्मा घेऊन ४५ वर्षे झाली कोणत्याही संमेलनाचा एकही कार्यक्रम आपल्या मुलांसहित कधीही चुकविला नाही. त्याच्या कुटुंबातील कोणीही तो गमावू नये असेच उत्तेजन दिले.
एक नजरचूक
येशू लहान होता तेव्हा तो या भव्य यरूशलेम शहराच्या वार्षिक सहलीत त्याच्या पालकांच्या निकट राहिला यात शंका नाही. तथापि तो वयाने वाढत गेला तसे त्यास मोकळीक दिली गेली असावी. तो १२ वर्षाचा होता तेव्हा यहुदी ज्यास प्रौढत्वाकडे निरविणारी महत्वपूर्ण वयोमर्यादा म्हणून पहात त्या जवळपास होता. कदाचित सामान्य व स्वाभविक बदलामुळे योसेफाचा परिवार यरूशलेम साडून घरी परतत असताना एक नजरचूक घडली. अहवाल असा वाचतो: “ते परत जाण्यास निघाले तेव्हा तो मुलगा येशू यरूशलेमात मागे राहीला हे त्याच्या पालकांच्या नजरेस आले नाही; तो वाटेच्या सोबत्यात असेल असे समजून ते एका दिवसांची वाट चालून गेले. नंतर नातलग व ओळखीचे यांच्यामध्ये त्यांनी शोध केला.”—लूक २:४३, ४४.
या प्रसंगाची काही वैशिष्ठे आहेत जी पालक व तरूण मुले या दोघांनीही ओळखली पाहिजेत. तथापि यातील एक भिन्नता येशू परिपूर्ण होता ही आहे. तो योसेफ व मरिया यांना आज्ञाधारक होता हे पहाता आम्ही अशी कल्पना केव्हाही करू शकत नाही की तो त्यांनी केलेली योजना पाळण्यात अपयशी ठरला. (लूक २:५२) त्यामुळेच संभाषणात खंड पडला असावा याची ती शक्यता असावी. पालकांना वाटले की येशू नातलग व ओळखींच्या लोकांबरोबर असेल. (लूक २:४४) हे जाणणे सोपे आहे की यरूशलेमामधून निघण्याच्या घाईगडबडीत, ते त्यांचे लक्ष प्रथम त्यांच्या लहान लेकरांकडे देतील व त्यांना वाटले की त्यांचा मोठा मुलगा येशू सोबत येतच असेल.
तथापि, येशूने विचार केला की तो कोठे होता हे त्याच्या पालकांना माहीत असावे. हे त्याच्या नंतरच्या प्रत्युत्तरात दिसते: “तुम्ही माझा शोध करीत राहीला हे कसे? जे माझ्या पित्याचे आहे त्यात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नसावे काय?” तो अनादर करणारा नव्हता. त्याचे शब्द केवळ आश्चर्य प्रकट करतात की त्याच्या पालकांना त्याला कोठे शोधावे हे माहीत नव्हते. असा गैरसमज होण्याचे हे नमुनेदार प्रकरण होते ज्यास वाढत्या लेकरांचे पालक नक्की ओळखतील.—लूक २:४९.
येशू हरवला आहे हे आढळल्यानंतर पहिल्या दिवसाच्या समाप्तीस योसेफ व मरियेस वाटलेल्या हुरहुरीचा विचार करा. त्याला शोधण्यास नंतर त्यांनी यरूशलेम पालथे घातले त्या दोन दिवसामधील चिंत्तेची सुद्धा कल्पना करा. तथापि येशूस दिलेल्या शिस्तीवर पाणी फिरले नाही हे येथे प्रत्ययाला आले. येशू कुसंगतीत गुरफटला नव्हता. त्याने पालकांवर शिंतोडे आणले नाही. त्यांना येशू सापडला तेव्हा तो “मंदीरामध्ये गुरुजनात बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यांना प्रश्न करताना सापडला, त्याचे बोलणे जे ऐकत होते ते सर्व त्याच्या बुद्धीवरून व उत्तरावरून थक्क झाले.”—लूक २:४६, ४७.
वास्तविकतेत तो त्याचा वेळ अशामार्गी खर्च करीत होता व आध्यात्मिक तत्वावरील त्याची पक्कड स्पष्ट होती, हे योसेफ व मरिया यांनी त्याला दिलेली तालीम केवढी उत्तम होती त्याचा पुरावा देते. तथापि काळजी करणाऱ्या मातेची, मरियेची प्रतिक्रिया नमुनेदार आहे: प्रथमतः तिचा मुलगा सुरक्षित पाहून सुटकेचा निश्वास तिने टाकला व त्यानंतर तिची काळजी व विफलता व्यक्त केली: “बाळा तू आमच्याबरोबर असा का वागलास? पहा तुझा बाप व मी कष्टी होऊन तुझा शोध करीत आलो आहोत.” (लूक २:४८) योसेफापोक्षा मरिया दोघांच्या चिंता व्यक्त करते हे कांही अनपेक्षित नाही. हा अहवाल वाचणारे पुष्कळ किशोर वयीन असे कांही म्हणतील: “हे तर माझ्या आईच्या प्रमाणेच आहे!”
शिकण्याचा धडा
या अनुभवापासून आम्ही काय शिकतो? किशोर वयीनांचा असे वाटण्याकडे कल असतो की त्यांच्या पालकांना ते काय विचार करतात ते ठाऊक आहे. त्यांना असे म्हणताना आपण ऐकतो की: “मला वाटले की तुम्हाला ते ठाऊक असेल.” पालकांनो तुमच्या किशोर वयीनाने गैरसमजामुळे असे म्हटले तर तुम्हीच समस्याला तोंड देणारे पहिले नाहीत.
लेकरे यौवनात येतात तेव्हा ती त्यांच्या पालकावर कमी विसंबून राहणारी बनतात. हा बदल स्वाभाविक आहे व पालकांनी यास मुभा देण्यास स्वतःत फेरबदल केला पाहिजे. तरीपण चांगली तालीम असूनही गैरसमज उद्भवेल व पालकांना त्यांच्या चिंत्तेचा वाटा मिळणार. तथापि त्यांनी संकट समय येतात तेव्हा योसेफ व मरिया यांच्या उदाहरणाचे अनुकरण केले तर दिलेली तालीम त्यांच्या लेकरांना चांगल्या भूमिकेत ठेवील.
येशूचे पालक त्याच्या किशोर वयात त्याच्याबरोबर काम करीत राहिले. आत्ताच विचार केलेला प्रसंग घडल्यानंतर तो गावाकडे “त्यांच्या सोबत गेला” व “त्यांच्या आज्ञेत राहिला.” कोणत्या परिणामास्तव? “येशू हा ज्ञानाने, शरिराने व देवाच्या व माणसांच्या कृपेत वाढत गेला.” यास्तव या घटनेचा अंत हर्षात झाला. (लूक २:५१, ५२) जे पालक योसेफ व मरिया यांचे अनुकरण करतील, त्यांच्या लेकरांची वाढ इश्वरी ज्ञानात होण्यास त्यांना मदत करतील, कुटुंबात चांगले वातावरण देतील व त्यांच्यापुढे उत्तम इश्वरी संगतीचा प्रभाव ठेवतील, त्यांच्याध्ये त्यासारखेच कांहीतरी त्यांच्या मुलांच्या बाबत घडण्याचा दाट संभव असतो. ते ख्रिश्चन प्रौढतेच्या जबाबदारी प्रत वाढतील तसे अशाप्रकारची मुले बहुदा सुखकर जीवनाचा आनंद लुटतील.
[तळटीपा]
a मूळ ग्रीक हे विचार सामावून आहे की येशू “ज्ञानात वाढत गेला” म्हणजेच सातत्याने प्रगमनशीलपणे वाढत गेला.