तुम्ही तुमच्या मुलांबद्दल काळजी करता का?
अर्थातच! तुमच्या मुलांना धमकावीत असणाऱ्या केवळ तीन समस्या आजार, मादक औषधांचा दुरुपयोग व गुन्हेगारी या तुम्ही जाणता. मुलांविषयी चिंता करणे—एवढेच काय पण त्यांच्याबद्दल काळजी करणे पालकांच्या बाबतीत स्वाभाविक आहे.
संपूर्ण इतिहासभर बहुतेक पालकांना असेच वाटले आहे असे पवित्र शास्त्र दाखविते. याकोब चिंतातुर होता म्हणूनच त्याने योसेफास त्याच्या भावाकडे ते कसे काय आहेत हे पहाण्यास पाठविले हे आठवा. (उत्पत्ती ३७:१३, १४) ईयोब सुद्धा त्याचे पुत्र त्यांच्या स्वतःची कुटुंबे असण्याएवढे वयस्कर असताही त्यांची काळजी करून होता. त्याने विचार केला: “माझ्या पुत्रांनी पाप केले असेल व आपल्या अंतःकरणात देवाचा अव्हेर केला असेल.”—इयोब १:४, ५.
तसेच योसेफ व मरिया सुद्धा त्यांचा परिपूर्ण पुत्र येशू विषयी चिंता करून नव्हते का! वास्तविक, येशू १२ वर्षाचा होता तेव्हा एके प्रसंगी ते खासकरून त्याच्याविषयी हरवला असे त्यांना आढळले तेव्हा चिंताक्रांत होते. तरीसुद्धा त्यांचा मुलगा त्यांना गौरवास्पद होता व स्वतःस दोष देण्याचे त्यांना कोणतेच कारण नव्हते. त्या स्तुतीपर प्रसंगी अक्षरशः काय घडले व आधुनिक पालक त्यापासून काय धडा घेऊ शकतात ते आपण पाहू या.
हरवलेला मुलगा
तुम्ही पालक आहात तर तुम्ही कदाचित मरियेने येशूस जे धमकावून म्हटले की: “बाळा, तू आमच्याबरोबर असा का वागलास? तुझा बाप व मी कष्टी होऊन तुझा शोध करीत आलो” त्याविषयी कदाचित सहमत दाखवाल. योसेफ व मरिया येशू पासून विलग होऊन तीन दिवस झाले होते. त्यामुळे आपला १२ वर्षे वयाचा मुलगा कोठे होता. हे जाणण्यास ते का चिंतातुर होते याविषयी तुम्ही रसिकता दाखवू शकाल.—लूक २:४८, टूडेज इंग्लीश व्हर्शन.
येशू, योसेफ व मरिया यापासून कसा हरवला? एका सुविख्यात निरीक्षकाने या गोष्टीबद्दल त्यांच्यावर टिकास्त्रच उगारले, तो लिहीतो: “त्यांच्याजवळ केवढा ठेवा आहे हे जाणूनही ते एवढा दिर्घकाळ त्याकडे कानाडोळा कसे करून राहू शकले? आईची अंतरिक ओढ व तळमळ कोठे गायब झाली होती?” परंतु खरेतर, आम्ही पाहू तसे अहवालाचे बारकाईने केलेले परिक्षण योसेफ व मरिया यांना दोषमुक्त करील.
वस्तुस्थिती ही आहे की मरिया उत्तम गृहीणी व चांगली आई होती असे पवित्र शास्त्र दाखविते. गाब्रिएल दूत येशूच्या जन्माचे भाकीत करण्यास आला तेव्हा तो म्हणाला होता की तिजवर “देवाची कृपादृष्टी झाली.” (लूक १:२८, ३०) तिने या खास मानवी–बाळास जन्म देण्याची नेमणूक तसेच त्यास तालीम देऊन वाढविण्याची अवघड जबाबदारी स्वखुषीने स्विकारली होती. ती नम्र व देवावर दृढ विश्वास असणारी स्त्री होती, येशूच्या जन्मानंतर यहोवाच्या नियमाप्रमोण “लिहीले आहे त्याप्रमाणे” तिने सर्व कांही केले होते.—लूक १:३८, ४५–४७; २:२१–२३, ३९.
ज्याने मरियेसोबत विवाह केला व येशूचा दत्तक बाप बनला तो योसेफ ही चांगला, धार्मिक मनुष्य होता, ज्याने यहोवाच्या दूतासोबत चार प्रसंगी बोलणी केली हाती. (मत्तय १:१९, २०; २:१३, १९, २२) यहोवाने योसेफ व मरिया यांना त्याच्या बहुमोल, एकुलत्या एका पुत्रास वाढविण्यासाठी निवडले हे ध्यानात ठेवा. जे दांपत्य या पुत्रास इश्वरी ज्ञानात वाढविल अशांची निवड करण्यात देव कांही कमी करील का?
अर्थातच सध्याचे पालक त्यांच्या मुलांबाबत त्यांच्या सभोवताली असणारे धोके व वातावरणामुळे चिंताक्रांत आहेत. त्यांना हे माहीत आहे की येशू होता त्याप्रमाणे त्यांची लेकरे परिपूर्ण नाहीत. तरीसुद्धा आम्ही योसेफ, मरिया व येशू यांच्या उदाहरणापासून फायदा घेऊ शकतो.