सामाजिक सेवा—तिचा लोकावर परिणाम कसा होतो
येशू ख्रिस्ताने इ.स. ३२च्या वल्हांयडण सणाच्या (मार्च–एप्रिल) सुमारास फक्त पाच सातुच्या भाकरी व दोन लहान मासे याने ५००० पेक्षा जास्त पुरुष स्त्रिया व बालके यांना आश्चर्ययुक्तपणे भरविले होते. (मत्तय १४:१४–२१; योहान ६:१–१३) येशूठायीच्या विलक्षण शक्तीस जाणून लोक त्याला त्यांचा राजा बनवू इच्छीत होते. तो त्यांना रोमी जाचापासून मुक्त करील व त्यांचे जीवनमान सुधारेल असे त्यांना वाटले असावे. पण येशूची प्रतिक्रीया काय होती?
लोकप्रिय मागणीस मान्यता दाखविण्याऐवजी येशू “पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला.” (योहान ६:१५) परंतु लोकसमुदायाने त्याला सहजरित्या सोडले नाही. ते पुन्हा त्याजकडे दुसऱ्याच दिवशी आले. त्यांचा अंतःस्थ हेतु हेरून येशू त्यांना म्हणाला: “मी तुम्हास खचित खचित सांगतो, तुम्ही चिन्हे पाहिली म्हणून नव्हे तर भाकरी खाऊन तृप्त झाला म्हणून माझा शोध करीता.” त्यानंतर त्याने पुष्ठी जोडली: “नाशवंत अन्नासाठी नव्हे तर सार्वकालिक जीवनासाठी टिकणाऱ्या अन्नासाठी श्रम करा.”—योहान ६:२५–२७.
आम्ही या अहवालाकडून काय शिकू शकतो? इतर गोष्टी सोबतच हे, स्पष्ट होते की भौतिक गोष्टीने लोकांना आकर्षित करणे अधिक सोपे आहे. तथापि, आत्मिक गोष्टीसाठी अस्सल आवड उभारणे—सार्वकालीक मोलाची गोष्ट—ही पूर्णपणे वेगळीच गोष्ट आहे. सध्या, एकाद्या गोष्टीकडे केवळ भौतिकवादीपणे पहाणे अधिक प्रचलित बनले आहे.
समाज सेवेचा दृढ आर्जव
विकसनशील राष्ट्रातील लोकांच्या नजरेत पुढारलेली पाश्चिमात्य राष्ट्रे सर्व संधी व एकादा अपेक्षिल, व त्याच्या स्वतःच्या राष्ट्रात उपलब्ध नाही ते भौतिक फायदे सादर करतात. उत्कर्षाचा हव्यास होतो व रहाणीमान चढाओढीचे बनते. उच्च शिक्षणाची संधी प्रत्येक विद्यार्थ्यापुढे जणु काय प्रगति व यशाचा परवाना म्हणून ठेवली जात आहे. परदेशी चर्च, समाज सेवा कार्यक्रम अशा राष्ट्रात भुलविणारा का असावा या पाठीमागची पार्श्वभूमी जाणणे कठीण नाही. परंतु परिणाम काय दिसत आहेत?
पूर्वेकडे, उदाहरणार्थ, लोक बक्षिस मिळविण्यास वा देणगीस पात्र ठरण्यास चर्च अपेक्षिते ते कांहीही करण्यास तयार असल्यामुळे “राईस ख्रिश्चन” यांची भरमसाट वाढ झाली. शोकान्तीका ही आहे की अर्थातच अशी मदत व पाठींबा थांबतो तेव्हा लोकांची आस्था ही थंड होते. पुष्कळ राईस ख्रिश्चन दृष्यातून दिसेनासे झाले आहेत. अशाप्रकारे लष्करी वसाहतीत अशी प्रसिद्ध म्हण आहे जिचे भाषांतर कांहीसे अशा प्रकारे आहे: “देवाने जगावर प्रिती केली परंतु जग पावडरच्या दुधावर प्रेम करते.”
तथापि पुष्कळ चर्च गट विपत्ती समय वगळता मदत कार्यक्रम राबवीत नाहीत तरी पुर्वी जे घडले त्याने मात्र छाप सोडली आहे. पुष्कळ पौर्वात्यांना चर्च, दानधर्म संघटना म्हणून ज्ञात आहेत व चर्चला जाण्याचे एकमेव कारण घेणे आहे पण देणे नव्हे. चर्चसाठी व्यक्तीगत त्याग करण्याची निकड त्यांना दिसतच नाही. यामुळेच साधारणतः असा अनुभव दिसून येतो की जेव्हा पवित्र शास्त्र प्रकाशने सादर केली जातात तेव्हा त्यांची किंमत देण्यात लोक का कू करतात कारण त्यांना वाटत असते की हे कोणा चर्चकरवीचे प्रकाशन आहे तर ते मोफत मिळाले पाहिजे.
चर्चचा उपयोग कसा केला जातो हे खासरित्या शैक्षणिक क्षेत्रात दिसून येते. पुष्कळ प्रगतशील राष्ट्रात पाश्चिमात्य शिक्षणप्राप्त करणे याकडे किर्ती व यशाच्या खात्रीचा मार्ग म्हणून पाहिले जाते. एका उगमानुसार, ब्रिटन कडून भारताने स्वातंत्र्य मिळविले त्यावेळी त्या राष्ट्राच्या ८५ टक्के पार्लमेन्ट सदस्यांनी “ख्रिस्ती शाळा”तून शिक्षण घेतले होते, कन्फ्युशियन्स विचारधारेनुसार अति पुर्वेकडील भागात चांगले शिक्षण प्राप्त केलेले असणे हे जीवनातील श्रेष्ठ ध्येयातील एक होय. स्वाभाविकपणे, पुष्कळ जण चर्चच्या शाळाकडे डोळे लावतात कारण त्या स्व–प्रगतीसाठी सर्वसाधारणपणे पाश्चिमात्य पद्धती व दर्जे उपयोगात आणतात. आपल्या मुलांना चर्चने चालविलेल्या एकाद्या शाळेत प्रवेश मिळविण्यास व नंतर विदेशी जाऊन शिक्षण संपादता यावे यासाठी पौर्वात्य पालक जे सांप्रदायीक धर्म पाळीत ते स्वतःहून आनंदाने चर्चला जातात व त्यांच्या लेकरांना तेच करण्यास आर्जवितात.
फलप्राप्ती काय आहे?
स्वराष्ट्रातील चर्चेसच्या तुलनेत पाहता मिशन चर्चेसला चांगली उपस्थिती असते. पुष्कळ लोकांना अशाप्रकारे चर्च शिकवण व कांही ख्रिस्ती कल्पनांचा परिचय करून दिला जातो. परंतु या पद्धतीने त्यांना पवित्रशास्त्र व त्याचा संदेश समजण्यास मदत केली का? याने त्यांना खरेच ख्रिश्चन म्हणजे येशू ख्रिस्ताचे अनुयायी बनविले का?
उदाहरणार्थ कुओ टूंग या सुरवातीस उल्लेखलेल्या युवकाचा विचार करा. कांही काळ चर्चला उपस्थीत राहिल्यावर त्याला विचारले गेले की तो देवावर आता विश्वास ठेवतो का तेव्हा तो उत्तरला: “नाही, देव अस्तित्वात आहे याच्या पुराव्याची चर्चा कधीही केली गेली नव्हती.” वास्तवकि त्याने हे मान्य केले की त्याजसोबत चर्चला जे मित्र जात होते ते तरी देवाच्या व्यक्तीत्वावर कितपत विश्वास ठेवतात याबद्दल तो साशंक होता. तो म्हणतो की केवळ इंग्रजी शिकायला मिळते यासाठी त्याजसोबत जे जात होते.
आणखी एक युवक अमेरिकेतील महाविद्यालयातून सुट्टी लागली तेव्हा आपल्या घरी आला होता. यहोवाच्या साक्षीदारातील एकाने त्याची भेट घेतली त्यावळी त्याने विचारले की साक्षीदार त्यांची सभा इंग्रजीत चालवितात का? ते का बरे?! “म्हणजे मला माझे इंग्रजी जतन करता येईल” असे तो उद्गारला. त्याला जेव्हा सांगितले की सर्वांना अध्यात्मिक फायदा व्हावा म्हणून सभा स्थानिक भाषेत होतात तेव्हा तो युवक उद्गारला की जेथे सप्ताहात दोन सभा इंग्रजीत चालतात तेथे तो जाईल.
जे चर्चचे सदस्य बनले व बाप्तिस्मा पावले तेही त्यांच्या दृष्टीकोनात फारच अल्प बदल दाखवितात. त्यांच्यातील पुष्कळ जण त्यांच्या पुर्वीच्या विश्वास किंवा पद्धतींना बिलगून आहेत बहुदा संमतीने, तसे नसल्यास त्यांच्या चर्चच्या आशीर्वादाने. उदाहरणार्थ, चिन मध्ये रोम कॅथोलीकांना त्याच्या पुर्वजांची भक्ती चालू ठेवण्यास मोकळीक आहे पण तेच इतरत्र मनाई आहे. आशीर्वाद दर्शविणारी चिनीमातीची नक्षीदार पट्टी “ख्रिस्ती” घराच्या दरवाजाच्या कमानीवर दिसते. ओकीनावा मध्ये जनावरांच्या स्वरूपाची दैवतांची चित्रे दरवाज्याच्या कोपऱ्यात कुटुंबास संरक्षणासाठी ठेवली जातात.
चर्च कार्यक्रमांपासून फायदा मिळवितात त्यांच्याबद्दल काय? त्यांना सांपडलेल्या नविन आर्थिक व भौतिक सुरक्षिततेत, त्यांना आजच्या समस्यांच्या पर्याय स्वतःवर विसंबून रहा असे उत्तर ऐकणे हे असामान्य नाही. याचा परिणाम हा झाला की त्यांच्यातील पुष्कळांनी स्वतःस चर्चमधील कोणत्याही सहभागीत्वापासून दूर ठेवले किंवा याहून उत्तम स्वतःस आदरयुक्त परिस्थितीत ठेवले.
चर्चच्या मिशनऱ्यांना पवित्रशास्त्र काय म्हणते ते शिकविण्याच्या पुष्कळ सुसंध्या होत्या. तरीपण त्यांनी येशूचा बोध, “प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळविण्याची खटपट करा म्हणजे ह्या इतर गोष्टी तुम्हास मिळतील” हा अनुसरण्यास शिकविण्याऐवजी “इतर गोष्टी” वर जोर दिला. (मत्तय ६:३३) सामाजिक सेवेद्वारा त्यांनी लोकांना शारिरिक, औषधोपचार व शैक्षणिक मार्गी बरीच मदत केली पण हे फायदे तात्पुरते होते. आत्मिक दृष्टीकोन न पुरविल्यामुळे बहुदा असा कार्यक्रम अधिक तात्पुरत्या किंवा जगिक फायदे मिळविण्यास प्रयत्न करण्यास प्रेरक ठरतो.
चर्चेसनी आपली सुरुवात शुभवृत प्रचारासाठी केली. परंतु बहुतांशी परिणाम पाश्चिमात्य भौतिक जीवनीमार्गास चेतना देणारा दिसला. होय, त्यांनी पुष्कळ धर्मांतरीत मिळविले. परंतु आम्ही पाहिले आहेच त्याप्रमाणे त्यातील पुष्कळ, पुर्वी नव्हे तेवढे अधिक जगिक व भौतिकवादी, बनले. येशूच्या काळातील धार्मिक नेत्यांना तो म्हणाला: “तुम्ही एक मतानुयायी मिळविण्यास समुद्र व भूमि पालथी घालता आणि तो मिळाला म्हणजे तुम्ही त्याला आपणाहून दुप्पट नरकपुत्र करता.” (मत्तय २३:१५) या दृष्टीने पाहता सामजिक सेवेद्वारा शुभवर्तमान प्रचार करण्याचा ख्रिस्ती राष्ट्रसमुहाच्या प्रयत्नांचा परिणाम उलट्या उडीसारखा झाला. येशू ख्रिस्ताने दिलेल्या त्या महान कार्यास “जा व सर्व राष्ट्रातील लोकास शिष्य करा, . . . मी तुम्हास सांगितलेल्या सर्व गोष्टी त्यांना पाळावयास शिकवा” त्यात ते तोकडे पडले.—मत्तय २८:१९, २०.