सामाजिक कार्याद्वारे ‘शुभवर्तमानाचा प्रचार’
कुओ टूंग या हाँग काँग मधील बुद्ध युवकास महाविद्यालयीन शिक्षण मिळाले. हसीयु यिंग या तायवान मधील मातेस तिच्या मुलाच्या चिंताजनक आजारात उपचाराची मदत मिळाली. या दोन भिन्न भिन्न घटनांमध्ये सर्वसाधारण अशी कोणती गोष्ट आहे?
कुओ टूंग साठी महाविद्यालयीन शिक्षण सर्वसाधारणपणे ऐपती पलीकडचे होते. परंतु तो ज्या चर्चचा होता त्यामार्फत त्याच्यासाठी मार्ग खुले झाले. त्याचप्रमाणे हसीयु यिंगच्या मुलाला आवश्यक तो बिकट वैद्यकीय उपचार तिच्या विभागातील चर्चच्या मालकीच्या दवाखान्यात उपलब्ध झाला होता. पुन्हा चर्च सोबतच्या संबधाने समस्या मिटली गेली.
कुआ टूंग व हसीयु यिंगच्या गोष्टी असामान्य नाहीत. विकसनशील राष्ट्रातील हजारो लोक चर्चद्वारा पुरस्कृत असणाऱ्या शाळा, दवाखाने, अनाथाश्रम व सामाजीक संस्था यांना आकर्षित झाले. अशामार्गी त्यांनी स्वतःसाठी पुष्कळ भौतिक फायदा प्राप्त केला. अशाप्रकारे चर्चला जाऊन मिळणाऱ्यांनी चर्चचे सभासदत्व यादीस भरून टाकण्यास मदत केली.
दीर्घ ऐत्याहासीक सराव
अर्थातच चर्चच्या शाळा व दवाखाने ही कांही नवीन गोष्ट नाही. वास्तविक सुरवातीच्या काळात मिशनऱ्यांना मूर्तिपूजक प्रतिकूल म्हणविल्या जाणाऱ्या राष्ट्रात पाठविले तेव्हा शाळा, दवाखाने याकडे नवीन क्षेत्रे सुरु करण्यास व स्थानिक लोकांचे मित्रत्व व भरवसा संपादण्यास प्रभावी उपकरणे म्हणून पाहिले गेले.
उदाहरणार्थ, भारतामधील १९व्या शतकाच्या सुरवातीच्या परिस्थीतीचे वर्णन करताना नाइटीन सेन्च्युरी ऑफ मिशन (१८९९) पुस्तक म्हणते: “मिशनरी, सुवार्ता कार्यातच केवळ तन्मयतेने नाहीत तर त्यांनी शैक्षणिक, वैद्यकीय सेवा, झेनान कार्यात परिश्रम करून उल्लेखनिय यश मिळविले.” परिणाम? “प्रत्येक मिशन जवळ त्यांच्या स्वतःच्या दिवसाच्या शाळा, औद्यागिक व वसतिगृह शाळा, उच्च माध्यमिक शाळा किंवा महाविद्यालय व जवळजवळ सर्वबाबतीत वेदान्त विद्यालय आहेत.”
वैद्यकीय कार्यातील त्यांची भूमिका यावर “मिशनरी धाडस” यात तेच पुस्तक पुढे म्हणते: “डॉक्टरांचे नेहमीच स्वागत असे. शारिरिक वेदनातून मिळालेली सुटका केवळ डॉक्टरवरील आत्मविश्वासाची प्रेरणा देत नव्हता, तर तो शिकवित असलेल्या धार्मिक विश्वासाचे अनुकरणास चालना देणारा ठरले. संपूर्ण गावे वैद्यकीय उपचाराकडे निरविली गेली व परिणाम मूर्तिपूजकतेचा धिक्कार करून ख्रिस्ती शिक्षण प्राप्त करण्यात झाला.”
भारतामध्ये सत्य होती तीच गोष्ट पूर्वेकडील राष्ट्रे, दक्षिण अमेरिका व आफ्रिका या इतर देशातही सत्य ठरली. सामाजिक सेवेतून शुभवर्तमान प्रचार करणे हे लोकप्रिय झाले होते. युरोपियन व अमेरिकेच्या मिशनरी संस्थांनी मग ते कॅथोलीक किंवा प्रॉटेस्टंट असोत यांनी या विभागात कार्यकर्ते पाठविले. त्यांनी शाळा, दवाखाने व इतर संस्था व आपापल्या मिशनांची स्थापना केली. स्थानिक लोकांना आकर्षित करण्यात हे फारच यशस्वी शाबीत झाले व अशाप्रकारचे समाज कार्य लवकरच चर्चेसनी पाठींबा दिलेल्या परदेशी मिशनरी कार्याचा अंतर्गत भाग बनले.
पुष्कळ वर्षे या चर्चने चालविलेल्या संस्थांनी स्थानिक समाजात महत्वपूर्ण जम बसविला. त्यांच्या शाळा व महाविद्यालये व या प्रकारच्या इतर संस्था बहुदा प्रतिष्ठीत झाल्या व उच्च शिक्षणासाठी तेथेच धाव सुरु झाली. सर्वसाधारपणे त्यांचे दवाखाने अति सुसज्ज व आधुनिक आहेत. पुष्कळ विभागात सरकार सामाजिक समस्येने हाताश आहे तेथे सन्मान केला जात नसला तरी त्यांचे स्वागत केले जाते.
अशा कार्यक्रमाद्वारे पुरविलेल्या सेवेचा समाजास चांगला फायदा झाला यात मुळीच प्रश्न नाही. चर्च चालवित असलेल्या शाळा व महाविद्यालय यांनी त्या शिक्षणापासून वंचीत असणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. अशाप्रकारच्या दवाखान्यांनी व आरोग्य सेवांनी मागासवर्गिय व उपेक्षित विभागातील असंख्य लोकांना दिलासा दिला. अल्बर्ट रचवेटझर व “मदर” तेरेसा हे मानवतावादी कार्यासाठी अंतरराष्ट्रीय स्थरावर ख्यातनाम आहेत व दोहोंनीही नोबल शांती पुरस्कार मिळविला आहे.
तरीपण एकाद्याने विचारले पाहिजे: सामाजिक शुभवर्त्तमानाने खरोखरच त्याचे ध्येय साध्य केले का? या दानशूर कार्याकडून फायदा झालेल्यांना त्याने खरे ख्रिस्ती बनविले का? त्याने लोकांना सत्य विश्वास व आशा दिली का? याहून अधिक महत्वपूर्ण ते आम्ही विचारलेच पाहिजे: ‘सर्व जगात शुभवर्तमान गाजवा’ ही आज्ञा त्याच्या अनुयायांना देताना येशूच्या मनात हेच होते का?—मत्तय २४:१४, किंग जेम्स व्हर्शन.