वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 ६/१ पृ. १०-१५
  • यहोवाच्या वचनात आनंद मिळविणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाच्या वचनात आनंद मिळविणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • योग्य मनोवृत्ती उभारा
  • समस्यांवर मात करण्यासाठी हालचाल करा
  • मनन करण्याची गरज
  • अभ्यास—फलदायक व आनंददायक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • राजांचे अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • वैयक्‍तिक अभ्यासात सुधार करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • देवाच्या वचनाचा वैयक्‍तिक अभ्यास आनंददायक बनवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 ६/१ पृ. १०-१५

यहोवाच्या वचनात आनंद मिळविणे

१. यहोवाने “प्रकट केलेल्या गोष्टी” इतरांना शिकविण्याकरता कोणाची नेमणूक करण्यात आली होती?

“प्रकट केलेल्या गोष्टी” ह्‍या आमच्या तारणासाठी अत्यंत महत्वपूर्ण असल्यामुळे या प्रकटीत सत्याविषयीचे शिक्षण देण्याकरता यहोवाने नेहमी जबाबदार व्यर्क्‍तिची नियुक्‍ति केली. (अनुवाद २९:२९) इस्राएलामध्ये याजक व लेव्यांनी ही भूमिका पूर्ण केली. (लेवीय १०:८–११; २ इतिहास ३५:३) इस्राएली पालकांनी देखील आपल्या मुलांना शिक्षण दिले. (अनुवाद ११:१९; नीतीसूत्रे ६:२०) इसवी सनाच्या पहिल्या शतकात अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या मंडळीत अधिकृत अशी नेमणूक लाभलेल्या वडीलांनी शिक्षकाचे काम केले. शिवाय ख्रिस्ती पालकांना आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी आर्जविण्यात आले. (इफिसकर ६:४; १ तिमथ्यी ३:२; २ तिमथ्यी २:२) याशिवाय प्रत्येक ख्रिश्‍चनावर यहोवाने प्रकट केलेल्या गोष्टी ख्रिस्ती मंडळीबाहेर लोकांना जाहीर करण्याची जबाबदारी होती.—प्रे. कृत्ये १:८.

२. यहोवाचे वचन शिकविण्याकरता इतरांवरच विसंबून राहणे पुरेसे आहे का? विवेचीत करा.

२ पण देवाच्या वचनाचे शिक्षण मिळावे याकरता इतरांवरच विसंबून राहणे पुरेसे आहे का? नाही. आम्हा प्रत्येकावर वैयक्‍तिपणे यहोवाने “प्रकट केलेल्या गोष्टीं”चा अभ्यास करण्याची जबाबदारी आहे. यामुळेच स्तोत्रकर्त्याने आपल्यासह इस्त्राएलांसाठी असे लिहिले होते: “जो पुरुष . . . यहोवाच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो तो धन्य.” (स्तोत्रसंहिता १:१, २) प्रेषित पेत्रानेही आपल्यासह उपासकांना हे लिहून उत्तेजन दिले: “तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धि व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकांसारखे निऱ्‍या दुधाची इच्छा धरा.”—१ पेत्र २:२.

३. अभ्यासाविषयीचा पुष्कळांचा स्वाभाविक कल कशाची हाक देतो?

३ तुम्ही पवित्र शास्त्राच्या अभ्यासाकडे कोणत्या दृष्टिकोणातून पाहता? तुम्ही ख्रिस्ती सभांना नियमितपणे जात असाल तर पवित्र शास्त्रावर आधारलेले असे कित्येक सुंदर विषय तुमच्या कानी पडत असतील यात काही शंका नाही. शिवाय काही म्हणतात त्याप्रमाणे, “तुमची सत्यात वाढ झाली आहे” तर तुमच्या पालकांनी तुम्हाला यहोवाने “प्रकट केलेल्या गोष्टीं”पैकी कितीतरी शिकवल्या असतील. पण हे असले तरी तुम्ही व्यक्‍तिशः पवित्रशास्त्राचा अभ्यास करता का? स्तोत्रकर्त्याला अशा प्रकारातील अभ्यासात आनंद वाटत होता हे उघड आहे, पण कदाचित तो तुम्हाला इतका सोपा वाटत नसावा. तसे आहे तर तुम्हीच असे नाहीत. पेत्राने आपल्या समविश्‍वासू जनांना “[वचना विषयीची] इच्छा धरा’ हा जो बोध लिहिला तो हे सुचवितो की व्यक्‍तिगत अभ्यास हा बहुतेकांसाठी स्वाभाविक असा प्रथमतः वाटत नाही. पण त्यापासून आनंद मिळवून घेण्याचे आम्हाला शिकून घेता येईल. ते कसे?

४. व्यक्‍तिगत अभ्यास हा अधिक अपीलकारक बनवता येऊ शकतो हे कोणते उदाहरण दाखविते?

४ समजा, तुम्हाला जमिनीत एक खड्डा खणायला सांगितले गेले. तुम्हाठायी कठीण परिश्रमाचे काम करण्याची स्वाभाविक प्रवृत्ती नसली तर या कामाबद्दल तुम्हाला इतका उत्साह वाटणार नाही. पण समजा तुम्हाला म्हणण्यात आले की, “अहो, जमिनीत एक खजिना पुरलेला आहे.” तर काय? आता मात्र तुम्हाला माती उकरण्याचे काम त्रासाचे वाटणार नाही. उलटपक्षी, तो खजिना तुमच्या डोळ्‌यापुढे तरळत राहून तो उकरून काढणे तुम्हाला मोठे विलोभनीय वाटेल. अशाप्रकारे, तुमची स्वाभाविकरित्या अभ्यासू वृत्ती नसली तरी योग्य मनोवृत्ती राखल्यास हाच अभ्यास तुम्हाला मनोरंजक आणि उत्साहवर्धक वाटेल. अशी ही वृत्ती निर्माण करण्याचे मार्ग आहेत.

योग्य मनोवृत्ती उभारा

५, ६. यहोवाच्या प्रकटीत वचनाद्वारे आम्हाला अतुलनीय आशीर्वाद मिळतात त्यापैकी काही सांगा.

५ प्रथमतः आम्ही नेहमी याचा विचार ठेवावा की पवित्र शास्त्रात केवढी गहन संपत्ति सामावलेली आहे. प्रेषित पौलाने उद्‌गारिले: “अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ति किती अगाध आहे!” (रोमकर ११:३३) हजारो वर्षांच्या कालावधीत यहोवाने ओघाओघाने प्रकटविलेले त्याचे उद्देश भयप्रेरित आहेत व ते आम्हासाठी अद्‌भूत व खात्रीची आशा देतात. यहोवाने पवित्र शास्त्रात जीवनमानासाठी लिखित करून ठेवलेल्या सूचना अवलंबिल्यास त्याद्वारे निश्‍चितपणे यशप्राप्ती मिळू शकेल. (२ तिमथ्यी ३:१६) “तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो, त्याने भोळ्‌यांना ज्ञानप्राप्ती होते.” असे जे स्तोत्रकर्त्याने गायिले ते काही नवलाईचे नव्हते!—स्तोत्रसंहिता ११९:१३०.

६ यापेक्षा अधिक म्हणजे पवित्र शास्त्र आपणात देवाचे विचार राखून आहे आणि हे विचार ग्रहण केल्यामुळे आपण त्याच्या समीप येत राहतो. (याकोब ४:८) आम्हाला इतरांना शिक्षण देऊन त्यांना येशूचे शिष्य करण्याची आज्ञा आहे. (मत्तय २८:१९, २०) या कामात पवित्र शास्त्र हे आमचे मुख्य साधन असल्यामुळे त्याचा चांगला वापर करण्यासाठी आम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे. (इफिसकर ६:१७; २ तिमथ्यी २:१५) तसेच पवित्र शास्त्र आधारित विचार आम्ही आपणात साठवून ठेवल्यास आमचे रक्षण होते, आमची सचोटी राखण्यात आणि विश्‍वासास दुर्बळ करणाऱ्‍या शंका व चुकीच्या कल्पना टाळण्यात आम्हास मदत मिळते.—नीतीसूत्रे ४:५, ६; २०:७; फिलिप्पैकर ४:८.

७, ८. “प्रकट केलेल्या गोष्टीं”च्या बाबतीत, आज आम्ही प्राचीन काळच्या देवाच्या सेवकांपेक्षा अधिक आशीर्वादित का आहोत

७ आज आम्ही सत्याची “रुंदी, लांबी, उंची व खोली किती, हे . . . सर्व पवित्र जनांसह समजू” शकतो हे लक्षात आणा. अशी ही गोष्ट गतकाळी देवाच्या प्राचीन सेवकांना जमू शकली नाही. (इफिसकर ३:१४–१८) पण हेही आठवा की अब्राहामाला आपल्या उभ्या आयुष्यात देवाच्या अभिवचनांची पूर्तता पहावयास मिळू शकणार नव्हती तरी त्याने आपले स्वतःचे घर सोडले व डेऱ्‍यात जाऊन वस्ती केली. (इब्रीयांस ११:८–१०) दानीएलाने समक्ष पाहिलेला दृष्टांत आपणास कळावा अशी विनंति केली, पण त्याला सांगण्यात आले की, “अंतसमयापर्यंत ही वचने गुप्त ठेवून ती मुद्रित केली आहेत.” (दानीएल १२:८, ९) आज, अब्राहामाने ज्या संतानाकडे दृष्टि लावली होती ते दिसून बराच काळ लोटला आहे. आता आम्ही “अंतसमयात” जगत आहोत जेव्हा की दानीएलाने पाहिलेल्या बहुतेक गोष्टींचा अर्थ “प्रकट केलेल्या गोष्टीं”करवी आमच्या समजावणूकीत भरीस पडला आहे.

८ ,प्रेषित पेत्राने लिहिले: ‘ज्या संदेष्ट्यांनी तुम्हावर होणाऱ्‍या कृपेविषयी पूर्वी सांगितले, त्यांनी त्या तारणाविषयी बारकाईने शोध केला. त्यांना असे प्रकट करण्यात आले होते. . . . त्या गोष्टी कळविण्याची सेवा ते स्वतःसाठी नव्हे तर तुम्हासाठी करीत होते, त्या गोष्टी तुम्हास आता सांगितल्या आहेत. त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची उत्कंठा देवदूतांना आहे.” (१ पेत्र १:१०, १२) त्या आरंभीच्या संदेष्ट्यांनी ज्याविषयीची इतकी इच्छा बाळगली होती त्या गोष्टींवर यहोवाने आता प्रकाश पाडला असल्यामुळे आम्ही या सत्याविषयीचे खरे मोल जाणावे, त्या गोष्टी गृहीत धरता कामा नये.

९, १०. पवित्र शास्त्राचा व्यक्‍तिगत अभ्यास करण्याचे जे स्वातंत्र्य आम्हापैकी बहुतेकांना आहे त्याची अधिक जाण कोणत्या उदारणांमुळे वाढविली गेली पाहिजे?

९ योग्य मनोवृत्ती प्राप्त करण्यासाठी, आम्ही, काहींना पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्यास मिळावा म्हणून केवढी मोठी व कठीण लढत द्यावी लागली याबद्दलची जाण राखली पाहिजे. विल्यम टिंडेल यांच्या काळी, कोणा इंग्रजाने ग्रीक शास्त्रवचनाचे स्वतःच्या भाषेतील भाषांतर विकणे, विकत घेणे वा वाचणे हा फार मोठा गुन्हा समजला जाई. १६व्या शतकातील प्युरिटन प्रचारक, जॉन फोक्स यांनी कळविले की प्रॉटेस्टंट मतात नव्यानेच परिवर्तित झालेल्या एका माणसाने स्पेनमध्ये काही पवित्र शास्त्र प्रती चोरून आणल्या तेव्हा काय घडले. त्याला विश्‍वाघाताने धरले गेले आणि एका खांबाला बांधून जिवंत जाळण्यात आले व ज्यांनी पवित्र शास्त्र विकत घेतले होते त्या ८०० लोकांना अटक करण्यात आली. वीस जणाना लोखंडाच्या सळईवर भाजून काढण्यात आले. इतरांना जन्मठेप मिळाली, जाहीरपणे चाबकाने झोडपण्यात आले किंवा जहाजात बसवून सोडून देण्यात आले. फारच थोड्यांना निर्दोष असे सोडण्यात आले.

१० आधुनिक काळात सुद्धा यहोवाच्या साक्षीदारांना कधी कधी मोठ्या धोक्याच्या वातावरणात राहून पवित्रशास्त्राचा अभ्यास करावा लागला. राजकीय बंधांच्या छावण्यात वा तुरूंगात असताना त्यांनी पवित्र शास्त्र हाती यावे याकरता शिक्षा वा मरणाचीही जोखीम पत्करली. एकान्त कोठडीतील तुरूंगवासात टाकलेल्या एका मिशनऱ्‍याने त्याला आठवणीत असणारी सर्व शास्त्रवचने लिहून काढली व नंतर तो वर्तमानपत्रात “धर्म” रकान्यात जी एकेक शास्त्रवचने छापली जात ती खोडीत गेला. कित्येक वर्षे पवित्र शास्त्राप्रत पोहोचण्याचा त्याचा हाच एकमेव मार्ग होता. होय, पवित्र शास्त्रावर बंदी येते तेव्हा त्याच्या वाचनासाठी ख्रिश्‍चन हवी ती धडपड करतात. तर मग आता पवित्र शास्त्र उपलब्ध असताना व ते कपाटातून काढून वाचणे इतकेच श्रम घ्यावे लागतात तर त्याकरता आम्ही अल्प परिश्रमी असावे का?

११. काही माहिती वारंवार चर्चिण्यात येते या गोष्टीने आम्हाला पवित्र शास्त्राभ्यासाच्या बाबतीत बेपर्वा बनवावे का?

११ काहींनी म्हटले आहे की त्यांना टेहळणी बुरुज मासिकातील उत्तरे, त्यातील काही साहित्याची पुनरावृत्ती होत असल्यामुळे विनासायास देता येतात. अशाप्रकारे, व्यक्‍तिगत अभ्यासासंबंधाने असणारी गरज ते न्याहाळीत नाहीत. असे लोक पुनरावृत्तीचे मोल कमी लेखतात. यहोवाकडील निर्बंध वा वारंवार दिले जाणारे स्मरण जसे स्तोत्रकर्त्यास आवडीचे वाटत होते तसे आम्हासही वाटावेत. (स्तोत्रसंहिता ११९:११९) आपण लक्षात आणले तर, जग सुद्धा त्याच्या त्याच त्याच अनैतिक, जडवादीय गोष्टींचा मारा आम्हावर सतत करीत असते हे आपल्याला दिसेल. अशा गोष्टीना तोंड देण्यासाठी आमच्या मनाची तयारी ठेवण्याकरता आम्ही वारंवार दिल्या जाणाऱ्‍या पवित्र शास्त्रीय निर्बंधाकरवी स्वतःला सज्ज ठेवण्यास हवे.

समस्यांवर मात करण्यासाठी हालचाल करा

१२. पवित्र शास्त्र अभ्यासासाठी वेळ काढण्याच्या समस्येवर मात करता येईल असे व्यावहारिक प्रस्ताव सांगा.

१२ पवित्र शास्त्र अभ्यासाच्या बाबतीत योग्य मनोवृत्ती राखणाऱ्‍या व्यक्‍तिला अभ्यासाचा मार्ग हा बहुधा सापडत असतोच, पण हे सोपे नसते. याकरता काही समस्यांवर मात करावी लागते. जसे की, आजच्या कार्यमग्न दिवसात व्यक्‍तिगत अभ्यासासाठी वेळ कोठून मिळणार? ही समस्या सोडविण्यातील पहिले पाऊल म्हणजे, पवित्र शास्त्र अभ्यास हा क्षेत्र कार्य आणि सभांची उपस्थिती यासारखाच जरूरीचा आहे हे ओळखले पाहिजे. (१ तिमथ्यी ४:१५) यानंतर आम्ही आमचा दैनंदिन कार्यक्रम, याच्याकरता कोठे वेळ मिळतो ते पाहण्यासाठी तपासून बघावा. काहीजण सार्वजनिक वाहनांद्वारे प्रवास करीत असताना अभ्यास करतात. काहीजण वाहने चालविताना किंवा घरी काम करीत असताना पवित्र शास्त्र वाचनाच्या ध्वनिफिती ऐकतात. काहीजण आपल्या कामावरील दुपारच्या वा सायंकाळच्या जेवणाच्या सुट्टीत अभ्यास करतात. काहीजण सकाळी थोडे लवकर उठुन दिवसाची कामे सुरु करण्याआधी अभ्यास करतात तर तेच इतर काही मुले रात्री झोपल्यावर करतात. आम्ही इतर कामामधून आणि जरूर पड़ल्यास आराम करण्याच्या वेळेतूनही अभ्यासाकरता वेळ काढण्याची गरज असते. (कलस्सैकर ४:५) या अभ्यासामुळे कित्येकांना आढळले आहे की अभ्यास हाच मुळात आरामदायकता देत असल्यामुळे त्यांना इतर आरामदायक गोष्टींची तितकी गरज भासत नाही.

१३. ज्याविषयीचा आम्ही अभ्यास करतो त्यावर एकाग्र होण्यास आम्हाला कशी मदत मिळू शकेल?

१३ काहींना एकाग्रता ही समस्या असल्याचे दिसले. दैनंदिनीच्या समस्यांचा विचार बाजूला ठेवून पवित्र शास्त्र अभ्यासासाठी एकाग्र होणे त्यांना कठीण वाटते. यावर मात करण्यासाठी प्रार्थना सहाय्यक ठरू शकते. अभ्यास सुरु करण्याआधी, यहोवाने प्रकट केलेल्या गोष्टीस्तव त्याचे उपकार का मानू नये व यानंतर त्याच गोष्टीवर एकाग्रतेने लक्ष देता यावे व त्यांचे महत्व समजावे याच्या मदतीकरता का प्रार्थना करू नये? (फिलिप्पैकर ४:६; २ तिमथ्यी २:७) अशी ही प्रार्थना, यहोवाने आमच्यासाठी उद्देशिलेल्या उद्देशाच्या पूर्ण सहमतात असते. (१ योहान ५:१४) स्वतःला शिस्त लावणे ही गोष्ट अनिवार्य आहे व ती प्रथम प्रथमतः अत्यंत जरूरीची आहे. (१ करिंथकर ९:२५) बिरूयाच्या लोकांनी देवाच्या वचनाचे परिक्षण प्रतिदिवशी केले. (प्रे. कृत्ये१७:१०, ११) त्यांचे चांगले उदाहरण आहे. नियमित अभ्यास हा लवकरच मनोरंजक वाटेल आणि त्याची ओढ तुम्हास लागेल, मग त्यानंतर तुम्हाला स्वतःला त्याच्याकडे ओढावे लागणार नाही.

१४. व्यक्‍तिगत अभ्यासात सहभागी होताना शांत वातावरणाची इच्छा का धरावी?

१४ योग्य वातावरणामुळे एकाग्र होण्यास मदत मिळते. चिंतन करण्यासाठी इसहाक रानात गेला, ही जागा त्याच्या डेऱ्‍यात जी वर्दळ व धावपळ होत होती त्यापासून निवांत होती. (उत्पत्ती २४:६३) हे खरे की, जेथे लक्ष विचलीत होणार नाही अशी मोकळया रानाची जागा आम्हापाशी कदाचित नसेल, तरीपण आमच्या सभोवार आमचे लक्ष विचलीत करणाऱ्‍या गोष्टीना आम्हाला निश्‍चितच थांबवता येणे शक्य आहे. समोर टी. व्ही. चालू ठेवून किंवा मागे कर्कश स्टिरिओ वाजत ठेवून अभ्यासाला बसणे हे, निवांत जागी होणाऱ्‍या अभ्यासाइतके फलदायी व मनोरंजक होणार नाही. आम्हाला नेहमीच गोंधळ दूर सारता येणार नाही पण अभ्यासाकरता साधारण निवांत अशी जागा शोधून तेथे अभ्यास निश्‍चितच करता येईल.

१५. पवित्र शास्त्राचे ज्ञान प्राप्त करण्याचे काही अनौपचारिक मार्ग कोणते आहेत?

१५ आणखी एक समस्या असू शकते: काहींना अभ्यास कसा करावा हेच बहुधा ज्ञान नसते. आजच्या दिवसात खासपणे मुले शाळेत अभ्यास शिकू शकतील हे गृहीत धरता येऊ शकत नाही. शिवाय ज्यांनी शाळा सोडून बराच काळ लोटला आहे अशांनी आपली अभ्यासाची सवय कदाचित गमाविली असेल. तथापि, खरे पाहता, अभ्यास वाटतो तेवढा कठीण नाही. तुम्हाला मनोरंजक वाटणारा एखादा लेख वा माहिती एड टू बायबल अंडरस्टँडिंग यातून वाचण्याएवढा किंवा प्रत्यक्षात न्यू वर्ल्डट्रान्सलेशन रेफरन्स बायबल वाचण्या एवढा तो सोपा आहे. ध्वनीफितीवर मुद्रित करण्यात आलेले पवित्र शास्त्र वाचन कॅसेटवर ऐकणे किंवा साहित्यातून व्यक्‍तिगत संशोधन करने या अभ्यासामध्ये मोडणाऱ्‍या गोष्टी आहेत. टेहळणी बुरुज व अवेक! चे काही प्राचीन अंक तुम्ही चाळले का व तुमची नजर खेचून धरणारा वा तुम्हात आवड निर्माण करणारा लेख वाचलात का? हे खरे की हा एकाग्रतेचा अभ्यास होणार नाही तरी पण यहोवाच्या वचनात आनंद देण्यात तो तुमची निश्‍चितपणे मदत देईल.

१६. साप्ताहिक टेहळणी बुरूजच्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करताना आमचा उद्देश काय असावा?

१६ तरीपण औपचारिक अभ्यासाबद्दल काय जो की साधारणपणे टेहळणी बुरुजच्या साप्ताहिक अभ्यास क्रमासाठी केला जातो? प्रत्येक अभ्यासामध्ये विद्यार्थ्याने आपल्यामनात हेतू राखला पाहिजे. हा कोणता हेतु? टेहळणी बुरुजचा अभ्यास करताना त्याने “विश्‍वासू व बुद्धीमान दास” याने तयार केलेल्या “यथाकाळी अन्‍नाचा” पुरेपूर लाभ घ्यावा आणि सभेत तो जी विवेचने मांडणार त्याकरवी इतरांची मदत व्हावी हा तो हेतु असावा. (मत्तय २४:४५) हे त्याला कसे जमेल? याकरता विशिष्ठ नियम असे नाहीत पण पुढे काही प्रस्ताव दिले आहेत ते विचारत घ्या:

१७, १८. (अ) कोणा विद्यार्थ्याला टेहळणी बुरुज साप्ताहिक अभ्यासक्रमाची कशी तयारी करता येईल त्याबद्दलच्या सूचना द्या. (ब) व्यक्‍तिगत अभ्यासात तुम्हाला उपयुक्‍त ठरलेल्या सूचना सांगा. (तळटीप पहा.)

१७ प्रथम, तुमचा टेहळणी बुरुजचा अंक मिळताच त्यातील एक लेख संपूर्ण वाचा. अशा या पहिल्या वाचनाला साधारणतः २० मिनिटे लागतात, पण यामुळे तुम्हाला लेखातील मुख्य मुद्यांची साधारण कल्पना व लेखाचा एकंदरीत रोख कळून येईल. जेव्हा लेखाचा एकाग्रपणे अभ्यास करण्याची वेळ येते तेव्हा सोबत पवित्र शास्त्र व एखादे पेन वा अधोरेखित करणारे साहित्य घ्या. यानंतर पहिला परिच्छेद काळजीपूर्वक वाचा व वाचताना त्यातील विवाद आणि विचार कशा पद्धतीने मांडले आहेत ते लक्षात आणा. परिच्छेदात नमूद करण्यात आलेली पण अवतरीत नाहीत अशी शास्त्रवचने वाचून पहा. आणि ही वचने त्या परिच्छेदात का देण्यात आली आहेत त्याचा विचार करा. आता परिच्छेदास अनुलक्षून असणारा प्रश्‍न वाचा व त्याचे उत्तर तुम्हाला येते का ते पहा. त्याचे उत्तर सापडल्यावर या उत्तराचे मोजकेच शब्द अधोरेखित करा की जे तुम्हाला तुम्ही टेहळणी बुरूज अभ्यासक्रमात उपस्थित राहाल तेव्हा हा परिच्छेद पाहता क्षणीच तुम्हाला ते उत्तर आठवून देण्यात मदत देतील. परिच्छेदाच्या बाजूच्या रकान्यात तुम्ही पवित्र शास्त्रात काढून वाचलेल्या वचनाविषयीची, तसेच ज्यावर तुम्हाला अधिक संशोधन करावेसे वाटते अशा इतर गोष्टीची संक्षिप्त नोंद लिहा.

१८ अशा पद्धतीने त्या सबंध लेखाचा अभ्यास संपविल्यावर लेखाच्या शेवटी असणाऱ्‍या शिक्षणाच्या चौकोनी रकान्यातील प्रश्‍न पहा आणि तुम्हाला लेखातील मुख्य मुद्यांचे आकलन होऊ शकले का ते पडताळून बघा. यातील एखाद्या प्रश्‍नाचे उत्तर तुम्हाला येत नसल्यास लेखावर परत एकवार नजर टाका व त्याचे उत्तर मिळवा. अशी तयारी तुम्ही साप्ताहिक टेहळणी बुरुज अभ्यासाच्या काही दिवस आधी करून ठेवल्यास ज्या दिवशी हा अभ्यास असेल त्यावेळी या लेखावरून नुसती नजर फिरविल्यास त्यातील साहित्य तुमच्या मनात परत ताजेतवाने होईल.a

मनन करण्याची गरज

१९. मनन हे यहोवाच्या वचनासंबंधीची प्रीती वाढविण्यास कसे साहाय्यक ठरते?

१९ अभ्यासात मनन हे असलेच पाहिजे हे ध्यानात ठेवा. मनन करण्याशिवाय केलेला अभ्यास हा जणू न चावता अन्‍न खात राहण्यासारखा असतो. यासाठी जो अभ्यास करता त्यामध्ये मनन करा. या अभ्यासाचा संबंध तुम्हास ज्ञान असणाऱ्‍या गोष्टीसोबत कसा आहे ते पारखून बघा. ते तुमच्या जीवनावर कसा परिणाम करते? (नीतीसूत्रे १५:२८) सविस्तर माहितीकडे लक्ष देण्यास शिका. जे शिकला त्याबद्दल इतरांसोबत बोलणी करा. तुम्हास आढळलेल्या नव्या संशोधनाची सहभागी इतरांसोबत करा. (नीतीसूत्रे २७:१७) यामुळे देखील तुम्हाला पवित्र शास्त्रात आढळून येणारा आनंद वाढता राहील.

२०. यहोवाच्या प्रकटीत वचनासंबंधाने दावीद राजाठायी केवढी गाढ रसिकता होती ते सांगा.

२० दावीद राजाठायी यहोवाच्या वचनासंबंधाने अप्रतिम रसिकता होती. त्याने लिहिले: “यहोवाचे नियम शास्त्र परिपूर्ण आहे, ते जीवाचे पुनरूज्जीवन करते. यहोवाचा निर्बंध विश्‍वसनीय आहे, तो भोळ्‌यांस समंजस करतो. यहोवाचे विधि सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करतात. यहोवाची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते. यहोवाचे भय शुद्ध आहे, ते सर्वकाळ टिकणारे आहे. यहोवाचे निर्णय सत्य आहेत, ते सर्वथैव न्याय्य आहेत. ते सोन्यापेक्षां, बावनकशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहेत. ते मधापेक्षा, मोहोळातून पाझरणाऱ्‍या मधापेक्षा गोड आहेत.”—स्तोत्रसंहिता १९:७–१०.

२१. यहोवा द्वारे “प्रकट केलेल्या गोष्टीं”संबंधाने आम्ही खरी प्रीती राखली तर कोणत्या आशीर्वादांची कापणी आपल्याला मिळवता येईल?

२१ पहिल्या स्तोत्रातील सूचना अनुसरण्याने तसेच पवित्र शास्त्राचा नियमित रूपाने अभ्यास केल्यामुळे, तुम्हाठायीही यहोवाने “प्रकट केलेल्या गोष्टीं” विषयीची रसिकता बळावू लागेल. याकरवी, त्या स्तोत्रात यहोवाच्या वचनात रममाण होणाऱ्‍याला जे आशीर्वाद प्राप्त होतील असे अभिवचन आहे त्याचा अनुभव घेण्याकडे आम्हाला निरविण्यात येईल: “जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लाविलेले असते. जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते . . . नीतीमानांचा मार्ग यहोवाला अवगत असतो.’—स्तोत्रसंहिता १:३, ६.

[तळटीपा]

a  अभ्यासासंबंधी इतर प्रस्ताव आणि भाषणाची तयारी करण्यामध्ये काय काय समाविष्ट असते त्याच्या माहितीसाठी थिऑक्रेटिक मिनिस्ट्री स्कूल गाईडबुक हे वॉचटावर संस्थेचे प्रकाशन पहा.

तुम्ही कसे विवेचीत करणार?

◻ देवाचे वचन शिकविण्याकरता आम्ही केवळ इतरांवरच विसंबून राहणे का पुरेसे नाही?

◻ पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्यामुळे आम्हाला कोणते आशीर्वाद मिळतील?

◻ पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी वेळ कसा काढला जाऊ शकतो?

◻ अभ्यास करताना एकाग्रता लाभावी याकरता सहाय्यक गोष्टीं काही कोणत्या आहेत?

◻ टेहळणी बुरुज अभ्यासाची तयारी करण्यामध्ये आम्ही कोणता हेतु राखण्यास हवा?

[१२ पानांवरील चित्रं]

पवित्र शास्त्राचे वाचन करण्यासाठी लोकांनी मृत्यु पत्करला

[१३ पानांवरील चित्रं]

आमच्या दिवसभराच्या कामकाजातून देवाच्या वचनाचा विचार करण्यासाठी आम्ही कसातरी वेळ काढलाच पाहिजे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा