यहोवाचे नाम किती थोर आहे!
“हे यहोवा, आमच्या प्रभो, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे!”—स्तोत्रसंहिता ८:१, ९.
१. देशाने कनानी लोकांना ‘ओकून टाकावे’ असे यहोवा का करणार होता?
इ. स. पूर्वी १४७३ मध्ये, सरते शेवटी इस्राएल लोक वचनयुक्त देशी उभे राहिले. तरी पण आता इश्वरशासित युद्धाची काही वर्षे सामोरी होती; कारण देशाला त्यातील नीतीभ्रष्ट रहिवाश्यांपासून मुक्ति द्यावयाची होती. ते कनानी निवासी इतके वाईट होते का? होय, खूप वाईट होते! त्यांची मूर्तिपूजा व अनैतिक मार्गाक्रमण यांचा यहोवाला वीट वाटत होता व या गोष्टी देवाच्या लोकांना धोक्यात आणणाऱ्या होत्या. याकरताच देवाने मोशाला घोषित करावयास लावले की, देव त्याचे पवित्र राष्ट्र इस्राएल याला त्याजकडील दंडाज्ञा बजावणारे या अर्थी वापरील. याप्रकारे यहोवा त्या देशाला त्या अशुद्ध राष्ट्राला ‘ओकावयास’ लावील.—लेवीय १८:१–३०; अनुवाद १२:२९–३२.
२. जगाची धर्मव्यवस्था कोणती फळे सामोरी आणीत आहे?
२ आज आम्हाला असा प्रश्न विचारता येईल की हे जग इतके वाईट आहे का की ते नाश होण्याच्या पात्रतेचे आहे? बरे, जगाच्या धार्मिक व्यवस्थेबद्दल काय? यांनी निर्माणकर्ता यहोवा देवाचा सन्मान केला नाही हे मोठे दुःखाचे आहे. ख्रिस्ती धर्मराज्यातील लोकांनी त्याला, “जो जिवंत पाण्याचा झरा [याला] सोडिले व . . . ज्यात पाणी राहणार नाही असे फुटके हौद आपल्यासाठी खोदून तयार केले” आहेत. (यिर्मया २:१३) त्यांच्या पंथीय विश्वासात सत्याचे “पाणी” राहिलेले नाही. जगातील युद्धे व राजकारण यांना पाठबळ देऊन आणि त्याच्या लैंगिक प्रकारांना सामावून घेऊन जगाचेभाग असल्याचे त्यांनी स्वतःबाबत दाखवून दिले आहे. येशूने म्हटले त्यानुसार त्यांची ओळख त्यांच्या “फळावरून” मिळते.—मत्तय ७:१६, १७; पडताळा गलतीकर ६:७, ८.
३. जगाने देवाच्या नियमांचा भंग केल्यामुळे कोणते परिणाम ओढावून घेतले आहेत?
३ जगाच्या नैतिकतेविषयी काय? अलिकडिल वर्षात गोलार्धिक रूपात, पण खासपणे तथाकथित ख्रिस्ती राष्ट्रात गर्भपात, युवकांची गर्भधारणा आणि मोडकळलेली कुटुंबे याची मोठी वाढ झाल्याचे दिसते. काही राष्ट्रात तर ५० टक्के विवाहांचा अंत घटस्फोटात होतो. १९६०च्या काळातील “लैंगिक क्रांती” हिने आणखी घातक परिणाम ओढावून आणले. यापैकीच्या एकाची माहिती दी न्यूयॉर्क टाईम्स वृत्तपत्रात जून १३, १९८६ रोजी अगदी पहिल्याच पानावर ठळक मथळ्याकरवी अशी दिली गेली: “९१ पर्यंत एड्स्ची मृत्युसंख्या दसपटीने वाढणार.” लेखाने दाखविले की १९९१ पर्यंत एड्स् (अख़यर्ड इम्यून डिफिशियन्सी सिन्ड्रोम) चे रोगी केवळ अमेरिकेत एक लाखापर्यंत जातील आणि त्यावरील वैद्यकीय खर्च प्रतिवर्षी १६ अब्ज डॉलर्स इतका असेल. हा भयंकर रोग पुरूषगामी कार्य, मादक औषधांचे अतिसेवन व रक्तसंक्रमण याकरवी संक्रमित होतो—यासर्व आचारपद्धती देवाच्या कायद्याचा भंग करणाऱ्या आहेत.—१ करिंथकर ६:९, १०; गलतीकर ५:१९–२१; प्रे. कृत्ये १५:१९, २०.
४. (अ) आमचे सध्याचे युद्ध यहोशवाच्या काळातील इस्राएलांपेक्षा केवढे भिन्न ठरते? (ब) जागतिक लोकांचा संपर्क आम्ही कितपत राखावा व का?
४ यहोशवाच्या काळी यहोवाने आपल्या पवित्र राष्ट्राला खरोखरीच्या युद्धाकरवी वचनयुक्त देश शुद्ध करण्यास पाठविले. आज आमचे युद्ध आध्यात्मिक आहे. (२ करिंथकर १०:३, ४) देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांविरूद्ध आम्ही साक्षीदार हिंसाचारी कृति अवलंबीत नाही. यहोवाच आपल्या नियुक्त समयी व स्वमार्गाने त्यांना दूर करील. (अनुवाद ३२:४१, ४३) आम्ही दुराचारी लोकांकडे राज्याची सुवार्ता नेण्याचे प्रेमळ कार्य करीत असलो तरी त्यांना आपल्या सहवासात घेत नाही. (१ करिंथकर १५:३३) त्यांच्याबरोबर देवाच्या वचनाचा अभ्यास करून त्यांना याचे प्रोत्साहन देता येईल की त्यांनी ‘पश्चाताप करावा, मागे वळावे म्हणजे त्यांची पापे पुसून टाकली जातील.’—प्रे. कृत्ये ३:१९; मत्तय २१:३१, ३२; लूक ५:२७–३२.
राहाब व तिचे घराणे
५, ६. (अ) हेर यरीहो शहरी तसेच राहाबाच्या घरी का गेले? (ब) मदतीकरता केलेल्या याचनेविषयी आज यहोवाने बहुधा कसे उत्तर दिले आहे? (क) राहाबाने स्वतःच्याबाबतीत “शांतिप्रिय” व्यक्ती असल्याचे कसे दाखविले?
५ इस्राएलांनी यार्देन नदी पार करून जाण्याआधीच यहोवाने यरीहो शहराकडे निर्देश केला होता. इस्राएलाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन हेरांना यहोशवाने असे म्हणून पाठविले. “जा आणि तो देश व विशेषतः यरीहो हेरून या.” पण यरीहोची हेरगिरी का? हे शहर खूप लहान होते आणि इस्राएली सैन्यबळाच्या तुलनेत उणेच होते; तरीपण ते कनानास जाण्याच्या मार्गावर होते. हेरांची उपस्थिती जसे नंतर घडले त्याप्रमाणे यरीहोच्या निवासियांना, ते यहोवाच्याबाजूने आहेत की विरूद्ध आहेत ते स्पष्टपणे दाखवून देण्याची संधि देऊ करणार होते. याकरताच “ते [हेर] गेले व राहाब नावाच्या वेश्येच्या घरी उतरले.” (यहोशवा २:१–७) या राहाबाच्या घरी हेरांना इश्वरी मार्गदर्शनानेच आणले असावे, जसे की आज सुद्धा आध्यात्मिक मदत मिळावी याकरता प्रार्थना करणाऱ्या लोकांकडे यहोवाच्या साक्षीदारांना बहुधा दिव्यदूतांच्या मार्गदर्शनाकरवी निरविले जाते. “यहोवाचे नेत्र नीतिमानांकडे असतात. त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात.”—स्तोत्रसंहिता ३४:१५; तसेच २ इतिहास १६:९ सुद्धा पहा.
६ त्या हेरांनी वेश्येच्या घरी का प्रवेश मिळवावा? अनैतिक कारणासाठी नव्हे, पण कनानी लोकांची दिशाभूल करता यावी म्हणून. राहाबाने हेरांशी जे बोलणे केले त्याद्वारे तिचा त्यांच्याशी कसलाहि अनैतिक हेतू नव्हता हे स्पष्ट दिसते. यहोवाचे सेवक असल्याचे तिला कळल्यावर तिने आपण स्वतःही यहोवाचे उपासक व्हावे असे आपल्याला किती वाटते ते बोलून दाखविले असावे. तिने त्यांना छपरावर लपवून ठेवण्यात स्वतःच्या जिवाची जोखीम पत्करली. येशूच्या दाखल्यातील प्रभूच्या “भावां”च्या बाबतीत दयाळूपणा प्रदर्शित करणाऱ्या “मेंढरा” सारखी ती ठरली. (मत्तय २५:३१–४६) आज यहोवाचे साक्षीदार चाणाक्षपणे कार्य करीत असले तरी अशा “शांतीप्रिय” आस्थेवाईक लोकांची भेट घेऊन त्यांना पवित्र शास्त्राचा अभ्यास देऊ करण्याची ते टाळाटाळ करीत नाही.—लूक १०:५–७.
७. (अ) राहाबाने यहोवावरील आपला विश्वास कसा बोलून दाखविला? (ब) नवीन लोकांनी कोणती वृत्ति दाखवावी व कसे वागावे?
७ राहाबला यहोवाने केलेली अद्र्भित कृत्ये कळली होती. लपलेल्या हेरांना ती आपला विश्वास असे बोलून व्यक्त करू शकली: “यहोवाने हा देश तुम्हाला दिला आहे, आम्हाला तुमची दहशत बसली आहे आणि देशातील सर्व रहिवाश्यांची तुमच्या भीतीने गाळण उडाली आहे हे मला ठाऊक आहे.” यहोवाने केलेल्या अद्र्भित कृत्याविषयीचा ऐकलेला अहवाल कथन केल्या नंतर ती म्हणाली: “तुमचा देव यहोवा हाच वर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे. मी तुमच्यावर दया केली आहे म्हणून आता माझ्यासमोर यहोवाच्या नामाने शपथ घ्या की, आम्हीही तुझ्या बापाच्या घराण्यावर दया करू आणि ह्याबद्दल मला खात्रीलायक खूण द्या.” (यहोशवा २:९–१३) राहाबाप्रमाणेच आज देवाचे सत्य नव्यानेच शिकणाऱ्यांना “यहोवाच्या दिवशी” बजावण्यात येणाऱ्या न्यायदंडाची भीती बाळगण्याची गरज नाही. (सफन्या १:१४–१८) उलट पक्षी ते जगीक मार्गापासून मागे वळतात आणि यहोवाच्या साक्षीदारांकडून तारणप्राप्तीची मदत स्विकारतात.—स्तोत्रसंहिता ३:६–८, नीतीसूत्रे १८:१०.
८. (अ) राहाबाने आपल्या खिडकीवर “किरमिजी रंगाचा दोर” दिसू देण्याचे आजचे प्रतीक कोणते आहे? (ब) राहाबला नीतीमान का म्हणण्यात आले व कोणत्या परिणामासह?
८ हेरांनी राहाबला जे चिन्ह दिले तो “किरमिजी दोर” होता. हा दोर तिने, हे हेर ज्या खिडकीतून बाहेर पडले त्याला बांधावयाचा होता. (यहोशवा २:१७–२१) राहाबाने हे चिन्ह दिसू दिल्यास तिचे घर यरीहोच्या नाशातून वाचविले जाणार होते. याचप्रमाणे आज राहाबाप्रमाणे विश्वास प्रदर्शित करणारे बचाव होण्यासाठी आपले समर्पण, बाप्तिस्मा घेऊन आपण यहोवाचे उपासक आहोत असे ओळखचिन्ह दाखवितात. प्रकटीकरण ७:९, १०, १४ यांचे वर्णन “मोठा लोकसमुदाय” असे देते व म्हणते की त्यांनी “आपले झगे कोकऱ्याच्या रक्तात धुवून शुभ्र केले आहेत.” ते ख्रिस्ताच्या यज्ञार्पित रक्तावर आपला विश्वास प्रकट करतात व याला ख्रिस्ती कार्याची जोड देतात. (रोमकर १०:९, १०) आम्ही याकोब २:२४, २५ मध्ये हे वाचतो: “केवळ विश्वासाद्वारे नव्हे, तर क्रियांनी मनुष्य नीतीमान ठरतो हे तुम्ही पाहता, तसेच राहाब वेश्या हिने देखील जासुदांचा पाहुणचार केला व त्यांना दुसऱ्यावाटेने लावून दिले. ह्यात ती क्रियांनी नीतीमान ठरली नाही काय?”
९. (अ) राहबाच्या “क्रिया”त कशाचा समावेश होता? (ब) निर्भिड स्वरूपाची साक्ष देण्यामुळे कोणता परिणाम घडला?
९ राहाबाकरवीच्या “क्रियां” मध्ये, तिने दोन हेरांना संरक्षण देणे व तारणाकरता आपल्या घरच्या सदस्यांना एकत्र करणे याचा समावेश होता. याचप्रमाणे, आधुनिक समयातील “मोठा लोकसमुदाय” अभिषिक्त अशा ”विश्वासू व बुद्धीमान दास” गटाला, तो “यथाकाळी [आध्यात्मिक] अन्न” पुरवतो आणि जगव्याप्त राज्य प्रचाराच्या कामाचे निरिक्षण ठेवतो म्हणून निष्ठावंत पाठबळ देऊन आहेत. (मत्तय २४:४५–४७) राहाबाच्या बाबतीत पाहता ती आपल्या बापाच्या घरच्या लोकांना साक्ष देण्यात निर्भिड होती. हे कार्य जोखमीचे होते कारण यात तिचा विश्वासघात सुद्धा होऊ शकला असता . (पडताळा मत्तय १०:३२–३६.) याचप्रमाणे ज्या देशात आज विरोध आहे तेथे यहोवाच्या साक्षीदारांनी साक्ष देण्यात निर्भिड असावे. याचा परिणाम मोठ्या एकत्रीकरणात घडला आणि बहुधा संपूर्ण कुटुंबच यहोवाच्या शुद्ध भक्तिसाठी दृढ भूमिका घेता यावी म्हणून मोठ्या बाबेलातून बाहेर पडले.—स्तोत्रसंहिता ७३:२८; १०७:२१, २२.
यरीहो—तेव्हा आणि आता
१०. यरीहोकडे कोणते खास लक्ष देण्यात येणार होते?
१० आता या नाट्यमय घटनेकडे आपण वेगळ्या अंगाने पाहू या. “इस्राएल लोकांच्या भीतीमुळे यरीहोच्या वेशी मजबूत लावून घेण्यात आल्या होत्या; कोणी बाहेर गेला नाही की आत आला नाही.” यहोवाच्या दंडाज्ञेच्या तरवारीखाली हे पहिले कनानी शहर यावयाचे होते. तद्वत, देवास अर्पिण्यात येणारे प्रथमफळ या अर्थी त्याच्याकडे खास लक्ष दिले जाणार होते. यहोशवाने म्हटले: “हे नगर व ह्यात जे काही आहे ते सर्व यहोवा प्रीत्यर्थ नाशाला समर्पित करावे.”—यहोशवा ६:१, १७; पडताळा निर्गम २२:२९; लेवीय २७:२६.
११. (अ) कोणती अप्रतिम साम्यता आज आपल्या लक्षात येते? (ब) मोठ्या बाबेलला जी “दहशत” पडली आहे त्याचे एक उदाहरण सांगा.
११ हे सर्व, खोट्या धर्माचे जगव्याप्त साम्राज्य असणाऱ्या मोठ्या बाबेलाविषयी ज्याने या २०व्या शतकातील रक्तपाताच्या दुष्टपणाचा कळस गाठला आहे त्याजविषयी केवढ्या साम्यतेचे आहे! यहोवाच्या साक्षीदारांकरवीची चढाई होऊ नये याकरता त्याने आपल्या वेशी घट्ट बंद केल्या आहेत. राहाबाच्या शब्दाप्रमाणे देवाच्या लोकांची “दहशत” त्याच्यावर पडली आहे. उदाहरणार्थ, ला रिपब्लिका या इटालियन वृत्तपत्राने नोव्हेंबर १२, १९८५ रोजी हा मथळा दिला की, “यहोवाच्या साक्षीदारांविरूद्ध चर्चने दिलेली धोक्याची ओरड.” बोलोग्ना येथे एका रोमन कॅथोलिक कार्डिनलांनी यहोवाच्या साक्षीदारांच्या “धमकी” विषयीची प्रतिक्रिया दर्शविण्यासाठी जी सभा बोलविली त्याचा वृत्तांत त्यात दिला होता. पोपनी या सभेला तार पाठवून प्रोत्साहन व पाठबळ दिले. ही ओरड करण्यात आली: “ते सबंध जगभरात माश्यांप्रमाणे फैलावत आहेत,” आणि हे घोषित केले गेले की, “या धोक्यास” सामना करण्यासाठी “आता चर्च सज्ज राहील.” पण यात त्याला यशप्राप्ती मिळेल का?—यिर्मया १:१७–१९.
१२. (अ) मोठ्या बाबेलची “देव” विषयक कल्पना सत्याशी किती विरोधक ठरते? (ब) यहोवा आपल्या साक्षीदारांच्यावतीने का लढेल?
१२ ख्रिस्ती धर्मराज्याच्या गूढ त्रैक्यापासून ते पूर्व देशाच्या धर्मांच्या लाखो देवदैवतांना मोठी बाबेल आपणात कवटाळून आहे. यहोशवाची नेमणूक करण्याआधी मोशाने जाहीर केले होते: “हे इस्राएला श्रवण कर, यहोवा आमचा देव हा एकच यहोवा आहे.” या “एक देव जो पिता” याची भक्ती उंचावण्यात यहोवाचे साक्षीदार एकटेच उल्लखनीय ठरले आहेत. (अनुवाद ६:४; इफिसकर ४:६) यहोशवा व इतर इस्राएली नेत्यांच्या काळी यहोवा जसा लढला त्याप्रमाणे तो आम्हासाठीही लढेल.—२ इतिहास २०:१५, १७; ३२:७, ८; यशया ५४:१७.
न्यायदंडाची अंमलबजावणी
१३. (अ) यरीहोवरील स्वारीआधी कोणकोणत्या गोष्टी घडल्या? (ब) याची कोणती साम्यता आज आपल्याला दिसते?
१३ यरीहोवरील स्वारीची यहोशवाने जय्यत तयारी केली. ज्या पुरुषांची अरण्यामध्ये वाढ झाली होती त्यांची सुंता केली गेली. याकरवी यहोवास पूर्ण तऱ्हेची निष्ठा दाखविण्यामध्ये ज्या ज्या गोष्टींचा अडथळा ठरणार होता त्या दूर सारल्या गेल्या अशी सूचकता दाखविली गेली. (अनुवाद १०:१६, ३०:५, ६) वल्हांडण सणाचा विधि पाळण्याची पूर्वक्त स्थापना केली गेली. लोकांना जमिनीपासून उगवणारे उत्पन्न मिळू लागले त्यामुळे अद्भूतरितीने देण्यात येणारा मान्ना पडण्याचे थांबले. याशिवाय “यहोवाचा सेनापति” जो निसंशय मनुष्यप्रकृतीपूर्वीचा लोगस किंवा शब्द असावा त्याने यहोशवास दर्शन देऊन त्याला दृढता दिली. त्याची उपस्थिति यहोशवाने मोठ्या लीनतेने मान्य केली. हे सर्व काही आधुनिक काळच्या यहोवाच्या साक्षीदारांच्या बाबतीत, जेव्हा त्यांनी स्वत: कार्यास वाहून घेतले त्यावेळी साम्यतेने घडले. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नेतृत्वाखाली “विश्वासू बुद्धीमान दास” याने प्रगतीपर हालचाल केली तसतसे आमचे आध्यात्मिक अन्न विविध प्रकारातील व अधिक समृद्ध बनले.—यहोशवा ५:१–१५.
१४. यरीहोवर वेढा पाडण्यासाठी यहोवा कोणती विचित्र युक्ति सांगतो?
१४ आता युद्धाच्या दृश्याकडे बघा. यहोवाने विचित्र युक्ति खरीच योजिली आहे! इस्राएलाचे याजक यहोवाच्या अस्तित्वाचा द्योतक असणारा कोश आपल्या हाती घेऊन दिवसाला एक याप्रमाणे सहा दिवस यरीहोला प्रदक्षिणा घालतात. त्यांच्या आधी सात याजक हाती रणशिंगे घेऊन वाजवीत जात आहे आणि मागे पुढे इस्राएलाचे शस्त्रधारी सैनिक चालत आहेत. पण सातव्या दिवशी ते “अगदी पहाटेस उठून” शहराभोवती सात प्रदक्षिणा घालतात. हे सर्व पाहून यरीहोकरांचे काळीज केवढे थरारले असेल!—यहोशवा ६:२–१५.
१५. यहोवाच्या साक्षीदारांच्या आजच्या कार्यात याची कोणती साम्यता दिसते?
१५ या गोष्टीची, आज यहोवाचे साक्षीदार पृथ्वीभरात जे काही करीत आहेत त्याची अप्रतिम साम्यता आढळते. अलिकडेच आमच्या राज्य कार्य हालचालीची भव्य वाढ न्याहाळली गेली आहे. १९८५ पर्यंत पाच वर्षात पायनियरांच्या मालिकेत १३४ टक्कयांची वाढ दिसली. पायनियरांचे व इतर विश्वासू राज्य प्रचारकांचे सैन्य प्रत्यक्षात” अगदी पहाटेच उठून” यहोवाच्या न्यायदंडाची घोषणा उत्साहाने करण्याच्या कामी सहभागी होतात. ख्रिस्ती धर्मराज्याच्या पुढाऱ्यांना हे साक्षीदार ‘महान व बलवान राष्ट्रा’सारखे वाटत आहेत. सत्याची घोषणा त्यांच्यातील पुष्कळ प्रमाणिक जनांना त्यांना सोडून देऊन यहोवासाठी आपली भूमिका ग्रहण करण्याकरता प्रवृत्त करीत आहे हे पाहून धर्मपुढारी “व्यथित” होत आहेत.—योएल २:१–३, ६.
१६. (अ) कोणत्या अद्र्भित कृत्याने यरीहोचे पतन घडते? (ब) राहाबाच्या विश्वासाला कसे प्रतिफळ मिळते?
१६ सरतेशेवटी यहोशवा लोकांना आज्ञा देतो: जयघोष करा, कारण यहोवाने हे नगर तुमच्या हाती दिले आहे.” युद्धाचा मोठा जयघोष निनादतो. पृथ्वी कंप पावते आणि मोठा चमत्कार घडतो. यरीहोचा तट पार भुईसपाट होतो. इस्राएल आज्ञाधारकपणे शहरात घुसून शहरातील प्रत्येक गोष्टीचा नाश करतात. ते शहर अग्नीने जाळून टाकतात. पण पहा! तटाच्या बाहेरील भागाची एक बाजू अद्याप तशीच उभी आहे आणि तिजवरील खिडकीत किरमिजी रंगाचा दोर बांधलेला दिसतो. राहाब व तिच्या बापाच्या घरच्या सर्व सदस्यांना कोणतीही इजा न करता बाहेर आणले जाते. काही काळातच राहाबाच्या विश्वासाला आणखी आशीर्वाद लाभतो, तो असा की ती, सल्मोन या इस्राएली पुरुषाची बायको बनते व पुढे येशू ख्रिस्ताची पूर्वज बनते.—यहोशवा ६:१६–२६; मत्तय १:५.
१७. हे सर्व चमत्कार कशाची पडछाया दाखवतात?
१७ “ह्याप्रमाणे यहोवा यहोशवा बरोबर राहिला आणि त्याची कीर्ति संबंध पृथ्वीभर पसरली.” याचप्रमाणे, “मोठ्या संकटा”ची पहाट होईल आणि मोठ्या बाबेलची धुळधाण होऊन तिचे वैभव आणि ऐश्वर्य पार लयास जाईल तेव्हा यहोवाचे थोर नाम प्रतापमय होईल.—यहोशवा ६:२७; प्रकटीकरण १७:१६; १८:९, १०, १५–१७; मत्तय २४:२१, २२.
एक धर्मत्यागी मागे पडतो
१८. (अ) “लोकांच्या काळजाचे पाणी पाणी” का झाले? (ब) याबद्दल यहोशवाची कशी प्रतिक्रिया होती?
१८ यरीहोच्या नादपूर्ण विजयानंतर एक आश्चर्यकारक गोष्ट घडली. यहोशवाने त्यापुढचे शहर आय यावर स्वारी करण्यासाठी जे सैन्य पाठविले त्याचा पूर्ण पराभव झाला. “त्यामुळे लोकांच्या काळजाचे पाणी पाणी झाले.” दुःखाने व्यग्र झालेल्या यहोशवाने मोठ्या आक्रोशाने प्रार्थना केली: “हायहाय, हे प्रभू यहोवा . . . तू आपले थोर नाव राखण्यासाठी काय करणार आहेस?”—यहोशवा ७:२–९.
१९, २०. (अ) आखानाच्या मूर्खतेची यहोवाने कशी हाताळणी केली आणि त्याने यहोशवाला कोणते आश्वासन दिले? (ब) याची कोणती आधुनिक समांतरता लक्षात येते?
१९ तेव्हा यहोशवाला यहोवाने कळविले की इस्राएलात “लांच्छनास्पद कृत्य” घडले आहे. तो गुन्हेगार यहुदा वंशातील आखान निघाला. त्याने यरीहोच्या लुटीतून एक “चांगला” बाबेलोनी झगा तसेच सोने व चांदी यांची चोरी केली होती. यहोवाने आखानावर ‘शाप आणला’ त्यामुळे तो व त्याचे घराणे यांना दगडमार करण्यात आला, आणि ते व त्यांच्या सर्व चीजवस्तु आगीत भस्म करण्यात आल्या. यहोवाच्या न्यायदंडाच्या अंमलबजावणीची साक्ष म्हणून त्यांनी आखानावर दगडांची एक रास रचिली व त्या स्थळाला “आखोर खिंड” असे नाव दिले, ज्याचा अर्थ “शाप, त्रास” असा होतो. परत यहोवाने यहोशवास म्हटले: “भिऊ नको, कचरू नको.” यानंतर यहोवाचे नाम परत उंचावले गेले याचा प्रत्यय यात दिसला की यहोशवाला पुनः युद्धात हार खावी लागली नाही.—यहोशवा ७:१०–८:१.
२० आखानाच्या पापाशी सदृश्य असणारी काही आधुनिक साम्यता दिसते का? होय, आहे. प्रेषित पौलाने “क्रुर लांडगे” याविषयीचा इशारा दिला. हे इश्वरशासित व्यवस्थेकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या स्वार्थी मार्गाचा मागोवा घेणारे लोक आहेत. १९१९ पासून पुढे वेळोवेळी असे लोभी लोक देवाच्या लोकात दिसले. याचे आधुनिक उदाहरण पाहता, १९७५च्या सुमारास काही प्रतिष्ठित वडील असंतुष्ट बनले. देवाच्या राज्याची घोषणा येशूच्या प्रेषितांच्या नमुन्याप्रमाणे घरोघरी जाऊन करणे हे त्यांना आपल्या “प्रतिष्ठेला” खाली पाहावयास लावणारे आहे असे वाटू लागले. (प्रे. कृत्ये ५:४२; २०:२०, २१, २९, ३०) यापेक्षा बाबेलोनी शिक्षणाकडे परत जावे हे त्यांना बरे वाटले. अगदी चतुराईने त्यांनी “शेवटले दिवस” याविषयी शंका घेणे आरंभिले आणि यहोवाच्या साक्षीदारांचे कार्य मंदावण्याचा प्रयत्न केला. (२ पेत्र ३:३, ४) शेवटी त्यांना बहिष्कृत करावेच लागले.—२ योहान १०, ११; पडताळा फिलिप्पैकर १:१५–१७; इब्रीयांस ६:४–८.
२१. (अ) १९७०रीच्या उत्तरार्धात जी घट दिसली त्याचे एक कारण काय असावे? (ब) त्यानंतर कशामुळे हे कार्य ‘त्वरेने’ घडण्यास मदत मिळाली?
२१ जुलै १५, १९७९ च्या दी वॉचटावर या अंकाने आमच्या घरोघरच्या उपाध्यपणाचा शास्त्रवचनीय आधार व त्याचे महत्व याविषयीची सखोल चर्चा पुरवली. यानंतर १९८०च्या दशकात निष्ठावंत साक्षीदारांनी आवेशपूर्ण उचल घेतली! १९७०च्या अर्ध्या दशकापर्यंत यहोवाच्या कार्याला अल्प अशा धर्मत्याग्यांच्या उपस्थितीने मंदी आणली होती जेव्हा की यहोवाच्या साक्षीदारांच्या क्रियाशील कार्यकर्त्यांच्या संख्येची १ पेक्षाही कमी टक्कयाची घट झाली. तरीपण गेल्या पाच वर्षातील वार्षिक वाढ सरासरी ६ टक्कयापेक्षाही पुढे गेली आहे. १९७५ मध्ये असणाऱ्या २१,७९,२५६ राज्य प्रचारकांच्या आकड्याने पुढे १९८५ मध्ये ३०,२४,१३१ चा जागतिक उच्चांक स्थापित केला. यानंतर आता यहोवा त्याचे कार्य ‘त्वरेने’ घडवून आणीत आहे!—यशया ५४:२, ३; ६०:२२.
२२. यहोशवाच्या पुस्तकात आणखी पुढे जाता यहोवाच्या नामाबद्दल आम्हाला आणखी कसली रसिकता वाटावी?
२२ खरेच, यहोवाचे नाम सबंध पृथ्वीवर थोर बनले आहे! तरीपण तो आम्हाला यहोशवाच्या पुस्तकात आणखी काही सांगतो जे आपण आता पाहणार आहोत.—यशया ४२:८, ९.
यहोशवाच्या पुस्तकात—
◻ आजच्या जगाचा कोणता नमुना आम्हाला पाहायला मिळतो?
◻ राहाबाच्या अहवालापासून आम्ही काय शिकू शकतो?
◻ आम्हाला आमच्या टप्याटप्याच्या कार्याबद्दल कोणती समांतरता आढळते?
◻ यरीहोच्या पतनाकरवी काय प्रतिछायित होते?
◻ आखानाच्या पापाच्या हाताळणी द्वारे काय सूचित होते?