युवकांनो—फसू नका
“सैतानही स्वतः तेजस्वी देवदूतांचे सोंग घेतो.”—२ करिंथकर ११:१४.
१. (अ) आम्हापैकी बहुतेकांची कोणत्या मार्गी फसवणूक झालेली आहे? (ब) साधारणपणे कोणाची फसवणूक घडते?
आम्हा प्रत्येकाची कोणा ना कोण प्रसंगी तरी फसवणूक झालेली आहे यात काही शंका नाही. कदाचित तुम्ही एखादा खेळ खेळत होता त्यावेळी विरुद्ध बाजूने खेळणाऱ्या गड्याने फसव्या युक्तिने आपली चाल केली व तुम्हाला बाद करून खेळ जिंकला असेल. किंवा तुम्ही तुम्हाला पसंत वाटणारे एखादे कापड खरेदी केले पण काय दिसले की त्याच्या थोड्याशा वापराने व धुण्याने तुम्हाला वाटले तसे ते टिकाऊ निघाले नाही. तर मग साधारणपणे आणि अगदी सहजपणे कोण फसविला जाते बरे? ज्याला अल्प अनुभव असतो तोच ना? शिवाय यामध्ये प्राप्त होणारे परिणाम खेळ हरणे वा खरेदीच्या बाबतीत झालेली फसवणूक याच्याही पुढे जाऊन गंभीर होत असतात.
२. काही युवकांना गंभीर पापकर्मात कसे पाडण्यात आले?
२ ज्यूलीचेच उदाहरण बघा ना. ती विद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकणारी विद्यार्थिनी होती. ती म्हणाली की, “विद्यालयात अत्यंत सुंदर दिसणाऱ्या तरूणावर तिचे प्रेम जडले.” “पण,” ती म्हणते, “मी त्याला आधीच म्हटले होते की तो मजसंबंधाने ज्या गोष्टीची अपेक्षा धरतो त्याच्यासाठी आता माझी तयारी नाही. तथापि तो मला म्हणत राहिला, ‘प्रिये, मलाही तुजबद्दल तेवढेच प्रेम वाटते. हे बघ, सगळं काही ठीक होईल.’ तरी मी त्याला ‘नाही’ म्हटले. यावेळी तो उत्तरला, ‘हे बघ प्रिये, माझी तुजवर मनापासून प्रीती आहे, आणि मला वाटत की तुलाही मजबद्दल गाढ प्रेम आहे. पण तू ते सिद्ध केलं नाहीस तर मला वाटतं की आपण एकमेकांना न भेटणेच बरे.’” तेव्हा ज्यूलीने हार पत्करली व जारकर्म केले. दुसऱ्या दिवशी जेव्हा तिला कळले की त्या मुलाने आपल्या “विजयाची” चारचौघात शेखी मिरवली तेव्हा आपली केवढी मोठी फसवणूक करण्यात आली ते तिला कळले. मुलाची आपल्यावर खरी प्रीती आहे तर त्याने असे कृत्य करावयाला नको होते हे तिला आधी माहीत असावयास हवे होते.
३. (अ) जारकर्म एवढी गंभीर गोष्ट का आहे? (ब) दियाबल सैतानाचे लक्ष्य कोणते आहे?
३ ज्यूलीला जे करण्यासाठी फसविण्यात आले तो देवाच्या नियमाचा गंभीर स्वरूपाचा भंग होता. याच कारणास्तव पवित्र शास्त्र आर्जविते: ‘जारकर्मा . . . पासून पळ काढा.” शिवाय ते स्पष्टपणे म्हणतेः “जारकर्मी . . . असल्या कोणासही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वारसा नाही.” (१ करिंथकर ६:१८; इफिसकर ५:५) एखादा खेळ तुम्ही जिंकला काय किंवा हरला काय, तसेच तुम्ही कपड्यांची सूज्ञपणे खरेदी केली किंवा नाही यात सैतानाला कसलाही रस नाही, पण देवाच्या नियमांचा भंग करण्यात तुम्हाला कसे ठकवता येईल याकडे मात्र त्याचे जातीने लक्ष आहे. “तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो,” अशी ताकीद पवित्र शास्त्र देते. (१ पेत्र ५:८) तो आपल्या सर्व चतुर विचारशैलीच्या वापराने तसेच तेजस्वी दिव्यदूताचे सोंगहि घेऊन आम्हाला यहोवा देवाची सेवा करण्यापासून परावृत्त करता यावे याचा पराकाष्ठेचा प्रयत्न करीत आहे! हा विचारच आम्हाला एकाएकी जागे करीत नाही का?—२ करिंथकरास ११:१४.
हव्वेच्या बाबतीत जे घडले त्यापासून शिका
४. युवक सैतानाचे खास निशाण आहेत असे का म्हणता येते?
४ पण तुम्हा युवकांना हा विचार खाड्कन जागे करणारा आहे: तुम्ही सैतानाचे खास लक्ष्य आहात! पण का बरे? कारण तुम्ही आता युवक आहात आणि तुम्हाला ज्ञान व अनुभव प्राप्त करण्यास फारच अल्प काळ लाभला ज्यामुळे अशा अल्पानुभवी लोकांच्या मागे सैतान टपून आहे. आपल्या बंडखोरीच्या आरंभालाच त्याने ही गोष्ट केली. एदेन बागेत तो हव्वेकडे आला होता हे आठवा. तो आदामाकडे गेला नाही कारण आदामाला हव्वेपेक्षा काही काळ आधी निर्माण करण्यात आले होते. सैतानाने घेतलेला पवित्रा यशस्वी ठरला. होय, त्याने आपल्या खोट्या स्वरूपाद्वारे तरूण व अल्पानुभवी हव्वेची भुलवणूक करून तिला फसविले. “कारण प्रथम आदाम घडला गेला,” पवित्र शास्त्र सांगते, “नंतर हव्वा. आणि आदाम भुलविला गेला नाही, तर स्त्री भुलून अपराधात सापडली.”—१ तिमथ्यी २:१३, १४.
५. (अ) आम्ही कसल्या विचारात दंग राहू नये? (ब) प्रेषित पौलाला कोणती काळजी वाटत होती व ती का योग्य होती?
५ तुम्हाला वाटेल की ते झाले ते झाले, सैतानाची कोणतीही पद्धत मजवर चालू शकणार नाही, त्याला मजकरवी देवाचे नियम तोडून दाखवता येणारच नाही. अशा या विचारात दंग राहू नका. “सैतान स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो” हा इश्वरी इशारा लक्षात आणा. (२ करिंथकर ११:१४) हा फसवेपणाचा धनी आपल्या कारवायाद्वारे अल्पनुभवी अशा सहख्रिश्चनांना फसविण्यात यश मिळवील ही पौलाला काळजी होती. याकरताच त्याने लिहीले: “सापाने कपट करून हव्वेला ठकविले तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता ह्यापासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे.”—२ करिंथकर ११:३.
६. ठकविणे याचा अर्थ काय होतो?
६ येथे लक्ष द्या की हव्वेला नुसते फसविले गेले वा तिची चेष्टा केली गेली नाही; तिला ठकविले सुद्धा गेले. याचा अर्थ हा होता की तिला काही लुभावणाऱ्या अमिषाद्वारे वा मोहाद्वारे नाशकारक मार्ग आचरण्यास लावले गेले. वेबस्टर यांच्या थर्ड न्यू इन्टरनॅशनल डिक्शनरी या शब्दकोषानुसार ठकविणे याचा अर्थ “आज्ञाभंगास प्रवृत्त करणे, “अगदी युक्तिबाज प्रलोभनाने आकर्षित करणे वा मिळवून घेणे” असा होतो. हाच शब्दकोष हा खास अर्थ देतो: “(कोणा स्त्रीस) पहिला संभोग करण्यास प्रवृत्त करणे.” सैतानाने हव्वेला ज्या पद्धतीने ठकविले (आणि या प्रकरणात लैंगिक संभोगाचे मार्गक्रमण समाविष्ठ तरी) त्याची चाचणी करणे व आज तो कोणत्या अशाच पद्धती वापरीत आहे त्याची नोंद घेणे आमच्या फायद्याचे आहे.
७, ८. (अ) सैतानाने हव्वेस प्रश्न विचारण्याचे प्रयोजन काय होते? (ब) झाडाचे फळ खाणे सैतानाने कसे लाभाविष्ट बनविले?
७ आपला पवित्रा घेण्याच्या आरंभालाच सैतानाने मोठ्या युक्तिबाजपणे एका सर्पाचा वापर करून हव्वेला देवाच्या कायद्याविषयी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. ज्यामुळे शंका व अविश्वास उद्भवेल अशा काळजीपूर्वकरित्या योजलेल्या शब्दाकरवी त्याने तिला विचारले: “तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हास सांगितले हे खरे काय?” हा अमंगलसूचक प्रश्न विचारून सैतानाने मतप्रदर्शन केले की तिला बागेतल्या सर्वच झाडापासून खाण्यासाठी काही घेता येत नाही ही केवढी शोचनीय अवस्था होती. याकरताच त्याने विवाद मांडला की देवाने म्हटल्याप्रमाणे मरण्यापेक्षा मना केलेल्या झाडाचे फळ खाण्यापासून खराच फायदा होऊ शकतो. “कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी,” सैतानाने तिला खात्री दिली की, “तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हाल.”—उत्पत्ती ३:१–५.
८ देव हव्वेपासून लाभदायक गोष्टींचे ज्ञान लपवीत आहे हे सुचविण्याचा सैतानाचा तो केवढा दुष्ट व युक्तिबाज पवित्रा होता! स्वतःची निवड करण्याची क्षमता रोखावी याकरता देव मरणाची भीती घालत होता अशी सैतानाची विचारसणी होती. ‘अग, देवाने तुला नुसतं खुळ केल आहे!’ अशा आविर्भावात सैतान हव्वेशी बोलला. ‘तू मरणार तर नाहीच, पण देव ज्या गोष्टींचा उपभोग घेत आहे त्याचा तूहि उपभोग घेऊ शकते. बर आणि वाईट हे तुझ तुलाच ठरवता येईल.’ कोणाला जाब न देता आपल्यालाहि स्वतःचा निर्णय घेता येतो ही गोष्ट हव्वेला फार बरी वाटली.
९. याकोबाचे पत्र १:१४, १५ मध्ये दाखविल्याप्रमाणे एकामागोमाग कोणत्या घटनांनी हव्वेला पापास प्रवृत्त करून शेवटी मृत्यु दिला?
९ याचा परिणाम असा झाला की तेव्हा पासून हव्वा त्या झाडाकडे फारच आशाळभूतपणे पाहू लागली. “त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यात मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले; तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले.” (उत्पत्ती ३:६) पण नंतर जेव्हा हव्वेला कळले की तिला सांगण्यात आलेल्या काहीच गोष्टी मिळू शकल्या नाहीत तेव्हा तिने म्हटले: “सर्पाने मला भुरळ घातली.” (उत्पत्ती ३:१३) खरे पाहता त्याने तिला ठकविलेच होते, आमिषाद्वारे भुरळ पाडून मोहविले इतके की तिच्या स्वार्थी भावनांनी तिला पाप करण्याप्रत निरविले ज्याचा परिणाम ओघाओघाने मृत्यु प्राप्त होण्यात झाला.—याकोब १:१४, १५.
सैतानाच्या युक्त्यांबद्दल सावधान असा
१०. सैतानाच्या युक्त्यांविषयी आम्ही अजाण राहण्याची का गरज नाही, व कोणत्या सूचना आम्ही पाळणे सूज्ञतेचे ठरेल?
१० आजच्या युवकांना फसविण्यासाठी व ठकविण्यासाठी सैतान अगदी याच प्रकारच्या युक्त्या म्हणजे योजना, डावपेच व व्यूह वापरीत आहे. वस्तुतः पवित्र शास्त्र आपल्या इतिहासाच्या माध्यमाने सैतानाच्या फसव्या पद्धतींची ओळख देत असल्यामुळे तुम्हाला त्याच्या युक्त्यांबद्दल अजाण राहण्याची गरज नाही. (२ करिंथकर २:११) तुम्हाला, यहोवा देव आपले वचन व संस्था याकरवी जे इशारे व सूचना देत आहे त्याकडे कान देण्यासाठी चांगले लक्ष राखणे आवश्यक आहे.—नीतीसूत्रे २:१–६; ३:१–७, ११, १२; ४:१, २, २०–२७; ७:१–४.
११. सैतान युवकांना बहुधा कोणत्या मार्गी पापासाठी ठकवितो वा फसवितो?
११ सैतान बहुधा युवकांना पापात पाडण्यासाठी कोणत्या प्रकारची भुरळ घातलो व फूस लावतो? तो हे, देव ज्या गोष्टींचा धिक्कार करतो व ज्याकरवी देवाची मर्जी गमाविली जाईल ती कृत्ये, हव्वेला भासविले त्या फळाप्रमाणे अति आकर्षित व कधी कधी तर निरुपद्रवी अशी सादर करतो. त्याने हव्वेच्या बाबतीत केले त्याप्रमाणे तो तुमच्याही मनात ही कल्पना उभारील की तुम्हाला काही सुखद गोष्टींपासून वंचित ठेवले जात आहे. अशाप्रकारे अत्यंत चतुराईने व फसवेपणाने सैतान तुम्ही यहोवाच्या वचनाविषयी राखून असलेल्या आदराची आणि तुमचे देवभिरु पालक व देवाची संस्था यांजकरवी दिल्या जाणाऱ्या सूचनांची पायमल्ली करीत असतो. या कारणास्तव अत्यंत उचित कारणामुळेच पवित्र शास्त्र असे आर्जविते: “सैतानाच्या डावपेचांपुढे (वा जसे द किंग्डम इंटरलिनियर ट्रान्सलेशन ऑफ द ग्रीक स्क्रिपचर म्हणते त्याप्राणे, “कुयुक्तिपुढे”) . . . टिकाव” धरा.—इफिसकर ६:११.
१२. (अ) सैतानाविषयीची कोणती वस्तुस्थिती आम्ही गंभीरपणे घेण्यास हवी व का? (ब) १ योहान २:१५ व याकोब ४:४ मध्ये जे लिहिले आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? (ब) कोणती गोष्ट तुम्ही मानण्यास फसवणूक करावी अशी सैतानाची इच्छा असते?
१२ सैतानाच्या लबाडीवर हव्वेने विश्वास ठेवला हे तिचे मुर्खपणाचे कृत्य होते. तरीपण आजचे पुष्कळ युवक यहोवाचे वचन किंवा त्यांचे पालक वा ख्रिस्ती वडील याकरवी दिल्या जाणाऱ्या इशाऱ्यांना हलके मानून हीच प्रवृत्ति प्रदर्शित करीत नाहीत का? तुम्हाबाबत काय? उदाहरणार्थ, दियाबल सैतान हा या जगाचा अधिपती आहे व तो या व्यवस्थीकरणाचा देव या नात्याने लोकांची मने अंधळी करीत आहे या गोष्टी तुम्ही गंभीरपणे घेत आहात का? (१ योहान ५:१९; योहान १२:३१; १४:३०; १६:११; २ करिंथकर ४:४) “जग व जगातील गोष्टविंर प्रीती करु नका” या देवाच्या आज्ञेकडे तुमचे खरेच लक्ष आहे का? (१ योहान २:१५) शिवाय स्वतःस विचारा: ‘मी या शास्त्रवचनीय विधानास खरेच मानतो का की, “जो कोणी जगाचा मित्र होण्यास पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे”’? (याकोब ४:४) या जगात भीतीप्रद असे काही नाही व त्यातील सर्व हालचाली निरुपद्रवी आहे असे मानण्यात तो तुमची फसवणूक करू इच्छितो. पण सावध असा! फसू नका!
आजच्या फसव्या, मोहीत करणाऱ्या गोष्टी
१३. पुष्कळ ठिकाणी कोणती प्रथा लोकप्रिय बनली आहे व याबद्दल आपण काय मानावे अशी सैतानाची इच्छा असते?
१३ सैतान लोकांची पापकर्माप्रत फसवणूक ही अशा गोष्टींद्वारेच करतो ज्या मुळात चुकीच्या नाहीत वा पवित्र शास्त्राकरवी धिक्कारलेल्या नाहीत. उदाहरणार्थ, कित्येक विवाहीत दांपत्यांना आपल्या प्रणयराधनेच्या काळातील गोड अशा हितकारक आठवणींचे स्मरण आहे, पण तेच आता दोघांनी एकेकट्याने भेटीगाठी घेत राहण्यात संभाव्य धोके दिसत आहेत. भेटीगाठी घेण्याची प्रथा ही जगात साधारणपणे पहिल्या जागतिक महायुद्धानंतरच्या काळात लोकप्रिय झाली इतकी ती अर्वाचीन आहे. ही प्रथा साधीभोळी करमणूक आहे व यात दोन विरुद्ध लिंगी व्यक्ति आपला परिचय करून घेऊ शकतात असे तुम्ही मानावे अशी सैतानाची इच्छा असते. पण खरे पाहता ही प्रथा नैतिक धोक्यांनी भरलेली आहे.
१४. (अ) भेटीगाठीच्या प्रथेचे मोजमाप कसे करता येते? (ब) भेटीगाठीच्या काळात कोणत्या भावना वाढतात?
१४ या धोक्यांबद्दल वयस्कर, प्रौढ ख्रिश्चनांना त्यांच्या अनुभवामुळे अधिक चांगली माहिती आहे त्यामुळे ते साहाय्यक मार्गदर्शन देऊ शकतील. (नीतीसूत्रे २७:१२) पण तुम्हाला मात्र वाटेल की यात तर काही धोका दिसत नाही, आमचे पालकच मात्र पार कडक आहेत, आम्ही मौजमजा करावी असे त्यांना वाटत नाही. पण युवक जी फलप्राप्ती आणतात त्याद्वारे त्यांची तारतम्यता समजली जाते त्याप्रमाणेच भेटीगाठी या प्रथेचे मोजमापही असेच करता येते. (नीतीसूत्रे २०:११; मत्तय ७:१६) भेटीगाठीचा सराव केलेली व गर्भवती झालेली १८ वर्षे वयाची मुलगी म्हणते: ‘मी त्या हजार मुलांपैकी होते ज्यांना वाटले की “हे मजबाबतीत होऊच शकत नाही.”’ ती कबूल झाली की भेटीगाठीचा काही काळ गेला तर ‘एकमेकांना मिठीत धरणे व चुंबण घेणे शिळे बनते.’ याचप्रमाणे नित्याने गाठीभेटी घेणारी १७ वर्षे वयाची मुलगी कळवते: “चुंबनांचा भडीमार व कुरवाळणे हे इतके उद्विग्न करते की प्रणयाराधना नकोशी वाटते.” हा असाधारण अनुभव का? नक्कीच नाही.
१५. कोणत्या विपत्तीसाठी भेटीगाठीच्या प्रथेला बहुतांशी जबाबदार धरले पाहिजे?
१५ एकमेकांबद्दल आकर्षित झालेला युवक व युवती भेटीगाठीत घडते त्याप्रमाणे इतरांपासूनचा एकांत शोधतात त्यावेळी त्यांची लैंगिक इच्छा इतकी वाढू शकते की सदाचरणी युवक देखील देवाच्या नियमांचा भंग करण्याप्रत मजल मारतो. याचा जरा विचार करा की अमेरीकेत दहा लाखापेक्षा अधिक तरुण मुली गर्भवती होतात तर शेकडो, हजारो आपला गर्भपात करवितात किंवा आपल्या बालकाला लग्नबंधनाबाहेर वाढवितात. हे दुःखाचे आहे की कधी कधी या तरुण मुलीत यहोवाच्या सांक्षीदारांच्या काही मुली व त्यांच्याशी सख्य राखणारे मुले आढळतात. अशा या विपत्तीला आणि लैंगिक माध्यमाने जडविल्या जाणाऱ्या आजारांच्या लाखो प्रकरणांच्या बाबतीत भेटीगाठीच्या या प्रथेलाच जबाबदार धरावे लागेल.
१६. (अ) लैंगिक इच्छा केवळ कोठे योग्यतेने पूर्ण होतात? (ब) देवाच्या कित्येक लोकांबाबत काय घडते?
१६ देवाने उद्देशिले की लैंगिक इच्छा लग्नाच्या बंधनातच पूर्ण व्हावी. तेथेच ती हितकारक सुखाची व समाधानाची तृप्ती देते. (इब्री १३:४; नीतीसूत्रे ५:१५–१९) तरीपण या देवाकरवीच्या देणगीचा सैतानाने अगदी चतुराईने लोकांनी लैंगिक विषयाचा गैरवापर करावा आणि जारकर्म आचरावे याकरता वापर केला. देवाविरुद्धच्या अशा या गुन्ह्यात प्राचीन काळी एका दिवसात २४,००० इस्राएली मृत्युमुखी पडले आणि आज ख्रिस्ती मंडळीत दरवर्षी हजारो लोक व्यभिचाराच्या कारणामुळे बहिष्कृत होत आहेत. यास्तव सूज्ञ बना. सल्ला व मार्गदर्शन एकून घ्या. आपली फसवणूक होऊ देऊ नका.—गणना २५:१–९, १६–१८; ३१:१६.
१७. (अ) खेळ, संगीत व नृत्य याबाबतीत सैतानाने कोणता फसवा दृष्टीकोण जोपासला आहे? (ब) या जगातील करमूणक देवाच्या लोकांसाठी धोका कशी ठरते?
१७ सैतानाच्या इतर युक्त्यांबद्दलही सावध असा. त्याच्या जगाच्या करमणूकीच्या प्रकारात खेळ, संगीत व नृत्य ह्या गोष्टी महशूर बनल्या आहेत. या गोष्टी अर्थातच मुळात चुकीच्या नाहीत, त्या सुखद व लाभदायक ठरु शकतात. (१ तिमथ्यी ४:८; जखर्या ८:५; लूक १५:२५) तथापि, सैतानाने अगदी युक्तिबाजपणे यांच्याबाबतीत हे धोरण पुढे आणले आहे की यातून काही उपद्रव होऊ शकत नाही, जगातील लोकांबरोबर यात नियमित भाग घेतला तरी सुद्धा. परंतु देवाचे वचन इशारा देते: “फसू नका, कुसंगतीने नीती बिघडते.” (१ करिंथकर १५:३३) जरा विचार करा. धर्म व राजकारण हे सैतानी व्यवस्थेचे भाग आहेत तर जगाकरवी सादर केलेली करमणूक ही त्यांच्या प्रभावारहित असेल असे वाटू देणे मूर्खपणाचे ठरणार नाही का? यास्तव, “तुम्हा सभोवताली असलेल्या जगाने तुम्हाला त्याच्या साच्यात कोंबू नये” याकरता तुम्हाल सतत दक्ष राहण्याची गरज आहे.—रोमकर १२:२, द न्यू टेस्टमेंट इन मोडर्न इंग्लिश, जे.बी. फिलिप्स द्वारा.
युवकांचे रक्षण करणाऱ्या तरतुदी
१८. सूचना व मार्गदर्शन देणाऱ्या पालकांविषयी रसिकता तुम्हाला का असलीच पाहिजे?
१८ तुम्हा युवकांची फसवणूक होऊ नये याकरता यहोवा देवाने अत्यंत प्रेमळपणे तुम्हाकरता संरक्षणाच्या तरतुदी पुरविल्या आहेत. पहिली गोष्ट ही की त्याने तुम्हाला सूचना व मार्गदर्शन देण्यासाठी तुमचे पालक दिले आहेत. त्यांच्याकडील मदतीमुळे तुम्हला आनंदच वाटेल. गर्भवती बनलेल्या एका १८ वर्षाच्या दुःखी युवतीने अशी तक्रार केली की, “माझ्या पालकांनी आपले कर्तव्य पालक या अर्थी बजावले असते आणि कोणा मित्राचा सतत सहवास राखण्यात कोणते धोके असतात ते मला सांगून मला भेटीगाठी घेण्यासाठी मज्जाव केला असत” तर हे काही घडले नसते. याकरताच तुमचे पालक देवभिरु आहे तर त्याबद्दल कृतज्ञता बाळगा. ते तुम्हावर जी बंधने घालतात त्याकरवी तुमचा कोंडमारा व्हावा व जीवन असमाधारी व्हावे हा त्यांचा प्रयत्न नसतो. उलटपक्षी त्यांची तुम्हावर प्रीती असते व तुमचे रक्षण व्हावे ही त्यांची इच्छा असते. तद्वत, त्यांच्याकडून सूचना प्राप्त करून त्यांच्या अनुभवाचा व सूज्ञानाचा लाभ घ्या.
१९. युवकांचे संरक्षण करण्यासाठी आणखी कोणत्या मदतीची पुरवणूक केलेली आहे?
१९ यासोबत, यहोवाने तुम्हास मदत द्यावी याकरता त्याच्या पार्थिव संस्थेची सोय उपलब्ध करून दिली आहे. उदाहरणार्थ, या संस्थेकरवी प्रकाशित होणाऱ्या अवेक! या मासिकात प्रत्येक अंकामध्ये “यंग पीपल आस्क . . .” हे सदर असते ज्यात यहोवाच्या दर्जाविषयीची व्यवहार्यता दाखविली जाते. याच प्रमाणे, स्कूल ॲण्ड जेहोवास विटनेसेस हे माहितीपत्रक तुम्हाला शाळेच्या वातावरणात देवाचे नियम व तत्वे यांचे कसे अवलंबन करता येईल त्याविषयीचे मार्गदर्शन मिळावे म्हणून पुरविण्यात आले आहे. टेहळणी बुरुज याच्या पृष्ठांकरवी तसेच मंडळीच्या सभामार्फत तसेच विभागीय संमेलने व प्रांतिय अधिवेशन याकरवी सुद्धा तुम्हाला अधिक प्रोत्साहन व सूचना मिळते. खरे म्हणजे, “युवकांनो—फसू नका” हा विषयच अलिकडील प्रांतिय अधिवेशनात भाषणरूपे सादर केला गेला व एका कार्यमार्गदर्शक सभेत सुद्धा त्याची हाताळणी झाली.
२०. (अ) युवकांना इतकी मदत का देण्यात आली आहे? (ब) तुम्हाला फसविण्याच्या सैतानाच्या प्रयत्नास प्रतिकार करण्यासाठी कोणती प्रवृत्ती तुम्हाला साहाय्यक ठरेल?
२० तुमच्यावर आमचे हे एवढे एकाग्र लक्ष आहे याचा अर्थ आम्ही तुमचा आनंद हिरावून घेतो या अर्थी मुळीच करून घेऊन नका. तर देवाची संस्था तुमच्यावर प्रीती करते व जे काही म्हटले जाते व तुमच्याकरता लिहिले जाते ते सर्व तुमचे संरक्षण व्हावे—तुमच्या जीवनाचे रक्षण व्हावे याकरता आहे. या तरतुदींबद्दल रसिकता जाणा. संस्थेच्या प्रकाशनाद्वारे पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्याची सवय लावा. पवित्र शास्त्रीय सत्य तुमची रसिकता वाढवीत राहो. तुमची प्रवृत्ती त्या १८ वर्षे वयाच्या युवकासारखी राहावी ज्याने युवकांच्या बाबतीत दिलेल्या सूक्ष्म सल्ल्याचा विचार केल्यावर आम्हास लिहिले: “आम्ही तरुण युवक सत्यामध्ये केवढे सुस्थितीत आहोत याची मला सातत्याने जाणीव झाली. आपल्या युवकांबद्दल एवढी काळजी करणारी व प्रेम व्यक्त करणारी पृथ्वीवर दुसरी संस्था नाहीच!” तर आपण एकमेकांसोबत जडून राहू या व आम्हाला फसविण्याच्या सैतानाच्या प्रयत्नांचा प्रतिकार करीत राहू या, कारण त्याच्या युक्त्यांविषयी आम्ही अजाण नाही!
उजळणी चौकोन
◻ युवक आणि युवती सैतानाचे खास लक्ष्य का आहेत?
◻ सैतानाने हव्वेला पाप करण्यासाठी कसे भुलविले?
◻ आज सैतान युवकांना पापकर्म करण्यासाठी कसे भुलवितो?
◻ युवकांचे संरक्षण करण्यासाठी कोणत्या तरतुदी आहेत?
[१८ पानांवरील चित्रं]
आदामापेक्षा अल्प अनुभवी असणाऱ्या हव्वेला फसविण्यासाठी सैतानाने प्रयत्न केला तसेच आज युवक सैतानाचे खास लक्ष्य बनले आहे
[२१ पानांवरील चित्रं]
युवक व युवती एकांतात राहतात त्यावेळी लैंगिक इच्छा प्रदीप्त बनतात व त्याकरवी देवाच्या नियमांचा भंग करण्याकडे निरविले जाते