वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 २/१ पृ. २३-२९
  • यहोवाचे अंतःकरण आनंदी करणारे युवक

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाचे अंतःकरण आनंदी करणारे युवक
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ते का सूज्ञतेचे आहे?
  • यहोवाबद्दल तुम्हाला कसे वाटते?
  • त्यांनी देवाचे अंतःकरण आनंदी केले
  • आज यहोवाचे अंतःकरण आनंदी करणे
  • यहोवाचे मन आनंदित करणारे तरुण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • तरुणांनो, तुम्ही उत्तम भविष्याची उभारणी करत आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • युवकांनो—यहोवाचे हृदय आनंदित करा
    आमची राज्य सेवा—१९९३
  • मुलांनो—यहोवाची सेवा करण्याची आपली इच्छा आणखी दृढ करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 २/१ पृ. २३-२९

यहोवाचे अंतःकरण आनंदी करणारे युवक

“सूज्ञ होऊन माझे अंतःकरण आनंदी कर, म्हणजे माझी निंदा करणाऱ्‍यास मी प्रत्युत्तर देईन.”—नीतीसूत्रे २७:११.

१. आम्ही ज्या पध्दतीने आमचे जीवनाक्रमण करतो त्याकरवी आमचे पालक व निर्माणकर्ता याजवर कोणता परिणाम होत असतो?

तुम्ही तुमचे जीवन ज्या पध्दतीने व्यतित करता त्यामुळे, तुम्हास जाणीव असो वा नसो, फरक हा निश्‍चितपणे घडत असतो. उदाहरणार्थ, तुमच्या आईवडिलांना हा फरक जाणवतो. “मुलगा शहाणा तर बाप सुखी,” असे पवित्र शास्त्र म्हणते, “मुलगा मूर्ख तर आई दुःखी.” (नीतीसूत्रे १०:१; २३:२४, २५) पण अधिक महत्वाचे ते हे की तुम्ही तुमचे जीवन ज्या मार्गाने व्यतित करता त्यामुळे आमचा निर्माता यहोवा देव याला एक तर आनंदीत केले जाते वा दुःखी बनविले जाते. यामुळेच, “माझ्या मुला सूज्ञ हो” असे यहोवा तुम्हाला आर्जवितो, आणि म्हणतो की, “माझे अंतःकरण आनंदित कर, म्हणजे माझी निंदा करणाऱ्‍यास मी प्रत्युत्तर देईन.”—नीतीसूत्रे २७:११.

२. सैतानाने कोणता महत्वपूर्ण वादविषय उभा केला आणि आम्ही यात कसे गोविलेले आहोत?

२ यहोवाची निंदा करणारा, हा अर्थातच दियाबल सैतान आहे. एदेन बागेत सैतानाने असा महत्वपूर्ण वाद निर्माण केला ज्याविषयी देवाकडून उत्तर प्राप्त होणे जरुरीचे होते. दियाबल प्रथमतः जेव्हा हव्वा व नंतर आदाम यांना देवाच्या नियमाचा भंग करविण्यात समर्थ ठरला तेव्हा त्याने यहोवाला आव्हान केले होते असे त्याकरवी स्पष्ट होते. सैतानाने जणू असे प्रतिपादिलेः “मला एकदा संधि देऊन तर पहा, मी तुझी सेवा करण्यापासून सर्वांनाच परावृत्त करु शकेन.” (इयोब १:६–१२) याच कारणास्तव देवाने वर नमूद असणारे अंतःकरणपूर्वक अपील केले होते की त्याच्या मुलाने त्याला असे उत्तर तयार करुन द्यावे की ज्यामुळे देवाला सैतानाच्या आव्हानाला “प्रत्युत्तर” पुरविता येईल.

३. यहोवाचे अपील खासपणे येशूला का लागू होते, आणि आणखी कोणी यहोवाचे अंतःकरण आनंदी केलेले असणार?

३ तरीपण, “माझ्या मुला” असे संबोधून यहोवा खासपणे ते अपील कोणाला करीत होता? येशू ख्रिस्त हा त्याचा एकुलता एक असल्यामुळे त्याचा अप्रतिम पुत्र ठरतो. (योहान १:१४) याशिवाय येशू हा, आपल्या निर्माणकर्त्याविषयी अपयशी ठरलेल्या आदामाच्या अनुषंगाने पाहू जाता पृथ्वीवर एकटाच परिपूर्ण माणूस होऊन गेला. त्यामुळे देवास पूर्ण अर्थी विश्‍वासूपणा राखला जाऊ शकतो हे तोच एकटा शाबीत करु शकत होता. (१ करिंथकर १५:४५) याकारणास्तव यहोवाचे अपील खासपणे येशूला लागू होत होते. आणि येशूने आपल्या पित्याची निराशा केली नाही. परीक्षाप्रसंगी मानव देवाची विश्‍वासूपणे सेवा करुच शकत नाही या सैतानाच्या गर्विष्ठ आव्हानास येशूने आपले मार्गाक्रमण चोख राखून देवाने सैतानाला द्यावे याकरता योग्य उत्तराची पुरवणूक केली. (इब्रीयास २:१४; १२:२) याप्रमाणे ख्रिस्तासोबत स्वर्गात राज्य करतील अशा सर्वांनीही मरणापावेतो देवास विश्‍वासूपणा व्यक्‍त करुन यहोवाचे अंतःकरण आनंदी केले असेल.—प्रकटीकरण २:१०.

४. आपल्या जीवनाबाबत काय करावे हे ठरविताना तुम्ही कोणत्या महत्वपूर्ण गोष्टींचा विचार करावयास हवा?

४ पण आज आमच्याबाबत व खासपणे तुम्हा युवकांबद्दल काय? मानव देवास विश्‍वासू राहतील की काय या वादविषयात तुम्ही समाविष्ठ आहात का? होय, निश्‍चितपणे! (स्तोत्रसंहिता १४७:११; १४८:१२, १३) तुम्हाला कदाचित याची जाणीव नसेल पण तुम्ही आपल्या जीवनासंबंधाने जे काही करीत आहात त्यामुळे वादविषयाच्या बाबतीत एकतर तुम्ही देवाच्या बाजूने होता किंवा सैतानाच्या बाजूकडे जाता. त्यामुळे एकतर यहोवा आनंदी होतो किंवा सैतान. या कारणास्तव यहोवाकडील आमंत्रण वा अपील हे प्रत्यक्षात आम्हालाच करण्यात आले आहे असा दृष्टिकोण आम्ही धरु शकतो, कारण तो म्हणतोः“माझ्या मुला, [वा मुली], सूज्ञ होऊन माझे अंतःकरण आनंदी कर, म्हणजे माझी निंदा करणाऱ्‍यास मी प्रफ़ुतर देईन.” (नीतीसूत्रे २७:११) तर मग आपल्या निर्मात्याचे अंतःकरण आनंदी करणे हे तुम्हासाठी तृप्तीकारक ध्येय ठरणार नाही का?

ते का सूज्ञतेचे आहे?

५. यहोवाचे अंतःकरण आनंदी करणे का सुज्ञतेचे आहे?

५ यहोवा काय प्रोत्साहन देतो ते लक्षात घ्या. तो म्हणतो: “सूज्ञ हो.” तर मग आम्ही यहोवाचे अंतःकरण आनंदित करतो तेव्हा आम्ही सूज्ञ का ठरतो? कारण यहोवा आमचा प्रेमळ पिता असून तो आमच्या भल्याचीच अपेक्षा धरतो आणि जे काही तो आम्हास करावयास सांगतो ते आमच्या भल्यासाठीच असते. यशया ४८:१७, १८ सुध्दा तेच म्हणते: “तुला जे हितकारक ते मी यहोवा तुझा देव तुला शिकवितो. ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो. तू माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकतास तर बरे होते. मग तुझी शांति नदीसारखी, तुझी धार्मिकता समुद्राच्या लाटासारखी झाली असती.”

६. (अ) तुम्ही जीवनाचा आनंद घ्यावा ही यहोवाची इच्छा आहे हे कशावरुन दिसते? (ब) तरीपण कोणते परिणाम तुम्हाला टाळता येऊ शकत नाहीत?

६ प्रेमळ पालक या नात्याने यहोवाची ही इच्छा आहे की तुम्ही त्याच्या जीवनाच्या मोलवान देणगीचा पुरेपूर आनंद प्राप्त करावा. या कारणास्तव तो म्हणतो:“हे तरुणा आपल्या तारुण्यात आनंद कर. तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला उल्लास देवो. तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल.” हे काही तुम्हाला जे जे सुखावह दिसते त्याच्या इच्छाप्राप्तीसाठी प्रयत्न करण्याचे आमंत्रण नव्हे. ही गोष्ट पुढील इशाऱ्‍याकरवी चित्रित केली आहे की:“पण ह्‌या सर्वांबद्दल देव तुझा झाडा घेईल हे तुझ्या लक्षात असू दे.” (उपदेशक ११:९) होय, तुम्हाला आपल्या कृतीचे परिणाम टाळता येणार नाहीत; तुम्ही जे करता त्याविषयी देव तुमच्याकडून जाब मागेल. हा नियम अगदीच खात्रीशीर आहे:“माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल.”—गलतीकर ६:७.

७, ८. (अ) तुम्हाला खेद कसा दूर करता येईल आणि उपद्रव कसा टाळता येईल? (ब) तारुण्य व भरज्वानी केव्हा व्यर्थ ठरते?

७ या कारणास्तव यहोवा पुढे म्हणतो:“यास्तव आपल्या अंतःकरणापासून तू खेद [किंवा चिंता करण्याजोगे कारण] दूर कर आणि आपला देह उपद्रवापासून राख; कारण तारुण्य व भरज्वानी ही व्यर्थ आहेत.” (उपदेशक ११:१०) जी कार्ये तुम्हाला नंतर खेद व उपद्रव देत राहतील ती टाळणे हे अर्थातच सुज्ञतेचे आहे. असेही काही असतील जे म्हणतील की तुम्ही अगदीच खुळे आहात–जोपर्यंत तुम्ही अति मद्य घेतले नाही, निषिध्द लिंगाचार केला नाही किंवा अशासारखी “धाडसी” कामे केली नाहीत तर तुम्ही ‘खऱ्‍या अर्थी जीवन जगलाच’ नाहीत. पण हेच केवढे मुर्ख असतात! व्यभिचारानंतर एका तरुण विद्यार्थ्याने अश्रु गाळीत शोकपूर्णरितीने म्हटले: “ते खरेच योग्य नव्हते. तेव्हापासून आता मी फारच चिंताक्रांत झालो आहे.”

८ तर तुम्ही युवकहो, चिंता किंवा दुःख होईल असे कारण तुम्ही तुमच्या अंतःकरणामधून दूर करा हा देवाकडील सूज्ञ सल्ला ऐका. अशा या चिंतेचा वा दुःखाचा अनुभव बेपर्वा व स्वार्थी वृत्तीने जीवन जगणाऱ्‍या युवकांना आला होता. १७ व्या शतकातील एका निबंधकाराने हे निरिक्षिले: “मानवजातीतील बहुसंख्याक आपल्या जीवनाची पहिली वर्षे दयनीय बनतील अशा पध्दतीने घालवितात.” हे केवढे खरे पण केवढे दुःखदायक! कोणी युवक आपली शारिरीक शक्‍ति व क्षमता अशा मार्गी घालवितो की ज्यामुळे त्याच्या प्रौढकालातील वर्षे अधिकच कठीण बनतात तर याचा अर्थ त्याचे तारुण्य व भरज्वानी ही नक्कीच व्यर्थ आहेत! (नीतीसूत्रे २२:३) यामुळेच सूज्ञ व्हा! आणि पुढील सल्ला पाळा: “आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला स्मर.”—उपदेशक १२:१.

९. यहोवाचे आपल्या तरुणपणाच्या दिवसात स्मरण करीत राहिल्यामुळे तुम्हाला कोणत्या लाभांचा आनंद मिळेल?

९ यहोवाला आपल्या तारुण्याच्या दिवसात स्मरल्यामुळे तुम्हाला खूप फायदा घडेल. तुम्ही खेद दूर कराल व उपद्रव तर टाळालच पण सोबत आपल्या थोर निर्मात्याची सेवा करण्यात आता आनंदी व प्रतिफळदायक जीवनाचा अनुभव प्राप्त कराल. यासोबत तुम्ही सूज्ञपणे स्वर्गात आपल्या ठेवीचा संचय कराल जी तुम्हाला सदासर्वकाळासाठी लाभदायक ठरेल. (मत्तय ६:१९–२१) तुम्ही आता यहोवाचे स्मरण करुन त्याच्या इच्छप्रमाणे कराल तर तो सुध्दा तुमची आठवण ठेवील व तुम्हाला तुमच्या “मनाच्या संकल्पा”नुसार म्हणजेच नंदनवनातील सार्वकालचे आनंदी व तृप्त जीवनाचे बक्षीस प्रदान करील!—स्तोत्रसंहिता ३७:४; १३३:३; लूक २३:४३; प्रकटीकरण २१:३, ४.

यहोवाबद्दल तुम्हाला कसे वाटते?

१०. (अ) देवाची सेवा करण्याचा तुमचा निर्णय थंडपणाचा का नसावा? (ब) यहोवा आणखी कोणते अपील करतो?

१० यहोवाची सेवा करण्याविषयीचा तुमचा निर्णय थंडपणाचा नसावा. सैतान हा इतका चतुर आहे की त्याला तुमच्याबाबतीत हे दिसले की व्यक्‍तिगत फायदा उचलण्याचा तुमचा कल आहे तर तो तुम्हाला ओघाओघाने स्वार्थी आकांक्षाना भुरळ घालण्याचा प्रयत्न करील व याद्वारे तुम्हाला यहोवाची सेवा करण्यापासून दूर नेईल. या कारणास्तव यहोवा तुम्हाला नुसते सूज्ञ होण्याचे आर्जवीत नाही, तर सोबत तुम्ही स्वतःचे व्यक्‍तिगत समर्पण करावे असेही अपील करतो. येशूने म्हटले: “तू आपला देव यहोवा ह्‌याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीती कर.” (मत्तय २२:३७) यहोवास संपूर्ण अंतःकरणाने प्रीती करण्याचा काय अर्थ होतो हे तुम्हास ठाऊक आहे का?

११. (अ) यहोवास आपले अंतःकरण देणे याचा काय अर्थ होतो? (ब) सुस्थितीत असणारे अंतःकरण आम्हाला देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यास कसे प्रवृत्त करु शकते हे योसेफाच्या उदाहरणाद्वारे कसे चित्रित होते?

११ तुमचे अंतःकरण हे तुमचे अंतर्याम, तुमच्या भावना, तुमच्या प्रवृफ़ा, तुमचे खोल मानसिक विचार आणि तुमची विचारधारा याचे प्रतिनिधित्व करते. तद्वत, यहोवावर तुमच्या पूर्ण अंतःकरणाने प्रीती करणे याचा अर्थ तो तुमचा अत्यंत प्रिय असून जीवनातील इतर सर्व गोष्टींपेक्षा तुम्ही त्याचे अंतःकरण त्याला सुयोग्य उत्तर सैतानाला देण्यासाठी पुरवून आनंदी करण्याची तुमची पसंतीची निवड आहे असा होतो. अशाप्रकारची ही अंतस्थ जाणीव व देवाच्या इच्छेसंबंधीचे प्रेम आणि काळजीची सखोल भावना त्याच्या इच्छेप्रमाणे करीत राहण्यात व तेही इतर गोष्टींचे आकर्षण समोर उभे राहिले तरी, तुम्हाला दृढ चालना देत राहील. तरुण योसेफाला यहोवाबद्दल असे प्रेम वाटत होते, त्यामुळेच जेव्हा एका आकर्षक स्त्रीने त्याला म्हटले: “ये, मजपाशी नीज,” तेव्हा योसेफ उत्तरला: “एवढी मोठी वाईट गोष्ट करुन मी देवाच्या विरुध्द पाप कसे करू?”—उत्पत्ती ३९:७–९.

१२. (अ) यहोवाला आपले अंतःकरण तुम्ही दिले आहे हे तुम्ही कसे दाखवता? (ब) तुम्ही यहोवाला आपले अंतःकरण दिले नसल्यास कोणत्या प्रश्‍नांचा विचार करावा?

१२ आपली यहोवावर पूर्ण अंतःकरणाने प्रीती आहे हे तुम्ही जेव्हा त्याला प्रार्थना करुन तुम्ही त्याचे बनण्याची इच्छा प्रदर्शित करता आणि त्याची सेवा सदासर्वदा करण्याचा आपला मनोदय व्यक्‍त करता तेव्हा स्पष्ट होते. याप्रकारे तुम्ही यहोवाला स्वतःचे समर्पण करता. असे तुम्ही केले आहे का? जर नाही, तर का नाही? कशामुळे तुम्ही मागे आहात? यहोवा देव व सैतान याजमध्ये जो मोठा वाद आहे तो समजण्याएवढे तुम्ही मोठे आहात का? मग यहोवाचे अंतःकरण आनंदी करण्याची तुमची इच्छा आहे का? तुम्ही यहोवावर आपल्या पूर्ण अंतःकरणाने प्रीती करावी असे सैतानाला मुळीच वाटत नाही. तुम्ही स्वार्थपणे “स्वतःच्याच गोष्टी” करीत राहाव्या, स्वतःस संतुष्ट करावे असे त्याला वाटते. तुम्ही कोणाला आनंदी कराल–यहोवाला किंवा सैतानाला? याविषयीचा गंभीर विचार करा.

१३. तुम्ही समर्पित व बाप्तिस्मा घेतलेले आहात तर कोणते प्रश्‍न तुम्ही स्वतःला विचारावेत?

१३ तुम्ही स्वतःचे देवाला समर्पण करुन त्याचे द्योतक म्हणून पाण्याचा बाप्तिस्मा घेतला आहे तर तुमचे जीवनाक्रमण दाखवून देते का की तुमचे अंतःकरण खरेच यहोवापाशी जडले आहे? तुमच्या आस्था, तुमच्या भावना कोठे केंद्रित आहेत? नवी गाडी घेण्यावर? नवनवीन कपडे किंवा इतर व्यक्‍तिगत गोष्टी प्राप्त करण्यासाठी पैसे कसे मिळविता येतील त्यावर? कोणाची आस्था प्रधान स्थानी येते–तुमची स्वतःची की यहोवाची? आपले अंतःकरण मला सुपुर्द करा या यहोवाच्या अपीलाला तुम्ही खरा प्रतिसाद दिला आहे का?

१४. (अ) युवकांपाशी कोणता महत्वपूर्ण ठेवा आहे? (ब) कोणी युवक निर्माणकर्त्याचे स्मरण करीत नाही तेव्हा ते दुःखाचे का असते?

१४ वयस्करांपाशी अधिक अनुभव आणि साधारणपणे अधिक ज्ञान असले तरी युवकांपाशीही असा काही महत्वपूर्ण ठेवा आहे ज्याचा वापर देवाला संतुष्ट करण्यासाठी त्यांना करता येईल. “बल हे तरुणास भूषण आहे,” असे पवित्र शास्त्र म्हणते. (नीतीसूत्रे २०:२९) तर त्या बलाचा आत्ताच वापर करा. जेव्हा शरीर अशक्‍त बनते व त्याची गात्रे ढिली होऊन त्यांचे योग्य कार्यवहन होण्यात संथपणा येतो त्या वृध्दापकाळाचे “अनिष्ट दिवस” “जवळ येत आहे” त्यापूर्वी आपल्या निर्माणकर्त्याचे स्मरण करा. युवक असताना कोणी निर्माणकर्त्याचे स्मरण करु शकला नाही व आता वृध्दापकाळी त्याला देवास देता येण्याजागे असे काहीही नाही हे किती शोचनीय ठरते बरे! हे “सर्व व्यर्थच आहे!” (उपदेशक १२:१–८) याकरताच आपल्यापाशी ताकद व जोम आहे तेव्हाच आपल्या निर्माणकर्त्याचे सुज्ञपणे स्मरण करा. देवापुढे विश्‍वासू कार्याचा अहवाल उभारा म्हणजे त्याजकडील संमतिदर्शक न्याय, होय, सार्वकालिक जीवन तो तुम्हास देईल.—इब्रीयांस ६:१०–१२; उपदेशक १२:१३, १४.

त्यांनी देवाचे अंतःकरण आनंदी केले

१५. देवाच्या सेवेत ज्यांनी आपली ताकद वापरली अशा कोणत्या युवकांची पवित्र शास्त्रीय उदाहरणे आहेत?

१५ पवित्र शास्त्र हे अशा युवकांच्या उदाहरणांनी भरले आहे ज्यांनी आपले “भूषण,” आपली ताकद देवाच्या सेवेत लावली. ज्यांनी वचनयुक्‍त देशाची हेरगिरी केली ते “तरुण पुरुष” तत्परता व चपळता यांनी भरलेले होते. (यहोशवा ६:२२, २३; २:१५, १६, २३) दावीद आपल्या विशीत असताना त्याने नाबालाकडे याचना करण्यासाठी “दहा तरुण पुरुषांस” पाठविले. (१ शमुवेल २५:४, ५) नेहम्याच्या देखरेखीखाली यहुद्यांनी हल्ला होण्याची भीती होती तरी यरुशलेमाचा तट बांधून काढला तेव्हा हे परिश्रमाचे व धोक्याचे काम कोणी केले बरे? “माझे अर्धे तरुण सेवक,” नेहम्याने स्पष्ट केले, “कामास लागत व अर्धे भाले, ढाली, धनुष्ये, चिलखते धारण करीत.” (नेहम्या ४:१६) जेव्हा देवाने हनन्या व सप्पीरा यांना खोटे बोलल्यामुळे ठार केले तेव्हा “तरुणांनी” त्यांना वाहून नेले व पुरले.—प्रे. कृत्ये ५:५, ६, १०.

१६. प्राचीन काळी तरुणांनी कोणत्या आध्यात्मिक कार्यात भाग घेतला?

१६ समयानुरुप उपलब्ध असणाऱ्‍या सेवेकरता जेव्हा युवक स्वतःला सादर करीत असतात तेव्हा यहोवाला नक्की आनंद होत असतो. तरीपण काही युवकांनी आध्यात्मिक कार्यात स्वतःला सामावून घेतले ज्यात शारिरीक ताकद व जोम यापेक्षा अधिकाची गरज लागते. “मी अल्पवयी आहे,” असे अलीहू म्हणाला. तरी देखील यहोवाने त्याचा वापर इयोबास सुधारणूक देण्यासाठी केला. (इयोब ३२:४–६) शिलो येथे यहोवाच्या निवास मंडपात शमुवेलाने सेवा आरंभिली तेव्हा तो “बाळ” होता. (१ शमुवेल २:१८) ती “लहान मुलगी” होती जिने, नामानाच्या घरी दासी होती तरी यहोवाचा संदेष्टा काय करु शकतो ते निर्भिडपणे सांगितले. ( २ राजे ५:२–४) यहोवाने यिर्मयाला संदेष्टा अशी नेमणूक दिली तेव्हा यिर्मयाने म्हटले: “मी केवळ बाळ आहे.” (यिर्मया १:५, ६) दानीएल व त्याचे तीन इब्री साथीदार हे ‘चौघे तरुण’ बाबेलोनी बंदिवासात यहोवाचे केवढे अप्रतिम सेवक ठरले बरे! (दानीएल, अध्याय १ व ३) पौलाचा भाचा या “तरुणाने” आपल्या मामाच्या खातर मोठी धैर्यवान हालचाल केली. (प्रे. कृत्ये २३:१६–२२) तिमथ्यी हा एक असा मुलगा होता ज्याला बाळपणापासून पवित्र शास्त्राविषयीची माहिती होती व त्याने आपले तरुणपण यहोवाच्या सेवेत घालविले.—२ तिमथ्यी ३:१५; फिलिपैकर २:१९–२३; १ करिंथकर ४:१७.

आज यहोवाचे अंतःकरण आनंदी करणे

१७. आज यहोवास संतुष्ट करणारे युवक दिसले पाहिजे अशी आम्ही अपेक्षा का करावी?

१७ केवळ गतकाळीच तरुणांनी आपल्या विश्‍वासू सेवेकरवी देवाचे अंतःकरण आनंदी केले असे नाही. “‘शेवटल्या दिवसात असे होईल की,’ देव म्हणतो, ‘मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या तरुणांस दृष्टांत होतील.’” (प्रे. कृत्ये २:१७; योएल २:२८) तद्वत, या शेवटल्या काळात पुष्कळ ख्रिस्ती युवक देवास संतुष्ट करीत असलेले आम्हास दिसले पाहिजे. आणि तसे दिसते! युवक साक्षीदार आमच्याप्रमाणेच दोषरहित नाहीत तरी यापैकीचे बहुतेक ख्रिस्ती या नात्याने उत्तम काम करीत आहेत. यहोवाचे अंतःकरण आनंदी करण्याची काळजी त्यांच्याठायी आहे.—स्तोत्रसंहिता २७:११; ३:१, २.

१८, १९. आज कोणते काम होण्याची गरज आहे व याकरता युवक कसे योग्य ठरतात?

१८ या शेवटल्या दिवसात यहोवाची इच्छा ही आहे की त्याच्या राज्याविषयीची भव्य स्वरुपाची जगव्याप्त साक्ष दिली जाण्यास हवी. याकरता खूप परिश्रमाची गरज आहे. (मत्तय २४:१४) भक्‍तिकरता राज्य सभागृहे तर विभागीय संमेलनासाठी मोठमोठ्या इमारती बांधण्याची गरज आहे. काही देशात पवित्र शास्त्र प्रकाशनांची छपाई करण्यासाठी मोठे कारखाने व बेथेल गृहे ही अधिक निवासस्थाने उभारण्याची गरज आहे. या नव्या वास्तुंची उभारणी करण्यासाठी प्रचंड असे बांधणी काम करायचे आहे. नेहम्याच्या काळात तट बांधणीचे कार्य केले गेले त्याप्रमाणे आज शक्‍ति व जोम असणारे युवक पुष्कळ काम करीत आहेत.

१९ असेच तरुण आज प्रचंड टनाचे पवित्र शास्त्रीय साहित्य दरवर्षी छापून, बांधणी करून व टपालाने पाठविण्याचे काम करतात. खरे म्हणजे, यहोवाच्या साक्षीदारांच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयात व वॉचटावर फार्म येथे २५ वर्षे वयाचे व त्याहिपेक्षा तरुण असे १,४०० पेक्षा अधिक जण आहेत. त्यांच्या कामात आठवडाभर ताकदीच्या व अंगमेहनतीच्या कामाचाच समावेश नाही तर हेच लोक सप्ताहाच्या शेवटी घरोघरच्या प्रचारकार्यात सहभाग घेतात आणि स्थानिक मंडळीत ख्रिस्ती सभांना हजर राहतात. ते यहोवाचे अंतःकरण किती आनंदीत करीत आहेत!

२०. (अ) पायनियर कार्यात युवक कोणता सहभाग घेत आहेत? (ब) पूर्ण वेळेच्या कार्यात सहभागी नसणाऱ्‍या युवकांनी स्वतःला कोणते प्रश्‍न विचारावेत?

२० अमेरिकेत या युवकांच्या खांद्याला खांदा लावून याच वयोगटातील १२,७०० आणखी आहेत जे नियमित पायनियर सेवक या नात्याने सेवा सादर करीत आहेत. जगाच्या इतर भागात इतर जण हजारोंच्या संख्येने पायनियरींग करीत आहेत. तुम्ही युवक आहात व अद्याप पूर्ण वेळेचे उपाध्यपण सुरु केले नाही तर तुम्ही अशी काही ध्येये स्वतःपुढे ठेवाल का की ज्यामुळे मोठ्या पगाराची नोकरी, विवाहबध्द होणे व आपले कुटुंब स्थापित करणे यांच्या ऐवजात यहोवाला तुमच्या जीवनात प्रधान स्थान मिळेल? मोठ्या विश्‍वव्यापी वादविषयाची तुम्हाला समज आहे का? आमच्या वैभवी निर्माणकर्त्याचे नाव सर्व निंदेपासून स्वच्छ व शुध्द होत आहे हे पाहण्याची खरी उत्कंठा तुम्हाठायी आहे का? तर मग यहोवाच्या कार्यात जेवढे काही करता येते तेवढे सर्व करीत राहणे योग्य नाही का? यात तुम्हापैकी अनेक जणांना बेथेल गृहातील कार्यात वा पायनियरिंग कार्यात सहभागी होण्याची संधि नाही का?

२१. (अ) यहोवाकडील कोणत्या निमंत्रणाचा तुम्ही स्विकार करण्यास हवा व कसा? (ब) यशयाने प्रतिसाद दिला त्याप्रमाणे आणखी पुष्कळ युवक यहोवाच्या निमंत्रणास प्रतिसाद देतील असे आम्हाला का अपेक्षिता येईल?

२१ ऐका! यहोवा तुम्हाला, तुम्ही सैतानाच्या दुष्ट टोमण्यासंबंधाने देवाने देण्याजोगे सुयुक्‍त उत्तर द्यावे याकरता अपील करीत आहे. यशयाला यहोवाकडून जी विचारणा झाली होती ती तुम्हाला ऐकायला येते का: “मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल?” तर मग सूज्ञ होऊन यशयासारखा, “हा मी आहे, मला पाठीव” असा प्रतिसाद का देऊ नये? (यशया ६:८) तुम्हापैकी आणखी युवक प्रतिसाद देऊन सामोरे येतील हा आम्हाला आत्मविश्‍वास वाटतो कारण देवाचे वचन अभिवचन देते: “तुझ्या पराक्रमाच्या दिवशी तुझे लोक संतोषाने पुढे होतात . . . तुझे तरुण [व तरुणी] तुला पहाटेच्या दहिवरांसारखे आहेत.” (स्तोत्रसंहिता ११०:३; १४८:१२, १३) तुम्ही प्रतिसाद दिल्यास तुम्हाला ही खात्री राहील की यहोवा देवाचे निरिक्षण आहे व तो तुम्हास पसंती दाखवील–कारण तुम्ही त्याचे अंतःकरण आनंदी करीत आहात!

उजळणीचा चौकोन

◻ आम्ही ज्या पध्दतीने जीवन व्यतित करतो ते यहोवाला महत्वाचे का वाटते?

◻ यहोवाचे अंतःकरण आनंदी करणे सुज्ञतेचे का आहे?

◻ आम्ही आपले अंतःकरण यहोवाला दिले आहे हे कसे दाखवू शकतो?

◻ गतकाळी कोणी यहोवाचे अंतःकरण आनंदित केले व कसे?

◻ आज कोण यहोवाचे अंतःकरण आनंदित करीत आहेत व कसे?

[२५ पानांवरील संक्षिप्त आशय]

युवक देवाच्या आज्ञा मोडतात तेव्हा नंतर त्यांना कटु परिणामाचे पीक हाती येते

[२६ पानांवरील चित्रं]

यरुशलेमाच्या तटाच्या पुर्नउभारणीत मदत देऊन युवकांनी देवाचे अंतःकरण आनंदित केले

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा