वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w88 ७/१ पृ. ८-९
  • निंदा करणाऱ्‍यांना उत्तर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • निंदा करणाऱ्‍यांना उत्तर
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • मिळती जुळती माहिती
  • आरोप करणाऱ्‍यांना उत्तर
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • ख्रिस्त—भविष्यवाणींचा केंद्रबिंदू
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • काम करण्याचा आणि विश्रांती घेण्याचा उचित काळ आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • येशू आजाऱ्‍यांना बरे करतो
    बायबल कथांचं माझं पुस्तक
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
w88 ७/१ पृ. ८-९

येशूचे जीवन व उपाध्यपण

निंदा करणाऱ्‍यांना उत्तर

हा शब्बाथ आहे. ३८ वर्षे आजारी असलेल्या मनुष्याला येशू बरे करतो. पण यहुदी धर्मपुढारी त्याच्यावर शब्बाथ मोडल्याचा आरोप ठेवतात. येशू उत्तर देतो: “माझा पिता आजपर्यंत काम करीत आहे आणि मीही काम करीत आहे.”

परूश्‍यांनी जरी दावा केलेला असला तरी येशूने केलेले काम शब्बाथाच्या नियमाचा भंग करणाऱ्‍या कामाच्या प्रकारात मोडत नाही. त्याचे प्रचाराचे व बरे करण्याचे काम त्याला देवाकडून मिळाले होते व देवाच्या उदाहरणाचे अनुकरण करून तो प्रतिदिवशी ते करीत आहे. तरी पण येशूने वर दिलेले उत्तर ऐकून यहुदी आणखी चिडतात व ते त्याला ठार मारावयास बघतात. पण का?

कारण त्यांच्या मते येशूने केवळ शब्बाथाचा भंग केला इतकेच नसून त्याच्या आताच्या उद्‌गारामुळे तो स्वतःला देवाचा स्वतःचा मुलगा आहे असे दाखवीत होता व ही एक प्रकारची निंदाच होती. तरीपण येशू त्यांना न भिता देवाबरोबरील त्याच्या संमतीकारक नात्याविषयी अधिक बोलतो. “पित्याला पुत्राविषयी कळवळा आहे,” तो म्हणतो. “आणि म्हणूनच स्वतः जे करतो ते सर्व त्याला दाखवितो.”

“जसा पिता मेलेल्यांना उठवून जिवंत करतो” येशू पुढे म्हणतो, “तसा पुत्रही पाहिजे त्यांना जिवंत करतो.” खरोखर, हा पुत्र तर अनेकांना आध्यात्मिक दृष्ट्या जिवंत करीत होता! “जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्‍वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे” असे तो म्हणतो. याशिवाय तो आणखी सांगतो: “मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील, अशी वेळ येत आहे, किंबहुना आता आलीच आहे.”

त्या वेळेपावेतो येशूने खरोखरी कोणा मृताचे पुनरूत्थान केल्याचा अहवाल नसला तरी अशा मृतांचे पुनरूत्थान खरोखरी होणार असे तो आपल्या निंदकांना सांगतो. “याविषयी आश्‍चर्य करू नका,” तो म्हणतो. “कारण स्मृति कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि . . . बाहेर येतील अशी वेळ येत आहे.”

आतापर्यंत येशूने, देवाच्या उद्देशातील त्याची भूमिका इतक्या ठळक व प्रभावीपणे कधीच वर्णन करून सांगितली नव्हती. तरीपण याबद्दल त्याच्या निंदकांना त्याच्या स्वतःच्या साक्षीशिवाय आणखी साक्ष आधीच लाभली होती. “तुम्ही योहानाकडे [माणसे] पाठवून विचारले” हे स्मरण तो त्यांना देतो, “व त्याने सत्याविषयी साक्ष दिली आहे.”

केवळ दोन वर्षाआधी बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाने या यहुदी धर्मपुढाऱ्‍यांना त्याच्यानंतर येणाऱ्‍याबद्दल सांगितले होते. सध्या बंदिवान असलेल्या योहानाविषयी त्यांना एकेकाळी जो आदर वाटत होता त्याचे स्मरण देऊन येशू म्हणतो: “तुम्ही त्याच्या प्रकाशात काही वेळ हर्ष करावयास राजी झाला.” हे स्मरण देऊन त्यांना मदत करण्याची, त्यांचे तारण साधण्याची येशूची इच्छा होती. तरीपण तो केवळ योहानाच्या साक्षीपुरतीच मर्यादा ठेवीत नाही.

“जी कार्ये मी करतो [ज्यामध्ये आत्ताच एक चमत्कार करण्यात आला होता] तीच माझ्याविषयी साक्ष देतात की पित्याने मला पाठविले आहे.” या पेक्षा आणखी तो असे म्हणतो: “ज्या पित्याने मला पाठविले त्यानेच माझ्याविषयी साक्ष दिली आहे.” देवाने येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी “हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे” अशा वाणीद्वारे त्याजविषयी साक्ष दिली होती.

आता येशूचा धिक्कार करण्यात त्याच्या निंदकांना कसलीही सबब राहिली नव्हती. ज्या शास्त्रलेखांचा ते शोध करीत होते तीच त्याच्याविषयी साक्ष देत होती! “तुम्ही मोशावर विश्‍वास ठेवला असता तर माझ्यावर विश्‍वास ठेवला असता,” असे शेवटी येशू म्हणतो. “कारण त्याने माझ्याविषयी लिहिले आहे. तुम्ही त्याच्या लिखाणावर विश्‍वास ठेवीत नाही तर माझ्या वचनांवर विश्‍वास कसा ठेवाल?” योहान ५:१७–४७, १:१९–२७; मत्तय ३:१७.

◆ येशूचे काम शब्बाथाचा भंग करणारे का नव्हते?

◆ देवाच्या उद्देशातील आपल्या महत्वपूर्ण भूमिकेचे येशू कसे वर्णन करतो?

◆ आपण देवाचे पुत्र आहोत हे सिद्ध करण्यासाठी येशू कोणत्या साक्षीकडे निर्देश करतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा