“प्रकट केलेल्या गोष्टी . . .आपल्या आहेत”
“गुप्त गोष्टी आपला देव यहोवा ह्याच्या स्वाधीन आहेत, पण प्रकट केलेल्या गोष्टी आपल्या आहेत.”—अनुवाद २९:२९.
१, २. (अ) मानवजातीला यहोवाकडील प्रकटीकरणांची अत्यंत गरज का आहे? (ब) यहोवाने आम्हास जी माहिती उपलब्ध करून दिली आहे तिच्या विषयी आमची मनोवृत्ती कशी असावी?
कोणी माणूस एखाद्या खाणीत आहे व शिवाय त्याच्यापाशी खाणीतला मार्ग दाखविणारा नकाशाही आहे तर नकाशातील मार्गाचा हा गृहस्थ काळजीपूर्वक अभ्यास करणार नाही का? किंवा असा विचार करा की कोणा माणसाला एखाद्या असाध्य रोगाने ग्रस्त केले आहे तर हा गृहस्थ या रोगाच्या इलाजाची आशा दाखविणाऱ्या आधुनिक वैद्यकीय संशोधनाचा पडताळा करण्यात खूप रस दाखविणार नाही का? अशाच प्रकारची खरी पण दुःखद गोष्ट ही आहे की आम्ही आज या दोन्ही प्रकारच्या स्थितीत अडकलो आहोत. आम्ही अशा जगतात जगत आहोत जेथे असे खाचखळगे आहेत, जे आमचा नाश करू शकतात. शिवाय आम्ही अनुवंशिक अपूर्णतेच्या अशा रोगाने ग्रस्त आहोत ज्याला कोणताही मानवी इलाज चालत नसल्यामुळे मरणप्राय स्थितीत आहोत. (१ योहान २:१५–१७; रोमकर ७:२०, २४) केवळ देवच आम्हाला त्या पाशांची ओळख देऊन आम्हाला ते टाळण्यात मदत देऊ शकतो. याकरताच आपल्याला यहोवाकरवीच्या प्रकटीकरणांची गरज आहे.
२ शिवाय याच कारणामुळे नीतीसूत्राच्या पुस्तकाच्या प्रेरित लेखकाने हा सल्ला दिला होता: “ज्ञान्यांची वचने कान लावून ऐक, माझ्या ज्ञानाकडे आपले अंतःकरण लाव.” (नीतीसूत्रे २२:१७) असेच नीतीसूत्रे १८:१५ मध्येही आम्ही वाचतो: “सूज्ञांचे अंतःकरण ज्ञान प्राप्त करून घेते. शहाण्यांचे कान ज्ञानाविषयी आतुर असतात.” यहोवाने उपलब्ध केलेल्या कोणाही ज्ञानाकडे आपण पाठ फिरवू शकत नाही.
यहोवाने प्रकटविलेली रहस्ये
३. यहोवाने आदाम व हव्वेला आपल्या उद्देशाविषयीचे कोणते प्रकटीकरण दिले?
३ यहोवा ज्ञानाचे प्रकटीकरण पुरविण्यात मोठा औदार्यशील आहे हे आनंदाचे आहे. निर्मितीच्या काळापासून देवाने आपल्या भक्तांना विविध परिस्थितीत अनुलक्षून असणारी सर्व माहिती देऊ केली. (नीतीसूत्रे ११:९; उपदेशक ७:१२) आरंभाला त्याने म्हटले की, पृथ्वी व तिच्यावरील प्राणी जगत आदाम, हव्वा व त्यांच्या वंशजांच्या अधीन असणार. (उत्पत्ती १:२८, २९) तरीपण सैतानाने आदाम व हव्वा यांना पापास प्रवृत्त केले आणि मग असे दिसले की देवाच्या गौरवासाठी इश्वरी उद्देशाची पूर्ति कशी होणार. तरीपण यहोवाने लागलेच एकंदरीत प्रकरणाविषयीचे स्पष्टीकरण सादर केले. काही काळातच एक नीतीमान संतान किंवा “संतती” सामोरी येऊन ती दियाबल व त्याच्या अनुयायांच्या सर्व कृत्यांना काढून टाकील असे त्याने प्रकटविले.—उत्पत्ती ३:१५.
४, ५. यहोवाने आणखी कोणते प्रकटीकरण दिले व त्याकरता कोणते माध्यम वापरण्यात आले?
४ हे संतान कोण असा देवभिरू पुरूष व स्त्रियांना प्रश्न पडला असावा. खरेच तो कोण असणार? तो केव्हा येणार? तो मानवजातीला कोणता लाभ मिळवून देणार? शतके गुदरत राहिली त्याप्रमाणे यहोवाने आपल्या या उद्देशाविषयीचे आणखी प्रकटीकरण पुरविले व त्याद्वारे त्याने ओघाओघाने या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. प्रलयाआधी त्याने हनोखला सैतानाच्या संतानावर येणाऱ्या नाशाचे भाकित करण्यास प्रेरित केले. (यहुदा १४, १५) आमच्या समान शकाच्या सुमारे २,४०० वर्षाआधी त्याने नोहाला, मानवी जीवन व रक्त या गोष्टी पवित्र आहेत असे प्रकट केले. हे असे सत्य होते जे वचनयुक्त संतान येण्याच्या वेळी अत्यंत महत्वाचे असे ठरणार होते.—उत्पत्ती ९:१–७.
५ नोहाच्या काळानंतर यहोवाने इतर विश्वासू कुलपित्यांमार्फत महत्वपूर्ण ज्ञानाचे प्रकटीकरण पुरविले. इ.स. पूर्वीच्या २०व्या शतकात अब्राहामाला हे कळाले की वचनयुक्त संतान हे त्याच्या वंशातून सामोरे येणार होते. (उत्पत्ती २२:१५–१८) हे अभिवचन अब्राहामाचा मुलगा इसहाक व नातू याकोब (ज्याचे नंतर इस्राएल असे नाव पडले) यांच्यासाठी बहुमूल्य ठेवा ठरले. (उत्पत्ती २६:३–५; २८:१३–१५) मग याकोबाकरवी यहोवाने प्रकटविले की हे संतान “शिलो” एक सामर्थ्ययुक्त अधिकारी होईल, तो त्याचा पुत्र यहुदा याच्या वंश–मालिकेत जन्म घेणार.—उत्पत्ती ४९:८–१०.
६. इ.स. पूर्वी १६व्या शतकात कोण “प्रकट केलेल्या गोष्टी”चे माध्यम ठरले आणि त्यांनी शिकून घेतलेल्या काही नव्या गोष्टी कोणत्या?
६ इ.स. पूर्वीच्या १६व्या शतकात यहोवाने इस्राएल पुत्रांचे राष्ट्र संघटीत केले. तर मग सत्याविषयीचे प्रगमनशील प्रकटीकरण आता कोणास मिळणार होते? मोशाने त्या तरूण राष्ट्राला या शब्दात त्या प्रश्नाचे उत्तर दिले: “गुप्त गोष्टी आपला देव यहोवा याच्या स्वाधीन आहेत, पण प्रकट केलेल्या गोष्टी आपल्या व आपल्या वंशजांच्या निरंतरच्या आहे.” (अनुवाद २९:२९) होय, इस्राएल राष्ट्राचा इ.स.पू. १५१३ मध्ये जन्म घडल्यानंतर ते स्वतः “देवाची पवित्र वचने सोपविलेले” माध्यम बनले. (रोमकर ३:?) शिवाय वचनांची केवढी महामुरता! देवाने इस्राएलांना नियमशास्त्र करारात समाविष्ट करून घेतले, यामुळे त्यांच्यापुढे राजे व याजक यांचे राष्ट्र बनण्याची संधी उपलब्ध झाली. (निर्गम १९: ५, ६) या नियमशास्त्रात वागणुकीविषयीचे नियमही अंतर्गत होते की ज्याकरवी लोकांना पापाचे खळगे कळू शकले व ते त्यांना टाळता येऊ शकत होते. शिवाय याच नियमशास्त्रात यज्ञार्पणाची व्यवस्थाही आखली होती ज्यामध्ये प्राण्यांच्या पवित्र रक्ताचा वापर त्यांची पापे एक प्रतीक या अर्थी काढून टाकण्यासाठी करण्यात आला.
७, ८. (अ) यहोवाने येणाऱ्या संतानाविषयी कोणती अधिक माहिती प्रकट केली? (ब) “प्रकट केलेल्या गोष्टी” कशा सुरक्षित ठेवल्या गेल्या आणि या गोष्टींविषयीची योग्य समज कोणी दिली?
७ वेळ जात राहिला तसे यहोवाने संतानाविषयी अधिक प्रकटीकरणे दिली. स्तोत्रकर्त्याद्वारे देवाने प्रकटविले की राष्ट्रे त्याच्या संतानाचा धिक्कार करतील पण हे संतान यहोवाच्या मदतीनेच विजय प्राप्त करील. (स्तोत्रसंहिता २:१–१२) यशयाकरवी त्याने या संतानाबद्दल, ते “शांतीचा राजपुत्र” असेल अशी माहिती दिली पण हेच संतान इतरांच्या पापास्तव दुःख भोगेल असेही प्रकटविले. (यशया ९:६; ५३:३–१२) इ.स.पूर्वी आठव्या शतकात यहोवाने या संतानाच्या जन्मस्थळाची माहितीही दिली आणि इ.स.पूर्वी सहाव्या शतकात त्याच्या उपाध्यपणाच्या वेळेचा आराखडा प्रकटविला.—मीखा ५:२; दानीएल ९:२४–२७.
८ अशा या “प्रकट केलेल्या गोष्टी” ओघाओघाने इब्री शास्त्रवचनाच्या ३९ पुस्तकात संकलित केल्या गेल्या. पण कित्येक प्रकरणात त्या केवळ प्राथमिक रूपात होत्या. त्या लिखित केलेल्या गोष्टी समजण्यास कठीण होत्या. शिवाय ज्यांनी त्या विषयीचे लिखाण केले त्यांनाही कठीण वाटल्या. (दानीएल १२:४, ८; १ पेत्र १:१०–१२) पण सरतेशेवटी प्रज्वलितपणा सामोरा आला तेव्हा त्या कोणा मानवी उलगडा करणाऱ्यावर अवलंबित नव्हत्या हे दिसले. भविष्यवादित स्वप्नांच्या बाबतीत “अर्थ सांगणे देवाकडे आहे” हे सिद्ध झाले.—उत्पत्ती ४०:८.
एक नवे माध्यम
९. दैहिक इस्राएलांनी “प्रकट केलेल्या गोष्टी”चे माध्यम असण्याचा हक्क का गमाविला व हे केव्हा घडले?
९ येशू ख्रिस्त पृथ्वीवर होता तेव्हा इस्राएल अद्याप देवाचे माध्यम होते. ज्याला यहोवाची सेवा करण्याची इच्छा होती त्याला ती त्याच्या निवडलेल्या राष्ट्राच्या सहवासात राहून करावी लागे. (योहान ४:२२) तथापि मोशाने हे दाखविले होते की ज्याला “प्रकट केलेल्या गोष्टी”चा कारभारी असण्याचा हक्क आहे त्याच्यावर जबाबदाऱ्याही आहेत. त्याने म्हटले: “गुप्त गोष्टी आपला देव यहोवा ह्याच्या स्वाधीन आहेत, पण प्रकट केलेल्या गोष्टी आपल्या व आपल्या वंशजांच्या निरंतरच्या आहेत; ह्याचा हेतु हा की, ह्या नियमशास्त्राची सर्व वचने आपण पाळावी.” (अनुवाद २९:२९) हा “निरंतरचा” समय इ.स. ३३ मध्ये संपुष्टात आला. का बरे? कारण यहुद्यांनी राष्ट्र या नात्याने ‘नियमशास्त्राची सर्व वचने पाळण्यात’ मोठे अपयश दाखविले. वस्तुतः नियमशास्त्र “ख्रिस्ताकडे पोहचविणारे बालरक्षक” होते तरीही यहुद्यांनी येशू ख्रिस्त या त्या संतानाचे स्वागत करण्यात खासपणे आपली माघार दर्शविली. (गलतीकर ३:२४) अशा या अपयशामुळेच यहोवाने “प्रकट केलेल्या गोष्टी” साठी दुसरे माध्यम निवडले.
१०. यहोवाचे प्रकटीकरणाविषयीचे कोणते नवे माध्यम होते?
१० मग ते नवे माध्यम कोणते होते? पौलाने इफिसकरांना लिहिलेल्या पत्रात या विषयीची ओळख देताना असे लिहिले की, “जो युगादिकालाचा संकल्प [देवाने] आपल्या प्रभु येशू ख्रिस्त मध्ये सिद्धीस नेला आहे [तो], त्याप्रमाणे देवाचे नानाविध ज्ञान . . . मंडळीच्या द्वारे आता कळवावे.” (इफिसकर ३:१०, ११) होय, ही ख्रिस्ती मंडळी, जिचा जन्म इ.स. ३३च्या पेंटेकॉस्टच्या वेळी झाला तिला नव्या “प्रकट केलेल्या गोष्टी” सोपविण्यात आल्या. अभिषिक्त ख्रिस्ती एक गट या अर्थी “विश्वासू व बुद्धिमान दास” असे काम करू लागले. यथाकाळी आध्यात्मिक अन्न देण्यासाठी यांची नियुक्ति करण्यात आली होती. (मत्तय २४:४५) ख्रिस्ती आता “देवाच्या रहस्याचे कारभारी” बनले होते.—१ करिंथकर ४:१.
११, १२. या नव्या माध्यमाकरवी काही कोणती नवी प्रकटीकरणे देण्यात आली?
११ त्या नव्या “पवित्र गूजां”ची केंद्रीय आकृति स्वतः येशू ख्रिस्त, वचनयुक्त संतान होता व तो सामोरा आला होता. (गलतीकर ३:१६) येशू “शिलो” होता, ज्याला मानवजातीवर राज्य करण्याचा अधिकार होता. आणि यहोवाने त्याला अशा राज्याचा राजा असे नियुक्त केले जे या पृथ्वीवर नंदनवनाची पुनर्स्थापना करील. (यशया ११:१–९; लूक १:३१–३३) शिवाय येशू हा यहोवाचा नियुक्त प्रमुख याजकही होता, त्याने मानवजातीकरता आपले निष्कलंक व परिपूर्ण जीवन यज्ञार्पण या अर्थी वाहिले. हा रक्ताचे पावित्र्य या तत्वाचा अत्यंत अद्र्भित अवलंब होता. (इब्री ७:२६; ९:२६) याकरवीच, विश्वास राखणाऱ्या मानवजातीला आदामाने गमाविलेले परिपूर्ण मानवी जीवन परत प्राप्त होण्याची आशा लाभली.—१ योहान २:१, २.
१२ हे वचनयुक्त संतान एक मध्यस्त असेही ठरले व त्याने, जुन्या नियमशास्त्र कराराची जागा आता ज्या नव्या कराराने घेतली होती तो, आपले अनुयायी व त्याचा स्वर्गीय पिता यांच्यामध्ये आपल्या मध्यस्तीकरवी सम्पन्न केला. (इब्रीयांस ८:१०–१३; ९:१५) या नव्या कराराच्या आधारावरच नव्या बहरत असलेल्या ख्रिस्ती मंडळीने दैहिक इस्राएल राष्ट्राची जागा घेतली व ती स्वतः आध्यात्मिक इस्राएल, येशू बरोबरचे “अब्राहामाचे [आध्यात्मिक] संतान” आणि “प्रकट केलेल्या गोष्टी”ची कारभारी बनली. (गलतीकर ३:२९; ६:१६; १ पेत्र २:९) याशिवाय यहुद्यांना कधीही विचार आला नव्हता ती गोष्ट म्हणजे आता विदेश्यांनाही त्या नव्या आध्यात्मिक इस्राएलाचा भाग बनण्यासाठी आमंत्रित करण्यात आले! (रोमकर २:२८, २९) यहुद्यांना व विदेश्यांना एकत्रपणे सबंध पृथ्वीभरात येशूचे शिष्य बनण्याची नियुक्ति लाभली. (मत्तय २८:१९, २०) अशा “प्रकट केलेल्या गोष्टीं”नी आंतरराष्ट्रीय स्वरूप धारण केले.
१३. या नव्या “प्रकट केलेल्या गोष्टी” भावी पिढीसाठी कशा राखल्या गेल्या?
१३ काही काळातच, ख्रिस्ती मंडळीद्वारे या “प्रकट केलेल्या गोष्टी” ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांच्या २७ पुस्तकात नमूदित झाल्या व याकरवी प्रेरित पवित्र शास्त्राचा खंड पुरा झाला. तरीपण या पुस्तकांमध्ये परत एकदा यहोवाच्या उद्देशासंबंधी असे भविष्यवाद मुद्रित झाले की ज्यांची समज पुर्णपणे पुष्कळ शतकानंतर ज्ञात होणार होती. परत एकदा शास्त्रवचनांचे लेखक अद्याप जन्मास न आलेल्या भावी पिढ्यांकरता खरीखुरी सेवा सादर करीत होते.
आज “प्रकट केलेल्या गोष्टी”
१४. मोठा धर्मत्याग येऊन गेल्यावर यहोवा पुन्हा एकदा “प्रकट केलेल्या गोष्टीं”वर केव्हा प्रकाश पाडणार होता?
१४ प्रेषितांच्या मृत्युनंतर भाकित केल्याप्रमाणे ख्रिस्ती आहोत असा दावा करणाऱ्यांमध्ये मोठ्या धर्मत्यागाची वाढ झाली. (मत्तय १३:३६–४२; प्रे. कृत्ये २०:२९, ३०) यानंतर कित्येक शतके सरली व त्यात “प्रकट केलेल्या गोष्टीं” विषयीची समज मिणमिणती झाली. तथापि, ज्यांनी विश्वासू राहण्याचा प्रयत्न राखला अशांना येशूने त्यागले नाही. (मत्तय २८:२०) तरीपण येशूने याचे वचन दिले होते की अशी स्थिती अधिक काळ टिकणार नव्हती. व्यवस्थीकरणाच्या समाप्तीसमयी धार्मिकांना व दुष्टांना परत दृश्यरित्या वेगळे करण्यात येईल आणि “धार्मिक आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे चमकतील.” (मत्तय १३:४३) दानीएलाने सुद्धा हे भाकित केलेच होते की “अंतसमयात खरी ज्ञानवृद्धी होईल.” (दानीएल १२:४) “प्रकट केलेल्या गोष्टी” वर पुन्हा प्रकाश पाडला जाणार होता.
१५. “प्रकट केलेल्या गोष्टी” विषयीच्या आधुनिक समजावणूकीच्या बाबतीत माध्यम या अर्थी ख्रिस्ती धर्मराज्यातील धर्म कसे अपात्र असल्याचे सिद्ध झाले?
१५ १९१४ पासून आम्ही या सद्य व्यवस्थीकरणाच्या समाप्तीकाळात जगत आहोत. याकारणास्तव या नव्या आध्यात्मिक प्रकाशाच्या बाबतीत यहोवा आज माध्यम म्हणून कोणाचा वापर करीत आहे हे जाणणे अति महत्वाचे आहे. तो ख्रिस्ती धर्म राज्यातील प्रस्थापित धर्मपंथाना या बाबतीत वापरीत नाही हे नक्की, कारण यांनी मोठ्या धर्मत्याग काळात त्यांना ज्या खोट्या शिकवणी चिकटल्या गेल्या त्या झाडून टाकण्याच्या बाबतीत बहिरा कान दर्शविला. यांच्यापैकीच्या बहुतेक धर्मनेत्यांनी आज सांप्रदाय व विश्वासांगिकार याला इतके जखडविले आहे की नव्या ज्ञानाच्या बाबतीत आपले मन खुले करावेसे त्यांना वाटत नाही. शिवाय ते टीकास्त्र गोष्टींकरवी स्वतःला इतके भारावून आहेत की पवित्र शास्त्र प्रेरित आहे की काय तसेच त्यातील नैतिक दर्जे बंधनकारक आहेत की नाही याविषयीची साशंकता त्यांना वाटत राहते.
१६. यहोवाचे आधुनिक माध्यम या अर्थी कोण असल्याचे सिद्ध झाले?
१६ येशूने म्हटले की देवाचे राज्य यहुद्यांपासून काढून घेतले जाईल व “जे राष्ट्र त्याचे फळ देईल त्याला ते दिले जाईल.” (मत्तय २१:४३) पहिल्या शतकात ते राष्ट्र आध्यात्मिक इस्राएलांची नवी ख्रिस्ती मंडळी असल्याचे दिसले. आज त्या आरंभीच्या मंडळीसारखी फलप्राप्ती निपजविणारा केवळ एकच गट दिसून येत आहे. हे आध्यात्मिक इस्त्राएल मत्तय २४:४५–४७ मध्ये उल्लेखित असलेल्या “विश्वासू व बुद्धिमान दास” वर्गाचे सदस्य आहेत. सुरुवातीच्या ख्रिश्चनांप्रमाणेच सध्याचे ख्रिस्तीजन ‘आपला उजेड पाडण्यास’ भ्याले नाहीत. (मत्तय ५:१४–१६) १९१९ पासून सुरुवात करून त्यांनी राज्याची सुवार्ता साक्ष म्हणून सर्व जगाला घोषित करण्याचे काम मोठ्या धैर्याने हाती घेतले. (मत्तय २४:१४) यांनी देवाच्या राज्याची फलप्राप्ती सामोरी आणल्यामुळे यहोवाने त्यांना “देवाचे नानाविध ज्ञान” याच्या बाबतीत अद्यावतपणाप्रत आणून समृद्धरित्या आशीर्वादित केले. —इफिसकर ३:१०.
१७, १८. यहोवाने आपल्या आधुनिक माध्यमातर्फे कोणती प्रगतिशील समजावणूक शक्य केली?
१७ अशाप्रकारे १९२३ मध्ये येशूने शेरडे व मेंढरे याविषयी दिलेल्या थोर भविष्यवादाची समज प्राप्त झाली आणि तेव्हाच, सबंध जग हे न्यायदंडाखाली आहे हेही कळले. (मत्तय २५:३१–४६) १९२५ मध्ये देवाच्या पृथ्वीवरील सेवकांना प्रकटीकरण अध्याय १२ची अचूक समज मिळण्याचा ठेवा मिळाला व त्याकरवी १९१४ या चिन्हांकित वर्षी नेमके काय घडले याचे त्यांना आकलन झाले. १९३२ मध्ये त्यांची समज आणखी खोलवर मुळावली गेली. यहोवाने हे प्रकटविले की यहुद्यांचे यरूशलेमास परतणे होऊन तेथे ते पुनर्स्थापित होतील यासंबंधी असणारे भविष्यवाद, जे कित्येक काळाअधी अविश्वासू बनले व ज्यांना यहोवाने त्यागिले त्या दैहिक इस्राएलांस अनुलक्षून नाहीत तर आध्यात्मिक इस्राएल, ख्रिस्ती मंडळीस अनुलक्षून आहेत. (रोमकर २:२८, २९) मग १९३५ मध्ये प्रकटीकरणाच्या ७व्या अध्यायात असणाऱ्या योहानाच्या दृष्टांतात दिसलेल्या “मोठा लोकसमुदाया” बाबतच्या अचूक समजप्राप्तीने अभिषिक्त जणांचे डोळे त्या लोकसमुदायाच्या भव्य एकत्रीकरणासाठी उघडले गेले. अजूनही हे काम चालूच आहे.—प्रकटीकरण ७:९–१७.
१८ यामुळे जगव्याप्त प्रचाराच्या कामाची मोठी लाट उसळली गेली आणि “पृथ्वीवरील गोष्टी” एकत्रित करण्यामध्ये मोठी पराकाष्ठा दिसली. (इफिसकर १:१०) १९३९ मध्ये युरोपावर युद्धाचे ढग जमले तेव्हा तटस्थ राहण्याविषयीचे महत्व पूर्वी नव्हते इतक्या अधिक स्पष्टपणे सामोरे मांडले गेले. १९५० मध्ये यशया ३२:१, २ मधील “सरदार” यांची विस्तारीत स्वरूपाची ओळख मिळाली. १९६२ मध्ये “वरिष्ठ अधिकारी” यांची अचूक ओळख व ख्रिश्चनांचा त्यांच्याशी असणारा योग्य नातेसंबंध या गोष्टीही “प्रकट केलेल्या गोष्टी” मुळे अधिक स्पष्ट झाल्या. (रोमकर १३:१, २) यानंतर १९६५ मध्ये पार्थिव पुनरूत्थान व त्याचा कोणाला लाभ घडेल याची अधिक स्पष्ट समजावणूक मिळाली.—योहान ५:२८, २९.
१९. यहोवाचा “दास” वर्ग देवाच्या वचनाचा आज खरा रखवालदार आहे हे कसे सिद्ध झाले?
१९ याशिवाय या २०व्या शतकातील अभिषिक्त ख्रिश्चनांची मंडळी, “प्रकट केलेल्या गोष्टीं”चे लिखित संकलन असणाऱ्या देवाच्या वचनाचा खरा रखवालदार असल्याचे सिद्ध झाली. या मंडळीच्या प्रातिनिधिक सदस्यांनी पवित्र शास्त्राचे आधुनिक इंग्रजी भाषेत भाषांतर करण्याचे काम हाती घेतले व आज न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ दी होली स्क्रिपचर्स ११ भाषेत दिसले व त्यांच्या एकंदर ४,००,००,००० प्रती छापल्या गेल्या. अभिषिक्त ख्रिश्चनांचा “दास” वर्ग आंतराष्ट्रीयपणे शैक्षणिक कार्यक्रम चालवितो व तो पवित्र शास्त्र आधारित क्रमिक पुस्तके व मासिके छापतो. शिवाय तो साप्ताहिक सभा, नियमित संमेलने आणि विविध शाळा यांना सुद्धा संचालित करतो—हे सर्व काही सत्य शोधकांना “प्रकट केलेल्या गोष्टीं” विषयीचे अचूक ज्ञान मिळावे याकरता योजित आहे. खरेच, “धार्मिक जण” आता आध्यात्मिक अर्थाने “सूर्यासारखे चकाकत” असून आपल्या कारभारीपदाची योग्यता सिद्ध करीत आहेत.—मत्तय १३:४३.
आमची जबाबदारी
२०, २१. (अ) यहोवाच्या प्रकटीत वचनाविषयी स्तोत्रकर्त्याने भारावून कोणती प्रतिक्रिया व्यक्त केली? (ब) आगामी अंकातील लेखात कोणत्या गोष्टींचे परिक्षण करण्यात येईल?
२० अशाप्रकारे यहोवाने या जगाच्या खाणीत आम्हाला एकटेच भटकत राहावे असे सोडून दिले नाही. उलटपक्षी आमच्या मार्गात उजेड पडावा आणि आम्हास आध्यात्मिक धोके टाळता यावेत याकरता त्याचे वचन दिले आहे. (स्तोत्रसंहिता ११९:१०५) याशिवाय यहोवाने आम्हाला पाप व अपूर्णता याकरवी मरावे म्हणून लोटून दिले नाही. याऐवजी त्याने आम्हापुढे नंदनवनमय पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाची संधि उघडी केली आणि याविषयीचे ज्ञान अगदी मोकळेपणाने उपलब्ध करून ठेवले आहे. (योहान १७:३) या कारणास्तव आपल्या काळी उपलब्ध झालेल्या “प्रकट केलेल्या गोष्टी” विषयी बोलताना स्तोत्रकर्त्याने भारावून असे म्हटले: ‘अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे! दिवसभर मी त्याचे मनन करतो.”—स्तोत्रसंहिता ११९:९७.
२१ यहोवाने आज आमच्या काळी “प्रकट केलेल्या गोष्टी” विषयी व त्याच्या समजावणूकी विषयी तुम्हाला असेच वाटते का? तुम्ही शिकलेल्या सत्याविषयी तुम्हाला गाढ रसिकता वाटते का? या शिकलेल्या सत्याकरवी निर्णय घेण्यात, मोहपाश टाळण्यात आणि यहोवाची सेवा करण्यात तुम्हाला किती मदत मिळाली पाहिजे त्याची गरज दिसते का? या “प्रकट केलेल्या गोष्टीं”चे वाचन व अभ्यास करण्यासाठी तुम्ही खरेपणाने किती वेळ देता? तुमच्या अभ्यासिक सवया सुधारता येण्याचे काही मार्ग आहेत का? या सर्व गोष्टी आगामी अंकातील लेखात विचारात घेतल्या जातील.
तुम्हास आठवते का?
◻ येशूच्या काळाआधी “प्रकट केलेल्या गोष्टी” संबंधाने काही माध्यम कोणते होते?
◻ इ.स. ३३ नंतर “प्रकट केलेल्या गोष्टी” कोणाच्या मालकीच्या बनल्या?
◻ या नव्या माध्यमाकरवी कोणती महत्वपूर्ण प्रकटीकरणे दिली गेली?
◻ आज “प्रकट केलेल्या गोष्टी” आध्यात्मिक इस्राएलांच्या मालकीच्या असावयास हव्या असे का?
◻ अभिषिक्तांची ख्रिस्ती मंडळी यहोवाच्या वचनासंबंधाने लायक असा रखवालदार असल्याचे कसे सिद्ध झाले?
[पानांवरील चित्रं २२]
प्राचीन काळच्या विश्वासू माणसांद्वारे यहोवाने महत्वपूर्ण माहिती प्रकटविली
[२४ पानांवरील संक्षिप्त आशय]
अभिषिक्त ख्रिश्चनांची मंडळी यहोवाच्या प्रकटीकरणासंबंधाने नवीन रखवालदाराप्रमाणे ठरली
[२५ पानांवरील संक्षिप्त आशय]
यहोवाच्या अभिषिक्त साक्षीदारांच्या “दास” वर्गाने देवाच्या वचनाचे रखवालदार या अर्थी चांगली सेवा केली