वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w86 ९/१ पृ. १६-२१
  • सत्याचा देव याची सेवा करण्यामधील सचोटी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सत्याचा देव याची सेवा करण्यामधील सचोटी
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मानवी बुद्धीमत्तेचे आश्‍चर्य
  • सयाला धरून राहा
  • वानर–नर अस्तित्वात होता का?
  • भविष्यवादित साम्य
  • सत्याखातर सेवा करणे
  • उत्क्रांतीवादाचा बायबलशी मेळ बसतो का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • उत्क्रांतीची न्यायचौकशी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • देवाने उत्क्रांतीद्वारे सजीव सृष्टीची निर्मिती केली का?
    सावध राहा!—२००६
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
w86 ९/१ पृ. १६-२१

सत्याचा देव याची सेवा करण्यामधील सचोटी

“हे यहोवा, तुझा मार्ग मला शिकीव. मी तुझ्या सत्यात चालेन.”—स्तोत्रसंहिता ८६:११.

१, २. (अ) देवाने मानवजातीसाठी केलेल्या तरतुदींचे कसे वर्णन करता येईल? (ब) देवाच्या हस्तकृतिचे त्याचप्रमाणे मानवाच्या विपरीत मार्गाचे शास्त्रवचने कसे वर्णन देतात?

तुम्ही एका उजाड, निर्मनुष्य स्थिती असणाऱ्‍या वाळवंटातून जात आहात असा विचार करा. एकाएकी तुम्हाला सुंदर घर दिसते. ते वातानुकुलित आहे त्यात शेगड्या नळकोंडाळे व वीज यांचीहि सोय आहे. घरातील शीतपेटी व कपाटे अन्‍नाने भरली आहेत. त्याच्या तळघरात इंधन व इतर गोष्टींचा मुबलक साठा आहे. या सर्व गोष्टी तेथे आकस्मिकरित्या आल्या असे तुम्ही म्हणाल का? घरमालकाने तुम्हाला म्हटले की जाऊन त्या घरात राहा व त्याचा उपभोग घ्या तर तुम्हाला कृतज्ञतेचे वाटेल का?

२ बरे तर, आम्ही प्रत्यक्षात या सुंदर पृथ्वीवर आज जे जिवंत आहोत ते त्याच घरासारखे आहे. मानवजातीची निर्मिती होण्याआधी आमच्या प्रेमळ देवाने, ही पृथ्वी आमचे घर व्हावी याकरता तिची तयारी करविली व त्यामध्ये, आम्ही आनंदी होऊ शकू अशा सर्व गोष्टी सम्पन्‍न केल्या. (यशया ४५:१२, १८) या उदार दात्याचे आम्ही आभार मानावयास नको का? त्यानेच पवित्र शास्त्रात इब्रीयांस पत्र ३:४ मध्ये हे लिखित होण्याची प्रेरणा दिली की, “प्रत्येक घर कोणी तरी बांधलेले असते, आणि सर्व वस्तु करणारा देव आहे.” लाजेची गोष्ट ही आहे की, स्वार्थी माणसांनी या पृथ्वीची जणू उधळपट्टी करून तिजवरील देवाची कामे उद्‌ध्वस्त केली आहेत.—अनुवाद ३२:३–५.

३. यहोवाच्या सध्याच्या व भावी काळातील उदारतेबद्दल पवित्र शास्त्र काय म्हणते?

३ सत्याच्या विरोधकांना प्रेषित पौल देवाच्या बाबतीत असे म्हणू शकला: “त्याने स्वतःस साक्षीविरहीत राहू दिले नाही म्हणजे त्याने उपकार केले. आकाशातून पर्जन्य व फलदायक ऋतु तुम्हास दिले, आणि अन्‍न व हर्षाने तुमची अंतःकरणे भरून तुम्हास तृप्त केले.” (प्रे. कृत्ये १४:१७) तर मग जे सचोटीने त्याची सेवा करतात अशांना यहोवा किती आशीर्वादित करणार बरे! या “शेवटल्या काळी” असणारा त्रास व भार आम्हास दाबून टाकत असला तरी फार दूर नाही अशा भावी काळात सार्वभौम प्रभू यहोवा, त्याजवर प्रेम करणाऱ्‍या सर्वांच्या मुखावरील अश्रु पुसून उत्तमोत्तम गोष्टींची बहुविध मेजवानी देणार आहे ही वैभवी आशा आहे.—२ तिमथ्यी ३:१; यशया २५:६–८.

मानवी बुद्धीमत्तेचे आश्‍चर्य

४. (अ) काही गणक यंत्राचा शास्त्रज्ञांना कोणता पेचप्रंसग, भेडसावून आहे? (ब) यिर्मया ३३:२, ३ मानवी मेंदूच्या घडविणाऱ्‍याविषयी काय माहिती देते?

४ आज बऱ्‍याच वर्षांपासून शास्त्रज्ञांनी मानवासारखा विचार करू शकणाऱ्‍या कॉम्प्युटर्स वा गणकयंत्राची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. पण ते कबूल करतात की पहिल्या पायरीलाच ते अडखळून पडले. ते कसे काय? त्यांनी मान्य केले की मानवी नेत्राच्या घडणेनेच त्यांना पराभूत केले. त्यांना डोळ्‌यांचेच अनुकरण साधता येत नाही तर मेंदूवर व त्याच्या कार्यसिद्धिवर काय काम करून दाखवणार? मानवी मेंदू हा केवढे आश्‍चर्य आहे! दर सेकंदाला या अंगात हजारो–लाख तऱ्‍हेची माहिती ओतली जाते तेथे त्याची चाळणी होते, विश्‍लेषण होते व ती बुद्धीजीवि चलनास लागू केली जाते. अत्यंत क्लिष्ट असा कॉम्प्युटर देखील याची तुलना करू शकणार नाही. ज्या प्रेमळ देवाने आम्हास निर्मिले त्याच्या अथांग सूज्ञानाची केवढी ही सुंदर साक्ष! आमचा निर्माता व घडण करविणाऱ्‍या यहोवा देवाने ही बुद्धीमत्ता आम्हाला बहाल केली आणि आमच्या मेंदूचा वापर आम्ही, तो आम्हास त्याच्या नियुक्‍त वेळी व त्याच्या पद्धतीने “मोठ्या व गहन गोष्टी” प्रकटवितो त्यांचे आकलन करण्यासाठी करू शकतो म्हणून धन्यता वाटते.—यिर्मया ३३:२, ३.

५. (अ) वाढीचा कोणता अद्‌र्भित चमत्कार केवळ मानवात घडतो? (ब) अलिहूचे शब्द कसे योग्य आहेत?

५ मानवी मेंदूचा चमत्कार उदरात सुरू होतो. गर्भधारणा झाल्यावर केवळ तीन आठवड्यांनी मेंदूच्या पेशी तयार होऊ लागतात. त्यांची वाढ भव्य प्रमाणात होते, कधी तर एका मिनिटाला २ लाख पन्‍नास हजार इतक्या पेशी तयार होतात. जन्मल्यावर बाळाचा मेंदू वर्षभरात तिपटीने वाढतो व तो कोणाही जनावराच्या आणि वानर–नराच्या मेंदूपेक्षा भिन्‍न आहे हे प्रकट करतो. लवकरच बाळ भाषा बोलणे, एखाद्या विषयावर विवाद करणे, नैतिक व आध्यात्मिक मूल्य जाणणे या कला हस्तगत करते. या सर्व कार्यक्षमता निर्दयी पशूंकडून उत्क्रांतीच्या वारशाने कशा लाभू शकतील बरे! यामुळेच अलिहूने आमचा देव व थोर निर्माणकर्ता याजबद्दल योग्यपणे म्हटले: “तो आम्हास पृथ्वीवरील पशूंहून अधिक शिकवितो आणि आकाशातील पक्ष्यांहून अधिक ज्ञान देतो.”—इयोब ३५:१०, ११.

६. (अ) मानवाच्या अद्‌र्भित घडणेविषयी शास्त्रवचने कोणता अहवाल देतात? (ब) देवाकडून लाभलेले सामर्थ्य आम्ही प्रेमळपणे कसे वापरू शकू?

६ हे आश्‍चर्य की, ही मानवी बुद्धीमत्ता उत्पत्ती १:२७ शी जुळणारी आहे, जे म्हणते की, “देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली.” देवाने आम्हाला ज्या पद्धतीने घडविले त्याबाबत आम्ही कृतज्ञ नसावे का? दावीद होता. त्याने यहोवाची स्तुति करून म्हटले: “भयजनक व आर्श्‍चयकारक रीतीने माझी घटना झाली आहे म्हणून मी तुझे उपकार स्मरण करितो. तुझी कृत्ये अद्‌र्भित आहेत.” (स्तोत्रसंहिता १३९:१४) आमच्या देवाचे स्तवन आम्ही याच कारणास्तव करीत नाही का? तद्वत आम्हाला देवाकडून लाभलेला मेंदू व आमची शरीरे यांचा, सैतानाने देवापुढे जे आव्हान मांडले त्यांचे निरसन करण्यासाठी वापर व्हावा. आम्ही यहोवाची सेवा सचोटी रक्षक या अर्थी करावी.—नीतीसूत्रे २७:११.

सयाला धरून राहा

७, ८. (अ) सत्य व सिद्धांत याजमधील कोणत्या तफावती लक्षात घेण्याजोग्या आहेत? (ब) उत्क्रांतीच्या बाबतीत माहीतगार लोक काय म्हणतात? (क) उत्क्रांतीचा संबंध विश्‍वासासोबत नव्हे तर कच्चेपणासोबत का येतो?

७ सत्याने विजयी झालेच पाहिजे! सचोटीने मार्गाक्रमण करताना आम्ही आमच्या मानसिक शक्‍तीचा वापर करतो तेव्हा आम्हा यहोवाच्या चाहत्यांनी सत्याला धरून राहिले पाहिले. निर्मितीचे सत्य शाबीत झाले आहे. ते अटळ आहे. ते हजारो वर्षाच्या परिक्षांमध्ये टिकून राहिले. शतकभरापेक्षा थोडे अधिक दिवस टिकलेले ते असत्य, उत्क्रांतीचा सिद्धांत आता टाकाऊ बनला आहे. हा आमचा अभिप्राय नाही. तो सर्व खुल्या मनाचे, जाणीव राखणारे शास्त्रज्ञ, वकील, संशोधक व इतर माहितगार लोकांचा आहे. “डार्विन व इतरांकरवी सांगण्यात आलेली उत्क्रांतीची तत्वे” याच्या आव्हानावर निर्वाळा देताना द न्यू यॉर्क टाईम्स ने परिस्थितीचा सारांश असा दिला: “संबंध क्षेत्र आता गडबडले आहे.” एका माहीतगार शास्त्रज्ञाने लिहिले: “उत्क्रांतीचा पुरावा दर्शविताना त्यात खिंडारे येतात हे आम्हाला मान्य आहे. . . . होय, उत्क्रांती हा नुसताच सिद्धांत आहे. त्यामुळेच उत्क्रांतीस मानणे ही विश्‍वासाची बाब आहे असे म्हणावे लागेल.”

८ पण वस्तुतः उत्क्रांतीस मान्य करणे ही खरीच विश्‍वासाची बाब आहे का? उलटपक्षी, आम्ही म्हणतो की तो कच्चेपणा आहे. कारण विश्‍वासाठायी भक्कम पाया असतो. इब्रीयांस पत्र ११:१ सांगते की तो “गोष्टींबद्दलची खातरी” असा आहे. पवित्र शास्त्रातील अहवाल खात्रीशीर असून तो सत्य आहे याचा बहुतपट पुरावा आहे. (२ तिमथ्यी ३:१६, १७; रोमकर १५:४) याऊलट, उत्क्रांतीवादी प्रकरणाचा शहनिशा जितक्या अधिक प्रमाणात करू पाहतात व ज्याचे समर्थन ते कच्च्या मताच्या लोकांपुढे न्याय्य म्हणून करतात तितक्या अधिकपणे त्यांना विसंगति आढळतात.

वानर–नर अस्तित्वात होता का?

९. वानर–नराचे किती अवशेष मुबलक आहेत व त्यांची जागा कोठे आहे?

९ वानर व नर यांच्यामधील अवशेषांचा निखळता दुवा जोडण्याच्या प्रयत्नात उत्क्रांतीवाद्यांनी १३० वर्षांचे जे संशोधन केले त्यात त्यांना अगदी नाममात्र हाडांचा संच लाभला. सायन्स डायजेस्ट या मासिकानुसार “मानवी उत्क्रांतीसाठी जो भौतिक पुरावा हवा आहे तो अद्यापि स्थापित करावयाचा आहे. एका शवपेटीत अजूनही हाडांचा संच मावण्यास पुरेशी जागा आहे!” तथाकथित पुरावा हेच सांगतो की आता बस्स झाले; त्या शवपेटीचे झाकण बंद करून त्याला खिळे ठोका!

१०. वानर–नराचे चित्रकाराने काढलेले चित्र केवढे खरे आहे?

१० उत्क्रांतीचा सिद्धांत चित्रित करण्यासाठी मासिकातून वानर–नराची जी चित्रे प्रसिद्ध झाली ती काल्पनिक आराखड्याशिवाय दुसरे काही नाही. ही चित्रे कवटी वा जबडा यांची जी तुरळक हाडे सापडली त्यावरून काढली आहेत. उदाहरणार्थ, ऑगस्ट १६, १९८५च्या न्यूयॉर्क टाईम्सच्या पहिल्या पृष्ठावर “जनावराच्या आरंभाचा वरचा क्रम दाखविणाऱ्‍या ॲम्फीपीटेकसचे काल्पनिक चित्र रेखाटले आहे याकडून मानवाची उत्क्रांती झाली असे समजले जाते.” त्याचे डोके व हात केसाळ असल्याचे दाखविले आहे. या चित्राचा आधार कोणता होता? त्याविषयीचा लेख म्हणतो: “अर्ध्या शतकाआधी आढळलेला खालच्या जबड्याचा मागील भाग आणि पुढील जबड्याच्या हाडाचे अवशेष.” अशा या दोन गोष्टीकरवीच सबंध डोके व केस याचे पूर्ण चित्र काढता येऊ शकेल का? त्या लेखाने हार्वर्ड विश्‍वविद्यालयाच्या एका प्राध्यापकांनी याबाबतीत “अंधारी एकरांच्या जमिनीत प्रकाशाचा झोत” असे म्हटल्याचे उदृत केले. पण यांचा संयोग खरोखरीच प्रकाशाशी जुळतो का?

११. तथाकथित वानर–नराविषयी यशया ५९:१५ कसे लागू होऊ शकते?

११ काही लोक ज्याला “प्रकाशाचा झोत” म्हणतील ती आहे पील्टडॉन मानवाची कवटी. सुमारे ४० वर्षे या कवटीने उत्क्रांतीवाद्याचे लक्ष केंद्रित केले होते. पण १९५३ मध्ये हे उघड झाले की ते जनावरे व माणसे यांच्या हाडांच्या तुकड्यांनी तयार केलेली मिस्किल फसवणूक होती! यशया संदेष्ट्याच्या शब्दात या वानर–नर याच्या तात्विकतेबद्दल म्हणायचे झाल्यास, त्यात “सत्याचा अगदी अभाव” दिसतो.—यशया ५९:१५.

भविष्यवादित साम्य

१२. यहेज्केलाने कोणत्या घृणित गोष्टी पाहिल्या?

१२ आजच्या अभक्‍त ख्रिस्तीधर्मराज्याची पडछाया प्राचीन काळच्या अविश्‍वासू यरूशलेमात दिसते. इ. स. पू. ६१२ मध्ये सेनाधीश प्रभू यहोवाने यहेज्केलास दृष्टांत दिला ज्यामध्ये त्याने आपल्या या संदेष्ट्याला बाबेलोनपासून यरूशलेमापर्यंत स्थलांतरित केले होते. येथे मंदिराच्या अंगणात यहेज्केलने मूर्तिपूजेचे घृणित चिन्ह पाहिले. यानंतर यहोवाने त्याला भिंतीत एक मोठे भोक पाडायला लावले. तेव्हा यहोवाने यहेज्केलास म्हटले: “येथे हे लोक कसली दुष्ट व अमंगळ कृत्ये करीत आहेत ती पहा.” त्याने काय पाहिले? यहोवाच्या भक्‍तिस्थानाच्या आतील भागी, सरपटणारे प्राणी, अमंगळ पशु व इस्राएल घराण्याच्या सर्व मूर्ति यांची चित्रे भिंतीवर चाहोकडे काढलेली होती.”—यहेज्केल ८:१, ७–१०.

१३. (अ) आज ख्रिस्तीधर्म राज्यात अशीच साम्यतेची कोणती स्थिति दिसते? (ब) पवित्र शास्त्रातील निर्मितीच्या अहवालाविषयी येशूचा कोणता दृष्टीकोन होता?

१३ या दृष्टांताच्या साम्यतेत आज आम्हाला ख्रिस्ती धर्मराज्यातील धर्मपुढाऱ्‍यात एक धक्कादायक स्थिति आढळून येते. या ‘धर्मत्यागी पुरूषाने’ पवित्र शास्त्रातील निर्मितीचा अहवाल बहुतेक त्यागला आहे. (२ थेस्सलनीकाकर २:३) किंवा यहेज्केलाच्या काळातील धर्मत्याग्यांप्रमाणेच धर्मपुढारी पवित्रशास्त्राऐवजी उत्क्रांतीकडे झुकले आहेत. ते म्हणतात की उत्पत्तीचे सुरूवातीचे अध्याय दंतकथा आहेत. साधे स्पष्टीकरण बहुधा खरे असते या वैज्ञानिक नियमास धुडकावून लावून ते म्हणतात की पवित्रशास्त्र अहवाल त्यांच्या करिता खूपच भोळसटपणाचा आहे. त्यांची गर्विष्ठ बुद्धीमत्ता त्यांना काहीतरी क्लिष्ट व गुंतागुंतीचे स्विकारण्यास प्रवृत्त करते. ज्याने उत्पत्तिचा शब्दशः अहवाल “सत्य” मानला त्या येशू ख्रिस्तापेक्षा स्वतःला ते अधिक उंचावतात.—योहान १७:१७; मत्तय १९:४–६.

१४. ‘वडील’ आपला कळप नीट नेण्यात कसे अपयशी होत आहेत आणि याचा काय परिणाम होणार?

१४ यहेज्केलने आपल्या दृष्टांतात “इस्राएल घराण्याच्या वडिलातले सत्तर पुरूष” “सरपटणारे प्राणी अमंगळ पशु” यांच्या प्रतिमेपुढे उपासना करीत आहे असे पाहिले. (यहेज्केल ८:१०, ११) आधुनिक काळातील जे धर्मपुढारी, मानवजात अशा प्राण्यांकडून उत्क्रांतीत झाली असे उघडपणे म्हणतात त्यांच्याशी ते अत्यंत साम्यतेचे आहे! खरे पाहता या ‘वडीलांनी’ आपल्या कळपाचे सत्याच्यामार्गाने नेतृत्व करण्यास हवे होते. पण येशूने मत्तय १५:१४ मध्ये जे वर्णन दिले ते यांना लागू होत नाही का? त्याने म्हटले: “ते अंधळे वाटाड्ये आहेत; आणि अंधळा अंधळ्‌याला नेऊ लागला तर दोघेहि खाचेत पडतील.” जेथे उत्क्रांदीवादी धडपडत आहेत त्या “अंधारी एकरांच्या जमिनीत” त्यांना ती खाच मिळेल.

१५. उत्क्रांतीवादी धर्मपुढारी ‘धर्मत्यागी पुरूषा’चा भाग असल्याचा आणखी कोणता पुरावा देतात?

१५ यहोवाने पुढे यहेज्केलास म्हटले: “मानवपुत्रा, इस्राएल घराण्याचा प्रत्येक वडील आपल्या मूर्तिगृहात अंधारामध्ये काय करीत आहे हे तुला दिसते ना? ते तर म्हणतात की ‘यहोवा आम्हास पाहत नाही; यहोवाने देशाचा त्याग केला आहे.’” (यहेज्केल ८:१२) मानवी तत्वज्ञानास आधार देणारे धर्मपुढारी, आपण “धर्मत्यागी पुरुष” गटाचे आहोत हे याकरवी सुव्यक्‍त करतात. देवाचा नियम, ज्यात उत्पत्ती पुस्तकाचा समावेश आहे त्याचा ते त्याग करतात. (प्रे. कृत्ये ७:५३) उत्क्रांतीचे असिद्ध आणि कधीही सिद्ध होऊ न शकणाऱ्‍या तत्वाचा पाठपुरावा करीत राहण्यामध्ये त्यांनी आपल्या कळपास जगीक विचाराच्या अंधारात चाचपडत ठेवले आहे. त्यांनी सत्याच्या “प्रकाशाऐवजी अंधाराची आवड धरली.”—योहान ३:१९.

१६. यहेज्केलाच्या काळातील “वडील” आजच्या काळातील पुष्कळ धर्मपुढारी यांजमध्ये कोणते साम्य न्याहळता येईल?

१६ त्या यहुदी वडीलांनी यरूशलेमाच्या मंदिरी खोटी उपासना आणली होती तसेच आजचे धर्मपुढारी “ख्रिस्ती” किताबास चिकटून राहिले आहेत. पण उत्क्रांतीवरील विश्‍वास हा काही ख्रिस्ती नाही. या तत्वाचा स्वीकार केल्यामुळे आज पुष्कळांना देवापासून दूर नेण्यात आले आहे. त्याने आमच्या २०व्या शतकात स्वैरवर्तन, हिंसाचार आणि आतंकवादास फार मोठ्या प्रमाणात चिथावले आहे कारण त्यामध्ये राष्ट्र व विशिष्ठ लोक “बचावासाठी लढत” या उत्क्रांती प्रणालीचे अवलंबन करतात. मानवाला देवविषयक कसलीही जबाबदारी नाही असे उत्क्रांतीने शिकविले. (रोमकर ९:२८) यामुळेच देवाचा विचार न राखता लोकांना ‘आपापल्या इच्छेप्रमाणे वागण्यास’ मोकळीक वाटते.

१७. उत्क्रांतीवादी धर्मपुढारी कोणकोणत्या बाबतीत गंभीर चुकीत सापडले आहेत?

१७ उत्क्रांतीचा स्विकार करणारे धर्मपुढारी जणू असे म्हणतात: “यहोवा आम्हास पाहत नाही. यहोवाने देशाचा त्याग केला आहे.” या तत्वास कवटाळून राहिल्यामुळे त्यांना त्याजविषयीची कोणतीही जबाबदार वृत्ती वाटत नाही. खरे म्हणजे देवाविषयीची त्यांची विचारधारा त्रेकत्वासारख्या गूढ व विवेचीत करता न येणाऱ्‍या तत्वावरील विश्‍वासामुळे अभ्राच्छादित बनली आहे. हा दृष्टिकोण राखून एकच खरा देव यहोवा याच्या नामासंबंधाने जितकी टाळाटाळ करता येणे शक्य आहे, म्हणजे त्याच्या नावाचा उच्चार अजिबात न करणे व आपल्या पवित्र शास्त्र भाषांतरातून ते नाव हेतुपुरस्सर गाळणे हे धोरण त्यांनी पत्करले आहे. देवाऐवजी उत्क्रांती या महशूर जागतिक शिक्षणविरूद्ध आम्ही जाऊ की काय याची त्यांना भीती वाटते.

१८. उत्क्रांती शिक्षण व त्यांच्या पुरस्कर्त्यांच्या बाबतीत कोणता जाब वाट पाहून आहे?

१८ या कारणास्तव, यहोवा आपल्या आणखी एका संदेष्ट्याद्वारे कळवितो: “हे लोक माझ्यासमीप येऊन आपल्या तोंडच्या शब्दांनी माझा सन्मान करतात; तरी मजपासून आपले अंतःकरण दूर राखतात; आणि हे माझे भय बाळगतात ते केवळ मनुष्यांनी पढविलेल्या आज्ञेप्रमाणे बाळगतात. तर पाहा, मी या लोकांशी अद्‌र्भित प्रकारे वर्तण्यास प्रवृत्त होईन. मी अद्‌र्भित व आश्‍चर्यावह कृत्य करीन. तेव्हा त्यांच्यातील ज्ञान्यांचे ज्ञान नष्ट होईल व त्यांच्यातील बुद्धीमानांची बुद्धि लुप्त होईल.” (यशया २९:१३, १४) अगदी लवकरच, यहोवाच्या धधकत्या क्रोधदिनी, देवाची निंदा करणारे उत्क्रांती तत्व आणि त्यास कवटाळणाऱ्‍या सर्व नामधारी ख्रिश्‍चनांना हा जाब मिळेल.—सफन्या ३:८.

सत्याखातर सेवा करणे

१९. (अ) पुष्कळांनी उत्क्रांती तत्व का कवटाळले? (ब) लीन जनांना कोणत्या आनंदात सहभागी होता येईल?

१९ हे खरेच अभक्‍त जग आहे! खोटा धर्म व चुकीच्या दिशेकडे निरविणारा वैज्ञानिक अभिमान यामुळे जगाची ही दशा झाली आहे. ख्रिस्ती धर्मराज्यातील धर्मपुढारी, “धर्मत्यागी पुरुष” याच्या विसंगत शिक्षणामुळे पुष्कळांना धर्मापासून दूर नेले आहे. जसे पाण्यात बुडणारा एखादा माणूस गवताच्या एका काडीस धरतो त्याप्रमाणे यापैकी काहींनी उत्क्रांतीस पकडले. इतरांनी उत्क्रांती सिद्धांताला यासाठी कवटाळले की त्यातील अभक्‍तपणा त्यांना निर्मात्या देवासंबंधाने असणाऱ्‍या जबाबदारीतनू सुटका देतो असे त्यांना दिसले. (पडताळा रोमकर १:२१–२३.) तरीपण, मानवजातीतील विनयशील व लीन जन सार्वभौम प्रभू यहोवा, राज्य करीत असलेला राजा येशू ख्रिस्त व लवकरच वैभवीपणे साकार होणारे देवाचे राज्य याविषयीचे शिक्षण संपादित करण्यात आनंद मिळवीत आहेत.—रोमकर १६:२०; १ करिंथकर १५:२५, २६.

२०. (अ) सध्याच कोणते भव्य अभिवचन पूर्ण होत आहे? (ब) हे १९८५ मध्ये कसे दृष्टोत्त्पतीस आले? (क) सत्याच्या देवाची सेवा करण्यात तुम्हाला आपली सचोटी कशी दाखविता येईल?

२० आम्हा सर्व यहोवाच्या साक्षीदारांना सबंध जगभरात ऐक्यता राखून सत्याची आवेशाने घोषणा करीत राहण्याची केवढी धन्यता वाटते! देवाचा आत्मा त्याच्या संघटनेसोबत प्रबळपणे कार्य करीत आहे यामुळेच आत्ताच आम्हाला या अभिवचनाची पूर्णता होत आहे हे दिसते: “सागर जसा जलपूर्ण आहे तशी यहोवाच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूण होईल.” (यशया ११:९) यहोवाच्या साक्षीदारांनी १९८५ मध्ये जगभरात जी साक्ष दिली त्यामुळे क्षेत्रात २०० पेक्षा अधिक भाषात ३३,९३,५१,१७० पवित्र शास्त्र व पवित्र शास्त्राचे विवेचन करणाऱ्‍या प्रकाशनांचे वाटप होऊ शकले. या भव्य गोलार्धव्याप्त प्रचार कार्यात “चार लोकात व घरोघरी” समाविष्ट होण्याचा सहभाग तीस लाखापेक्षा अधिक जणांना लाभला. (प्रे. कृत्ये २०:२०) सत्याच्या देवाची सेवा करण्यात सचोटी राखता असताना यहोवाकरवी आम्हाला समृद्ध आशीर्वाद प्राप्त होवो.

तुमचे विवेचन काय आहे?

◻ मानवी मेंदूविषयी कोणत्या आश्‍चर्यकारक गोष्टी सर्वसूज्ञ निर्मात्याकडे निर्देश करतात?

◻ उत्क्रांतीवरील विश्‍वास, विश्‍वासाची बाब आहे असे म्हणणे का चुकीचे आहे?

◻ वानर–नर संबंधीचा केवढा पुरावा आज उपलब्ध आहे?

◻ यहेज्केल ८:७–१२ आजच्या काही धर्मपुढाऱ्‍यांना कसे लागू करता येते?

◻ सत्याच्या देवाची सेवा करण्यामधील सचोटी कोणते परिणाम आणित आहे?

[२१ पानावरील चौकट]

लाईफ–हाव डीड इट गेट हिअर? बाय इव्होल्यूशन ऑर बाय क्रिएशन?

या शिर्षकाचे पुस्तक १९८५ व १९८६ मध्ये पृथ्वीभरातील यहोवाच्या साक्षीदारांच्या “सचोटी राखणारे” प्रांतीय अधिवेशनात प्रकाशित झाले. हे पुस्तक आता या भाषांत मिळू शकेल: चिनी, डॅनिश, डच, इंग्रजी, फिनीश, फ्रेंच, जर्मन, इटालियन, जपानी, पोर्तुगीज व स्पॅनिश.

[१९ पानांवरील चित्र]

थोड्याशा हाडांच्या अवशेषांमधून वानर–नराचे चित्र चित्रकाराने रेखाटणे प्रामाणिकतेचे आहे का?

[२० पानांवरील चित्र]

यहोवाच्या साक्षीदारांनी यहोवाच्या ज्ञानाने ‘पृथ्वी भरून टाकली’ आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा