वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w86 ९/१ पृ. १०-१५
  • अभक्‍त जगात सत्याचे समर्थन करणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अभक्‍त जगात सत्याचे समर्थन करणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • असत्याकरवीची नासधूस
  • एका मोठ्या लबाडीस उबविणे
  • असत्याचे समर्थक
  • जीवनाचा उगम
  • प्रगतिशील उत्क्रांती —की थेट निर्मिती?
  • तुम्ही कृतज्ञ आहात का?
  • उत्क्रांतीची न्यायचौकशी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • देवाने उत्क्रांतीद्वारे सजीव सृष्टीची निर्मिती केली का?
    सावध राहा!—२००६
  • सत्याचा देव याची सेवा करण्यामधील सचोटी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
w86 ९/१ पृ. १०-१५

अभक्‍त जगात सत्याचे समर्थन करणे

“तुझे वचन हेच सत्य आहे.”—योहान १७:१७.

१. (अ) सत्य केव्हा व कसे पणाला लागले? (ब) एदेनात कोणते भव्य स्वरूपाचे नवे सत्य विदीत करण्यात आले?

सत्य दीर्घकाळापासून पणाला लागलेले आहे. मानवजातीच्या इतिहासाएवढा पुरातन असणारा हा वादविषय एदेनात उद्‌भवला. त्यावेळी जुनाट सापाने सार्वभौम प्रभू यहोवा याच्या सत्यतेविषयी प्रश्‍न उभा केला होता. मोहपाशात येऊन आमच्या पहिल्या पालकांनी स्वैरपणे विचार करण्याची आणि स्वतःच्या स्वार्थी मार्गाचा मागोवा घेण्याची निवड पसंत केली. ते सत्य प्रतिपादित करू शकणारे सचोटी रक्षक नव्हते. पण नेमक्या त्याच प्रसंगी देवाने नव्या सत्यापैकीचे सर्वथोर असे सत्य विदीत केले. ते असे होते की, राज्याचे “संतान” सामोरे येईल आणि ते दियाबलाची कर्मे मोडून काढील.—उत्पत्ती ३:१–६, १४, १५.

२. (अ) जलप्रलय–पूर्व जगतात सत्यावर कसा हल्ला झाला? (ब) नोहा व त्याच्या कुटुंबाला यहोवाची कृपापसंती का लाभली?

२ सत्य हे आता हल्ल्याच्या दबावाखाली होते. आद्य ठकाने इतर बंडखोर देवपुत्रांचा आधार मिळविला आणि पृथ्वी बिघडविण्यास सुरुवात केली. जलप्रलयापूर्वीची अनैतिक पिढी ‘स्वत:चीच कर्मे करण्यात’ इतकी दंग झाली की त्यांना नोहाने घोषित केलेला देवाचा इशारा ऐकण्याची उसंत मिळाली नाही. यामुळेच त्यांचा नाश झाला. पण नोहा व त्याच्या कुटुंबाचा निर्दोष सचोटीमुळे बचाव झाला. सत्याचे हे समर्थक संरक्षक तारवातून बाहेर आले त्या वेळी त्यांचा पहिला विचार यज्ञार्पण सादर करणे हा होता. तो यहोवाला “सुवास” ठरला.—उत्पत्ती ६:४–१२; ८:१८–२१; लूक १७:२६, २७; २ पेत्र २:५.

असत्याकरवीची नासधूस

३. मोठी बाबेल काय आहे व तिची सुरुवात कशी झाली?

३ तरीही त्या जुनाट सापाने, दियाबलाने, सत्याचे पाणी गढूळ करण्याचा प्रयत्न चालूच ठेवला. प्राचीन बाबेलची बांधणी त्या सैतानी मार्गदर्शनाखालीच निसंशये झाली. ‘बाबेलची गूढतत्वे’, ज्याचे वर्णन प्रकटीकरण १७:५ मध्ये “मोठी बाबेल, कळवंतिणीची व पृथ्वीवरील अमंगळपणाची आई” असे करण्यात आले त्या खोट्या धर्माच्या जगव्याप्त साम्राज्याकरता पाया ठरला. त्याचे विविध भाग आणि त्यांच्या परस्पर विरूद्धच्या पंथीय शिकवणी आजतागायत धार्मिक चुकांचे प्रशस्त भांडार या अर्थी टिकून राहिल्या आहेत.—उत्पत्ती १०:८–१०; यिर्मया ५१:६.

४. येशूने सत्याचे समर्थन कसे व कोणत्या परिणामाने केले?

४ येशू ख्रिस्त पृथ्वीवर असताना त्याने मोठ्या धैर्याने सत्याचे समर्थन केले. त्याच्या काळातील धार्मिक ढोंग्यांना उद्देशून तो म्हणाला: “तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला आहा . . . तो सत्यात टिकला नाही, कारण त्याजमध्ये सत्य नाही.” पुढे येशू, जो ते भाकित असणारे “संतान” आहे त्याने सत्याविषयीचे महत्व पंतय पिलातासोबत बोलताना या प्रकारे जोर देऊन सांगितले: “मी राजा आहे असे तू म्हणतोस. मी यासाठी जन्मलो आहे व यासाठी जगात आलो आहे की मी सत्याविषयी साक्ष द्यावी.” सत्याचे—राज्याच्या सत्याच्या—समर्थनात येशूने आपले मानवी जीवन वाहिले.—योहान ८:४४, १८:३७; उत्पत्ती ३:२–५.

५, ६. (अ) सत्यासंबंधाने आपली लढत सैतानाने कशी जारी ठेवली? (ब) कोणता गढूळपणा निर्माण झाला व त्यातून कोणत्या लबाडया फुलल्या? (क) आपण सत्याचे उत्साही समर्थक असण्याची का इच्छा धरावी?

५ लबाड्या अधर्माच्या हातात हात घालून चालतात. यामुळेच, सैतानाने आपली सत्याविरूद्ध लढत जारी ठेवण्यात, २ थेस्सलनीकाकर २:३ मधील वर्णित असणारा “धर्मत्यागी पुरूष” धर्मत्यागी पाळकवर्गाच्या रूपात सामोरा आणला हे काही नवलाईचे नाही. येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांच्या मृत्युनंतर या धर्मत्यागी लोकांनी स्वतःला सभासदांपेक्षा उंचाविले आणि बाबेलची “गूढतत्वे,” ग्रीक तत्वज्ञान खासपणे मानवी जीव अमर आहे हे प्लॅटोचे तत्व, शुद्ध ख्रिस्ती शिक्षणात घुसडून ते गढूळ केले.

६ या असत्य गोष्टीने, ‘सर्व चांगले लोक स्वर्गात जातात,’ ‘तेवढे अधिक चांगले नसणारे परगेटरीत जातात,’ आणि ‘वाईट लोक यातनेच्या नरकात सर्वदा होरपळत असतात’ अशा खोट्या शिकवणींना आधार दिला. वस्तुतः बाबेलोनी साम्राज्यात बरेच चुकीचे शिक्षण पसरलेले असल्यामुळे आम्हाला येशूच्या या अभिवचनाचा केवढा आनंद वाटावा की, “तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहा. तुम्हास सत्य समजेल व सत्य तुम्हास स्वतंत्र करील.”! स्वतंत्रता प्रदान करणाऱ्‍या सत्याचे आवेशी समर्थक असण्याची आमची इच्छा राहिली पाहिजे.—योहान ८:३१, ३२.

एका मोठ्या लबाडीस उबविणे

७. (अ) सैतानाचे कोणते ध्येय आहे व त्याच्या पूर्तीचा तो कसा प्रयत्न करतो? (ब) १९व्या शतकात कोणते खोटे शिक्षण पुढे आले?

७ तथापि, सत्याचा विरोध करण्यात सैतान कोणतीही दिशा सोडत नाही. देवाचे सत्य वचन पवित्र शास्त्र यास कसलेहि श्रेय देणारा कोणीही असला तरी त्याविषयीचा क्रोध तो मनात बाळगून आहे. ‘ख्रिस्ताची वैभवी सुवार्ता कोणाला कळू नये याकरता विश्‍वास न ठेवणाऱ्‍या लोकांची मने अंधळी करण्याचा’ त्याचा निश्‍चय आहे. ख्रिस्ती धर्मराज्यातील “धर्मत्यागी पुरूषा” करवी त्याने पवित्र शास्त्रास जोडून खोट्या धार्मिक शिकवणींचा प्रसार तर केलाच पण पवित्र शास्त्र हेच मुळात दंतकथा व कहाण्या आहे असा दावा त्यांच्याकरवी पसरवून त्याने सत्याला कमीपणा आणण्याचे ध्येय ठेवले. तद्वत १९व्या शतकात त्या जुन्या सर्पाने आणखी एका खोट्या व फसव्या शिकवणीचे अंडे उबविले. त्याला उत्क्रांतीचे तत्व असे म्हणतात.—२ करिंथकर ४:४.

८. डार्विनचे तत्व काय आहे?

८ पवित्र शास्त्रातील “अंतसमय” समीप येत असता १८५९ मध्ये चार्ल्स डार्विन यांनी ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसीस बाय मिन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन, ऑर द प्रिझर्वेशन ऑफ फेवर्ड रेसेस इन द स्ट्रगल फॉर लाईफ या शिर्षकाचे पुस्तक प्रकाशित केले. (दानीएल १२:४) डार्विनने हे तत्व प्रतिपादिले की, जिवंत गोष्टींची निर्मिती झाली नाही तर पूर्वीच्या जीवनाच्या प्रकारातून “अस्तित्व टिकविण्याच्या झगड्याच्या परिणामातून स्वाभाविकपणे निवडीने” उत्क्रांती होत आली. शेवटी मानव हा वानर नर मधून उत्क्रांतीने पुढे आला. ही गोष्ट “झगडण्याच्या परीक्षेतून बचाव” यामधून घडली असे डार्विनचे मत आहे.

९. (अ) उत्क्रांतीवाद खरा आहे तर येशूकरवी शिकविलेली कोणती पवित्र शास्त्रीय तत्वे निरर्थक ठरतात? (ब) उपकल्पित “बचावासाठी लढत” या तत्वाने मानवजातीस कोणती भयंकर इजा दिली?

९ हे तत्व, पवित्र शास्त्रातील निर्मिती आणि मानवाचे पापात पतन या अहवालास साफ रितीने अमान्यता दाखविते. त्यामुळे येशूचे खंडणी यज्ञार्पण, आणि पवित्र शास्त्रातील राज्याविषयीचे, पुनरुत्थानाविषयीचे, सार्वकालिक जीवनाविषयीचे आणि नंदनवनमय पृथ्वीविषयीचे शिक्षण निरर्थक बनते. याशिवाय उत्क्रांतीचे तत्व, खरे असल्यास, ते मानवजातीला निर्माणकर्त्याविषयी असणाऱ्‍या नैतिक जबाबदारीतून मुक्‍त करते.a “झगडण्याच्या परीक्षेतनू बचाव” या तत्वापुढे मार्क्सवादी, फॅसिझम व इतर तत्व प्रणालींना मूळ धरण्यास आधार मिळाला.b उत्क्रांतीच्या समर्थकांना आज जगात आढळणारा अभक्‍तपणा व त्रास याविषयीचा मोठा जाब द्यावा लागेल.—स्तोत्रसंहीता १४:१–४.

असत्याचे समर्थक

१०. डार्विनच्या अनुषंगाने धर्मपुढारी असत्याचे समर्थक असल्याचे कोणत्यामार्गी दिसून आले?

१० देवास निंद्य ठरविणाऱ्‍या या तत्वाविरूद्ध डार्विनच्या काळातील धर्मपुढाऱ्‍यांनी काही लढत दिली का? केंब्रिज विश्‍वविद्यालयाचे प्राध्यापक जे काही लिहितात ते किती आश्‍चर्याचे आहे ते बघा. ते म्हणतात: “डार्विन तत्वाला प्रथमतः शास्त्रज्ञांकडून पुरावा दाखवा या अर्थी विरोध झाला. असा हा विरोध वेदांतवाद्यांनी शास्त्रवचनाआधारे दर्शविला नाही.” आणखी एक जाणकार लिहितात: “ग्रेट ब्रिटन व अमेरीका येथील बहुतेक थोर विचारवंत डार्विन तत्व व उत्क्रांतीवादास त्वरेने मान्य झाले.” १८८२ मध्ये डार्विनला अँग्लीकन डीनच्या संमतीने वेस्टमिन्स्टर स्मशानभूमीत राजांच्या सोबतीत समाधि दिली गेली!—पडताळा प्रे. कृत्ये २०:३०; २ तीमथ्यी ४:३.

११. डार्विनच्या नास्तिक तत्वासंबंधाने धर्मपुढाऱ्‍यांनी कोणते उद्‌गार काढले आहेत?

११ डार्विनचे नास्तिक तत्व ख्रिस्ती धर्मराज्यातील कित्येक धर्मपुढाऱ्‍यांनी ‘शुभवर्तमान सत्य’ म्हणून स्वीकृत केले. चर्च ऑफ इंग्लंडच्या दुसऱ्‍या दर्जावर असणारे यॉर्कचे आद्यबिशप यांना जीवशास्त्रविषयक उत्क्रांती तत्व इतके मजबूत वाटते की ते त्याला “आधुनिक जीवशास्त्राचा खात्रीलायक आधार” मानतात. अलिकडेच एका व्हॅटीकनच्या सभेत कॅथोलिक चर्चच्या सर्वोच्च विज्ञान शास्त्रीय गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्‍या १२ प्रामाण्यांनी म्हटले: “मानवाविषयी व इतर प्राण्यांविषयी उत्क्रांतीची विचारधारा कोणताही गंभीर वाद न आणता खरी आहे हे बऱ्‍याच पुराव्यानिशी दाखवता येते याबद्दल आमची खात्री आहे.” यालाच न्यू कॅथोलिक एनसायक्लोपिडीआ पुष्टी देते: “सर्वसाधारण उत्क्रांती, मानवाच्या शरीराची उत्क्रांती सुद्धा आरंभ मानण्याजोगा वैज्ञानिक अहवाल वाटतो.” पण तो खराच वैज्ञानिक आहे का? उत्क्रांतीला विश्‍वासार्ह वैज्ञानिक पुरावा आहे का? या प्रकरणातील सत्य निश्‍चित करण्यावर तुमचे जीवन अवलंबून आहे.—योहान १४:६; १६:१३; १७:१७.

१२. निर्मितीचे तत्व हे अशास्त्रीय व विश्‍वास न ठेवण्याजोगे आहे असे का म्हणता येईल?

१२ आधुनिक काळात काही मूलतत्ववादी धर्मांनी निर्मितीचे तत्व हा उत्क्रांतीचा तोडगा सुचवला आहे. पण यात ते जो दावा करतात तो शास्त्रवचनांशी विसंगत आणि मानता न येण्याजोगा आहे. तो दावा असा की स्वर्ग, पृथ्वी आणि पृथ्वीवरील सर्व काही देवाने २४ तासांच्या सहा दिवसात, होय, केवळ १४४ तासांत निर्माण केले! या शिकवणीमुळे पुष्कळांना पवित्र शास्त्राचा उपहास वाटू लागला. पण, पवित्र शास्त्राचा एक “दिवस” नेहमीच २४ तासांचा आहे का? पवित्र शास्त्रात उत्पत्ती २:४ “यहोवा देवाने ज्या दिवशी पृथ्वी व आकाश केले” त्या दिवसाबद्दल सांगते. या एका दिवसात उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायातील निर्मितीचे सर्व सहा “दिवस” समाविष्ठ आहेत. याद्वारे हे कळते की “दिवस” म्हणजे कालाचे मापन करण्याचे परिमाण हा पवित्र शास्त्राचा वापर आहे. यहोवाकरता एक “दिवस” हजार वर्षाचा किंवा निर्मितीच्या ‘दिवसां’प्रमाणेच कित्येक हजार वर्षे असू शकतो. तद्वत, या मुद्याबद्दल पवित्र शास्त्रीय अहवाल हा व्यवहार्य आहे आणि तो खऱ्‍या विज्ञानाशी सुसंगत आहे.—२ पेत्र ३:८.

जीवनाचा उगम

१३. (अ) उत्क्रांतीचे समर्थक जीवनाच्या उगमाची कशी स्पष्टता करतात? (ब) एका जिवंत पेशीने स्वतःलाच आकस्मिकरित्या निर्मिले हे म्हणणे थट्टेचे का वाटते बरे?

१३ जीवनाच्या खऱ्‍या उगमाचे, उत्क्रांतीचे समर्थक कसे स्पष्टीकरण देतात? त्यांचे म्हणणे असे आहे की कित्येक अब्ज वर्षांआधी पृथ्वीभोवती पसरलेला समुद्र, जीवन विरहित असा “सेंद्रिय द्रव” होता. यानंतर ते म्हणतात की, ‘एकाएकी अकस्मात एक खास व अप्रतिम अणु तयार झाला.’ त्याने आश्‍चर्यकारकरित्या इतर परमाणु तयार केले व सर्व अणु एकत्र येऊन त्यांची पेशी तयार झाली. यापेक्षा विलक्षण असे दुसरे काही असू शकेल का? ज्या लेखकाने असे वर्णन दिले तो आपल्या प्रास्तविकतेत म्हणतो: “हे पुस्तक वाचताना ती जणू विज्ञानाची विसंगति आहे हे गृहीत धरून वाचावे.” होय, विसंगतीच, कारण त्यात विज्ञान असे मुळीच नाही! नॅशनल जिऑग्रॅफिक ने म्हटले की एका छोट्या पेशीत असणारा तयार आरखडा (DNA)) “सविस्तर लिहून काढायचा म्हटले तर ते वर्णन ६०० पानी पुस्तक भरून तयार होईल.” तर मग, एका जिवंत पेशीने स्वतःलाच आकास्मितरित्या आद्ययुगीन सेंद्रियातून निर्मिले हे केवढे थट्टेचे वाटते बरे!

१४. सत्याचे समर्थक या अर्थी कोणते मुलभूत पवित्र शास्त्र शिक्षण उंचावून धरावे?

१४ यापेक्षा पवित्र शास्त्र लेखक दावीद याने स्तोत्रसंहिता ३६ अध्याय ५ व ९ वचनात जे विवेचन लिहिले ते अत्यंत व्यवहार्य व समंजस वाटते. ते असे आहे: “हे यहोवा... जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे.” सत्याचे समर्थक या नात्याने आम्ही त्या मुलभूत पवित्र शिक्षणाचा पुरस्कार केला पाहिजे.—तसेच स्तोत्रसंहिता १००:३ पहा; यशया ४२:५, ८.

प्रगतिशील उत्क्रांती —की थेट निर्मिती?

१५. (अ) उत्क्रांती खरी असल्यास ते अवशेषांचा अहवाल कसे स्पष्ट करील? (ब)अहवाल काय दाखवितो व यामुळे डार्विनला काय कबूल करावे लागले?

१५ पण समजा, एकदा जीवनाचे अस्तित्व लाभल्यानंतर प्राण्यांच्या विविध जातींनी इतर जातींमध्ये प्रगमनशीलपणे उत्क्रांती साधली असावी असे तर नसेल ना? तसे जर आहे तर गत युगांतील अवशेष अस्थींचा अहवाल ते सुव्यक्‍त करील. पण वस्तुतः तसे दिसते का? ज्याला कॅम्ब्रियन कालावधी म्हणण्यात येतो तो विचारात घ्या. येथे पाठीचा कणा नसलेल्या प्राण्यांच्या अस्थींच्या अवशेषांचा समूह एकत्रित ठेवण्यात आला आहे. याबाबत असे म्हटले जाते की तो जिवंत प्राण्यांच्या नेत्रदीपक “स्फोटा” ने तयार झाला. आता अगदीच भिन्‍न असा समूह एकाच वेळी अस्तित्वात आला तर मग एकातून दुसऱ्‍यात त्याची उत्क्रांती झाली असे कसे शक्य असेल बरे? डार्विननेच स्वत: अगदी स्पष्टरित्या कबूल केले: “विविध जाती . . . एकाच वेळी अस्तित्वात आल्या तर ही गोष्ट उत्क्रांती तत्वास निश्‍चित घातकच आहे.” घातक म्हणावे!—१ करिंथकर ३:१९, २०.

१६. (अ) जीवनाच्या जातींच्या स्वरूपाबद्दल अस्थींच्या अवेशषांचा अहवाल उत्क्रांतीला कसे खोटे ठरवितो? (ब) उत्पत्ती १:२५ मध्ये कोणते विधानपूर्वक सत्य विदीत केले आहे?

१६ अस्थींच्या अवशेषांचा अहवाल प्रकटवितो की अत्यंत गुंतागुंत असणाऱ्‍या जीवनाच्या जाती एकाएकी दिसल्या व त्या पूर्णपणे वाढल्या. नैसर्गिक विज्ञानाच्या प्राध्यापकांनी म्हटले: “व्हील, वटवाघूळ, घोडे, श्रेष्ठ दर्जाचे प्राणी, हत्ती, ससे, खारी इत्यादि प्राणी त्यांच्या पहिल्या स्वरूपापासून ते आतापर्यंत अगदी वेगळेच आहेत. यांचा सर्वसाधारण पूर्वज असल्याचा मागमूस कोठेही दिसत नाही व शिवाय सरपटणारे प्राणी या पूर्वज समजल्या जाणाऱ्‍यांशी असणारा दुवा आढळत नाही.” ज्याच्या मानेची लांबी दोन तृतीयांश किंवा तीन चतुर्थांश आहे अशा जिराफाचे अस्थिंचे अवशेष उपलब्ध आहेत का? नाहीत. तर मग, जे उत्पत्ती १:२५ मध्ये लिखित आहे तेच एकंदरीत प्रकरणाचे सत्य आहे की, “प्रत्येक जातीचे वनपशु, ग्रामपुशु व जमिनीवर रांगणारे जीव देवाने केले. देवाने पाहिले की हे चांगले आहे.” खरेच, ते अत्युत्तम होते!

१७. जीवंत प्राण्यात कोणती सुंदर विविधता व रचना दिसते व या सर्वाचा उगम कोणाकडून असावा?

१७ याशिवाय, या पृथ्वीवरील जिवंत प्राण्यात जी उत्तेजक विविधता दिसते त्याचाही विचार करा! गुलाब, फुलपाखरू, साद घालणारा पक्षी, मोर व इतर शेकडो प्राण्यांनी आपली अप्रतिम सुंदरता योगायोगाने व बचावकरिता दिलेल्या लढतीतून संपादित केली का? का ते सर्व प्रेमळ देवाच्या कुशल हस्तकृति आहेत ज्याची इच्छा होती की आपल्या कृतिद्वारे मानवजातीने आनंद मिळवावा? या आश्‍चर्यावह पृथ्वीत जी उदंड सुंदरता आपल्याला पहायला मिळते त्याद्वारे आपल्या मुखातून हेच उद्वार निघावेत: “हे यहोवा, तुझी कृत्ये किती अगणित आहेत! ती सर्व तू चातुर्याने केली. तुझ्या संपत्तीने पृथ्वी परिपूर्ण आहे.—स्तोत्रसंहिता १०४:२४.

१८. प्लॅटिपसची रचना केवळ देवच करू शकतो असे तुम्ही का म्हणाल?

१८ रचना ही नेहमी बुद्धिमान रचनाकाराची हाक देते. जिवंत प्राण्यात विविधि रचना सापडतात. ऑस्ट्रेलियात आढळणाऱ्‍या प्लॅटिपस या प्राण्याबद्दल जरा विचार करा: तो सश्‍याच्या आकाराचा आहे; त्याची लोकर पाणमांजरासारखी, चोच बदकासारखी, टाच कोंबडयासारखी आणि पंजे व जाळीदार पाय आहेत. तो सरपटणाऱ्‍या प्राण्यांसारखी अंडी घालतो व सस्तन प्राण्यांप्रमाणे आपल्या पिलांना पाजतो. तो जमिनीच्या पृष्ठभागावर व पाण्यातही राहू शकतो. तर आता सांगा की प्लॅटिपसची उत्क्रांती कशी झाली? हा प्राणी केवळ रात्रीला बाहेर पडत असल्यामुळे त्याला उत्क्रांतीवाद्यांचे भयंकर निशा स्वप्न म्हणता येईल. “एका खास व असाधारण जीवनाकरता निर्मिलेला अप्रतिम व व्यवस्थित रचलेला प्राणी” असे त्याविषयीचे वर्णन हार्वर्ड विश्‍वविद्यालयाच्या एका जीवशास्त्र प्राध्यापकाने केले. तर मग तो अप्रतिम रचनाकार कोण होता? तो केवळ देवच असला पाहिजे, जो असे म्हणतो की, “वनातील सर्व पशु . . . माझे आहेत.”—स्तोत्रसंहिता ५०:१०.

१९. (अ) मंजुळ गाणे गाणारा छोटा पक्षी कोणता आश्‍चर्यकारक पराक्रम करून दाखवितो? (ब) हे सर्व करणे त्याला कसे जमते?

१९ यासोबतच कित्येक प्राण्यात जी उपजत बुद्धी आम्हाला दिसते तिजबद्दल काय? उदाहरणार्थ, अमेरिकत आढळणारा मंजुळ गाणे गाणारा, डोक्याचा भाग काळ्‌या रंगाचा असणारा पक्षी पहा. त्याचे वजन फक्‍त तीन चतुर्थांश औंस (२१ ग्राम) एवढेच आहे. अलास्का ते न्यू इंग्लंडपर्यंत भरारी मारण्यासाठी शरद ऋतुतील योग्य हवामान कसे निवडावे हे त्याला कळते. तेथे जाऊन तो चांगले खाद्य खातो व थंडीच्या हवामानासाठी थांबून राहतो. नंतर तो उड्डाण घेतो व २०,००० फूट (६,१०० मिटर) आणि अधिक उंचीवरून फवाऱ्‍याच्या वेगाने उडत आफ्रिका खंडापर्यंत येतो. येथे त्याला प्रतिकारात्मक वारा लोटून दक्षिण अमेरिकेच्या त्याच्या जागी बरोबर आणतो. या पक्ष्याच्या उपजतबुद्धीचे कार्यवहन वाटाण्याच्या आकाराएवढ्या त्याच्या छोट्या मेंदूत संग्रहीत असते. कोणा उत्क्रांतीवाद्याला ही उपजतबुद्धी या पक्षाला कशी लाभली ते सांगता येईल का? त्याला ते जमणार नाही. पण पवित्र शास्त्र दर्शविते की यहोवा, “आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व काही” गोष्टी ज्यात उपजतबुद्धि असणारे “अत्यंत शहाणे” प्राणीही आहेत त्या सर्वांचा थोर निर्माता असून तोच सर्वसूज्ञ आहे.—स्तोत्रसंहिता १४६:५, ६; नीतीसूत्रे ३०:२४–२८.

तुम्ही कृतज्ञ आहात का?

२०. (अ) आम्हासभोवताली पसरलेल्या अद्‌र्भित गोष्टींविषयीचे कोणते स्पष्टीकरण देता येईल? (ब) आमच्या निर्मात्याचा दयाळूपणा आम्हासंबंधाने कसा व्यक्‍त होत आहे? (क) सत्याचे समर्थक या अर्थी आमचा प्रतिसाद कसा असावा?

२० एकंदरीत प्रकरणाचे सत्य हे आहे: आकाशात प्रीतीयुक्‍तता व्यावहारिकपणा दाखविणाऱ्‍या भयप्रेरित गोष्टी व शिवाय या पृथ्वीवर आम्हासभोवताली पसरलेली निर्मिती ही प्रेमळ व सर्वसमर्थ रचनाकाराकरवी धडविलेली आहे! आम्हापाशी असणारी देव–प्रणीत इंद्रिये सर्वसाधारण स्थितीत वातावरणाशी जुळते घेऊन आमचे जीवन केवढे आनंदी करतात बरे! आम्ही पहात असलेला सूर्यास्ताचा दिमाखी थाट, आम्ही वास घेतो त्या फुलांचा दर्प, आम्ही चव घेतो ती सुमधूर फळे, आमचे मन उल्लासित करणारा आल्हाददायक वारा, जंगलात आमच्या कानी पडणारे मधुर संगीत—यासर्व गोष्टी आमचा निर्माता व देव याच्या दयाळूपणाचे केवढे थोर वक्‍तव्य करतात! (स्तोत्रसंहिता १३६:१–६, २५, २६) तर मग या अभक्‍त जगात सत्याचे समर्थन करून आम्ही आपली कृतज्ञता केवढ्या कळकळीने व्यक्‍त करावी बरे! खरेच, देवाचे “वचन सत्य आहे”!

[तळटीपा]

a येशू ख्रिस्ताने शिकविलेल्या व प्रकटीकरण ४:११; मत्तय १९:४; लूक २४:४६, ४७; मत्तय २०:२८; ६:१०; योहान ५:२८, २९; १७:३; लूक २३:४३ येथे आढळणाऱ्‍या पवित्र शास्त्रीय सत्याचा पडताळा करा.

b कार्ल मार्क्स यांनी म्हटले: “डार्विनचे पुस्तक फार महत्वाचे आहे. इतिहासात वेळोवेळी वर्गाच्या श्रेष्ठतेविषयीचे जे लढे झाले त्याचा आशय असणारे पुस्तक मला आधार देते.”

सत्याचे समर्थन करताना तुम्ही याची कशी उत्तरे द्याल?

◻ सत्य पणाला कसे लागले?

◻ पवित्र शास्त्रीय सत्य बाबेलोनी चुकांना कसे उघड करून दाखविते?

◻ जीवनाचा उगम व विविध जातीविषयींचे स्पष्टीकरण केवळ कोणत्या आधारे देता येईल?

◻ जिवंत प्राण्यातील रचना आम्हाला काय सांगते?

◻ आम्ही आमच्या निर्माणकर्त्याचे कसे आभार मानू शकतो?

[१० पानांवरील चित्र]

सत्याच्या विरोधकांना येशूने अगदी साध्या शब्दात म्हटले, “तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला आहा”

[१२ पानांवरील चित्र]

चार्ल्स डार्विन—वानर–नर तत्वाचा उत्पादक

[१३ पानांवरील चित्र]

वेस्टमिन्स्टर ॲबे येथे चर्च ऑफ इंग्लंडने डार्विनची प्रतिष्ठापना घडविली

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा