वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 ३/१ पृ. ३१
  • वाचकांचे प्रश्‍न

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वाचकांचे प्रश्‍न
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • मिळती जुळती माहिती
  • “जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील”—कसे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • पृथ्वीबद्दल देवाचा काय उद्देश आहे?
    देव आपल्याकडून काय अपेक्षितो
  • पृथ्वी
    सावध राहा!—२०१५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 ३/१ पृ. ३१

वाचकांचे प्रश्‍न

◼ काही पवित्र शास्त्र आवृत्तीत स्तोत्रसंहिता ३७:२९ असे भाषांतरीत आहे: “नीतीमान देशाचे वतन पावतील, त्यात ते सर्वदा वास करतील.” हे इस्त्राएल लोकांनी वचनयुक्‍त देशाचा कायमचा ताबा मिळविण्यासंबंधी उल्लेखिलेले आहे का?

नाही. असे प्रतिपादन त्या प्रेरित अभिवचनाचा निराधार व मर्यादित उलगडा ठरेल. ३७ वे स्तोत्र नीतीमानांना आमच्या पृथ्वीवर सदासर्वदा जगण्याच्या भवितव्याची आशा देते.

स्तोत्रसंहिता ३७:२९ चे वर नमूद असणारे भाषांतर किंग जेम्स व्हर्शनमधील आहे. इतर काही आवृफ़ांप्रमाणेच हेही इ.रेट्‌स या इब्री शब्दाचे भाषांतर “देश” असे करते. इ.रेट्‌स हा शब्द भिन्‍न प्रांत वा एखाद्या राष्ट्राच्या क्षेत्राला, जसे की “शिनार देश” किंवा “मिसर देश” याला उल्लेखू शकतो.—उत्पत्ती १०:१०, ११; २१:२१; स्तोत्रसंहिता ७८:१२; यिर्मया २५:२०.

याकरताच, स्तोत्रसंहिता ३७:११, २९ इस्त्राएल लोक वचनयुक्‍त देशी कायमचे रहिवासी असू शकत होते वा असावयास हवे होते असे सुचवू शकते. देवाने अब्राहामासोबत केलेल्या कराराच्या अनुषंगाने, देवाने त्यांना दिलेल्या देशी राहून तेथे पिढ्यान्‌पिढ्या त्याचे आशिर्वाद अनुभवायचे होते. पण ते तसे घडून आले नाही, कारण इस्त्राएल देवास अविश्‍वासू ठरले.—उत्पत्ती १५:१८–२१; १७:८; अनुवाद ७:१२–१६, २२; २८:७–१४; ३१:७; यहोशवा २१:४३–४५.

तथापि, इ.रेट्‌स चा अर्थ स्तोत्रसंहिता ३७:११, २९मध्ये इस्त्राएलांना दिलेल्या देशापुरताच मर्यादित असला पाहिजे असे दर्शविणारा शास्त्रवचनीय आधार नाही.

ए हिब्रु ॲण्ड लेक्सिकन ऑफ द ओड टेस्टमेंट (जेसेनियस, ब्राऊन, ड्रायवर आणि ब्रीग्स; १९५१) मते इ.रेट्‌स चा अर्थ: “१. अ. पृथ्वी, सबंध पृथ्वी (एखाद्या विशिष्ट जागेच्या वैधर्म्यतेत) . . . ब. पृथ्वी, स्वर्ग, आकाश यांच्या विरुध्द दिशेस असणारी . . . क. पृथ्वी=पृथ्वीवरील निवासी . . . २. देश= अ. राष्ट्र, क्षेत्र . . . ब. प्रांत, परिसर . . . ३. अ. जमीन, जमिनीचा पृष्ठभाग . . . ब. माती, सुपीक.” विल्यम विल्सन यांचे ओल्ड टेस्टमेंट वर्ड स्टडीज हे पुस्तक इ.रेट्‌सबद्दल म्हणते: “पृथ्वी, व्यापक अर्थाने. तिचा निवासी भाग व निर्मनुष्य विभाग; पृथ्वीच्या पृष्ठभागावरील काही भाग मर्यादित रुपाने दाखविणारे शब्द, जसे की देश किंवा राष्ट्र.” अशा प्रकारे त्या इब्री शब्दाचा पहिला व मुलभूत अर्थ आमचा ग्रह, किंवा गोलार्ध, पृथ्वी हा आहे.

स्तोत्रसंहिता ३७:११, २९ याचे जेव्हा ग्रीक भाषेत सेप्ट्युजंट मध्ये भाषांतर झाले तेव्हा इ.रेट्‌स या इब्री शब्दाचे गे या ग्रीक शब्दाकरवी भाषांतर झाले, ज्याचा अर्थ, “लागवड करण्याजोगा किंवा सुपीक प्रदेश असणारी पृथ्वी” असा होतो. हाच गे शब्द येशूच्या मत्तय ५:५ मधील अर्थपूर्ण भविष्यवादात वापरण्यात आला: “जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील.”

हे उघड आहे की स्तोत्रसंहिता ३७:११ च्या अभिवचनाचे अवतरण घेऊन बोलत असता येशू वचनयुक्‍त देशाविषयी सांगत नव्हता. त्याचे अभिषिक्‍त अनुयायी त्याजबरोबर स्वर्गात राजे–याजक या अर्थी राहून त्याच्या बरोबर या सबंध पृथ्वी गोलार्धावर अधिपत्य गाजविण्यात सहभागी होतील. (प्रकटीकरण ५:१०) याचप्रमाणे मानव या नात्याने सार्वकालिक जीवनाची प्राप्ती करणारे सौम्य जन या सबंध पृथ्वीवर नंदनवनाची स्थिती आणण्यासाठी मदत देतील. (प्रकटीकरण २१:४; उत्पत्ती १:२८) अशाप्रकारे आम्ही सर्वजण भावी काळात होणाऱ्‍या अभिवचनाच्या भव्य पूर्णतेकडे डोळे लावू शकतो: “चांगले लोक पृथ्वीचे वतन मिळवितील. तिच्या मध्ये ते सर्वकाळासाठी राहतील.”—स्तोत्रसंहिता ३७:२९, फेन्टन.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा